प्रेगा न्यूजची माहिती व वापर कसा करायचा

0
802
प्रेगा न्यूजची माहिती
प्रेगा न्यूजची माहिती

प्रेगा न्यूजची माहिती

नमस्कार, मैत्रिणींनो पूर्वीच्या काळी स्त्रियांचे शारीरिक, आजार हे मोकळेपणाने बोलले जात नसायचे, ज्यावेळी स्त्रियांची मासिक पाळी आली, तेव्हा ते घरात कोणालाही सांगायचे नाहीत, समजा एखादीला मासिक पाळी आली, तर तिला ते नियम आखून ठेवायचे. चार दिवस एका कोपऱ्याला बसायला लावायचे. तसेच किचन मध्ये येऊ नये, डोक्यावर पाणी घेऊ नये, त्यांचे, अंथरूण वेगळी ठेवायला लावायचे, असे काही त्यांचे नियम असायची. पण आता बदलत्या जीवनशैलीमध्ये, स्त्रिया मोकळेपणाने बोलायला लागलेल्या आहेत. मासिक पाळी संदर्भात त्यांचे विचार हे मोकळेपणाने मांडायला लागलेले आहेत. आता बदलत्या जीवनामध्ये, आपण एकमेकांशी स्पष्टपणे बोलू शकतो. तसेच आता हल्लीची वातावरण इतके मोकळे आहे, की  मासिक पाळी बद्दल ची माहिती तसेच त्याबद्दल वापरते, पॅड ची माहिती टीव्हीवर ही ॲडव्हर्टायझिंग येते. त्यामध्ये स्त्रीच्या मासिक पाळी संदर्भात असो, किंवा प्रेग्नेंट राहिले, त्याबद्दल माहिती असो, तसेच तुम्ही प्रेग्नेंट राहिल्यावर काय वापरावेहे, हे स्पष्टपणे टीव्हीवर आपल्याला सांगण्यात येते. तसेच तुम्हाला मुलबाळ नको हवे असेल, तर त्याबाबतीत च्या गोळ्या हि टीव्हीवर येतात. तसेच तुम्हाला निरोध म्हणजेच कंडोम कोणत्या कॉलिटी चे तुम्ही वापरू शकतात  हे अक्षरशः टीव्हीवर खुलेआम दाखवायला लागलेले आहेत. चांगलंच आहे म्हणा! बदलत्या जमाना नुसार आपणही बदलायला हवेत. 

हल्ली टीव्हीवर आपण भरपूर माहिती बघतो, पण तरीही एकमेकांना विचारायला कधीकधी लाजतो. आज आपण बघणार आहोत, की प्रेगा न्यूजची माहिती, चला, तर मग जाणून घेऊयात! 

प्रेगा न्यूज म्हणजे काय? 

भरपूर  स्त्रियांना याबाबत ची माहिती असतेच. पण अजूनही समाजात काही स्त्रिया आहेत, की त्यांना याबाबत माहिती नसते. प्रेगान्यूज म्हणजे तुम्ही गर्भ धारण केले आहे, की नाही, याबद्दलची माहिती होय. प्रेगान्यूज अशी कीट आहे, की तुम्ही घरच्या घरी ती किट आणून प्रेग्नेंसी चेक करू शकतात. तुम्ही गर्भवती आहे, की नाही. जर तुम्हाला जाणवले की तुम्ही गर्भवती आहे. तुमची पाळी चुकली आहे, अशा वेळी तो किट आणून, तुम्ही चेक करू शकतात. 

वाचा  छोटी-मोठी कामे केल्यानंतर धाप लागणे कारणे आणि घरगुती उपाय :-

प्रेगा न्यूज कुठे मिळते व कितीला मिळतो? 

हल्ली प्रेगा न्यूज म्हणजे प्रेग्नेंसी टेस्ट करण्याचा किट, हा तुम्हाला मेडिकल स्टोअर्स मध्ये कुठेही मिळेलच. तसेच तुम्ही ऑनलाईन ही मागू शकतात. 

तसेच प्रेगा न्यूज ची (प्राइस) किंमत अत्यंत कमी आहे, आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. प्रेगा न्यूज ची किंमत ही  पन्नास(50) रुपये आहेत. तसेच जर तुम्हाला दोन कीट हवे असतील, तर शंभर (100) रुपयाला मिळतात. हि आहे प्रेगा न्यूजची माहिती.

प्रेगा न्यूज कोणी वापरावे? 

ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही चुकलेली असेल, तसेच त्यांना वाटत असेल, की आपण प्रेग्नेंट आहोत. म्हणजेच गर्भ धारण केलेले असेल, स्त्रियाही प्रेगान्यूज ही वापरू शकतात. हि आहे प्रेग न्यूजची माहिती

प्रेगा न्यूज कसे वापरावे? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला प्रेगान्यूज म्हणजे काय तो कुठे मिळतो व कितीला मिळतो. तसेच त्याचा वापर कोणी करावेत, हेही सांगितले आहेत. तसेच प्रेगा न्यूज चे पॅकेटवर त्याचा वापर कशाप्रकारे करायचा, ती माहिती पूर्णपणे दिलेली असतेच. तरीही आज आपण, त्याचा वापर कसा करायचा, हे जाणून घेऊयात! 

 • सर्वात अगोदर तुम्हाला प्रेगान्यूज पॅकेट आणायचे आहेत. 
 • रात्री झोपून उठल्यावर, ज्यावेळी तुम्ही सकाळच्या बाथरूमला जातात, त्यावेळी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. 
 • सकाळी स्वच्छ बाटलीमध्ये, तुम्हाला सकाळची युरीन म्हणजेच लघवी एका बाटलीत घ्यावयाची आहे. 
 • प्रेगा न्यूज कीट उघडल्यावर, त्यात एक ड्रॉपर दिलेला असतो. त्या ड्रॉपरमध्ये लघवी भरायची आहेत. 
 • नंतर प्रेगा न्यूज कीट, एका हातात धरायचा, आणि तिथे लघवीचे ठेंब टाकण्यासाठी, चे चिन्ह तुम्हाला दाखवलेले असते, त्या जागेवर लघवीचे तीन ते चार थेंब टाकावेत. 
 • त्यानंतर तुम्हाला पाच मिनिटे थांबायचे आहे, त्यावर तुमचा रिझल्ट हा मिळतोय. 

प्रेगा न्यूज चा रिझल्ट कसा मिळतो? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला प्रेगा न्यूज ची टेस्ट कशी करावी, हे सांगितले आहेत. आता त्याचा रिझल्ट कसा आहे, तो अनेकांना माहिती नसते, चला तर मग जाणून घेऊयात. 

 • ज्यावेळी तुम्ही लघवीचे थेंब, प्रेगा न्यूज च्या दाखवलेल्या किट मध्ये टाकतात. त्या वेळी तुम्हाला रिझल्ट्स साठी पाच मिनिटे थांबावे लागते. 
 • प्रेगा न्यूज किटवर लघवी चे थेंब टाकतात, तिथे समजा एक लाईन गुलाबी रंगाची आली, तर तुम्ही निगेटिव्ह आहात. असे समजते, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट नाहीत, म्हणजे तुमचे हार्मोन्स इन बॅलन्स मुळे ही पाळी चुकली असेल, असे निदान कळते. 
 • अशावेळी तुम्ही नाराज होऊ नका,  तुम्ही डॉक्टरांनाही दाखवू शकतात. 
 • आणि समजा तिथे दोन लाइन गुलाबी आल्यात, तर समजा तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे निदान करते. त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना दवाखान्यात जाऊन, तुमची प्रेग्नेंसी टेस्ट दवाखान्यात करून घ्यावी. 
 • दवाखान्यात गेल्यावर, डॉक्टर तुमचे रक्त आणि लघवी चे नमुने घेऊन, तुम्ही गर्भधारण झाले आहेत, हे कन्फर्म सांगतात. मग त्यानुसार ते तुम्हाला औषधी गोळ्या देतात. 
वाचा  दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा.

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला प्रेगान्यूज म्हणजे काय, त्याचा वापर कशा प्रकारे करावा, कोणत्या प्रकारे करावा, व त्याची किंमत काय आहे, हे तुम्हाला सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही    शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.          

 

                    धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here