लहान मुलांचे वजन कसे कमी करावे

0
1035
लहान मुलांचे वजन कसे कमी करावे
लहान मुलांचे वजन कसे कमी करावे

 

                 तर 2014 च्या अहवालानुसार मुलांमध्ये लठ्ठपणा फारच वाढत गेलेला आहे. आणि याचे एकमेव कारण म्हणजे पालक मुलांचे वजन वाढल्याने मुले गुटगुटीत दिसतात म्हणून पालक त्यांच्या वजन वर एवढे लक्ष देत नाही. तसेच त्यांच्या वजनाचे गांभीर्याने दखल घेत नाही. जर लहानपणीच मुलाचे वजन जास्त असले तर त्याला मोठ्यापणी जाऊन बरेच त्रासांना किंवा आजारांना सामोरे जावे लागू शकते. याचे गांभीर्य वेळ समजून आपण यावर काहीतरी तोडगा काढून हळूहळू का होईना मुलांचे वजन नियंत्रण मध्ये आणले पाहिजे. लहान मुलांचे वजन कसे कमी करावे हि गंभीर समस्या आहे.

  तुम्हाला माहिती आहे का की भारताचा लठ्ठपणा मध्ये तिसरा क्रमांक लागतो. म्हणजेच आपण आपल्या शारीरिक स्वस्त कडे लक्ष देत नाही. जर हे स्वास्थ आपले लहानपणापासूनच बिघडली असेल तर बऱ्याच वेळेस मोठे होऊन देखील आपले वजन वाढतच जाते व शरीर लठ्ठ राहते. बऱ्याच पालकांना वाटतं की मुलांनी खूप खाल्ला तर त्यांचे स्वास्थ्य चांगले राहील तसेच त्यांना काम करण्यासाठी किंवा इतर कामासाठी भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळेल म्हणून ते दर दोन तासाला लहान मुलांना खायला देतात. असं केल्यास मुलांना भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा तर मिळते पण अति ऊर्जा भेटल्याने देखील ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

                    कोणत्याही पाल्याला किंवा पालकांना असे वाटणार नाही की त्यांचे आयुष्य हळूहळू धोक्यात जावे. म्हणून स्वस्थ राहणे व निरोगी राहणे आपल्या सर्वांनाच आवडेल त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे आपले वजन नियंत्रण मध्ये राहणे फार गरजेचे आहे. जर वजन नियंत्रण मध्ये राहिले तर आपल्या शरीराच्या बऱ्याचशा समस्यांचे समाधान मिळते. भविष्यामध्ये जर वजन जास्त असतील तर त्यांना रोजच्या हालचाली करायला देखील कठीण होऊ शकत. रोजची काम करणे देखील त्यांच्यासाठी फार कठीण होऊन बसेल. आपण सुरुवातीपासूनच जर हळूहळू वजन नियंत्रण ठेवण्यासाठी चालू केले तर आपल्याला पुढे जाऊन एवढा त्रास होणार नाही. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की लहान मुलांचे वजन एवढ्या लवकर कसे वाढते. तसेच लहान मुलांची वजन नियंत्रण मध्ये राहण्यासाठी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो हेदेखील आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग बघुया.

लहान मुलांचे वजन इतक्या लवकर कसे वाढते ?

                   मुलांचे वजन बरेच वेळेस फटाफट वाढते कारण म्हणजे लहान मुलांना भूक फार लवकर लागते. तसेच ते दोन दर दोन तासाला काहीतरी खायला मागत असतात. शिवाय त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार इतका वाढलेला असतो की ते इकडे तिकडे धावपळ करता खेळ खेळतात यामुळे खाल्लेले अन्न लवकर जिरते व परत भूक लागते आणि सर्वात मुख्य कारण म्हणजे लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा ताण तणाव नसतो. जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होईल हे एक मुख्य कारण असू शकते लहान मुलांचे वजन भराभर वाढण्याचे.

वाचा  उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे

लहान मुलांचे वजन किती असावे ?

                   बर्‍याच पालकांचा प्रश्न असतो की त्यांच्या मुलाचे वजन त्याच्या वयानुसार किती असावे तर आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया.

  • जर तुमचा मुलगा/मुलगी सहा महिन्याचा असेल तर त्याचे किमान वजन 6 ते 9 किलो असले पाहिजे जर नऊ किलोपेक्षा जास्त वजन असेल तर त्या मुलाचे वजन नियंत्रण मध्ये करण्याची फार गरज आहे.
  • जर तुमच्या मुला/मुलीचे वय एक वर्ष असेल तर त्याचे वजन 8 किलो पासून 12 किलो पर्यंत असले पाहिजे.
  • आता आपण उंची नुसार वजन बघुया जर तुमच्या मुलगा/मुलगी उंची दोन फूट असेल तर तर त्यांचे वजन किमान 17 किलो पासून 21 किलो पर्यंत पाहिजे
  • तुमच्या मुलगा/मुलगी ची उंची तीन फुटाची असतील तर त्याचे किमान वजन 24 किलो पासून ते 30 किलो पर्यंत पाहिजे.
  • जर तुमच्या मुलगा/मुलगी ची उंची चार फुटाची असतील तर त्याच्या किमान वजन 32 किलो पासून 41 किलो पर्यंत पाहिजे.
  • तुमच्या मुलगा/मुलगी ची उंची पाच फूट आता एवढी असेल तर त्याची किमान वजन 42 किलोपासून 51 किलो पर्यंत पाहिजे.

                 तर वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांचे किंवा मुलीचे वजन ठरवू शकता किंवा नियंत्रणमध्ये ठेवू शकता. तसेच तुम्हाला तक्त्यानुसार फार मदत होईल की तुमच्या मुलाचे वजन किती असली पाहिजेत किंवा आता किती आहे यानुसार देखील तुम्ही तुमच्या मुलाच्या आराम मध्ये काही बदल करून तुमच्या मुलाचे वजन यंत्र मध्ये ठेवू शकता.

लहान मुलांचे वजन कसे कमी करावे ?

               तर आता आपण बघितले की वयोमानानुसार मुलांचे वजन किती असले पाहिजे पण आता आपण जाणून घेऊया की सर मुलांचे वजन अति प्रमाणामध्ये वाढले असेल तर आपण ते कोणत्या प्रकारे नियंत्रण मध्ये करू शकतो तर मग जाणून घेऊया.

फास्ट फूड पासून दूर ठेवा :

                 लहान मुलांना नेहमी फास्टफूड पासून दूर ठेवावे. कारण जर तुम्ही फास्ट फुल मुलांना दिले तर मुलांचे पोट नाही भरणार. पण फास्टफूडमध्ये जो कार्बोहायड्रेट्स व फ्याट असतो त्यामुळे मुलांचे वजन नक्कीच वाढेल. म्हणून कधीही मुलांना फास्ट फूड च्या जागी हिरव्या पालेभाज्या किंवा घरातलाच आहार द्यावा.

वाचा  चेहऱ्यावरील वांग चे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन करावे :

                  बरेच वेळेस मुलं एका जागी बसून मोबाईल मध्ये गुंतलेली असतात म्हणून जर तुम्ही त्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन केले तर त्या मुलांचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तसेच त्यांची हाडे देखील मजबूत होईल व त्यांच्या शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यास मदत देखील होईल. तसेच तुम्ही त्यांना विविध प्रकारचे शारीरिक खेळ किंवा व्यायाम देखील करून घेऊ शकतात जसे की सायकलिंग, पोहणे,पळणे ई.

सलाड बनवून द्या  :

                 जर अगदी लहान मुलं असतील आणि ज्यांचे वजन खूप असेल तरआकर्षक असे सलाट बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. सलाड मध्ये मुख्यता गाजराचा समावेश करावा कारण गाजरामुळे पोट भरतं व शरीराला प्रोटिन्स देखील मिळतात पण गाजरामुळे मुलांचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

साबुदाण्याचे पदार्थ :

                तुम्ही मुलांना साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार प्रकाराचे पदार्थ खाऊ घालू शकता कारण साबुदाण्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात. जेणेकरून मुलांचे वजन वाढत नाही किंवा वजन नियंत्रण मध्ये राहण्यास मदत होते. पण अति प्रमाणामध्ये साबुदाण्याचे सेवन मुलांना करू देऊ नये याची दक्षता तुम्ही घ्यावी कारण अति प्रमाणामध्ये साबुदाणा जर लहान मुलांनी खाल्ला तर ते त्या लहान मुलांसाठी धोकादायक असू शकते.

               तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की लहान मुलांचं वजन का वाढते. तसेच आपण आज हे देखील बघितले की लहान मुलांचे वयानुसार वजन किती असली पाहिजे याच बरोबर लहान मुलांचे वजन आपल्याला जर नियंत्रण मध्ये ठेवायचे असेल तर आपण कोण कोणत्या पद्धतीने लहान मुलांचे वजन नियंत्रण मध्ये ठेवू शकतो हे देखील आज आपण जाणून घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

 

                धन्यवाद !

 

                   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here