लहान बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?

0
1547

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लहान बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय करावे? आई होणे ही खूपच भाग्याची गोष्ट असते. आई झाल्यावर जेव्हा सर्वप्रथम बाळ आईच्या कुशीत येते तेव्हा तिला होणारा जो आनंद असतो तो ती  व्यक्त करू शकत नाही इतका आनंद तिला झालेला असतो. त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यापासून ती बाळाची सतत काळजी घेत असते. सर्वच पालकांना असे वाटत असते की, आपले बाळ हे देखील गुटगुटीत व्हायला हवे. आपल्या बाळाचे वजन व्यवस्थित रित्या वाढले पाहिजे. म्हणजेच प्रत्येक महिन्यानुसार बाळाचे योग्य वजन असायला हवे ते वजन आपल्या बाळाच देखील असायला हवे. म्हणून आपल्या बाळाचे वजन व्यवस्थित राहावे व्यवस्थित दर महिन्यानुसार वजन वाढले पाहिजे यासाठी आपण बाळाला काय खाऊ घातले पाहिजे? तसेच कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? याविषयी बरेच पालक हे चिंतेत असताना दिसून येतात. तुम्हालाही तुमचे बाळ हे गुटगुटीत करायचे आहे का?  तुमच्या बाळाचे वजन व्यवस्थित वाढण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे जाणून घ्यायला हवे. बाळाची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी हे देखील जाणून घेणे आवश्यक असते. तुम्हालाही तुमचे बाळ गुटगुटीत व्हावयाचे वाटत असेल तसेच बाळाचे वजन व्यवस्थित वाढायला हवे असे वाटत असेल तर तुम्ही याबद्दल माहिती जाणून घ्यायला हवी. तर मित्रांनो आज आपण बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय केले पाहिजेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बाळाचे वजन वाढावे यासाठी काय केले पाहिजे याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

बाळाची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी?

बाळाचा जन्म झाल्यापासूनच आपण बाळाची व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली पाहिजे. बाळाला पकडणे पासून तर बाळाचं पोट व्यवस्थित भरण्यापर्यंत सगळी काळजी बाळाच्या आईने घेतली पाहिजे. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आईचे दूध पाजणे अत्यंत आवश्यक असते. कारण सुरुवातीला आईच्या दुधामध्ये चीक असते व ते  बाळाला पाजणे अत्यंत महत्वपूर्ण असते. बाळाला सहा महिने होईपर्यंत आईच दूध पाजले पाहिजे. आईने अंगावरचे दुध पाजताना सुरुवातीला एक साईड ने 15 ते 20 मिनिटे बाळाला दूध पाजावे. आणि नंतर दुसऱ्या साईडने घेऊन 15 ते 20 मिनिटं दूध पाजावे. यामुळे बाळाचे पोट देखील व्यवस्थित भरत असते. लहान बाळ जेव्हा दूध पीत असते तेव्हा दूध पिताना त्याच्या तोंडातून हवा देखील शरीराच्या आत जात असते. म्हणून, आईने बाळाला दूध पाजल्यानंतर त्याचा ढेकर जरूर काढावा. त्यामुळे, बाळाला देखील बरे वाटते. तसेच बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला पाणी पाजू नये त्याचप्रमाणे बाळगुटी देखील देण्यात डॉक्टर वर्ज्य करतात. कारण बाळ लहान असल्यामुळे त्याची पचन शक्ती ही फार कमी प्रमाणात ची असते. बाळ फक्त दूधच पचवू शकते बाकी कुठल्या वस्तू आहार पचवू शकत नाही त्यामुळे सहा महिन्यापर्यंत फक्त आईच्या अंगावरचे दूध पाजणे योग्य ठरते. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही त्याला वरचे पदार्थ देणे सुरू करू शकतात. तसेच बाळाला पाणी पाजने देखील सुरु करावे. आणि पाणी देताना तुम्ही ते उकळून थंड केलेले पाणी पाजावे. पाणी उकळल्या शिवाय ते पाणी बाळाला देऊ नये. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही त्याला कुठले पदार्थ खायला देऊ शकतात ह्या बद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

वाचा  चेहऱ्यावरील वांग चे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

लहान बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय करायला हवे?

बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईच्या अंगावरचे दूध पाजणे योग्य ठरते. कारण बाळाची पचनशक्ती तेव्हा कमी असते. आणि जर तुम्ही बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त इतर पदार्थ लवकर खाण्यास सुरुवात केली तर बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणून बाळ सहा महिने झाल्यानंतर तुम्ही वरचे खायला घालू शकतात. तर बाळ सहा महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला कुठले पदार्थ खाऊ घालू शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • हल्ली आता मेडिकलमध्ये बाळाच्या महिन्यानुसार सेरेलॅक पावडर देखील उपलब्ध असतात. परंतु तुम्ही जर हे सेरेलॅक पावडर बाळाला देत असाल तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
  • बाळाचे वजन वाढावे यासाठी तुम्ही बाळ सहा महिने झाल्यानंतर बाळाला प्रथम पातळ पदार्थ खाऊ घालने सुरू करू शकतात.
  • त्यासाठी तुम्ही बाळाला मुगाची डाळ खिचडी पातळ करून खाऊ घालू शकतात. मुगाची डाळ हे पचण्यास हलकी असते आणि तसेच मुगाची डाळ पौष्टिक देखील असते त्यामुळे बाळाचे वजन चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
  • त्याचप्रमाणे तुम्ही बाळाला सफरचंदाचा गर पपईचा गर देखील खाऊ घालू शकतात. यामुळे बाळाला बऱ्याच प्रमाणात विटामिन्स मिळू शकतात.
  • बाळाचे वजन वाढीसाठी तुम्ही बाळाला केळ देखील कुस्करून खाऊ घालू शकतात.
  • बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर फक्त आईच्या दुधावरच बाळाचे पोट भरत नाही यासाठी तुम्ही बाळाला प्रथम दूध पाजावे त्यानंतर वरील पदार्थ खाऊ घालावे.
  • तसेच बाळाला तुम्ही मुगाची डाळ आणि तांदूळ यांची पेस्ट शिजवून देखील बाळाला खाऊ घालू शकतात यातून देखील बाळाला बरेच पौष्टिक घटक मिळण्यास मदत होत असते.
  • सहा महिन्यांचा बाळ झाल्यानंतर तुम्ही बाळाला बाळगुटी देण्यास चालू करू शकतात.
  • तसेच लहान बाळाला तुम्ही सहा महिने झाल्यानंतर बदाम काजू आणि खारीक यांचा एक एक वेढा हा उगळून देऊ शकतात.असे नियमित दिल्याने देखील बाळाची तब्येत चांगली होण्यास मदत होईल.
  • बाळाचे वजन चांगले वाढावे यासाठी तुम्ही बाळाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा. दुधामुळे बाळाला मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • तसेच बाळाला नाचणीची खीर बनवून देखील खाऊ घालायला हवी.
  • हिरवे पालेभाज्यांमधून रक्त वाढण्यास मदत होत असते कारण की त्यांमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते त्यामुळे तुम्ही लहान बाळाला पालेभाज्यांचे सूप देऊ शकतात.
  • लहान बाळाला तुम्ही गाजराची पेस्ट बनवून खाऊ घालू शकतात.
  • लहान बाळाचे वजन व्यवस्थित राहावे यासाठी तुम्ही लहान बाळाला बटाटा उकडून त्याची पेस्ट बनवून देखील खाऊ घालू शकतात.
  • तसेच लहान बाळाला पुरेपूर विश्रांती व झोप आवश्यक द्यावी.  बाळाला झोपवताना अंगाई गीत जरूर गावे यामुळे बाळ शांत झोपते.
वाचा  पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

मित्रांनो, लहान बाळाचे वजन महिन्यानुसार योग्य पद्धतीने वाढावे, तसेच बाळ गुटगुटीत व्हावे, यासाठी तुम्ही वरील प्रमाणे, काळजी घ्यावी.  योग्य त्या पदार्थांचा, घटकांचा बाळाच्या आहारामध्ये समावेश आवर्जून करायला हवा. त्याचप्रमाणे लहान बाळाचे पोट हे लहान असते त्यामुळे त्याला फक्त दोन वेळा जेवण खाऊ न घालता दिवसातून सात ते नऊ वेळा तुम्ही जेवण द्यायला हवे. असे केल्याने लहान बाळाचे वजन व्यवस्थित होण्यास मदत होत असते. लहान बाळांची तब्येत चांगली राहावी तसेच लहान बाळ सारखे सारखे आजारी पडू नये याची देखील काळजी घ्यायला हवी. तरी याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

लहान बाळ निरोगी राहावे यासाठी खालील प्रमाणे काळजी घेतली पाहिजे:-

मित्रांनो, आपण आपल्या लहान बाळाच्या आहाराची काळजी तर घेतलीच पाहिजे त्याशिवाय आपले लहान बाळ आहे सारखे सारखे आजारी पडू नये यासाठी देखील आपण व्यवस्थित प्रकारे काळजी घेणे गरजेचे असते त्यामुळे बाळाचे वजन व्यवस्थित राहू शकेल तर आपण आपल्या लहान बाळाची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  1. बाळ खूप लहान असते त्यामुळे त्याला चांगले काय वाईट काय याबद्दल लवकर कळत नाही त्यासाठी आपण स्वतःहून त्याची काळजी घेणे आवश्यक ठरते फरशीवर एखादे खेळणे अस्वच्छ असेल तर ते स्वच्छ केल्याशिवाय लहान बाळाला घेऊ देऊ नये. कारण लहान बाळांना जे हाती येईल ते तोंडात घालण्याची सवय असते आणि त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते.
  2. लहान बाळाचे कपडे हे दिवसातून तीन चार वेळा बदलले पाहिजे कारण बाळाला जेवण खाऊ घालताना ते कपड्यावर पडत असते त्यामुळे कपडे अस्वच्छ होतात आणि हेच कपडे बाळ तोंडात घातल्यामुळे ते आजारी देखील पडू शकते म्हणून बाळाचे वेळोवेळी कपडे चेंज करत राहावे.
  3. लहान बाळ हे दिवसभर फरशी वर खेळत असते त्यामुळे फरशी नेहमी स्वच्छ केली पाहिजे कारण लहान बाळ त्याचे दोन्ही हात सतत तोंडात घालत असते त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते यासाठी स्वतः खबरदारी घेतलेली बरी.
  4. लहान बाळांना पाणी पिण्यासाठी उकळलेले स्वच्छ पाणी द्यावे त्यामुळे लहान बाळ निरोगी राहण्यास मदत होते.
  5. आपले हात अस्वच्छ असतात त्यामुळे लहान बाळांना घेण्याआधी आपले हात स्वच्छ करूनच मग त्यांना कुशीत घ्यावे.
वाचा  छोटी-मोठी कामे केल्यानंतर धाप लागणे कारणे आणि घरगुती उपाय :-

मित्रांनो, लहान बाळाचे आरोग्य चांगले राहावे निरोगी असावे यासाठी वरील प्रमाणे सर्व प्रकारचे काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

       मित्रांनो, वरील प्रमाणे आपण लहान बाळाचे वजन कसे वाढवावे, तसेच निरोगी राहावे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. बाळाचे वजन कसे वाढवावे याबद्दल मला अजून माहिती जाणून घ्यावयाची असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतात. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here