वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे जाणून घेऊयात

0
2484
वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे
वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे

प्रत्येक जण हे आपल्या स्वप्ना नुसार घर बांधत असतात. स्वप्नातील घर साकारत असतात. घर बांधताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात. घर बांधण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करत असतात. परंतु एवढे करून सुद्धा देखील त्यांना अनेक अडचणी येत असतात. अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. मग घर बांधताना आपले काही चुकले तर नाही ना? चुकीच्या पद्धतीने आपण घर तर बांधले नाही ना? नेमके आपले काय चुकले? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात, त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे  असावे.

घर बांधताना आपण वास्तुशास्त्राचे नियम पाळले पाहिजे होते का ? आणि वास्तुशास्त्राचा वापर करून आपण घरातले  किचन,  बेडरूम, हॉल आणि पूजा घर करायला हवे होते का? असे प्रश्न देखील मनात उत्पन्न होत असतात. तर हे सर्व का होत असेल याविषयी तुम्हाला माहिती जाणून घेणे फार गरजेचे आहे. यातीलच एक म्हणजे देवघर. वास्तुशास्त्रानुसार घर बांधतांना देवघर हे नेमके कुठे असावे ? कसे असावे ? या विषयी आपण माहिती जाणून घेऊया.

देवघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा होय. घरात आपले पावित्र्य राखण्याची जागा म्हणजेच पूजा घर. मग ते घर लहान असो किंवा घर मोठे असो, त्या घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची  स्वप्न रंगवताना देवघर कुठे असावे, कसे असावे याचेही नियम काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची व विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर मन शांत व प्रसन्न वाटायला पाहिजे. घरा बरोबर देवघराचे महत्व देखील तेवढेच असते. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, हवन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठल्या दिशेला असावे ? आणि कसे असावे? याचे देखील मार्गदर्शन घेणे गरजेचे असते.

वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे (स्वयंपाकघरात) 

घर बांधकाम करताना घरातील देवघर हे कुठल्या दिशेला हवे?कसे हवे? हे जाणून घेणे फार गरजेचे असते. घराचे बांधकाम ची जागा ही जर मोठी असेल तर घरातील देवघर हे स्वतंत्र काढण्यास हरकत नाही. घराची जागा मोठी असल्यास देवघर हे स्वतंत्र असावे. आणि घरात जास्त जागा नसेल तर देवघर हे स्वयंपाक घरात ठेवताना  देखील योग्य रीतीने ठेवले पाहिजे. आणि शक्यतो जर किचन मध्ये तुम्ही जर मास शिजवत असाल तर अशा ठिकाणी देवघर ठेवणे चुकीचे असते. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसताना किचन मध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर – पूर्व दिशेला देवघर बनवू शकतात. देवघर ईशान्य दिशेला असावे. कारण ऐश्वर्य  हे ईशान्य कोपर्‍यातून प्रवेश करते आणि नेऋत्य म्हणजेच पश्चिम – दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरातील देवघर अशा ठिकाणी असावे,ज्या ठिकाणी दिवसभरातून त्याठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत असते त्या घरातील विविध दोष हे आपोआप नष्ट होत असतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते व सकारात्मक उर्जेत वाढ होत असतो, असे सांगितले जाते.पूजा घरातील दिवा, निरंजन, समई हे आग्नेय कोप-यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे.देव घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर  बसवावी.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम कुठल्या दिशेला असावा

वास्तुशास्त्रानुसार देवघरात देवाच्या मुर्ती कशा ठेवाव्यात ?

देवघर बनवल्यावर देवघरात मूर्ती कशा ठेवाव्यात? हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. देवाचे फोटो दक्षिण दिशेला लावू नयेत. देवघरात कमीत कमी मूर्तींचा समावेश असावा. देवघरात अडगळीचे सामान ठेवू नका. देवघराच्या वरील भागात निर्माल्य माळा ठेवू नये. प्राचीन काळातील मूर्तींचे अवशेष देवघरात ठेवणे शक्यतो टाळावे. कुलदेवतेची टाक, मूर्ती किंवा फोटो, लंगडा बाळकृष्ण, नंदी आणि नाग विरहित शंकराची पिंडी काळया रंगाची किंवा पंचधातूची असावी. देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिम दिशेस असावी. म्हणजेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे पूर्वेकडे होईल अशा तऱ्हेने देवघराची मांडणी करावी. देवघर याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. शंखाचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे, शंकराच्या पिंडीचे म्हणजेच शिवलिंगाचे निमुळते टोक हे उत्तर दिशेकडे ठेवावे. तसेच देवघराला उंबरठा असावा. देवघराला तोरण बांधावे. देवघरातील मूर्ती या जास्त उंच नसाव्यात. देवघरातील मूर्तीची उंची जितकी कमी तितके चांगले.

वास्तुशास्त्रानुसार देवघरात काय करू नये ?

देवघराची मांडणी व्यवस्थित करावी. देवघरात शनिदेवाची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो हा कुठेही असला तरी चालेल परंतु देवघरात मारुतीचा फोटो ठेवू नये, असे म्हटले जाते. देवघरात महादेव शंकराची मूर्ती अथवा फोटो पुजले जाऊ नये,असे सांगितले जाते किंवा अशी मान्यता आहे. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असतील तर ते उभे ठेवू नयेत तर जमिनीशी समांतर ठेवावेत. एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुर्त्या देवघरात ठेवू नयेत. शक्यतो एका देवाची एकच मूर्ती देवघरात ठेवा.

वास्तुशास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवावे का?

मित्रांनो देवघरात मूर्ती ठेवताना त्या विचार करूनच ठेवाव्यात  एकाच देवाच्या दोन किंवा तीन व त्यापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. तसेच बर्‍याच जणांना हा प्रश्न देखील पडलेला असेल की देवघरात शिवलिंग ठेवावे का? तर शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याचा आकारा एवढे असावे, असे सांगितले जाते तसेच, देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक ठरते. एकापेक्षा जास्त शिवलिंग घरात ठेवणे वर्ज्य मानले जाते. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्या पासून तयार केलेल्या वस्तू,चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात पूर्वजांचा फोटो लावू नये. तर पूर्वजांचा फोटो लावण्यासाठी घरातील दक्षिण दिशेची भिंत योग्य आहे. देवघरांत जास्तीत जास्त वस्तूंचा पसारा करणे टाळावे.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार दुकान कसे असावे?

वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे यावर सोपे उपाय

वास्तुशास्त्रानुसार देवघर बनवताना शक्यतो ईशान्य दिशेला बनवावे. तसेच देऊ घरात मोजक्याच मुर्त्यांचा समावेश करावा. देवघरात अडगळीचे सामान ठेवणे शक्यतो टाळावे. देवघरातील मूर्ती यांची उंची ही कमी असलेली बरी. तसेच देवघरात वास्तूदोष लागू नये म्हणून यावर ही सोपे उपाय करता येतील.

  • देवघरातील देवांच्या मुर्त्या या एकमेकांकडे तोंड करून नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.
  • भिंतीपासून मूर्ती किमान एक इंच अंतरावर ठेवावी.
  • पूजा कक्षात नेहमी गोंधळ मुक्त वातावरण ठेवावे.
  • देवघरात खराब झालेली मूर्ती कधीही ठेवू नका. यांनी वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
  • देवघरात मुर्त्या उभ्या ठेवण्यासाठी एक साधा पाट देखील वापरता येईल.
  • देवघराच्या खालील अथवा आजूबाजूची जागा नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवावी.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे सोपे उपाय तुम्हाला देवघरातील वास्तूदोष रोखण्यासाठी करता येतील. वरील प्रमाणे, देखील तुम्ही तुमच्या घराचे बांधकाम करताना देवघराची रचना करू शकतात. तसेच देवघरात कुठल्या मुर्त्या ठेवाव्यात, कुठल्या मूर्ती ठेवू नयेत, देवघराची रचना करताना कोणती काळजी घ्यावी,देवघर कसे ठेवावे या विषयीची सर्व माहिती तुम्ही  वरील प्रमाणे जाणून घेतलेली आहे. देव घरा विषयी अजून सखोल माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही वास्तु तज्ञांचा सल्ला देऊ शकतात. मित्रांनो,आम्ही सांगितलेली वरील प्रमाणे माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here