केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

0
1717
केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे
केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

 

हल्ली अनेकांना केस गळतीची समस्या असते. केस गळतीचे अनेक कारणे असू शकतात. प्रत्येकाला असे वाटत असते की आपले केस देखील सुंदर, मुलायम व दाट असावे यांनी आपण अजून सुंदर दिसू. परंतु हे प्रत्येकच बाबतीत घडते असे नाही. सतत केस गळतीमुळे केस हे विरळ होतात आणि याने टक्कल पडण्याची दाट शक्यता असते. असे होऊ नये म्हणून केसांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. कामाच्या अति व्यापामुळे देखील केसांकडे आपले दुर्लक्ष होत असते. काहीजण तर केसाना तेल देखील लावत नाहीत. केसांना तेल न लावल्यामुळे देखील केस हे रुक्ष बनतात. आणि निस्तेज देखील होतात. केसांना तेल न लावल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा केसांवर होत असतो. त्यामुळे केसांची वाढ देखील खुंटते. केस वाढवण्यासाठी काय करता येईल याचा सतत विचार त्रस्त करून जातो.

आपल्या केसांची काळजी ही आपल्या बालपणापासूनच सुरू होते. बालपणी आपल्या टाळूला तेल लावून त्याची मसाज केली जाते. केसांच्या टाळूची मसाज केल्यामुळे केस गळत नाही आणि केसांची वाढ देखील होत असते. केस गळतीची समस्या कमी व्हावी,तसेच  आपले केस हे घनदाट, मुलायम व्हावेत,आपले केस देखील इतरांप्रमाणे लांब सडक व्हावेत.यासाठी आपण आपल्या केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी नियमित रूटीनमध्ये व्यायामाची भर घातली पाहिजे. आपल्या केसांची योग्य निगा राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. केस वाढवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तसेच केस वाढण्यासाठी कुठले तेल वापरले पाहिजे,आयुर्वेदिक तेलाचा वापर केला पाहिजे का? ही सगळी माहिती तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग आपण केस वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयाची सखोल माहिती जाणून घेऊया.

केस वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

इतरांप्रमाणे आपले केस देखील लांब, दाट व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी तुम्ही केसांची काळजी  घेतली पाहिजे. तर केसांसाठी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेऊया.

  • केस जर पाच ते सहा आठवड्यानंतर ट्रिम केले तर केसांची कोरडी व निर्जीव टोके ट्रिम होतात. केस ट्रिम केल्यामुळे केस दाट होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना शाम्पू करा पण शाम्पू करण्याआधी केसांना कोमट तेलाने मालिश केली पाहिजे.
  • आठवड्यातून दोनदा केसांना अंडे लावून 5 ते 10 मिनिटे केसांना मसाज करा. आणि नंतर केस शाम्पू लावून स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
  • केस गरम पाण्याने कधीही धुवू नका. केस गरम पाण्याने धुतल्यामुळे केसातील कोंडा वाढण्याची शक्यता असते. आणि कोंडा वाढल्यामुळे खाज येण्याची शक्यता असते. म्हणून केसांना शक्यतो गरम पाण्याने धुणे टाळावे.
  • कधी केस कुरळे तर कधी स्ट्रेटनिंग करण्यासाठी तुम्ही वारंवार स्टायलिंग टूलचा वापर करत असाल तर तुमचे केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात उद्भवू शकते.
  • केस धुतल्यावर ते कधीही टॉवेलने जोरात पुसू नका. तर केस कॉटनचे कपड्याने हळुवार पणे वाळवून घ्या.
  • शाम्पू आणि कंडिशनर लावल्यानंतर केसांना ऍपल साइडर विनेगर लावून केस धुवा याने केस स्वच्छ व मुलायम होण्यास मदत होते.
वाचा  लहान बाळ रडत असल्यास काय करावे

जर तुम्ही वरील प्रमाणे उपाय करून बघितले तर नक्कीच तुमचे केस घनदाट होण्यासाठी मदत होऊ शकते. वरील प्रमाणे तुमच्या केसांची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.

केस वाढवण्यासाठी आयुर्वेदिक तेल

केस घनदाट होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही जाणून घेतले आहे. तसेच केस लांब व घनदाट होण्यासाठी कोणते आयुर्वेदिक तेल वापरले पाहिजे? कुठल्या प्रकारचे घरगुती आयुर्वेदिक तेल तयार करून तुम्ही केस वाढवू शकता? हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. चला तर मग,केस वाढवण्यासाठी आपण कोणत्या तेलाचा वापर करू शकतो याची माहिती जाणून घेऊया.

नारळाचे तेल वापरून बघा :

मित्रांनो, तुम्ही तुमचे केस वाढण्यासाठी नारळाचे तेल वापरून बघा. नारळाचे तेल हे एक आयुर्वेदिक आहे. नारळाचे तेल नियमितपणे तुम्ही वापरल्याने तुमच्या केसांना योग्य ते प्रमाणात पोषण घटक मिळतील. नारळाच्या तेलात फॅटी ऍसिड असते. नारळाचे तेल वापरल्याने तुमच्या केसांना एक नैसर्गिक चमक येऊ शकते. नारळाचे तेल नियमित लावले तर तुमच्या केसांची गळतीची समस्या कमी होऊ शकते. नारळाचे तेल केसांना कसे लावावे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

नारळाचे तेल एका वाटीमध्ये थोड्या प्रमाणात काढून घ्या. तेल किती लावावे हे तुमचे केसांवर अवलंबून असते.तुमचे केस छोटे असतील, तर तेल थोड्या प्रमाणात लागेल आणि केस मोठे असतील तर जास्त प्रमाणात घ्या.  हे तेल कोमट करून घ्या. हे कोमट केलेले तेल रात्री झोपण्याआधी केसांना लावा. पाच ते दहा मिनिटं तुमच्या केसांच्या मुळाची या तेलाने मालिश करा. रात्रभर तेथेच राहू द्या.आणि दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुऊन टाका. मित्रांनो यामुळे नक्कीच तुमच्या केसांना फायदा होऊ शकतो. या तेला मध्ये फॅटी ऍसिड असते. त्यामुळे हे तुम्हाला तुमच्या केसांसाठी फार उपयुक्त ठरू शकते. या तेलामध्ये केसांचे संरक्षण करण्याचे गुणधर्म आढळून येतात. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे केस वाढीसाठी नारळाचे तेल नक्कीच वापरून बघा.

कांद्याचे तेल वापरून बघा :

तुमचे केस दाट व्हावेत, लांबसडक व्हावेत, केस गळतीची समस्या कमी व्हावी तसेच केस मुलायम व मजबूत व्हावेत.यासाठी मित्रांनो,तुम्ही कांद्या पासून बनवलेले तेल वापरून बघा. कांद्याचे तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. कांद्याचे तेल हे बाजारात देखील उपलब्ध आहे. परंतु तुम्ही जर कांद्याचे तेल घरगुती पद्धतीने बनवले तर  याचा नक्कीच तुमच्या केसांना फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया  कांद्याचे घरगुती तेल कसे बनवावे.

वाचा  श्वास घेताना आवाज येणे कारण व उपाय

एक किंवा दोन लाल कलरचे कांदे घ्या. यानंतर या कांद्याची साल काढून कांदे स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. धुतल्यानंतर  मिक्सरच्या भांड्यात कांदे टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या. आता एका लोखंडी कढईत अर्धी वाटी खोबरेल तेल टाका. तेल व्यवस्थितपणे गरम झाल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकून घ्या. हे तेल अजून इफेक्टिव्ह होण्यासाठी यामध्ये तुम्ही मेथीचे दाणे देखील टाकू शकतात. कांद्याची पेस्ट हि लाल सर होण्यापर्यंत तेल चांगले गरम करून घ्या आणि तेल थंड झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने ते गाळून घेऊन एका छोट्याशा काचेच्या बरणीत भरून घ्या. या तेलाचा वापर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केल्यास फार उत्तम होऊ शकते. हे तेल तुमच्या केसांना लावणे आधी कोमट करून लावावे व पाच ते दहा मिनिटे या तेलाने केसांची मालिश करावी. या तेलाच्या नियमित वापराने काही महिन्यातच तुम्हाला तुमच्या केसांबद्दल चांगला फरक जाणवून येईल.

कांद्या मध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते. जे केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. कांद्याच्या तेलाचा नियमित पणे वापर केल्यामुळे तुमच्या केसांच्या गळतीची समस्या कमी होऊन तुमचे केस दाट व लांब सडक होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

कढीपत्ता पासून बनवलेले तेल वापरून बघा :

मित्रांनो,कडीपत्ता हा सगळ्यांनाच ठाऊक आहे.स्वयंपाकात तर कडीपत्ता याचा वापर आवर्जून केला जातो. कडीपत्ता बहुगुणकारी आहे. कढीपत्ता हा फक्त स्वयंपाकासाठीचा उपयुक्त आहे असे नाही.तर त्याचा वापर तुम्ही तुमच्या केसांसाठी देखील करू शकतात. कढीपत्ता केवळ भाजी चव वाढवत नाही. तर याचा वापर तुम्ही केस वाढण्यासाठी देखील करू शकतात. कडीपत्ता हेअर टॉनिक म्हणून काम करून तुमच्या केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

मित्रांनो,जर तुमचे केस हे अकाली पांढरे होत असतील तर तुम्ही कढीपत्ता पासून बनवलेले तेल वापरून बघा. कढीपत्ता पासून बनवलेले तेल वापरल्यामुळे तुमचे केस पांढरे होने थांबून केस काळे येतील. या तेलाच्या वापरामुळे केसांची वाढ होऊन केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहतो. कडीपत्त्याचे तेल कसे बनवावे हेदेखील माहिती करून घेणे गरजेचे आहे.चला तर मग जाणून घेऊया कडीपत्त्याचे तेल कसे बनवावे.

१ वाटी कडीपत्ता घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या + १ कप खोबरेल तेल घ्या. आता एका कढईत एक कप खोबरेल तेल टाकून घ्या. तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या. हा कडीपत्ता तेला मध्ये व्यवस्थितपणे गरम करून घ्या. नंतर येथील थंड होऊन एका भांड्यात काढून घ्या.

वाचा  दुधी भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

मित्रांनो,हे तेल कोमट करून तुमच्या केसांच्या मुळांशी लावा याने दहा मिनिटे केसांच्या मुळाशी मसाज करा. एक तास ते तसेच ठेवा. आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हे तेल केसांना लावू शकतात. आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाका. या तेलाच्या वापराणे नक्कीच तुमच्या केसांना त्याचा फायदा होणार आहे. कढीपत्ता मध्ये कॅल्शियम, आयरण आणि फॉस्फरस असते. कढीपत्ता मध्ये  विटामिन बी१, बी३, बी९ आणि व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कडीपत्ता चा वापर हा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो कढीपत्त्याच्या तेलाचे वापराने केसातील कोंडा देखील नाहीसा होण्यास मदत होते.

केसांसाठी केशकिंग वापरून बघा :

केसांसाठी हेअर ऑइल वापरणे हे तर सर्वांनाच ठाऊक असते. पण जर ते आयुर्वेदिक हेअर ऑईल असेल तर फारच उत्तम. आयुर्वेदिक हेयर ओईल मध्ये अनेक गुणधर्म असतात. आयुर्वेदिक तेलाचा आपल्या केसांसाठी चांगला फायदा होत असतो. आयुर्वेदिक हेअर ऑइल अनेक प्रकारे असतात. त्यातला एक आयुर्वेदिक हेअर ऑइल ते म्हणजे केशकिंग. कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये तुम्हाला सहजपणे केशकिंग हेअर ऑईल मिळेल. केश किंग हेअर ऑइल मध्ये 21 हर्बस चा वापर केला जातो. जसे की आवळा, ब्राम्ही, भ्रींगराज, निंबा, अमलाकी आणि तेलपाक विधी यापासून हे तेल तयार केले जाते.

केश किंग चे तेल हे डीपृट कंगवा सोबत येते. ज्यामुळे  हे तेल केसांना लावताना ते आत मध्ये पोहोचते. ज्यामुळे तेल हे केसांच्या मुळाशी पोचून केसांची वाढ होण्यास मदत होते. केश किंग या तेलाचा वापर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी केस शाम्पू लावून स्वच्छ करून घ्या.त्याने तुमच्या केसांना अधिक फायदा होऊ शकतो. तुमच्या केसान विषयी च्या सगळया समस्या नक्कीच या तेलाच्या वापराने कमी होऊ शकतात. केशकिंग हे  आयुर्वेदिक हेअर ओईल नक्कीच तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरुन बघा.

तुमचे केस अकाली पांढरे होऊ नयेत, तुमचे केस लांब व घनदाट व्हावेत, तुमच्या केसात कोंडा होऊ नये, तुमच्या केसांच्या गळतीची समस्या कमी व्हावी यासाठी तुम्ही वरील प्रमाणे उपाय करून बघू शकतात. आम्ही सांगितलेले आयुर्वेदिक तेल वापरून बघा. तसेच केसांची वाढ ही चांगल्या पद्धतीने व जलद गतीने व्हावी यासाठी घरगुती तेल देखील बनवू वापरू शकतात. याने नक्कीच तुमच्या केसांना फायदा होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो,वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आयुर्वेदिक घरगुती तेल याने देखील तुमचे केसांविषयाच्या समस्या कमी होत नसतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here