मित्रांनो,आपल्या केसांच्या अनेक समस्या भेडसावत असतात. जसे की केस गळणे, केस जास्त प्रमाणात गळून टक्कल पडणे, केसांची वाढ न होणे,केसांत कोंडा असणे, केसांतील फंगल इन्फेक्शन, केस रुक्ष होणे या विषयी एक ना अनेक समस्या या प्रत्येकालाच भेडसावत असतात. केसांशी निगडीत समस्या ही प्रत्येकालाच असते. आपले केस सुंदर असावे,लांबसडक असावेत, काळेभोर असावेत त्यात कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी तुम्ही कुठले ना कुठले प्रयोग तुमच्या केसांवरती करत असतात. पण असले प्रयोग कितपत योग्य आहे? केसांवरती कुठलाही प्रयोग करण्याआधी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती हवी असली पाहिजे. नाहीतर केस गळती ला अजूनच आमंत्रण. मग नेमके करावे तरी काय? केस धुण्यासाठी काय वापरावे ?
पण मित्रांनो, जास्त घाबरण्याचे कारण नाही. तुमचे केस चांगले दिसावेत स्वच्छ असावेत यासाठी तुम्ही अनेक शाम्पूचा वापर करत असतात. आपल्या केसांना कोणता शाम्पू चांगला हे देखील माहीत असणे तुम्हाला गरजेचे असते. परंतु शाम्पू हे केमिकल रहीत असते. आणि केमिकल चा वापर हा केसांसाठी हानिकारकच. तसेच तुम्हाला केस धुण्याची पद्धत देखील माहिती पाहिजे. तुमचे केस स्वच्छ व निरोगी राहावेत म्हणून केस धुण्यासाठी काय वापरले पाहिजे हे देखील तुम्हाला माहित पाहिजे. केसांची गळती कमी व्हावी तुमचे केस लांब सडक व्हावेत यासाठी तुम्ही आयुर्वेदाचा उपयोग करू शकतात. चला, तर मग आपण जाणून घेऊया की केस धुण्यासाठी काय वापरावे.
त्रिफळा पावडर :
मित्रांनो, केस धुण्याच्या अयोग्य पद्धती यामुळे देखील केस गळण्याची समस्या ही उद्भवते. तसेच केस धुताना केसांवर जास्त गरम पाणी वापरणे याने देखील केस गळतीची समस्या उद्भवते. अस्वच्छ पाणी आणि बोरवेल या पाण्यामुळे देखील केस गळती होते. आणि हे सगळे रोखण्यासाठी तुम्ही त्रिफळा पावडर चा उपयोग करू शकतात.
त्रिफळा पावडर चे पाणी कसे बनवावे
त्रिफळा पावडर चे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक बाऊल घ्या. त्या बाउल मध्ये थोडे पाणी घ्या. आता या पाण्यात त्रिफळा पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात थोडे पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करा. हे पाणी गरम झाल्यावर बाउल मध्ये मिक्स केलेले पावडर चे पाणी त्यात टाका. आता हे सर्व मिक्स केलेले पाणी व्यवस्थित पाणी उकळून घ्या. आणि हे पाणी गार होऊ द्या.
याचा वापर कसा करावा ?
याचा वापर तुम्ही आंघोळीपूर्वी करू शकतात. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने केसांना पंधरा मिनिटे मालिश करावी. त्यानंतर एक तास तसेच राहू द्यावे. एक तासानंतर तुम्ही स्वच्छ कोमट पाण्याने तुमचे केस धुवावेत. मित्रांनो, त्रिफळा पावडर चे पाण्याने तुम्ही केस धुतल्यास नक्कीच तुमच्या केसांना फायदा होऊ शकतो. या पाण्याचा वापर केल्यामुळे तुमची केसांच्या गळतीची समस्या कमी होऊ शकते. केस स्वच्छ होण्यास देखील मदत होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केस धुण्यासाठी पाणी वापरू शकतात.
कडुनिंबाचे पाणी :
आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे कडुनिंब हे बहुगुणकारी. अनेक ठिकाणी तुम्हाला कडुनिंबाचे झाड पहावयास मिळते. कडूनिंब हे आरोग्य साठी खूप उपयुक्त वनस्पती आहे. कडुनिंबाचा उपयोग तुम्ही तुमचे आरोग्य जपण्यासाठी करू शकतात. कडुनिंबाचा वापर कसा करावा हे देखील माहीत असणे गरजेचे असते. केस धुण्यासाठी कडुनिंबाचे पाणी कसे वापरावे याची माहिती आपल्याला असायला हवी. चला तर मग जाणून घ्या कडुनिंबाचे पाणी कसे करावे.
कडू लिंबाचे पाणी तयार करायची पद्धत
मित्रांनो,कडू लिंबा मध्ये निंबेनिन निंबोनाईड असते. यामुळे केसांचे मुळे घट्ट होण्यास मदत होते. कडुनिंबाचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कडुनिंबाचे पाने आणून ती स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. ही स्वच्छ केलेले कडुनिंबाची पाने मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडे पाणी घालावे व हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यावे. आता हे वाटून घेतलेले मिश्रण एका कपड्यात काढून व्यवस्थितपणे गाळून घ्या. याचा इफेक्ट अजून चांगला व्हावा यासाठी तुम्ही कांदा देखील यात टाकू शकतात. यासाठी तुम्ही एक कांदा घ्या. त्याची साल काढून त्याची पेस्ट करून घ्या. आणि त्याचा रस काढून घ्या. कडूनिंब हे तर गुणकारी आहेच शिवाय कांद्यामध्ये देखील एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
या पाण्याचा वापर कसा करावा ?
मित्रांनो, वरील प्रमाणे आपण कडूलिंबाचे पाणी तयार करून घेतलेले आहे. हे पाणी तुम्ही अंघोळीपूर्वी एक तास आधी तुमच्या केसांना लावायचे आहे. कडूनिंब व कांद्याचे पाणी हे व्यवस्थितपणे बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांना मालिश करायची आहे. मालिश केल्यामुळे तुमच्या केसांना मजबूती मिळेल. या पाण्याचा वापर जर तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी केला तरी तुम्हाला भरपूर प्रमाणात तुमच्या केसात फरक जाणवेल. यामुळे तुमच्या केसातील कोंडा नाहीसा होईल. केसांची मुळे मजबूत होतील. केस लांब सडक होण्यास मदत होईल. केसांमध्ये कुठल्याही प्रकारचे अँटी फंगल होणार नाही. तर वरील प्रमाणे तुम्ही कडुनिंबाच्या पाण्याचा वापर नक्कीच करू शकतात.
हर्बल शाम्पू :
मित्रांनो, आपले केस हे स्वच्छ राहावे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू वापरत असतात. बाजारात सर्व प्रकारचे शाम्पू उपलब्ध असतात. केसा विषयी जाहिरात बघून किंवा कुणाचेही ऐकून तुम्ही विविध प्रकारचे शाम्पू तुमच्या केसांसाठी वापरून बघतात. पण यामुळे केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात होऊ शकते. शिवाय शाम्पू मध्ये जास्त केमिकल देखील असते. कुठलाही शाम्पू हा केमिकल रहीत नसतो आणि अति केमिकल च्या वापरामुळे केसा विषयीच्या अनेक समस्या उत्पन्न होत असतात. म्हणून बाजारातून शाम्पू घेण्यापेक्षा तुम्ही घरगुती हर्बल शाम्पू तयार करू शकतात. पण हा घरगुती शाम्पू तरी कसा तयार करावा ? मित्रांनो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर घरगुती हर्बल शाम्पू कसा तयार करावा हे आपण जाणून घेऊया. अगदी सहज रित्या आपण हार्बल शाम्पू तयार करू शकतो.
हर्बल शाम्पू तयार कसा करावा ?
मित्रांनो, हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी सुकवलेली रिठे घ्या. सुकवलेले आवळे व शिकेकाई प्रत्येकी एक-एक वाटी घ्या. या तीन घटकांनी देखील तुम्ही हर्बल शाम्पू तयार करू शकता. पण हा हर्बल शाम्पू अजून इफेक्टिव व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये एक वाटी ब्राह्मी, भृंगराज, थोडे मेथीचे दाणे दोन ते तीन चमचे कलोंजी देखील घेऊ शकतात. हे सगळं एका भांड्यात काढून घ्या. आता यात दीड ते दोन वाटी पाणी घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून रात्री भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्या. आणि हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. आता यात काही कडूनिंबाची पाने स्वच्छ धुऊन टाका. आणि काही जास्वंदाची पाने देखील टाका. आणि हे सगळं चांगल्याप्रकारे उकळून घ्या. मित्रांनो या हर्बल शाम्पू चा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यात जेवढे आपण घटक घेतले आहे ते सर्वच आयुर्वेदिक आहेत. अशा प्रकारे तुम्ही हर्बल शाम्पू तयार करू शकतात.
याचा वापर कसा करावा ?
मित्रांनो, वरील प्रकारे आपण हर्बल शाम्पू तयार केलेला आहे आणि हा कसा वापरावा हे देखील जाणून घेणे तुम्हाला गरजेचे आहे. या हर्बल शाम्पू चा वापर तुम्ही केस धुवायला करायचा आहे. तुम्ही केसांना व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. याने तुम्ही पंधरा मिनिटे तुमच्या केसांची मालिश करायची आहे. या शाम्पूचा फेस होणार नाही परंतु या शाम्पूने तुमचे केस अगदी स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या केसांतील तेल देखील या शाम्पूने निघणार आहे. या शाम्पू च्या वापराने तुमचे केस स्वच्छ मऊ मुलायम होऊ शकतील.
तसेच तुमच्या केसांची गळती कमी प्रमाणात होईल. या शाम्पू च्या वापराने तुमच्या केसातील कोंडा नाहीसा होणार आहे. हा शाम्पू तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकतात. तसेच हा हर्बल शाम्पू तुम्ही महिनाभर ही साठवू शकतात. या शाम्पू मध्ये कडुनिंबाची पाने असल्यामुळे तुमच्या केसातील त्वचेला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकणार नाही. या हर्बल शाम्पू चा तुम्ही महिनाभरात वापर केल्याने देखील तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही आयुर्वेदिक हर्बल शाम्पूचा वापर करू शकतात.
तर मित्रांनो, बाजारातून केमिकल युक्त शाम्पूचा वापर न करता आयुर्वेदाचा वापर करून हर्बल शाम्पू कसा बनवू शकतात व त्याचा वापर कशाप्रकारे तुम्ही करू शकता हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे. आणि याने देखील तुमच्या केसांना फरक पडत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास हरकत नाही. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद !