वास्तुदोष म्हणजे नेमके काय ? Vastu Dosh Meaning in Marathi

0
1472
वास्तुदोष
वास्तुदोष

नमस्कार, हल्ली प्रत्येकालाच वाटते की, आपले स्वतःचे छोटे से का होईना, घर असावे. वास्तुदोष म्हणजे नेमके काय आणि ज्यावेळी आपण घर घेतो, त्यावेळी आपण काही गोष्टींकडे लक्ष न देता घेतो. आपण घर घेताना आपल्या बजेटनुसार बघतो, एरिया बघतो पण, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो जसे की प्लॉटची दिशा बघत नाही, एंट्रन्स कुठून होतोय  ते बघत नाही, यामुळे काही प्रॉब्लेम तयार होतात आणि तरी ही आपण स्वतःचे घर घ्यायला तयार राहतो. तुम्हाला विश्वास असो वा नसो, वास्तुशास्त्रानुसार घर घेतले, तर तुमच  खूप प्रॉब्लेम सॉल होतात. आणि जर तुम्ही घर वास्तुशास्त्रानुसार घेतले नसेल, तर तुम्हाला वास्तुदोष हा लागतो. जर वास्तुदोष लागला तर  आपल्या घरात कटकट होणे, किंवा शारीरिक व मानसिक तक्रारी ,आजारपण यासारख्या घटना घडत असतात, पण आपल्याला लक्षात येत नाही, हे कोणत्या कारणांमुळे होत आहे, आपण ती कारणे जाणून घेऊयात!

Table of Contents

वास्तुदोष म्हणजे नेमक काय ? Vastudosh Mhanje Kay ?

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की आपण घर घेताना नेमकी काळजी घेत नाही, त्यामुळे वास्तुदोष लागतो, वास्तुदोष लागला की, त्याचा परिणाम आपल्या  परिवारावर होतो. म्हणजे  घरात सतत आजारपण येणे, चिडचिड होणे, कट कट होणे, भांडण होते, पैशांची चणचण भासणे, मन उदास राहणे, अशा समस्या आपल्याला होऊ शकतात. चला तर मग वास्तुदोष लागू नये यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी. 

वाचा  घराची अंतर्गत व बाह्य स्वच्छता कशी ठेवावी ?

वास्तु दोष टाळण्यासाठी काय करायला हवे ?

वास्तुदोष टाळण्यासाठी काही उपाय – 

  • जसे की कॉर्नर चा प्लॉट घेणे, मोस्टली टाळावे. 
  • पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख घर घ्यावे, 
  • घराजवळ स्मशानभूमी नसावी, 
  • घरावर मंदिराच्या कळसाची, सावली पडती नसावी. 
  • दक्षिण मुखी घर नसावे, 
  • संडास घर ईशान्येला नसावे, 
  • पाण्याचा साठा व अग्नी जवळजवळ नसावे. 
  • ईशान्येला देवघर असावे. 
  • बीम खाली झोपण्याचा बेड असू नये, 
  • ब्रह्मस्थान मोकळे असावे. 
  • घर त्रिकोणी जागेत नसावे. 
  • स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. 
  • घराच्या खोलीत जास्त कॉर्नर असू नयेत. 
  • घरात मृत व्यक्तीचे फोटो दक्षिणेला लावावे. 

आता वास्तुदोष निवारणासाठी काही घरगुती उपाय :

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे. की वास्तु दोष कसा व कोणत्या कारणामुळे लागतो, व वास्तुदोष लागला, तर त्याचा परिणाम आपल्या परिवारावर काय होतो ते सांगितले आहेत. आता वास्तुदोष निवारणासाठी काही घरगुती उपाय, चला तर मग जाणून घेऊयात! 

वास्तुदोष निवारणासाठी घरात नंदादीप नेहमी तेवत ठेवा :

हो, खरंच जर तुम्ही देऊळ घरांमध्ये नेहमी नंदादीप तेवत ठेवला, तर तुम्हाला यासारख्या समस्यांवर आराम मिळेल. जसे की घरात कटकट होणे, वाद होणे, सतत आजारी पण येणे, यासारख्या समस्यांवर, जर तुम्ही घरात देवापुढे नेहमी नंदादीप तेवत ठेवला. तर तुम्हाला जरूर फायदा होईल. 

वास्तुदोष निवारणासाठी संध्याकाळी कापराची धुरी घराला द्या :

जर, तुम्हाला वाटत असेल, की घरात सारखी कटकट होते, आजारपण येते , आणि तुम्हाला वाटत असेल, की घरात काही वास्तु दोष लागला आहे, अश्यावेळी तुम्ही घरात संध्याकाळी कापराची धुरी द्यावी. जर घरात संध्याकाळी कापराचा धुरी दिली, तर तुमचे मन एकदम प्रसन्न व शांत चित्त राहते. 

वास्तुदोष निवारणासाठी देवघरात शंख ठेवावा :

हो, खरंच देवघरामध्ये शंख असावा. कारण शंखा मध्ये विजय, आनंद, समृद्धी, कीर्ती तसेच लक्ष्मीचे प्रतीक असते. शंख ज्या घरात असतो, त्या घरात सुख, शांती नेहमी भरलेली असते. ज्या वेळी तुम्ही संध्याकाळी शंख तीन वेळा वाजवाल, त्यावेळी तुमच्या घरात जी नकारात्मक उर्जा आहे, ती बाहेर टाकली जाते. व तुमच्या घरात सुख शांती लाभते. 

वाचा  दारासमोर रांगोळी काढण्याचे फायदे

वास्तुदोष निवारणासाठी घरात मोर पंख असावे :

ज्या घरात नवरा-बायको मध्ये सारखे वाद होत असतील, तसेच मुले चिडचिड करत असतील, अशा वेळी जर तुम्ही घरात मोर पंख ठेवले, तर तुम्हाला अधिक फायदा होईलच. घरात मोरपंख असल्यामुळे, नवरा-बायकोमधील वाद कमी होतात. तसेच जर तुम्ही घरात पंख्याला मोरपंख लावला, आणि त्या पंख्याची हवेची सावली, मुलांच्या अंगावर पडली, तर मूल हे शांत होतात. आणि जर मुलांच्या खोलीत मोरपीस त्यांच्या जवळ असले, तर त्यांचे अभ्यासातही मन लागते. 

वास्तुदोष निवारणासाठी घरात गायत्री मंत्राचा जप करा :

हो, खरंच गायत्री मंत्रा मध्ये खूप पावर असते. जर तुम्ही घरात गायत्रीमंत्राचा जप करत असाल, तर तुमच्या घरात सुख शांती ही नेहमी भरलेली असते. जर तुम्हाला जप करणे शक्य नसेल, तर तुम्ही आता मार्केटमध्ये गायत्री मंत्राच्या सीडीज भेटतात, त्या घरी लावल्या तरी चालेल. 

संध्याकाळी दिवा लावल्यावर घंटा नाद करावे :

तुम्ही दररोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर, घंटानाद करायला हवा. जर घंटानाद केला, तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघते, तसेच मन प्रसन्न व एकाग्र राहते. अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा. 

वास्तुदोष निवारणासाठी घराच्या आवारात शुभ झाडे लावावे :

हो, जर तुम्हाला वाटत असेल, की घरात वास्तुदोष आहे. सारखे भांडण होतात, कट कट होतात, चिडचिड होते, घरात संपत्ती राहत नाही, अशावेळी तुम्ही घराच्या आवारात शुभ झाडे लावली, तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मग ती म्हणजे कोण कोणती, जसे की तुळशी, गुडलक बांबू, मनी प्लांट, पारिजातक, अशोक, केळी, उंबर यासारखी झाडे तुम्ही लावू शकतात. ही सर्व झाडे शुभचिंतन असतात त्याने तुम्हाला फायदा मिळेल. 

दक्षिणाभिमुख दार असेल तर :

हो, आता आपण ज्यावेळी घर घेतो, त्यावेळी  कंट्रक्शन मध्ये बजेटनुसार घेतो, त्यामुळे दिशा ही नेहमी वेगवेगळ्या असतील, समजा जर तुम्हाला दक्षिणाभिमुख दार मिळाले, तर त्यावेळी तुम्ही दरवाज्याच्यावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. त्याने तुम्हाला वास्तुदोष चा त्रास होणार नाही. 

वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

 बाथरूम मध्ये काचेच्या वाटीत जाड मीठ भरून ठेवावे :

जर तुम्हाला वाटत असेल की, घरात वास्तुदोष लागला आहे. अशा वेळी तुम्ही टॉयलेट व बाथरूमच्या खिडकीमध्ये मिठाचे खडे, एका वाटीत भरून ठेवावे. त्यामुळे तुमच्या घरातील नेगेटिव एनर्जी ही बाहेर शोषून जाण्यास मदत मिळते. 

लादी पुसताना तुरटी व मिठाचा वापर करावा :

हो, जर तुम्ही रोज लादी पुसत असाल, अशावेळी तुरटीचे पाणी आणि मीठ टाकले, तर तुमच्या घरातील नेगेटिव एनर्जी हे लवकर बाहेर निघण्यास मदत होते. तसेच मिठाचा वापर हा तुम्ही अमावस्या- पौर्णिमा च्या वेळेस केला, तर तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यास मदत होते. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला वास्तुदोष हा कसा लागतो, आणि वास्तुदोष लागला. तर त्यावर कोणते परिणाम होतात. तसेच वास्तुदोष निवारणासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले वास्तुदोष निवारणाचे काही उपाय सांगूनही, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही एखाद्या ज्योतिष शास्त्र किंवा वास्तुशास्त्र कडे जाऊन ते उपाय करून घ्यावेत. व आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकतात.

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here