ओठांवरील केस काढणे

0
761
ओटांवरील केस काढणे upperlips
ओटांवरील केस काढणे upperlips

नमस्कार मित्रांनो. आजकाल सर्वच तरुण व तरुणी हे आपले सौंदर्य जपत असतात. प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते प्रत्येकाला असे वाटत असते की आपले केस लांब असावेत आपल्या चेहरा ही इतरांप्रमाणे  डाग विरहित सुंदर असावा. आपणही इतरांप्रमाणे सुंदर दिसावे म्हणून प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत असतात. पार्लरमध्ये जाऊन महागडा ट्रीटमेंट घेत असतात. बऱ्याच बायका या चेहऱ्यांच्या  बाबतीत खूप जागृत असतात.  त्यांच्या चेहर्‍यावर कुठेही केस आढळून आले किंवा ओठांवरील केस आढळून आले तर त्या चारचौघात जायला देखील लाजत असतात. म्हणून पार्लरमध्ये जाऊन सारखे सारखे ओठांवरील केस काढत असतात.

परंतु असे वारंवार करत गेल्यास ओठांवरील केस हे  रफ होतात. आणि त्यांची वाढ देखील जास्त प्रमाणात व्हायला लागते आणि असे केस चेहऱ्यावर देखील चांगले वाटत नाही म्हणूनच चेहऱ्यावरील केस पूर्णपणे काढून टाकण्यासाठी जर तुम्ही घरगुती उपाय करून बघितले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ तसेच खर्च करण्याची आवश्यकता नाही आपण घरच्या घरी देखील अतिशय सहजरीत्या या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. चला तर मित्रांनो आज आपण ओटांवरील केस काढण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

ओठांवर केस येण्याची कारणे ?

मित्रांनो बहुतांश मुलींचे चेहऱ्यावर अनावश्यक केस अधिक प्रमाणात दिसतात. अप्पर लिप्स, कपाळावर केस जास्त असल्याने मुली बरेचदा अस्वस्थ देखील होतात.तसेच त्यांना चारचौघात जाणे देखील लाजिरवाणी वाटते.या समस्या मागील कारणे अनुवंशिक हार्मोन मधील बदल, तान तनाव पूर्ण जीवन शैली इत्यादी असू शकतात. पण बऱ्याच प्रकरणांमध्ये यामागील प्रमुख कारण असल्याचे आढळून आले ताणतणावामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात.आणि या व्यतिरिक्त फास्ट फूड खाणे, तेलकट व तुपकट पदार्थ खाणे तसेच, डबाबंद खाद्य पदार्थ खाल्याने देखील शरीरातील हार्मोन्स हे संतुलित होतात. तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे यामुळे देखील केस वाढू शकतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयी मुळे ही आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. पण जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही यावरही उपाय करता येतात चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची समस्या दूर व्हावी यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. चला तर मग  चेहऱ्यावरील  घरगुती उपाय करून ओटावरील अनावश्यक केस काढण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील हे आपण जाणून घेऊया.

वाचा  वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि याने काय होते

ओठांवरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय :

मित्रांनो चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी खालील प्रमाणे घरगुती उपाय जाणून घेऊया .पार्लर मध्ये सारखे सारखे जाऊन अप्पर लीप काढण्यापेक्षा घरगुती उपाय करून ही तुम्ही अप्पर लिप्स वरील केस  जाण्यास तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. 

बेसन पीठ वापरून बघा :

  • दोन चमचे बेसन पीठ 
  • नारळाचे तेल दोन चमचे 
  • दोन चमचे गुलाब पाणी

मित्रांनो, एका वाटीमध्ये नारळाचे तेल दोन चमचे व बेसन पीठ दोन चमचे घेऊन एकत्रित पेस्ट तयार करून घ्या. या नंतर एक चमचा गुलाबपाणी त्यामध्ये मिक्स करा.ही पेस्ट एकत्रित करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर अप्पर लिप्स वर लावा आणि तीस मिनिटानंतर हळुवार पणे रगडून ही पेस्ट काढा . यानंतर कापसाच्या मदतीने आपण त्वचेवर गुलाब पाणी लावू शकतात.असे सलग सात दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.तसेच त्यांच्या डोळयांच्या आसपासची जागा सोडून तुम्ही पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर हे लावू शकतात, गाल, मान आणि कपाळावर अनावश्यक केस असल्यास तुम्ही या नैसर्गिक उपचाराचे मदत घेऊ शकतात. केसांच्या वाढीच्या दिशेने ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. पण पेस्ट काढताना उलट दिशेने मसाज करावा. यामुळे अनावश्यक चेहऱ्यावरील केस कमकुवत होतात व मुळापासून केस निघण्यास देखील मदत होते.

हळद व मध वापरून बघा :

 हळद आणि मध यांचा वापर करून देखील ओठांवरील केस काढण्यास मदत  होणार आहे परंतु यासाठी बाजारातून आणलेली हळद न वापरता घरच्या पद्धतीने तयार केलेली हळद वापरलेली योग्य ठरेल. घरगुती कशी बनवायची तर त्यासाठी एक हळकुंड आणायची त्याचे तुकडे करायचे मिक्सरमध्ये टाकून ते बारीक वाटून घ्यायचे. अशाप्रकारे बारीक हळद तयार करून घ्यायची. घरगुती पद्धतीने बनवलेली  चिमूटभर हळद घेऊन त्यामध्ये थोडे मध मिक्स करून घ्या आणि ओठांवर ज्या ठिकाणी केस आले असतील, त्या ठिकाणी लावून घ्या आणि  एक अर्धा तास ते तसंच राहू द्या. त्यानंतर ते स्वच्छ पाण्यात धुऊन टाका.असे तुम्ही आठवड्यातून तीन-चार वेळा करत राहिल्याने ओटावरील केस खूप कमी कमी होत जातील. 

वाचा  गरोदरपणात लो ब्लड प्रेशर होणे लक्षणे व घरगुती उपाय :-

डाळीचे पीठ व दूध वापरून बघा :

डाळीचे पीठ म्हणजेच बेसन चे पीठ व दूध वापरून देखील तुम्ही तुमच्या चेहर्‍यावरील ओठांवरील अनावश्यक केस काढू शकतात. बाहेरील बेसन विकत न आणता घरगुती पद्धतीने बनवलेले यासाठी वापरायचे आहे एक चमचा डाळीचे पीठ घ्या. त्यामध्ये  चिमूटभर हळद आणि थोडे दूध घालायचे हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून घ्या आणि हे ओटांवरील अनावश्‍यक केसांना लावून घ्या.नंतर हे तसेच अर्धा तास राहू द्या. अर्धा तासानंतर धून टाका या उपचाराने ओटांवरील केस निघून जाण्यास मदत होईल तसेच येणारे केस सुद्धा उशिरा येतील. तसेच नुसती हळद लावून त्याने देखील उलट दिशेने  मसाज जरी केली तरी केस कमी व्हायला लागतात. म्हणजेच निघून  जाऊ शकतात आणि येणारे केस हे देखील हळूहळू येत असतात तर हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून बघू शकतात.

   वरील प्रमाणे ओटावरील अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही घरेलू घरगुती उपाय करून बघू शकतात. याने नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील तसेच ओठांवरील अनावश्यक केस जाण्यासाठी मदत होऊ शकते.तर वरील प्रमाणे उपाय नक्कीच तुम्ही करून बघू शकतात. 

ओठांवरील केस काढताना कोणती काळजी घ्यावी ?

      बेसन, पीठ, दूध, मध एकत्रित मिश्रणाने तुम्ही तुमच्या ओठांवरील केस काढू शकतात. परंतु ओठांवरील केस काढताना देखील योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.  ओठांवरील केस काढताना म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पेस्ट लावली इथे पेस्ट रगडून काढतांना उलट दिशेने मसाज तुम्ही केला पाहिजे. म्हणजेच अनावश्यक केस मुळांसह कमकुवत होतील व त्यामुळे केस निघण्यासाठी देखील मदत होऊ शकते परंतु, योग्य त्या दिशेने म्हणजेच उलट दिशेने मसाज केली पाहिजे. आता हे उपाय करताना तुम्हाला याची एलर्जी तर होणार नाही ना यासाठी तुम्ही उपाय करण्याआधी हातावर लावून बघावे आणि त्यानंतरच ते उपाय तुम्ही करू शकतात.

वाचा   चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

घरगुती उपचारांमध्ये आपण बेसन पीठ, हळदीचा वापर करू शकतात. बेसन नैसर्गिक स्वरूपात आपल्या त्वचेत खोलवर स्वच्छ करण्याचे कार्य करते. या मुळे आपल्या त्वचेतील पेशी मजबूत होतात. त्वचेतील ओलावा टिकून राहतो तसेच, त्वचा उजळते. नारळाच्या तेलामध्ये अँटी फंगल घटक असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास सह पी एचची पातळी देखील संतुलित राहते. गुलाब पाण्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि राशेज याची समस्या कमी होऊन त्वचा मऊ होते. तसेच गुलाब पाण्यामुळे चेहऱ्याला एक नैसर्गिक थंडावा मिळतो. ओठांवरील केसांवर लावलेली पेस्ट हे तुम्ही उलट दिशेने म्हणजे  हळूवारपणे काढावी एकदम खेचून काढू नका. केस काढताना योग्य ती काळजी घ्यावी.

     मित्रांनो वरील प्रमाणे ओठांवरील केस काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात. तर वरील प्रमाणे  तुम्ही घरगुती उपाय करून तुमच्या ओठांवरील केस काढू शकतात. याने नक्कीच तूम्हाला मदत होऊ शकते. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

     धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here