चेहऱ्यावरील वांग चे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

0
1449
चेहऱ्यावरील वांग चे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्यावरील वांग चे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

              आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये बहुतांश लोकांना पुरेसा वेळ नसतो तरी देखील ते त्यांच्या चेहऱ्याकडे फार लक्ष देतात. कारण प्रत्येकाची इच्छा असते की त्याचा चेहरा सुंदर व आकर्षक दिसावा. स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या केसांवर आणि चेहऱ्यावर असते. म्हणून देखील स्त्रिया चेहऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून महागड्या शस्त्रक्रिया व औषधे घेतात जेणेकरून इतरांपेक्षा सुंदर व आकर्षक दिसावे. याचप्रकारे माणसे देखील त्यांचा चेहरा ची फार काळजी घेतात आहे. सुंदर दिसण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करत असतात पण बरेच वेळा प्रयत्नांना यश येतेच असे नाही. बरेच वेळेस साईड-इफेक्ट देखील होतात किंवा काही इतर आजारांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते चेहरा विद्रूप दिसू लागतो. त्यात चेहऱ्यावरील वांग चे डाग हि एक मोठी समस्या !

                 कोणालाही आवडणार नाही की त्याचा चेहरा विद्रूप दिसावा किंवा इतरांपेक्षा कमी सुंदर दिसावा. इतकच काय तर चित्रपटातील कलाकार देखिले खूप पैसे खर्च करतात आपल्या चेहऱ्यावर पण ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो किंवा पुरेसा वेळ असतो. आपल्या शरीराला द्यायला तर त्यांनी काय करावे त्यासाठी आपण आज काही घरगुती उपाय बघणार आहोत. या वांग च्या डागांवर कारण हे डाग जर एकदा चेहऱ्यावर आले आणि त्यांना वेळीच आपण काढला नाही तर हे डाग चेहरा धरुन बसतात. म्हणजेच हे डाग चेहरा मध्ये मुरून जातात व एका विशिष्ट कालावधीनंतर हे डाग चेहऱ्यावरून जातच नाही. तर हे वांग चे डाग चेहऱ्यावरून घालवण्यासाठी आपण आज काही उपाय बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

वांग म्हणजे काय ?

                   तर वांग म्हणजे काय अशी परिस्थिती आहे जिथे आपल्या चेहऱ्याचा रंग असमान दिसू लागतो. म्हणजेच सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या चेहऱ्यावर कळ्या रंगाचे चट्टे दिसू लागतात. आणि याच चट्ट्यांमुळे आपला चेहरा विद्रूप दिसू लागतो. तसेच विज्ञानाचे भाषा मध्ये बोलायचं झालं तर मेलानोसाईट्स आपल्या चेहऱ्यावर प्रभावित होऊन आपल्यास पेशींना देखील रंग प्राप्त होतो. तू अशा परिस्थितीमध्ये आपल्या पेशी हळूहळू काळपट होत जातात व तो थर संपूर्ण चेहर्‍यावर पसरतो यालाच आपण वांग चे डाग असे म्हणू शकतो.

वाचा  अशोकाच्या पानांचे फायदे

चेहऱ्यावर वांग असल्यास काय करावे ?

                   तर डाग म्हणजे काय हे आपण बघितले आता आपण जाणून घेणार आहोत जर आपल्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील तर आपण काय करावे.

हानीकारक सूर्यकिरणांपासून बचाव करावा :

               जर आपल्या चेहऱ्यावर वांग चे डाग असतील तर आपण सुरुवातीस उन्हामध्ये जाऊ नये. तसेच प्रखर उन्हामध्ये जावे लागल्यास चेहऱ्यावर स्कार्फ किंवा रुमाल बांधावा जेणेकरून हानीकारक सूर्याच्या किरणांपासून तुमचा बचाव होईल. कारण यामुळे वांग चे डाग पसरण्याची शक्यता असते. तसेच या हर्मफुल रेज मुळे आपल्या चेहऱ्यावरील पेशींचा रंग अधिक काळा होत जातो व ते वांगचे चट्टे पसरत जातात.

सन स्क्रीन लावुनच बाहेर पडावे :

                असे म्हटले जाते की आपल्या चेहऱ्यावर सात प्रकारचे टप्पे असतात म्हणून सर्वात वरचा टप्पा किंवा वरची जी लेअर आहे तिला सन स्क्रीन लावावे. म्हणजे चेहर्‍यावर सन स्क्रीन लावूनच उन्हामध्ये जावे जेणेकरून वांग चे डाग पसरणार नाही व वांग चे डाग कमी होण्यास मदत होईल ही प्राथमिक गोष्ट आपण आपल्या बाजूने करू शकतो.

वांगचे डाग जाण्यासाठी कोणते घरगुती उपाय कराल ?

               चला तर मग आता आपण जाणून घेऊया जर वांग चे डाग आपल्या चेहऱ्यावर असतील तर ते घालवण्यासाठी आपण कोणता घरगुती उपायांचा आधार घेऊ शकतो.

सोडा व लिंबू वापरून बघा :

                  जर वांगचे डाग पूर्ण चेहऱ्यावर पसरले नसतील आणि फक्त गालावर जर खूप काळपटपणा आला असेल तर, आपल्या घरातील बेकिंग सोडा जो घरामध्ये सहज उपलब्ध होतो. तो थोडासा घ्यावा साधारण अर्धा चमचा ला कमी बेकिंग सोडा घ्यावा त्यानंतर एक लिंबू अर्धा कापून त्यामध्ये बेकिंग सोडा टाकावा. व गालावर ज्या ठिकाणी वांगाचे डाग आहे त्या ठिकाणी मसाज करावी साधारणता दहा मिनिटे. लिंबू व सोडा याने गालावर मसाज करावी हा उपाय दोन-तीन दिवसांतून एकदा करावा. हा उपाय जर तुम्ही रोज केला तर तुमची त्वचा लाल होऊ शकते. कारण सोडा व लिंबूमुळे चेहऱ्यावरील डाग जाण्याचे तर मदत होईल पण जर याचा अति वापर केला तर आपली त्वचा देखील जळू शकते सॉरी याची काळजी सर्वप्रथम घ्यावी.

वाचा  लहान मुलांना झटके येणे

कच्चा बटाटा/कच्चा टमाट्याचा रस लावा :

               वांगाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही कच्चा बटाटा देखील वापरू शकता. तुम्ही एक बटाटा अर्धा कापून त्यावर थोडेसे पाण्याचे थेंब टाकून सरळ त्या बटाट्या गालावर मसाज करू लावू शकतात. शिवाय बटाट्याचे तुकडे करून तो थोडा बारीक करून घ्यावा त्यानंतर त्याचा थोडा लेप व तो जाडसर बटाटा चेहऱ्यावर लावावा. दहा ते पंधरा मिनिटात तो बटाटा तसाच चेहऱ्यावर राहू द्यावा जेणेकरून चेहऱ्यावर फर्मेंटेशन ची प्रक्रिया चालू होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा जेणेकरून तुम्हाला याचा फरक हळूहळू पुढे जाणवेल. तसेच तुम्ही कच्चा टमाट्याचा रस देखील चेहऱ्यावर लावू शकता म्हणजे जर तुम्ही अर्धा टमाटा घेतला तर तो टमाटा चेहऱ्यावर लावला तर वांग चे डाग तुमचा चेहऱ्यावरून हळूहळू जाण्यास मदत होईल व चेहऱ्यावरील वांग चे डाग देखील वाढणार नाही.

कोरफड लावावी :

                कोरफड म्हणजेच एलोवेरा जेल देखील जर तुम्ही चेहऱ्यावर लावले तर हा उपाय वांच्या डागांवर रामबाण उपाय ठरेल. कारण कोरफडी मध्ये इतके चांगले आयुर्वेदिक घटक असतात की ज्या घटकांमुळे आपली त्वचा व चेहरा तेजस्वी होण्यास मदत होते. त्याच प्रकारे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आजार किंवा समस्या असतील तर त्यादेखील कमी होण्यास मदत होते पण कोरफडीचा गर लावताना तो घर ताजा असावा याची काळजी घ्यावी.

पपईचा रस लावावा :

                 पपईमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोटिन्स व काही घटक असतात जे फर्मेंटेशन आणि तुमच्या त्वचेला तेजस्वी करू शकतात जेणेकरून तुमच्या त्वचेच्या संदर्भात कोणतेही आजार असतील तर ते दूर करण्यास मदत होते. तर तुम्ही सुरुवातीस कच्ची पपई घ्यावी त्यानंतर ती पपई मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी तसेच ती पूर्ण 10 बारीक होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच ती पेस्ट थोडी जाडसरच ठेवावी त्यानंतर ती पेस्ट काढून ज्या ठिकाणी वांगाचे डाग आहे त्या ठिकाणी लावावी. साधारणता तीस मिनिटं ही पेस्ट त्या वांगच्या डागांवर लावावी त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा हा उपाय दिवसातून एकदा करावा.

वाचा  केसांमध्ये निर्माण झालेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय

वांग चे डाग परत येणार नाही यासाठी कोणती काळजी घ्याल ?

              वांग चे डाग जर एकदा गेले तर ते परत येऊ शकतात म्हणून सुरुवातीस आपण जर कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेत असाल तर ती ट्रीटमेंट पूर्ण करावी. तसेच कधीही बाहेर निघताना चेहरा पूर्णपणे झाकून निघावा म्हणजेच रुमालाने चेहरा झाकावा प्रखर उन्हामध्ये किंवा धुळीच्या वातावरणामध्ये प्रदूषित वातावरणामध्ये जाणे टाळावे. व शरीराला जेवढे प्रमाणामध्ये पाणी हवे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी द्यावे जेणेकरून त्वचा ताजी व टवटवीत राहील.

              तर मित्रांनो आज आपण बघितले जर आपल्या चेहऱ्यावर वांग चे डाग येत असतील तर ते कोणत्या पद्धतीने आपण घालवू शकतो. तसेच आपण यावर काही उपाय देखील बघितले व याच प्रकारे आपण वांगाचे डाग म्हणजे काय सविस्तर जाणून देखील घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. याच प्रकारे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here