बाळाला दात येण्याची लक्षणे

0
1282
बाळाला दात येण्याची लक्षणे
बाळाला दात येण्याची लक्षणे

      बाळाला दात येण्याची लक्षणे    

नमस्कार मित्रांनो. आई होणे ही फार सोपी गोष्ट नाहीये. बाळ जन्मल्यापासून बाळाची प्रत्येक बारीक गोष्टीची आईला काळजी घ्यावी लागत असते. बाळाच्या प्रत्येक बारीक-बारीक गोष्टीकडे आईला लक्ष द्यावे लागत असते जेणेकरून बाळाला एखादा त्रास होत असेल तर तो आईच्या लवकर लक्षात येईल. बऱ्याच वेळा काही बाळे सारखे आणि सतत रडत असतात. परंतु ही सामान्य गोष्ट मानली जात असते कारण की जर बाळाला भूक लागली असेल तेव्हा पण हे रडून उठते. बाळाचे रडणे  मागील बऱ्याच गोष्टी किंवा कारणे असू शकतात. बऱ्याच वेळा जरब आहे सारखे सारखे रडत असेल तर त्याचे पोट दुखण्याची समस्या असेल नाही तर त्याला सारखे सारखे भूक लागत असे या देखील कारणे असू शकतात. तर काही वेळा बाळ जर एखादा खेळणे चांवता चांवता रडत असेल किंवा सारखे सारखे काही ना काही तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करत असेल, जे हाती भेटलं ते चावण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा मात्र आईने बाळाकडे खूप लक्ष दिले पाहिजे. कारण की जर बाळ एखादे सारखे सारखे खेळणे तोंडात घेऊन त्याला चावण्याचा प्रयत्न करत असेल, नाहीतर जे हा ते भेटले ते तोंडात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हा समजून घ्यायला हवे कि बाळाला काय त्रास होत असेल. त्यामुळे वेळीच लक्ष द्यायला हवे. आणि बऱ्याच वेळा काही बाळांना शांत झोप देखील लागत नसते. किंवा ताप येण्याची शक्यता तिकडे असते. असा जेव्हा त्रास होत असतो तेव्हा बाळाला दात येण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, आज आपण बाळाला दात येण्याची लक्षणे हे नेमके कोणते आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बाळाला दात येताना ची लक्षणे याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

बाळाला दात येताना ची लक्षणे कोणती असू शकतात?

   आईने बाळाच्या प्रत्येक गोष्टींवर प्रत्येक हालचालीवर आवर्जून लक्ष घालायला हवे. तुम्ही जर काम करत असाल आणि जर तुम्ही बाळा एकटे सोडले असेल तेव्हा अधून मधून बाळाकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे कारण बाळा तुम्ही जी खेळणे दिलेली आहे ती एकदम तोंडात तर घालत नाही ना या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आणि जर बाळ एखादे खेळणे घेऊन सारखे सारखे चावत असेल किंवा घरातल्या कोणत्याही वस्तू जी हातात सापडले ते पकडून तोंडात घालत असेल आणि त्याला सारखे सारखे सांगत असेल तर मात्र तुम्ही समजून घ्यायला हवे की हे बाळ दात येण्याचे लक्षण आहे.

     प्रत्येक बाळ हे वेगळे असते. म्हणजेच प्रत्येक बाळाची शारीरिक रचना ही वेगळी असते. त्यामुळे एखाद्या बाळाला उशिरा दात येण्याची शक्यता असते तर काही बाळांना अगदी चार महिन्यापासूनच दात येण्याची क्रिया सुरू होऊन जात असते. काही बाळाला जेव्हा दात येण्याची सुरुवात असते तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होताना दिसून येत नाही. आणि काही लहान बाळा यांना दात येताना खूप त्रास होताना दिसून येत असतो. म्हणजेच सारखे सारखे चिडचिड करणे, नाहीतर एखादे खेळणे घेऊन नाही तर वस्तू घेऊन त्याला सांगण्याचा प्रयत्न करताना रडत बसणे, नाहीतर सतत रड रड करणे अशी लक्षणे देखिल दिसुन येत असतात. अर्थातच जेव्हा पहिल्यांदा जात येत असतात तेव्हा खूप त्रास काही बाळाना होत असतो.

वाचा  कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

       जर लहान बाळा तुम्ही जेवण भरवताना ते खात नसेल आणि जास्त करून तुमचे अंगावरचे दूध पिणे प्रचंड करत असेल तेव्हा बाळाला दात येण्याची लक्षणे सुरू झालेले आहेत असे समजून घ्यावे. तसेच काही लहान बाळ आहे आई जेवण बनवत असताना सारखा सारखा चमचे ओढून चला चावत बसणे, नाहीतर हातात जी वस्तू येईल ग्लास वाटी हे ओढून तोंडात घालण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचा चावत बसणे म्हणजेच बाळाला दात येण्याची लक्षणे समजावे. साधारण बाळाला दात येण्याची ही चौथा महिना सुरू होतो त्या पासून सुरू होत असते. म्हणजेच चौथ्या महिन्यापासून बाळाला दात येण्याची लक्षणे दिसून येत असतात. कटाई बाळांना अशा प्रकारची लक्षणे न दिसून येताच डायरेक्ट दात येत असतात म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि काही लहान बाळांना बारा महिने पूर्ण झाल्यावर म्हणजेच एक वर्षाचा झाल्यावर दात येण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही आला अनुवंशिक तेच कारण देखील म्हणू शकतात. म्हणजे घरातील व्यक्तींना ज्याप्रमाणे उशिरा दात असे आले असतील त्याचप्रमाणे त्यांच्या बाळाला देखील उशिरा दात येण्याची शक्यता असते. म्हणजेच लहान भावांना जातींची क्रियाही लवकर घडत असते तर काहींना एकदम उशिरा दात येण्याची क्रिया घडत असते. जीवा लहान बाळांना दात येण्याची लक्षणे दिसून येतात तेव्हा लहान बाळ आहे सतत काही ना काही वस्तू घेऊन हातात भेटले ते हातात घेऊन तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करत असते आणि सारखे सारखे लाळ गळत असते. कारण बाळाला दात येण्याची लक्षणे सुरू होतात तेव्हा ते वस्तू चावल्यामुळे सारखे सारखे लाळ गाळत असतात.

        बऱ्याच वेळा दात येण्याची लक्षणे ही काही बाळामध्ये उशीराने दिसून येतात तर काही लहान बाळांना दात येताना ताप येण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे आपल्यासारख्या माणसांना दाता विषयी काही समस्या असते तेव्हा आपले गाल आणि डोकं दुखण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे जेव्हा लहान बाळांना दात येत असतात तेव्हा त्यांची देखील गाल सुजण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डोके देखील दुःख होण्याची शक्यता असते. या कारणामुळे ते लहान बाळ सतत चिडचिड रडत असते आणि जेवण देखील व्यवस्थित करण्यास नकार देत असते. अशावेळी आपण लहान बाळाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम दात येताना हिरड्या या दुखतात आणि हिरड्यांना सूज देखील आलेली असते. बराच लहान बाळांना येण्याची क्रिया घडत असते त्यामुळे त्यांचे शी चे प्रमाण देखील वाढत असते. वरील अन्न खाण्यास नकार देतात त्यामुळे त्यांचे वजन कमी होण्याची देखील शक्यता असते. परंतु ही सामान्य गोष्ट आहे कारण लहान बाळाला त्रास होत असल्यामुळे या सर्व गोष्टी करू शकतात. जन बाळा हे सतत रडते व दात येण्याची लक्षणे असल्यामुळे चिडचिड करत असेल तेव्हा तुम्ही डॉक्टरांना बाळाला दाखवायला हवे. जेणेकरून भाजी कशी व्यवस्थित प्रकारे काळजी घेता येईल याबद्दल डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देतील आणि काही टॉनिक देखील लिहून देतील. यामुळे बाळाला दात येण्यास जास्त त्रास होणार नाही.

वाचा  पायातला काटा काढण्यासाठी उपाय

    जेव्हा लहान बाळाला दात येण्याची लक्षणे तुम्हाला दिसून येतील तेव्हा तुम्ही काही साधे सोपे उपाय देखील करायला हवेत. तर तुम्ही यासाठी कोणते उपाय करायला हवेत याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

लहान बाळाला दात येत असतील तेव्हा कोणते उपाय करायला हवेत?

    मित्रांनो, जेव्हा लहान बाळाला दात येण्याची लक्षणे दिसून येतात तेव्हा मात्र तुम्ही बाळाकडे खूप लक्ष द्यायला हवे. तसेच बाळाला जेव्हा दात येण्याची क्रिया सुरू असते तेव्हा तुम्ही त्याला थोडीफार मदत करायला हवी. म्हणजेच काही उपाय बाळासाठी केले पाहिजे जेणेकरून त्याला दात येण्यास सुलभ होईल लहान बाळाला तुम्ही जेव्हा दात येत असतात तेव्हा काय उपाय करायला हवे त्याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • जेव्हा लहान बाळाला दात येताना ची लक्षणे तुम्हाला दिसून आली तेव्हा तुम्ही लहान बाळाच्या हिरड्यांना डिकामली पावडर लावायला हवी. म्हणजेच बोट स्वच्छ धुवून बोटाच्या साहाय्याने बाळाच्या हिरड्यांवर डिकामाली पावडरने मालीश करायला हवी. डीकामाली पावडर आयुर्वेदिक असते.त्यामुळे बाळाच्या तोंडात जरी गेली तरी त्याने बाळाला कुठलाही त्रास होणार नाही. डीकामाली पावडर वापरणे ही फार जुन्या काळापासून वापरली जात आहे. त्यामुळे डिकामाली पावडर चा लहान बाळास कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होत नाही.
  • जेवण लहान बाळ आहे सारखे सारखे एखादे खेळणे घेऊन तोंडात घालत असते जीवन हातात जी वस्तू आली ती वस्तू चावण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तुम्ही बाळाला अशा वस्तू तोंडात घालू देऊ नये. कारण प्रत्येक वस्तू ही स्वच्छ असेलच हे सांगता येत नाही नाहीतर बाळाला याचे इन्फेक्शन देखील होऊ शकते. त्यासाठी तुम्ही लहान बाळाला हिरड्यांची चावण्यासाठी टिथर घेऊन द्यायला हवे. तिच्यात लिक्विड फॉर्म असते जेणेकरून लहान बाळाला चावायला ते सुलभ होते. आणि लहान बाळाला हिरड्यांचा व्यायाम देखील होत असतो. आणि यामुळे लहान बाळाला त्रास देखील होत नाही.
  • जेव्हा लहान बाळाचे दात येतात तेव्हा त्यांच्या हिरडया सळसळ करत असतात. यासाठी तुम्ही लहान बाळाच्या हिरड्यांचा व्यायाम करायला हवा. तर हिरड्यांचा व्यायाम कसा करावा यासाठी तुम्ही तुमच्या हाताची बोटं स्वच्छ धुऊन घ्यावेत. आणि बाळाच्या हिरड्यांना बोटाच्या साहाय्याने हळुवारपणे मसाज करावी. यामुळे बाळा देखील कमी त्रास होतो. आणि हिरड्यांचा देखील व्यवस्थित व्यायाम होत असतो.
  • बरेच जण असे देखील सांगत असतात की जेव्हा बाळाला दात येण्याची क्रिया सुरु होते तेव्हा तुम्ही बाळाला एखादी थंडगार वस्तू हिरड्यांना चावायला द्यायला हवी, जेणेकरून बाळाच्या हेड यांचादेखील व्यवस्थित व्यायाम होईल व बाळाला दात येण्यास त्रास होणार नाही. परंतु तुम्ही हे डॉक्टरांना विचारूनच हा उपाय करू शकतात. कारण फ्रीजमधील वस्तूही थंडगार असते आणि त्याच्यामुळे  बाळाला सर्दी देखील होण्याची शक्यता असते.
  • बाळाला जेव्हा दात येतानाची लक्षणे दिसून येतात तेव्हा तुम्ही बाळाला पाणी पिण्याचे प्रमाण जास्त वाढवले पाहिजे. कारण अशावेळी जर तुम्ही बाळाला पाणी पाजत राहिले तर हिरड्यांना जो त्रास होतो तो कमी प्रमाणात होऊ शकतो. 
  • तसेच तुम्ही बाळाला मधाचे बोट देखील चाटवू शकतात. कारण की मधामध्ये बरेच अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे बाळाच्या हिरड्यांना सूज आलेली असेल ती कमी होण्यास मदत होईल.
  •  जर बाळाला दात येताना ताप आला असेल किंवा बाळ सतत चिडचिड करत असेल सारखे रडत असेल आणि झोप देखील व्यवस्थित लागत नसेल तर अशावेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे. जेणेकरून, डॉक्टर तुम्हाला योग्य प्रकारचा सल्ला देतील आणि काही औषधे देखील लिहून देतील व सोबत टॉनिक देखील लिहून देतील जेणेकरून बाळाला दात येताना त्रास कमी होऊ शकेल.
वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

मित्रांनो, बाळाला दात येताना ची लक्षणे नेमकी कोणती असू शकतात? याविषयी आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तसेच, जेव्हा दात येण्याची क्रिया सुरू असते, तेव्हा तुम्ही कोणते साधे, सोपे  घरगुती उपाय करायला हवेत? जेणेकरून बाळाला दात येण्यास मदत होऊ शकेल. याविषयी, देखील आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे आणि याबद्दल अजून सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देऊ शकतात.

     तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

     

      धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here