डोळे खोल जाणे

0
624
डोळे खोल जाणे
डोळे खोल जाणे

नमस्कार मित्रांनो, हल्लीच्या धावपळीत आपण स्वतःकडे पुरेसे लक्ष देत नाही. तसेच जास्त कामाचा ताण – तणाव असल्यामुळे, आपल्या आहाराकडे ही लक्ष जात नाही. तसेच त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोय. आपल्याला शारीरिक व मानसिक तक्रारी निर्माण होतात. तसेच कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण घरी वर्क फ्रॉम होम या जबाबदारीत होते. तासन्तास कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, यासारख्या गोष्टींवर आपला प्रेशर होता. त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर तर पडलाच, पण आपल्या डोळ्यांवर ही पडला. त्या कारणांमुळे आपले डोळे खोल जायला लागले.

मित्रांनो आपल्या शरीरातील एक-एक अवयव फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये एखाद्या अवयवाला दुखापत झाली, तर आपला संपूर्ण लक्ष त्याच्यात राहते. आपल्या शरीराचा मुख्य घटक तर आपले डोळे आहे. त्याच्यावरच आपल्याला दिसते आणि त्याच्यावरच आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. तसेच  डोळे खोल जाण्याची कारणे नेमकी कोण कोणती असू शकतात? तसेच डोळे खोल कोणत्या गेल्यास कोणकोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो ? ते आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया, की डोळे खोल गेल्यावर काही घरगुती उपाय योजना ! 

डोळे खोल जाण्याची कारणे :

मित्रांनो डोळे खोल जाण्याची अनेक कारणे आहेत, तर मग ती नेमकी कोणकोणती? चला तर जाणून घेऊयात. 

  • जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर अपूर्ण झोपेमुळे डोळे खोल जाऊ शकतात. 
  • शारीरिक तसेच मानसिक ताण-तणाव यामध्ये डोळे खोल जातात. 
  • जर तुम्ही सतत एखाद्या गोष्टीची चिंता करताय, तर त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावरही पडतो. तसेच डोळे खोल  जातात आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. 
  • शरीरात विटामिन्स ची कमतरतेमुळे हे डोळे खोल जातात. 
  • शरीरात पाण्याची कमतरता आल्यामुळे, तुमच्याशी तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्या होतात आणि त्यामुळे डोळे खोल जातात. 
  • तुम्ही दीर्घ आजारापासून बाहेर निघाले असणार, तर त्याची झीज पूर्ण होण्यास वेळ लागतो, व तुमचे डोळे खोल जातात. 
  • तासन्तास टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या गोष्टींचा अति वापर केल्यामुळे, त्याचा प्रभाव डोळ्यांवर पडतो. त्यामुळे ही डोळे खोल जातात. 
  • हिरव्या पालेभाज्यांचे गुणधर्म शरीरात कमी झाल्यासही डोळे खोल जातात. 
  • तसेच तुमचे वाढते वय, हे ही डोळे खोल जाण्याची कारणे ठरू शकते. 
  • तसेच तुम्हाला अमली पदार्थांचे, जसे की दारू, सिगरेट, तंबाखू यासारख्या गोष्टींची सवय असेल, तर त्यामध्ये ही डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. 
वाचा  पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

डोळे खोल गेल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत ? 

मित्रांनो डोळे खोल गेल्यास, तुम्ही आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत. तर मग ते जाणून घेऊयात! 

शरीरासाठी पुरेसे पाणी प्या :

हो, हा अगदी साधा उपाय आहे. आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. जर तुम्ही शरीरात पाण्याची कमतरता केली, तर तुम्हाला डीहायड्रेशन, अशक्तपणा, थकवा, तसेच थरथरणे, यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच या गोष्टी घडल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर व डोळ्यांवर ही पडतो. त्यामुळे तुमचे डोळ्याखाली खोल वर्तुळे होतात, किंवा काळी वर्तुळे येतात. यासारख्या गोष्टी जर तुम्हाला टाळायचे असतील, तर तुम्ही तुमच्या शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायला हवेत. तुम्ही दिवसातून किमान सात ते आठ लिटर पाणी प्यायला हवे. पाणी पिल्याने तुमचे शरीर प्युरिफायर होते व तुम्ही निरोगी दिसतात. 

आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्या खा :

हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. कारण त्याच्यामध्ये विटामिन्स, जीवनसत्वे, मिनरल्स, आयर्न, लोह, झिंक यासारखे गुणधर्म असतात आणि ते आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर राहतात. जर तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य जपायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आहारात नियमित हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. त्यामुळे तुमचे डोळे निरोगी रहातात. शिवाय डोळ्यांना लाली येत नाही व तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असेल, तर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तेही जाण्यास मदत होते. व या पालेभाज्या शरीरातील रक्त शुद्ध होते व त्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर व सौंदर्यावर ही पडतो. 

डोळ्यांची व्यायाम करा :

सतत टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप या गोष्टींवर नजर लावल्यामुळे, तुमचे डोल्याखाली काळे होते. शिवाय दुखतात. तसेच सारखे आग मारतात, अशावेळी तुम्ही त्या कामांमध्ये थोडे अंतर ठेवून करत जावे. तसेच तुम्ही नियमित डोळ्यांचे व्यायाम करावेत. त्याने डोळ्यांच्या नसांना आराम मिळतो. डोळ्यांचे व्यायाम करावेत. जसे की डोळे बंद करा, डोळे उघडा, डाव्या साईडला बघा, उजव्या साईडला बघा, वर बघा, खाली बघा, त्यानंतर डोळ्यांची उघडझाप करा, यासारखे व्यायाम करू शकतात. त्याने डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांचे व्यायामांचे प्रकार असतात, तेही तुम्ही युट्युब वर बघू शकतात. 

वाचा  सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय त्याबद्दल काही शंका-कुशंका जाणून घेऊयात

बदाम तेलाने मसाज करा :

बदाम मध्ये विटामिन इ मुबलक प्रमाणात असतात. त्यासाठी तुम्ही डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे जमले असल्यास, ते फायदेशीर ठरतात. तुम्ही डोळे बंद करून, डोळ्यांचा आजूबाजूचा भाग, बदाम तेलाने मसाज केल्यास, डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय डोळ्यांच्या दोघ बाजूला कपाळाच्या साईडला, डोळ्यांचे प्रेशर पॉईंट असतात. त्या पॉईंटवर तुम्ही मसाज करून प्रेस करा. त्यामुळे डोळ्यांच्या नसांना आराम मिळतो. तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे असेल, तर बदाम तेलाने मसाज केल्याने ते जाण्यास मदत मिळतात. 

तुमच्या आहारात विटामिन्स ई आणि सी असणारे घटक घ्यावेत :

हो, विटामिन ई आणि सी आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. या घटकांमुळे डोळ्यांना लागणारे गुणधर्म मिळतात. तसेच डोळ्यांचे त्रास असतील, तर तेही जाण्यास मदत मिळते. शिवाय डोळ्यांना लाली येणे, आग होणे, डोळे खोल जाणे, यासारख्या गोष्टी टळतात, त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नेहमी बदाम, अक्रोड, ब्रोकली  सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, तसेच हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी यासारखी फळे या गोष्टी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. 

आहारात मासे खाल्ल्याने, डोळ्यांचे आरोग्य सुधारते :

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मासेही फायदेशीर असतात. कारण माशांमध्ये ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या डोळ्याला त्याचे पोषक घटक मिळतात. शिवाय डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पण तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर अशा वेळी मग तुम्ही , ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ची गोळी घेऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यामधील लागणारे घटक द्रव्य तुम्हाला त्या गोळी मार्फत मिळतात. 

डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास :

मित्रांनो खोल डोळे गेले की, आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागतात. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात, जसे की काकडी  चकत्या डोळ्यावर ठेवाव्यात. बटाट्याचा रस लावू शकतात, तसेच कोरफडचा गर ही लावू शकतात. तसेच डोळ्यांना विटामिन ई कॅप्सूल मिळतात, तेही डोळ्याखाली लावू शकतात. तसेच डोळे बंद करून थंड पाण्याच्या घड्या तुम्ही डोळ्यावर ठेवू शकतात. यासारखे साधे सोपे उपाय तुम्ही डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास करू शकतात. 

वाचा  स्वप्नात आई एकविरा दिसणे शुभ की अशुभ ?

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की डोळे खोल गेल्यावर तुम्ही त्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय योजना, करू शकतात. तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवूनही करू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

                        धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here