लहान मुलांना उलटी होणे उपाय

0
5020
लहान मुलांना उलटी होणे
लहान मुलांना उलटी होणे

हल्लीच्या दिवसांमध्ये रोगराईचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे, विशेषकरून लहान मुलांना ! लहान मुले बाहेरील पदार्थ खून आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना विविध समस्या उद्भवत आहेत, जसे कि लहान मुलांना उलटी होणे, पोट दुखणे इत्यादी.

मित्रांनो म्हणतात ना की “लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.” जर या देवाघरच्या फुलांना काही झाले, तर ते किती कोमेजून जातात. तसेच लहान मुलांचे ही असेच असते. अशावेळी आपण लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. तरी लहान मुले हे जिद्दीचे असतातच. त्यांना जे हवे असते, ते करून घेतातच, आणि आपल्याकडून ही करून घेतात, ते त्यांच्या तालावर आपल्याला नाचवतात, आणि आपण नाचतोही, खरंच! कितीही कठोर माणूस असू द्या, कितीही रागीट माणूस असू द्या, तरी तो त्या लहान मुलांपुढे नमून जातो,

लहान मुले इतकी गोड असतात, की कोणीही त्यांच्यासमोर नमून जातो, आपल्याला कृष्णा माहितीच आहे, कृष्णाने सुद्धा कितीजणांना त्याच्या तालावर नाचवले, त्याच्या कथा खूप छान असतात. पण आताचे बाळ, कृष्णा पेक्षाही वरचे आहेत,  बापरे! किती जिद्दपणा करतात, आणि आपल्याला नाचवतात. आपण जर त्यांना जी गोष्ट नाही सांगितली, ती गोष्ट आवर्जून करायला मागतात. हल्ली लहान मुलं त्यांना जे आवडते, तेच खायला मागतात, आणि ते इतकी घाई मध्ये सर्व पदार्थ खातात की त्यामुळे त्यांना अपचन सारख्या, पोटदुखी सारख्या, तसेच उलट्या होण्यासारख्या, समस्या होतात. 

आज आपण हाच मुद्दा मांडणार आहोत  की लहान मुलांना उलटी नेमकी कोणत्या कारणाने होऊ शकते. चला, तर मग जाणून घेऊयात, की लहान मुलांना उलट्या होण्याची कारणे? 

लहान मुलांना उलटी कोणत्या कारणांमुळे होते? 

लहान मुलांना उलटी अनेक कारणांमुळे होते, ती कारणे आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात ! 

 • बऱ्याच वेळेला लहान मुलांना जेवण नीट करता येत नाही, त्यामुळे ते डायरेक्ट अन्नपदार्थ गिळतात, बारीक न चावल्यामुळे, त्यांच्या पोटात त्याचे अपचन सारखे, ऍसिडिटी सारख्या, समस्या त्यांना लवकर उद्भवतात. मग अशावेळी त्यांना उलटी च्या स्वरूपात त्यांचे पोटही साफ होते. 
 • लहान मुलं हे जेवणाच्या दोन वेळेमध्ये अंतर ठेवत नाहीत, सतत खाय-खाय केल्यामुळे, ही त्यांना त्यामुळे त्यांना उलटी होते. 
 • शिळे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळेही उलटी होते. 
 • वातावरणातील बदल, पाणी दूषित पिल्यामुळेही लहान मुलांना उलटी होते. 
 • अगदी लहान बाळ, शिशु बाळ हे आईचे दूध पितो, त्याला त्याच्या भुकेचा अंदाज नसल्याने, जास्तीत जास्त दूध पिल्यामुळे, ही त्यांना उलटी होते, ओकारी येते. 
 • काही लहान मुलांना प्रवास करताना उलटीचा त्रास होतो. 
 • लहान मुलांना  व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे, उलटी, डोकेदुखी यासारख्या समस्या होतात. 
 • तसेच काही लहान मुलांना कडू पदार्थ खाल्ले, की पोटात मळमळ आल्यासारखे, होते आणि लगेच उलट्या होतात. 
वाचा  घरातील पाली घालवण्यासाठी उपाय

उलट्या होत असतील, तर त्याची लक्षणे? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण जाणून घेतले आहेत, ती उलट्या होण्याची कारणे नेमकी कोणती, आता आपण त्याची काही लक्षणे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

 • ज्यावेळी लहान मुलांना उलटी होते, त्यावेळी त्यांचे डोके खूप दुखते. 
 • त्यांना तोंडात कडू कडू वाटते, घशात कडू कडू वाटते. 
 • डोळ्यात पाणी येते, चेहरा अगदी कोमेजून जातो. 
 • सारखे आडवे पडून राहावेसे वाटते. 
 • जेवण करण्याची इच्छा होत नाही.
 • तसेच उलटी होते, यावेळी त्यांची पूर्ण अंग थरथर करते. 
 • पोटातही दुखते. 
 • तोंडाला सारखे पाणी सुटते. 
 •  ज्यावेळी त्यांना उलटी होते, त्यावेळी त्यांना थोडे मोकळे वाटत. 
 • तसेच काही मुलांना उलटी होताना, अक्षरशः पोटातील आतडी ताणल्या गेल्यासारखे वाटते. 
 • तर काही मुलांना उलटी होताना सु-झाल्यासारखे वाटते. 

जर लहान मुलांना उलटी होत असेल, तर त्यावर काही घरगुती उपाय! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण लहान मुलांना उलटी होण्याची कारणे व लक्षणे जाणून घेतले आहेत. आता आपण त्यावर काही उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

लवंग चा वापर करा

जर तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे, आणि तुमच्या मुलांना त्याचा त्रास होतो, अशा वेळी तुम्ही त्यांच्या तोंडात लवंग चघळायला द्यावीत. तसेच तिला दातात धरून ठेवायला सांगायचे. जर लहान मुलांनी त्यांच्या तोंडात सतत लवंग चघळली, तर त्यांना उलट्या व मळमळ होण्यासारखा त्रास हा कमी होतो. 

अद्रक व मधाचा वापर करा

लहान मुलांना उलटी होते, त्यावेळी अक्षरशः त्यांना थरथर झाल्यासारखे वाटते, अशा वेळी तुम्ही त्यांना अद्रक चा रस काढून, त्यामध्ये मध टाकून, त्यात लिंबू चे दोन थेंब टाकून, त्याचे एकत्र मिश्रण करून, त्याचे चाटण मुलांना करायला द्यावेत. त्यामुळे पोटातील जळजळ व उलट्या झाल्यावर घशातील कडूपणा ही हळू कमी होतो, व उलटी वर आराम मिळतो. 

वाचा  टमाटर चे फायदे

ज्येष्ठमध वापरून बघा

ज्यावेळी लहान मुलांना उलटी होते, अशावेळी त्यांच्या घशात जळजळ होते, पोटात पित्त असल्यामुळे त्यांना यासारख्या समस्या असतात. अशावेळी तुम्ही ज्येष्ठमधाची पावडर+ मधात टाकून लहान मुलांना चाटण करायला लावायचे, त्यामुळे उलटी झाल्यामुळे, पोटातील आग होण्याचे समस्या कमी होतात. 

मीठ साखरेचे पाणी प्यायला द्या

ज्या वेळी लहान मुलांना सारखी उलट्या होत असतील, अशा वेळी त्यांचे शरीर थरथर करते, उलट्या करून-करून त्यांच्या शरीरातील पाणीही कमी होऊन जाते, अशावेळी जर तुम्ही मीठ आणि साखरेचे पाणी लहान मुलांना प्यायला दिले, तर त्यांच्या उलटी वर थोडा परिणाम होतो. उलट्या होणे थोडे कमी होते, शिवाय जास्त उलट्या करून त्यांना डीहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. जर लहान मुलांना अशा वेळी तुम्ही मीठ आणि साखरेचे पाणी पाजले, तर त्यांना डीहायड्रेशन च्या समस्या होण्यापासून ही थांबतात. 

लिंबू चा वापर करून बघा

लिंबू हा पूर्वीच्या काळापासून उलटी होण्यावर वापरला जात आहे. जर तुम्हाला मळमळ होणे, उलटी होणे, यासारख्या समस्या असतील, अशा वेळी तुम्ही नींबू हातात घेऊन, त्याचे थोडे टरफल काढून, त्याचा वास घेत राहावा. लिंबू मध्ये विटामिन सी असते. व्हिटॅमिन सी मुळे उलटी होणे, यासारख्या समस्या वर आराम मिळतो. तसेच तुम्ही लहान मुलांना लिंबूचा रस त्यामध्ये  मधाचे काही थेंब टाकून, त्याचे चाटण करायला लावल्यास, मुलांना उलटी होत नाही. 

कच्ची बडीशोप खायला द्या

लहान मुलांना सारखे मळमळल्यासारखे, वाटत असेल, अशा वेळी तुम्ही त्यांना बडीशोप त्यामध्ये खडीसाखर चे दाणे टाकून खायला द्यावेत. त्यामुळे तो मुलांच्या पोटातील बिघाड झाला असेल, त्यावर हे आराम मिळतो. शिवाय बडीशेप खाल्ल्याने, ॲसिडिटी यासारख्या समस्याही कमी प्रमाणात होतात, आणि बडीशोप आणि खडीसाखर खाल्ल्याने मुलांच्या तोंडाला चवही येते. 

मुलांना योग्य आहार द्या

हो, जर तुम्ही मुलांना योग्य आहार दिला, तर त्यांना मळमळ होणे, यासारख्या समस्या कमी होतात. शिवाय त्यांच्यापासून दूर राहतात.  मुल जेवण चाऊन खात नाही, अशावेळी तुम्ही त्यांच्या सोबत बसून, त्यांना जेवण करून द्यावे, तसेच त्यांना कोणताही पदार्थ बारीक चावून खायला लावावेत, ते जेवण करतात तेव्हा त्यांना बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, असे सांगावे.

वाचा  मेथीचे लाडू खाण्याचे फायदे

बाहेरचे दूषित पाणी पिल्यामुळे, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. तसेच लहान मुलांना चायनीज पदार्थ, नूडल्स, यासारखे पदार्थ आवडतात. ते पदार्थ त्यांना खाऊ नये, अशी विनंती करावी, तसेच लहान मुलांना हिरव्या पालेभाज्यांचे सूप, फळांचा ज्यूस, यासारखे पदार्थ द्यावेत. त्यामुळे त्यांना ऍसिडिटी, उलट्या होणे, अपचन होणे, तसेच पोटाच्या तक्रारी डोक्याच्या तक्रारी होत नाही. 

डॉक्टरांना कोणत्या वेळी दाखवावे? 

ज्यावेळी तुमच्या मुलांना सारख्या उलट्या होत असतील, लहान मुलांना उलटी चे प्रमाण चार ते पाच च्या वर गेलेत, आणि ते अगदी अशक्त होऊन गेले असल्यासारखे, डोळे खोलवर गेलेले असतील, अशा वेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे. कारण त्याने मुलांना जबरदस्त अशक्तपणा येऊन, त्याचे रूपांतर गंभीर स्वरूपात होऊ शकते. अशावेळी तुम्ही वेळ न घालवता, डॉक्टरांना दाखवावे. तसेच जर मुलांना उलटी चे प्रमाण दिवसातून दोन किंवा तीन वेळेस असल्यास, ते अगदी नॉर्मल असते. त्यावेळी तुम्ही आम्ही दिलेली, वरील घरगुती उपचार त्यांना करू शकतात. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला लहान मुलांना उलटी कोणत्या कारणांमुळे होते, तसेच त्याची लक्षणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत, तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

                     धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here