खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

0
1479
खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे , स्वच्छ, सुंदर, मऊ, मुलायम व नितळ त्वचा कुणाला नाही आवडणार बरे. आज कल सौंदर्याच्या बाबतीत सर्वजण जागृत असताना दिसून येत असतात. त्यासाठी अनेकजण बाजारातून महागडे क्रीम्स, पावडर आणून स्वतःवर त्याचा उपयोग करत असतात. कुठल्याही नवीन क्रीम ची जाहिरात टीव्हीवर आली की लगेच अनेक जण त्या क्रीमचा उपयोग करायला सुरुवात करतात. परंतु मित्रांनो, बाजारातून महागड्या क्रीमचा उपयोग करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय वर देखील भर घालू शकता. बाजारातल्या क्रीम तर या महाग असतातच शिवाय केमिकल रहित देखील असतात. त्यामुळे, चेहऱ्याला त्याचा उपयोग फारसा होईलच हे सांगता येत नाही. तर काही जण पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर ट्रीटमेंट घेत असतात. म्हणजेच आपण सुंदर दिसावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतात.

         मित्रांनो, काही उपाय हे घरात देखील असतात. जसे की आपल्या स्वयंपाक घरात काही मसाले पदार्थ यांचा उपयोग करून देखील आपण आपले सौंदर्य वाढवू शकतो. तर मग बाहेरील महागड्या वस्तू आणून ते उपाय करण्यापेक्षा आपण घरगुती उपाय करण्यावर देखील भर द्यायला पाहिजे. आपल्या घरातील काही साधे सोपे उपाय असे असतात की ज्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून शकतो. तर मित्रांनो खोबरेल तेल हे तर तुम्हाला ठाऊकच असेल. हो आपण खोबरेल तेल हे केसांवर लावण्यासाठी त्याचा उपाय करत असतो. खोबरेल तेल केसांना लावल्याने केस मुलायम व वाढण्यास देखील मदत होत असते. शिवाय आपण खोबरेल तेलाचा आपल्या चेहऱ्यावर देखील उपयोग करू शकतो. हो मित्रांनो खोबरेल तेलामुळे आपली त्वचा ही मुलायम व चमकदार होण्यास मदत होऊ शकते. आपण कुठलाही प्रकारचा घरगुती उपाय करत असू तेव्हा आपल्याला खोबरेल तेलाची गरज ही लागते. शिवाय खोबरेल तेलाचे अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्यामुळे आपल्याला कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

   

खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यामुळे होणारे फायदे:-

      मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या त्वचेसाठी काहीना काही उपाय करत असतात. आपली त्वचा देखील सुंदर मऊ मुलायम डाग विरहित दिसावी यासाठी अनेक जण काहीतरी क्रीम्स चेहऱ्यावर लावून त्वचा सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मित्रांनो बाजारातली महागडे क्रीम चेहऱ्यावर लावल्यामुळे फायदा होईलच असे नाही शिवाय पैसेही अधिक खर्च होतील आणि पाहिजेत असे  उपयोग चेहऱ्याला होऊ शकणार नाही. प्रत्येक जणांची त्वचा ही वेगळ्या प्रकारची असते काहींची सॉफ्ट असते तर काहींची कडक असते, काहींची ऑईली असते तर, काहींची कोरडी त्वचा असते. त्यामुळे अश्या क्रीम लावल्यामुळे चेहऱ्याला एलर्जी देखील होऊ शकते. तर मित्रांनो त्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो ज्यामुळे आपल्या त्वचेला एलर्जी देखील होऊ शकणार नाही. तुम्हाला तुमची त्वचा ही नितळ स्वच्छ मऊ मुलायम करावयाची असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावून बघू शकतात. खोबरेल तेल लावल्यामुळे अनेक फायदे आपल्या चेहऱ्याला होऊ शकतात तर ते कोणते याबद्दल आता आपण जाणून घेऊयात!

 • खोबरेल तेलामध्ये एक नैसर्गिक ओलावा असतो म्हणजेच आपन ल्याला मॉइस्चरायझर असे देखील बोलू शकतो. खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्यामुळे आपली त्वचा ही मऊ व मुलायम होण्यास मदत होत असते. त्यासाठी रात्री तुम्ही झोपण्याआधी खोबरेल तेलाचे पाच सहा थेंब घेऊन चेहऱ्याला त्या तेलाने हळुवारपणे गोलाकार पोझिशन मध्ये मालीश करायला हवी. असे नियमित केल्या मुळे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागेल.
 • खोबरेल तेल लावल्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारे नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होईल शिवाय तुमची त्वचा कोरडी लवकर पडणार नाही.
 • खोबरेल तेल चेहऱ्यावर लावून  मालिश केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन देखील व्यवस्थित वाढू लागेल जेणेकरून तुमच्या त्वचेवर पिंपल्स देखील लवकर येणार नाहीत शिवाय त्वचा ही नितळ देखील होऊ लागेल.
 • रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचे पाच सहा थेंब व विटामिन कॅप्सूल चे दोन थेंब एकत्रित मिक्स करून ते चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मालिश करावी. एक प्रकारे हे नाईट क्रीम म्हणून चेहऱ्यावर काम करेल. असे तुम्ही नियमित केल्यामुळे तुमची चेहऱ्याची त्वचा ही ग्लो करू लागेल. एक वेगळीच चमक तुमच्या चेहऱ्यावर येण्यास सुरुवात होऊ लागेल.
 • खोबरेल तेलामध्ये विटामिन ई कैप्सूल चे काही थेंब मिक्स करून त्याने चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मालिश केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते. तसेच हे नियमित लावल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या देखील नाहिश्या होतील आणि लवकर सुरकुत्या देखील पडणार नाहीत.
 • हिवाळ्याच्या दिवसात थंड वातावरण असते. अशावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा लवकर कोरडी पडणार नाही शिवाय तुमच्या त्वचेवर ओलावा टिकून राहील ज्यामुळे  तुमची त्वचा देखील फाटणार नाही. हिवाळ्यामध्ये ओठ देखील कोरडे पडत असतात. त्यामुळे, तुम्ही ओठांवर देखील खोबरेल तेल लावून हळुवारपणे मसाज करायला हवी. जेणेकरून, तुमचे ओठ मऊ, मुलायम व चमकदार दिसू लागण्यास मदत होऊ शकते.
 • अनेक जणांना डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडत असतात. तर तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सर्कुलर मोशन मध्ये खोबरेल तेलाने मालिश करायला हवी. असे नियमित केल्याने तुमच्या डोळ्या खालची काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच डोळ्याखाली सुरकुत्या देखील नाहीश्या होऊ लागतील.
 • तसेच खोबरेल तेलामध्ये साखर बारीक करून तेलामध्ये मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब म्हणून देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. त्यामुळे देखील तुमच्या चेहर्‍यावरील ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होऊ शकते शिवाय तुमची चेहऱ्यावरील त्वचा ही सुंदर दिसण्यात देखील मदत होऊ शकते.
वाचा  वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी हवी

खोबरेल तेलाने तुमच्या चेहऱ्यावर मालिश केल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतात. खोबरेल तेलाचा उपयोग तुमच्या चेहऱ्यावर केल्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या देखील नाहीश्या होत जातील. शिवाय, लवकर सुरकुत्या ही पडणार नाहीत. तसेच, तुमच्या चेहर्‍याची त्वचा मऊ, मुलायम नितळ होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. तर नक्कीच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खोबरेल तेल वापरून बघू शकतात.

खोबरेल तेल खाण्याचे फायदे:-

आयुर्वेदिक दृष्टीने खोबरेल तेल हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. खोबरेल तेल हे अँटिऑक्सिडंट ने संपूर्ण असते. त्याचे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असे फायदे होऊ शकतात. मित्रांनो खोबरेल तेल त्वचेवर लावल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. तसेच खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यामुळे कशाप्रकारचे फायदे होऊ शकतात हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेच आहे. तसेच खोबरेल तेल खाण्याचे फायदे देखील अनेक प्रकारे आपल्याला होऊ शकतात.

 • खोबरे तेल खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत असते. म्हणजेच खोबरेल तेल खाल्ल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होत असते.
 • खोबरेल तेल खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी आवश्यक ती ऊर्जा टिकून राहण्यास मदत होत असते ज्यामुळे आपण कुठले प्रकारचे काम करत असू तर आपल्याला लवकर थकवा येणार नाही. व अशक्तपणा देखील दूर होण्यास मदत होऊ शकते.
 • खोबरेल तेल खाल्ल्यामुळे हृदय रोग या सारख्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तसेच, आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो.
 • खोबरेल तेल खाल्ल्यामुळे आपली भूक ही कमी प्रमाणात होत असते. आणि दीर्घ काळ भूक न लागल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही वितळण्यास मदत होत असते शिवाय, लठ्ठपणा देखील कमी होण्यास मदत होत असते.
 • खोबरेल तेलाचे सेवन केल्यामुळे आपल्या दातांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते त्यासाठी आपण माऊथ वॉश प्रमाणे खोबरेल तेलाचा उपयोग करू शकतो. जेणेकरून आपल्या मुखातील दुर्गंध देखील जाण्यास मदत होत असते व दाताचे देखील संरक्षण होऊ शकते.
 • खोबरेल तेलाचे सेवन केल्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते शिवाय आपल्या त्वचेची पोत देखील सुधारु लागते.
वाचा  अक्रोड चे फायदे

तर मित्रांनो, खोबरेल तेलाचा त्वचेवर उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात शिवाय खोबरेल तेलाचे सेवन केल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तर नक्कीच तुम्ही देखील खोबरेल तेलाचा उपयोग करून घेऊ शकतात.

        मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here