बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे व उपाय

0
2530
बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे व उपाय
बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे व उपाय

नमस्कार मित्रांनो. घरात लहान बाळ असले म्हणजे लहान बाळा कळे खूपच बारकाईने लक्ष द्यावे लागत असते. तसेच बाळ काय करतोय, काय तोंडात घेते या कडे देखील बारकाईने लक्ष ठेवायला हवे. बाळाला  काय हवे काय नकोय तसेच बाळाच्या खाण्याच्या वेळा, बाळाच्या झोपण्याच्या वेळा याबद्दल प्रत्येक आईला खूप लक्ष द्यावे लागत असते. म्हणजेच लहानपणापासून खूपच काळजी घ्यावी लागत असते. बाळाच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देणे देखील गरजेचे असते.. बऱ्याच वेळा लहान बाळ आहे चिडचिड करताना दिसून येत असते तसेच सारखे सारखे रडत देखील असते. किंवा फरशी वरील कुठलेही खेळणे उचलून ते तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच ही लक्षणे असतील तर लहान बाळाला दात येण्याची शक्यता असते. बराच लहान बाळांना दात लवकर येण्याची शक्यता असते. परंतु काही ही लहान बाळांना उशिरा दात येत असतात. त्यामुळे त्या बाळाचे आई-वडील देखील चिंतेत असताना दिसून येतात. परंतु जास्त चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक बालक हे एक सारखे नसते. प्रत्येक बाळाची शारीरिक रचना ही वेगळ्या प्रकारे असते. काही लहान बाळांना लवकर दाते येत असतात तर काहींना उशिरा येत असतात. तर मित्रांनो आज आपण लहान बाळांना उशिरा दात येण्यामागील कारणे नेमकी कोणती असू शकता व त्यावर कोणत्या प्रकारे उपाय करता येतील? याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे व उपाय याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लहान बाळांना उशिरा दात येण्या मागील कारणे कोणती असू शकतात?

काही लहान बाळांना दात लवकर येण्याची शक्यता असते तर मात्र काही लहान बाळांना दात हे उशिराने येत असतात. कारण प्रत्येक बाळाची शरीर रचना ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तर लहान बाळांना उशिरा दात येण्यामागील कारणे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तर लहान बाळांना उशिरा दात येण्या मागील कारणे कोणती असू शकतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • अनुवंशिकता यामुळे देखील लहान बाळांना उशिरा दात येण्याची शक्यता असते. म्हणजेच एखाद्या घरातील लहान बाळाच्या आईला किंवा वडिलांना त्यांच्या लहानपणी जर उशिरा दात आलेले असतील तर त्यांच्या बाळाला देखील उशिरा दात येण्याची शक्यता असू शकते. आई-वडिलांना उशिराने जात आलेले परंतु बाळाला देखील उशिराने दात येतीलच असे देखील सांगता येत नाही. अनुवंशिकतेचा परिणाम हा क्वचितच बाळामध्ये होताना दिसून येत असतो.
  • जर तुमच्या लहान बाळाला योग्य पोषक घटक दुधामध्ये मिळत नसतील तसेच जर तुमचं लहान बाळ हे सहा महिन्याचे झाले असेल आणि तुम्ही त्याला वरील पदार्थ देणे सुरू केले असतील आणि त्या आहारा मधून जर  बाळाला योग्य ते पोषक घटक मिळत नसतील, तर याचा परिणाम म्हणून लहान बाळाला उशिराने दात येऊ शकतात.
  • जर तुम्ही तुमच्या बाळाला अंगावरचे दूध पास्ता पावडर युक्त दूध देत असेल तर यामुळे देखील लहान बाळाला उशिरा दात येण्याची शक्यता असते. कारण पावडर तुझा मधून पाहिजे तेवढे आवश्यक पोषक घटक लहान बाळाला मिळत नसतात.
  • प्रत्येक लहान बाळ हे वेगळ्या पद्धतीचे असते काहींना अगदी चार महिन्याचा असताना देखील येण्याची शक्यता असते तर काही ना पूर्ण बारा महिने झाल्यानंतर दात येत असतात म्हणजेच उशिराने जात येत असतात हे देखील उशिरा दात येण्याचे कारण असू शकते.
  • जर लहान बाळाची व्यवस्थित पोषण झालेले नसेल तर यामुळे देखील दात उशिरा येण्याची शक्यता असते.
  • जर बाळाची वाढ आणि विकास हा उशिराने होत असेल तर त्यालादेखील उशिराने येण्याची शक्यता असते.
  • जर लहान बाळ आहे जास्त प्रमाणात आजारी पडल्यामुळे म्हणजेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे देखील उशिराने दात  येऊ शकतात.
  • जर तुमच्या बाळाचा जन्म हा पूर्ण दिवस भरण्याआधी झाला असेल म्हणजेच सातव्या महिन्यात किंवा आठव्या महिन्यात जन्म झाला असेल तर या कारणामुळे देखील लहान बाळाला उशीराने दात येऊ शकतात.
  • जर तुमच्या लहान बाळाचे जन्माच्या वेळचे वजन हे खूपच कमी प्रमाणात भरले असेल म्हणजेच बाळ अशक्त असेल तर या कारणामुळे देखील बाळाला उशिराने दात येऊ शकतात.
वाचा  लहान मुलांना झटके येणे

मित्रांनो, वरील प्रमाणे लहान बाळांना उशीराने  दात येण्याची कारणे असू शकतात. म्हणजेच प्रत्येक बाळाच्या बाबतीत उशिरा दात येण्याचे कारण हे वेगळ्या प्रकारचे असू शकते. तर दात येण्याची योग्य वेळ केव्हा असते याबद्दल देखील जाणून घ्यायला हवे तसेच दात उशिरा येत असतील तर काय उपाय करू शकतो याबद्दल देखील जाणून घ्यायला हवे. ह्या बद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 

बाळाचे दात लवकर येण्यासाठी काय उपाय करू शकतो?

जर तुमच्या बाळाची वाढ आणि विकास हे जर चांगले असेल तर तुमच्या बाळाचे दात लवकर येण्याची शक्यता असते. परंतु तुमच्या बाळाचा वाढ आणि विकास हे उशिरा होत असेल तर तुमचे बाळाचे दात देखील उशिराने येत असतात. तुम्ही बाळांमध्ये तुलना करणे चुकीचे ठरते कारण प्रत्येक बाळाची शारीरिक रचना, शारीरिक वाढ ही वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे प्रत्येक लहान बाळाचा दात येण्याचा कालावधी हा मागे पुढे होऊ शकतो. जर लहान बाळाची वाढ आणि विकास हा योग्य असेल तर  बाळाला चौथ्या महिन्यापासून दात येणे सुरू होत असतात. तर काहींना सहाव्या महिन्यापासून येतात तर काहींना आठव्या महिन्यापासून येतात. आणि जर तुमच्या बाळाची वाढ ही हळूहळू होत असेल विकास हळूहळू पद्धतीने होत असेल तर तुमच्या बाळाचे दात देखील उशीराने येण्याची शक्यता असते. म्हणजेच, वर्षाचा झाल्यावर किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर हळूहळू येत असतात.

तर काही लहान बाळांना अनुवंशिकता या कारणामुळे, देखील उशिराने दात येण्याची शक्यता असते. त्यामुळे, जास्त घाबरण्याचे कारण देखील नाही. तुमच्या बाळाचे देखील दात हे त्याच्या योग्य वयानुसार यायला हवेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या लहान बाळाची योग्य रीतीने काळजी घ्यायला हवी. तसेच तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या हिरड्यांची मालीश करायला हवी. तुम्ही तुमच्या लहान बाळाचे पोषण हे व्यवस्थित प्रकारे करायला हवे. तुम्ही तुमच्या लहान बाळाला व्यवस्थित रित्या स्तनपान करायला हवे. जेणेकरून, त्याचे पोट देखील व्यवस्थित भरेल व त्याला दुधामधून योग्य ते पोषक घटक मिळतील. बाळाला स्तनपान करावे लागते यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील योग्य त्या घटकांचा समावेश करायला हवा. जेणेकरून,तुमच्या दुधामधून लहान बाळाला सर्व प्रकारचे विटामिन्स व पोषक घटक मिळण्यास मदत होईल.

वाचा  जिरे याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

जर तुमच्या लहान बाळाचे दात हे अगदी उशिरा याने येत असेल तर तुम्ही जास्त उशीर होण्याआधीच लहान मुलांच्या डॉक्टरांकडे तुमच्या बाळाला दाखविण्यास घेऊन जायला हवे. म्हणजे  एक ते दीड वर्षापर्यंत जर तुमच्या बाळाला एकही दात आला नसेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटायला हवे. जेणेकरून, उशिरा दात येण्यामागील खरं कारण शोधले जाईल व योग्य तो उपचार केला जाईल. मित्रांनो जर लहान बाळाला दात उशिराने आले तर बाळाच्या पुढील सर्वच गोष्टींना उशीर होत असतो. कारण बाळ सहा महिन्यानंतर आपण बाळाला वरचे पदार्थ खाणे चालू करत असतो सुरुवातीला पण हे पटले म्हणजेच मात्र असं खाऊ घालत असतो त्यानंतर बारा दात जर आले असतील तर बाळ ते चावून चावून खाऊ शकतो. म्हणजेच जेवणाचे पदार्थ चावायला बाळाला दात लवकर यायला हवेत. आणि जर बाळाला उशिराने दात आले तर बाळाच्या पुढील वाढीवर तसेच पुढील प्रत्येक गोष्टींवर त्याचा परिणाम होताना दिसून येत असतो. म्हणून जर तुमच्या बाळाला अगदीच उशिराने धावत येत असतील तर लवतोरी तुम्ही बाळाला घेऊन बालरोग तज्ञ डॉक्टरांना दाखवायला हवेत. जेणेकरून तुम्हाला बाळाचे उशिरा दात येण्यामागील कारण, देखील समजेल व योग्य उपचार घेता येईल.

जाणून घ्या : ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग

 मित्रांनो,वरील प्रमाणे आपण बाळाला उशिरा दात येण्याची कारणे नेमकी कोणती आहेत व त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे उपाय करू शकतात, याबद्दल जाणून घेतलेले आहेत. तर मित्रांनो याबद्दल अजून तुम्हाला जास्तीची माहिती जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून माहिती जाणू शकतात. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अधिक माहिती साठी येथे जाणून घेऊ शकता.

 

   धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here