दात दुखीवर आयुर्वेदिक औषधे

0
1705
दात दुखीवर आयुर्वेदिक औषधे
दात दुखीवर आयुर्वेदिक औषधे

नमस्कार, सगळ्यात कठीण दुखणे म्हणजे दात दुखी होय. ज्यावेळी दात दुखतो, त्यावेळी आपल्याला असह्य वेदना होतात. जसे की कान दुखून  डोळ्यातून पाणी येणे, भूक लागलेली असून सुद्धा खाता न येणे, हा मोठा त्रास आहे. ज्यावेळी दात दुखतात, त्यावेळी अक्षरशः आपले डोके दुखते, व बोलताना त्रास होतो, चावायला त्रास होतो, तर हे दुखणे कशामुळे होते ? दात दुखीवर की उपाय आहेत ? दात दुखणे हे दातामध्ये कीड लागल्यावर दातामध्ये खड्डा पडल्यावर ही होते. तसेच अतिशय कडक पदार्थ खाल्ल्यामुळे, दात दुखी च्या समस्या होऊ शकतात. तसेच दाताच्या फटीत आपण खाल्लेले अन्न अडकून, दात दुखी ची समस्या होऊ शकते. आणि ज्यावेळी दात दुखतात, अशा यावेळी दातातून रक्त येते व दात सळसळतात. तसेच जास्तीचे गोड पदार्थ खाल्ल्याने हे दात दुखतात.

थंड पाणी पिल्याने ही दात सळसळतात, चॉकलेट खाल्ल्याने हे दाताला कीड लागून, दात दुखण्याचा च्या समस्या होऊ शकतात, सहसा करून लहान मुलांना दात दुखी च्या समस्या फार होतात. कारण लहान मुलं चॉकलेट, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे त्यांच्या दातांना कीड लागून दात दुखी होते, मग ज्या वेळी तुमचे दात दुखतात, अशावेळी तुम्ही कोणते घरगुती उपचार करायला हवेत, चला तर मग जाणून घेऊयात! 

लवंग चा वापर करून बघा :

दात व दाढ दुखत असेल, अशा वेळी जर तुम्ही लवंगाचा तुकडा तुमच्या दात किंवा दाढी मध्ये दाबून ठेवल्यास, तुमचा दाढ दुखी व दात दुखीचा त्रास हा कमी होतो, तसेच आता मार्केटमध्ये किंवा मेडिकलमध्ये लवंगाचे तेल हे मिळेल, तर तुम्ही लवंगाचे तेल हे कापसाच्या बोळ्यावर घेऊन, दात दुखत असलेल्या ठिकाणी दाबून धरावे, असे पाच ते दहा मिनिटे धरून ठेवल्याने, तुमच्या दाढ दुखण्याचे समस्या त्वरित थांबतात. 

वाचा  लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

पेरूची पाने वापरून बघा :

हो, आता तुम्ही म्हणाल की पेरू चे पान हे दाढ दुखीवर कसे फायदेशीर ठरेल? तर हो खरंच पेरूच्या पानांमध्ये युर्सोलिक ऍसिड असते. जे दाह कमी करण्याचे काम करते. जर तुमची दात दुखत असतील, अशावेळी तुम्ही कच्चा पेरूच्या झाडाची पाने चावून खाल्ली, तर तुमची दात दुखी समस्येवर त्वरित आराम मिळेल. करून बघा अगदी साधा सोपा उपाय आहे. 

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा :

 दात दुखत असतील तर , अशावेळी तुम्ही तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा, कारण तुरटी मध्ये  एंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. जर तुमच्या दाढी मध्ये कीड असेल, ते काढण्यात मदत करतात. जर तुमहाला दात दुखी च्या तक्रारी असतील, अशा वेळी तुम्ही तुरटी घेऊन पाण्यात मिसळून त्या पाण्याने गुळण्या करा,त्याने तुम्हाला फरक पडेल. 

कडुलिंबाची पाने खा :

हो, आता तुम्ही म्हणाल, की कडूलिंबाची पाने तर किती कडू असतात. ती कसे खाणार. पण ती चवीला जरी कडू असली, तरी ती तुमच्या दातांसाठी फार फायद्याचे ठरते. कडूलिंबा मध्ये ऑटीबॅक्टरियल व गुणधर्म असतात. दात दुखी सारख्या समस्येवर जर तुम्ही कडूलिंबाची पाने चावून खाल्ली, तर तुमच्या दातांची मुळे ही मजबूत होतात. व कीड लागलेली असेल, तर तीही निघण्यास मदत मिळते. पूर्वीच्या काळी तर लोक कडू लिंबाची काडी तासून तिच्याने दात घासायचे. त्यामुळे त्यांचे दात हे मजबूत होते आणि त्यांना अशा समस्या व्हायच्या नाही. 

मिठाच्या व काळे मिरे पुढच्या पाण्याच्या गुळण्या करून बघा :

जर तुमचे दात दुखत असेल. तसेच तुमच्या दातांच्या फटीमध्ये अन्नकण अडकलेले असतील, अशावेळी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या, तर तुम्हाला फरक हा जाणवेल. कारण मीठ डिसइनफेक्टंट असल्यामुळे किटाणू मारते, तसेच तुम्ही मिठाच्या पाण्यात काळीमिरी पूड घालून त्या पाण्याने गुळण्या केल्या तरीही तुम्हाला फरक जाणवेल. 

वाचा  उशिरा गर्भधारणा होण्याची कारणे व उपाय

आईस पॅक चा वापर करा :

ज्या वेळी तुमचे दात दुखतात, अशा वेळी तुमच्या बाहेरील बाजूस हिरड्यांना सूज येते व हनुवटीला सूज येते. अशावेळी जर तुम्ही आईस पॅक घेऊन, तुमच्या हनुवटीवर व दाढ दुखत असलेल्या बाहेरील ठिकाणी लावले, तर तुमच्या या समस्येवर तुम्हाला थोडा वेळ का होईना आराम मिळेल. 

तुळशीच्या पानांचा रस वापरा :

तुळशी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे.  तुळशीमध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात.  जर तुमची दाढ दुखत आहे,अशावेळी तुम्ही तुळशीच्या पानांचा रस काढून कापसाच्या बोळ्यावर घेणे;  तो दात दुखत असलेल्या ठिकाणी धरल्यास तुम्हाला दात दुखीवर आराम मिळेल

लसणाचा वापर करून बघा :

हो, लसुन हा मसाल्यात वापरला जाणारा पदार्थच नाही, तर तुमच्या दात दुखी सारख्या समसयांवरही आराम देईल.  खरंच ! कारण लसणामध्ये एंटीसेफ्टीकचे गुणधर्म असतात. जर तुम्ही लसणाचे तेल हे कापसाच्या बोळ्यावर घेऊन, दात दुखी असलेल्या ठिकाणी लावले, तर तुम्हाला फरक पडेल. पण लसूण चे तेल हे अति उग्र आणि तिखट असते. ज्यावेळी तुम्ही हे तेल दात दुखत असलेल्या ठिकाणी लावता, त्यावेळी खूप आग होईल. पण ती थोड्या वेळापुरती राहते, असे केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. 

दात दुखी होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी

दात दुखणे हे अतिशय कठीण दुखणे आहे. हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि दात कशामुळे दुखतात हेही सांगितले. त्यावर काही घरगुती उपायही सांगितलेले आहेत. आता आपण दात दुखू नये, यासाठी काय करावे ते बघुयात! 

  • नियमित दोन वेळेस ब्रश करावा. 
  • जेवणानंतर चूळ भरावी. 
  • अतिशय कडक पदार्थ खाणे टाळावे. 
  • अति गोड पदार्थ खाणे टाळावे. 
  • अधून मधून कडुलिंबाच्या दातूने दात घासावे. 
  • अतिशय थंड व गरम पदार्थ खाणे टाळावे. 
  • अधून मधून नींबू आणि  मीठ ने दात घासावे. 
  • चांगल्या कंपनीचा टुटपेस्ट वापरावा. 

आज आम्ही तुम्हाला दात दुखीवर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच दात दुखी ही कशामुळे होते व त्यावर कोणते उपाय, कोणती काळजी घ्यायला हवी, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या आयुर्वेदिक उपचार करून, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला  जरूर घ्यावा. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  अनवाणी पायी चालण्याचे फायदे

 

                         धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here