मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे

0
4464
मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे
मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो मटकी म्हटले, की मस्त आपल्या डोळ्यासमोर झणझणीत मिसळ येते. असे वाटते की, आता आपण त्यावर ताव मारू. मटकी ही कडधान्य आहे व कडधान्य आपल्या शरीरासाठी  फायदेशीर राहतात. मटकी गावरानी असावीत. मिसळ ही कोणाला आवडत नाही, असे कोणीच नाहीत. कोल्हापुरी मिसळ तर फेमस आहे. तिची चवही न्यारीच आहे. त्यावर मस्त चिवडा, कांदा, कोथिंबीर, निंबू, मस्त झणझणीत तर्री, पाव घालून किती छान लागते ना ! तसेच लहान मुलांना मटकीची उसळ ही आवडते. मोड आलेली मटकी खाण्याचे खूप फायदे आहेत. मटकी मध्ये आपल्याला भरपूर विटामिन्स मिळतात. प्रथिने मिळतात. कॅल्शियम मिळतात. मटकी खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात.

तसेच मटकी जर तुम्ही तुमच्या आहारात खाल्ली तर तुमचे सौंदर्य ही निखारते, तसेच कच्ची मटकी खाल्ल्याने, तुमची हाडे मजबूत होतात, कारण मटकी मध्ये कॅल्शियम असते, आपल्यासाठी फायदेशीर असतात. तसेच मटकी ही नेहमी मोड आलेली खावीत. त्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात. काही जणांना मटकी पासून होणारे फायदे हे माहीत नसतात. तर आपण आज त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की मटकी खाण्याने तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात?  तसेच मटकीला मोड तुम्ही कशा प्रकारे आणू शकतात? चला तर मग जाणून घेऊयात ! 

मोड आलेली मटकी खाल्ल्यास, तुम्हाला कोणकोणते फायदे होतात, ते जाणून घेऊयात ! 

मित्रांनो मोड आलेली मटकी खाल्ल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया. 

वाचा  पुदिन्याचे सेवन केल्यावर होणारे शरीराला विविध फायदे :-

रक्तदाबाचे समस्या कमी होतात :

मटकी मध्ये फायबरचे प्रमाण असते. तसेच जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो व तुम्हाला रक्तदाब सारख्या समस्या होतात. अश्यावेळी जर तुम्ही मोड आलेली मटकी खाल्ली, तर तुम्हाला खूप फायदा होतो. मटकी खाल्ल्याने तुमची कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच मटकी मध्ये पोटॅशियम असते. पोटॅशियम हे तुमच्या रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत करतो. मग तुम्हाला रक्तदाब यासारख्या समस्या होत नाही. 

ॲनिमियाचा त्रास होत नाही :

खूप  स्त्रियांना मासिक पाळी मध्ये, रक्त प्रवाह जास्त जातो. अशा वेळ ते अशक्त पडतात व त्यांना, ॲनिमियाचा त्रास होतोय, तसेच गर्भवती महिलांनी जर त्यांच्या आहारात मटकी खाल्ली, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. कारण मटकी मध्ये आयर्न, लोह असते. ते शरीरातसाठी फायदेशीर असते. जर तुम्ही आहारात मोड आलेली मटकी खाल्ली, तर या त्रासापासून तुम्ही सुरक्षित राहू शकतात. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण मटकी जर तुम्ही तुमच्या आहारात खाल्ल्याने,  तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण मटकी मध्ये झिंकचे प्रमाण असते. ज्या लोकांना सारखे-सारखे आजारी पडण्याच्या समस्या असतील, अशा लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ति कमी असते. असे वेळी त्यानी त्यांच्या आहारात मोड आलेले मटकी व कडधान्य खाल्ले, तर त्यांच्या शरीराला योग्य विटामिन्स, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, लोह या घटकांचा त्यांच्या शरीरात, समावेश होतो व त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

तुमचे वजन कमी होते :

मटकी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते, खरंच मटकी मध्ये फायबर, कोलेस्‍ट्रॉल मध्ये वजन घटण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील कमी होते, व  फायबर तुमच्या शरीराला मिळतात. तसेच मटकी मध्ये ओमेगा प्रमाण असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच मटकी खाल्ल्याने, तुमची पोट भरल्यासारखे वाटते. व तुम्हाला भूक लागत नाही, त्यामुळे वजन वाढीचे समस्या होत नाही. तसेच वजन कमी करायचे असेल, अशा वेळी तुम्ही मटकी कच्ची खाल्ली, तरी चालते, तसेच तुम्ही गरम पाण्यात उकळून मीठ टाकून, ती मटकी खाल्ली तरीही चालते. 

वाचा  नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे?

मटकी खाल्ल्याने मलावरोध त्रास कमी होतो :

मित्रांनो,  जर तुम्ही तुमच्या आहारात मटकी खाल्ली, तर तुम्हाला मलावरोधाचा त्रास कमी होतो. कारण मटकी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. व ते तुमच्या साठी फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या आहारात नियमित मोड आलेली मटकी खास जावे, त्यामुळे तुम्हाला यासारख्या समस्या कमी प्रमाणात होतात. मोड आलेली मटकी खाण्याचे बद्धाकोष्टतेवर असे अनेक फायदे आहेत.

मटकी कोणी खाऊ नये ? 

मटकी शरीरासाठी चांगली असतेच. पण ज्यांना वाताची समस्या आहे, एसिडिटी, अपचन, गॅसेस च्या  सारख्या समस्या असतील, अशा लोकांनी मटकीचा वापर अगदी कमी प्रमाणात करावा. कारण मटकी खाल्ल्याने त्यांना अपचन, वात सारख्या समस्या येऊ शकतात. तसेच कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खावेत. प्रमाणाचे बाहेर खाल्ल्याने, त्याचा त्रास हा शरीराला होतो. तसेच मटकीची आहे, मटकी ही सकाळी नाश्त्यात खावीत. तसेच दुपारच्या जेवणात असली, तरी चालेल. पण रात्रीच्या वेळी मटकी खाऊ नये. त्यामुळे गॅस, अपचन सारख्या समस्या होतात. 

मटकीला मोड कसे आणावेत ? 

मटकीला मोड आणण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे. त्यासाठी मटकी तुम्हाला पाच ते सहा तास पाण्यामध्ये, भिजवून ठेवायची आहेत. त्यानंतर भिजलेली मटकी तुम्हाला एका सुती कापडावर काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तो कपडा झाकून ती मटकी एका टोपलीत ठेवून, त्यावर एक ताट ठेवून दहा ते बारा तासानंतर तुम्हाला ती मटकी काढायचे आहे. तुमच्या मटकीला मोड आलेले दिसतील, आणि ही मोड आलेली मटकी शरीरासाठी चांगली असते. तसेच तुम्हाला जर ही पद्धत समजली नसेल, तर तुम्ही युट्युब वर ही बघू शकतात. युट्युब वर ही मोड आलेली मटकी कशी करावी हे सांगितलेले आहेत. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मटकी पासून तुमच्या शरीराला किती सारे फायदे होतात, ते सांगितलेले आहे. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करून, जर तुम्हाला त्यासारख्या समस्येवर आराम मिळत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

वाचा  काळे मिठाचे फायदे

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here