नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी खाण्याचे चे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. स्ट्रॉबेरी हिवाळ्यामध्ये तुम्हाला सर्वत्र मार्केटमध्ये दिसेल. तसेच तुम्ही महाबळेश्वरला कधी गेला असाल, तर तुम्हाला जिथे-तिथे स्ट्रॉबेरी ही झाडे दिसली असतीलच. ती झाडे बघून असा उत्साह येतो, की जसे जाऊन, ती तोडून लगेच खावेत. स्ट्रॉबेरी आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असते. तिची गोड रसदार चव मनाला मोहून जाते. लाल रंगाची स्ट्रॉबेरी दिसायला, अगदी सुंदर आणि मोहक असते.
तसेच आपण स्ट्रॉबेरीपासून जॅम, जेली, स्टोबेरी चा ज्युस, स्ट्रॉबेरी शेक, तसेच स्ट्रॉबेरी सिरप यासारखे पदार्थ बनवले जातात. स्ट्रॉबेरी मध्ये गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. लहानांपासून तर मोठ्यांना स्ट्रॉबेरी ही फार आवडते. तर मित्रांनो, आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? तसेच कोणते तोटे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात!
स्ट्रॉबेरी खाल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे, नेमके कोणकोणते?
मित्रांनो, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदे होतात. चला, तर मग जाणून घेऊयात,
स्ट्रॉबेरी मधील गुणधर्म :
मित्रांनो, स्ट्रॉबेरी मध्ये अनेक गुणधर्म असतात. स्ट्रॉबेरी मध्ये लोह, कॅल्शियम, तांबे, जीवनसत्वे, विटामिन्स, फॉलिक ऍसिड फ्लेवोनॉइड, ऑंटीॲक्सिडेंट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस मॅगनीज, नायट्रेट, तसेच एंटीइंफ्लेमेटरी यांचे प्रमाण असल्यामुळे, आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात.
हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :
मित्रांनो, या धावपळीच्या जीवनात, दगदगीच्या जीवनात आपल्या शरीराकडे आपले दुर्लक्ष होते. आपल्या शरीराला लागणारा आवश्यक गुणधर्म आपण लवकर घेत नाही. पण जर तुम्ही नियमित स्ट्रॉबेरी तुमच्या आहारात सेवन केली, तर त्यामधील गुणधर्म तुमच्या शरीराला मिळतात. शिवाय वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होतात, अशा वेळी स्ट्रॉबेरीचा वापर करायला हवा. कारण स्ट्रॉबेरी मध्ये मॅगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या हाडांमधील ठिसूळपणा जाण्यास मदत मिळते.
हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावशाली ठरते :
हो, तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित स्ट्रॉबेरी या फळाचा वापर केला, तर तुम्हाला तुमचे हृदयाचे आरोग्य जपता येते. कारण स्ट्रॉबेरी मध्ये फॉलिक ऍसिड चे, पोटॅशियमचे, फॉस्फरसचे प्रमाण असते. शिवाय ते रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात. रक्तातील साखरेची पातळी कमी होते, यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. शिवाय हृदयाशी संबंधित तक्रारी दूर होतात.
भूक वाढीसाठी फायदेशीर ठरते :
हल्ली भूक लागत नाही, या समस्या लहान मुलांच्या खूप प्रमाणात असतात. अशावेळी जर तुम्ही त्यांच्या आहारामध्ये नियमित स्ट्रॉबेरीचा वापर केला, तर तुम्हाला फरक जाणवेल. मुले स्वतःहून जेवण मागतील. स्ट्रॉबेरी ही भुक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय ती पचायला हलकी असते, तसेच पचनाची संबंधित तक्रारी ही मुलांच्या दूर होतात. त्यासाठी तुम्ही नियमित मुलांना स्ट्रॉबेरी ज्यूस किंवा स्ट्रॉबेरी मिल्क शेक किंवा, स्ट्रॉबेरी फळ नुसते खायला दिले तरी चालते.
उच्च रक्तदाबात फायदेशीर ठरते :
स्ट्रॉबेरी मध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, तसेच ऑंटी एक्सीडेंट चे प्रमाण असल्यामुळे, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्ही नियमित फळांसोबत स्ट्रॉबेरीच्या समावेश तुमच्या आहारात करा.
हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते :
स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. हो खरंच! कारण स्ट्रॉबेरी मध्ये लोह, खनिजे, विटामिन्स, कॅल्शियम, यासारखे गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे, तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते, व तुम्ही सशक्त होतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते :
मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण सतत बैठे काम, अवेळी खाणे, जागरण, पुरेशी झोप न होणे, तसेच चहा कॉफीचं प्रमाण घेणे, मैद्याचे पदार्थ खाणे, यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपले वजन वाढते. अशावेळी जर तुम्ही नियमित तुमच्या आहारामध्ये फळांचा तसेच स्ट्रॉबेरीचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. कारण स्ट्रॉबेरी मध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तसेच जर तुम्ही नियमित स्ट्रॉबेरी खाल्ली, तर तुम्हाला पोट भरल्यासारखे जाणवते. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
कॅन्सरच्या पेशी पासून बचाव होतो :
हो, स्ट्रॉबेरी मध्ये आपल्या शरीराला लागणारे आवश्यक ते गुणधर्म असतात. स्ट्रॉबेरी मध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, फॉलिक ऍसिड, anti-inflammatory असल्यामुळे, आपल्या शरीरातील कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशीवर प्रतिबंध राहतो. तसेच महिलांनी स्ट्रॉबेरी नियमित खाल्ल्यामुळे, त्यांना स्तनाचा कर्करोगापासून बचाव होतो.
तुमच्या सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते :
जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित स्ट्रॉबेरी खाल्ली, तर त्याचा परिणाम तुमच्या सौंदर्यावर होतो. कारण स्ट्रॉबेरी मध्ये विटामिन सी तसेच ऑंटीॲक्सिडेंट चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या सौंदर्यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय सौंदर्य उजळते, चेहऱ्यावर डाग वगैरे असेल, तर ते जाण्यास मदत मिळते. तसेच स्ट्रॉबेरी तुम्ही चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावल्यास, चेहर्यावरील काळसरपणा जाण्यास मदत मिळते.अशाप्रकारे स्ट्रॉबेरी खाण्याचे चांगले परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतात.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराला होणारे तोटे ?
मित्रांनो, स्ट्रॉबेरी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पण त्याचे प्रमाण अति जास्त झाले, जर जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ली, तर तुम्हाला पोटात गॅसेस, पोट फुगणे, या सारख्या समस्या होऊ शकतात. तसेच स्ट्रॉबेरी मध्ये पोटॅशियमचा जास्त स्त्रोत असल्यामुळे, तुम्हाला त्याचे दुष्परिणामही बघावे लागू शकतात. कारण हृदयासाठी जास्त पोटॅशियम हे घातक ठरते. तसेच, स्ट्रॉबेरी घेताना चांगली घ्यावी. तसेच ती स्वच्छ पाण्याने धुवावेत, नंतरच खावेत, कारण त्यावर पावडर मारलेली असते.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरी खाण्याचे, तुमच्या शरीराला होणारे व फायदे व तोटे सांगितले आहेत. तसेच जर तुम्हाला स्ट्रॉबेरीपासून अलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच खावीत. तसेच तुम्हाला आम्ही सांगितले माहिती आवडली असेल, व आम्ही त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काहीच शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद !