डोळे लाल होणे घरगुती उपाय

0
790
डोळे लाल होणे घरगुती उपाय
डोळे लाल होणे घरगुती उपाय

आजकल डोळे लाल होणे ही समस्या फार वाढलेली आहे. कारण बदलती जीवनशैली आणि आपले बदलते राहणीमान याला कारणीभूत ठरू शकते. बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपले डोळे लाल जे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असतात म्हणजेच मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप यामुळेच होते आणि डोळे लाल होणे ही फार गंभीर बाब आहे. कारण की जर डोळे लाल होत असतील तर एकंदरीत आपण समजावे की डोळ्यांना विश्रांतीची गरज आहे. 

तसेच आजकाल पाच वर्षाची लहान मुले देखील मोबाईल मध्ये अगदी तासन्तास गेम खेळतात किंवा तासन्तास मोबाइल हाताळत असतात. ज्यांचा विपरीत परिणाम त्यांच्या डोळ्यावर होऊ शकतो. कारण आपण आजकाल बघतो की लहान पोरांना देखील चष्मे लागले आहेत त्यांचे डोळ्यांची नजर ही फार कमी झालेली आहे आणि याचे अनेक कारणे असू शकतात. पण याची सुरुवातीस लक्षण म्हणजे आपण समजू शकतो की डोळे चुरचुरणे आणि डोळे लाल होणे जर डोळे लाल होत असेल तर आपण त्वरित काही ना काही तरी करून या समस्यांचे समाधान करावे. कारण की आपण जर या समस्येकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन ही समस्या आपल्याला फार महागात पडू शकता. लहान मुलांच्या बाबतीत जाती काळजी घेणे गरजेचे आहे. 

कारण लहान मुलांचे जर डोळे लाल झाले तर ते डोळे चोळतात आणि डोळे त्यामुळे ते अधिक लाल होतात. यामुळे लहान मुलांची दृष्टी देखील जाऊ शकते. तसेच त्यांच्या नसा डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत जोडलेले असतात. म्हणून बऱ्याच वेळेस डोळे दुखतात तेव्हा डोके दुखू लागते. तर मित्रांनो आज आपला हाच विषय आहे की जर डोळे लाल झाले असतील तर आपण घरगुती उपायांनी कसा या समस्येचे समाधान काढू शकतो. याच बरोबर आपण कारणे देखील जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपले डोळे लाल होतात चला तर मग बघुया.

डोळे लाल होण्याची कारणे :

आपण डोळे लाल होण्याबाबत थोडीशी माहिती बघितली. आता आपण जाणून घेऊया की आपले डोळे लाल होण्यास कोणते कोणते घटक कारणीभूत ठरतात चला तर मग बघुया.

वाचा  पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

बदलते राहणीमान :

आपली बदलती जीवनशैली आणि बदलते राहणीमान याला कारणीभूत ठरू शकते. बदलत चाललेल्या राहणीमान कसे तर पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळत असे खालती ग्राउंड मध्ये म्हणजेच मैदानामध्ये किंवा इतर ठिकाणी खेळायला जात असे. माणसे देखील कामाला जात असायची पण आज-काल बरीचशी कामही घरूनच होत असल्यामुळे त्यांना सतत कम्प्युटर, लॅपटॉप च्या समोर बसून काम करावे लागते.

तसेच यामुळे त्यांच्या पाठीवर आणि त्यांच्या डोळ्यांवर फार मोठा परिणाम होतो. तसेच आज-काल शिक्षक देखील ऑनलाइन पद्धतीने शिकवायला लागल्यामुळे मुलांना देखील मोबाईल फोन मधून शाळा शिकायला लागते. यामुळे मुलं अतिरिक्त वेळ त्यांचा मोबाईल फोनवरच घालवतात तर हे एक मोठे कारण असू शकते डोळे लाल होण्याचे.

अवेळी झोप :

जसे की आपण बघितले आपले बदलते राहणीमान याला कारणीभूत ठरू शकते. तसेच आज काल लोक दिवसा झोपतात आणि रात्री काम करतात. असं झालं आहे म्हणजेच आपण रात्री जर लवकर झोपत नसू आणि उशिरा झोपत असेल तर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसून येतो. म्हणजेच डोळे लाल होतात किंवा डोळे सुजण्याचे सुरुवात होते. म्हणून दिलेल्या वेळेत झोपावे डोळ्यांना विश्रांती द्यावी. जर तुम्ही डोळ्यांना विश्रांती दिली नाही तर तुमच्या डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

एलर्जी किंवा किडा चावणे :

अनेक वेळेस असे देखील बघितले गेले आहे की जर तुम्हाला कोणत्या प्रकारची ऍलर्जी असेल तर त्यामुळे देखील डोळे लाल होण्याची शक्यता असते. याच प्रकारे जर तुम्हाला झोपेमध्ये कोणता किडा चावला असेल म्हणजेच तुमच्या डोळ्याला जर कोणत्याही प्रकारचा किडा चावला असेल तरी देखील तुमच्या डोळे लाल होऊ शकतात. याच प्रकारे जर तुम्ही प्रवास करत असाल तर बाहेरची हवा लागल्यामुळे धुळ मातीचे कन डोळ्यांमध्ये गेल्यामुळे देखील डोळे लाल होऊ शकता.

डोळे लाल झाले असतील तर यावर घरगुती उपाय :

आपण डोळे लाल होण्याची कारणे तर बघितली आता आपण जाणून घेऊया की यावरून आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो चला तर मग बघूया.

वाचा  पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध प्रभावशाली घरगुती उपाय

पुरेशा प्रमाणात विश्रांती घ्यावी :

तुम्हाला जर दिसत असेल की तुमचे डोळे लाल होत आहे तर तुम्ही सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात पहिला मुद्दा उपचार म्हणजे पुरेशी विश्रांती घ्यावी. आपण आपल्या शरीराची ऊर्जा डोळ्यान मार्फत बाहेर टाकत असतो. तुम्ही विचार देखील करणार नाही पण आपल्या शरीराची सर्वात जास्त ऊर्जा डोळा मार्फत जात असते. यामुळे डोळ्यांना पुरेशी विश्रांती भेटणे फार गरजेचे आहे. रात्री जागरण न करता रात्री दहा ते अकरा पर्यंत झोपावे आणि दिवसभरातून किमान सात तास तरी झोप घ्यावी. जेणेकरून तुम्ही पुन्हा ताजीतवानी आणि तुमची डोळे लाल होण्याची समस्या देखील कमी होईल.

डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवावे :

आपण बघितलं की डोळ्यान मार्फत आपली शरीरातील ऊर्जा बाहेर फेकली जात असते. म्हणून तुम्ही जेव्हा विश्रांती घेत असाल तेव्हा दोन काकडीचे तुकडे आपल्या डोळ्यांवर ठेवावे. साधारणता एक ते दोन तासांसाठी तुम्ही काकडीचे तुकडे डोळ्यावर ठेवू शकता. थोडा थोडा वेळ नंतर जर तुम्ही काकडीचे तुकडे बघाल तर ते सुकलेले असतील. कारण तुमच्या डोळ्यांनी त्याचा सगळा थंडावा सोकलेला असेल आणि तुमच्या डोळ्यांना देखील त्याचा हळू फरक जाणवेल.

एरंडेल तेल आणि गुलाबजल :

एरंडेल तेल आणि गुलाबजल एका कापसावर घेऊन तुम्ही तो कापूस जा तुमच्या डोळ्यावर ठेवला तर तुमच्या डोळ्यांना थंडावा भेटेल. तुमच्या डोळ्याची लाल होण्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होईल. हा उपाय तुम्ही एक दिवसाआड करू शकता.

खालील प्रकारे काळजी घ्या –

  • बाहेर जाताना गॉगल किंवा चष्मे घालावे जेणेकरून प्रवासामध्ये तुमच्या डोळ्यांना कोणत्या प्रकारची इजा होणार नाही.
  • आंघोळ करताना किंवा दिवसातून दोनदा तरी डोळे हे स्वच्छ करावे डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची घाण ठेवू नये. 
  • लहान मुलांना तुम्ही काजळ लावू शकता जेणेकरून त्यांचे डोळे लाल होणे पासून बचाव होईल.
  • टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप या दिवसभर वापरू नये यांची एक निश्चित वेळ ठरवावी जेणे करून तुमच्या डोळ्याला याचा फायदा दिसून येईल. टीव्ही बघताना सात फुटाच्या अंतरावर बसावे.
  • आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा जेणेकरून तुमच्या डोळ्यांना भरपूर प्रमाणामध्ये पोषण तत्व मिळतील. याच बरोबर फळांचा देखील आहारामध्ये समावेश करावा.
वाचा  कानातील मळ काढण्यासाठी उपाय

तर मित्रांनो आज आपण बघितले ते आपले डोळे लाल होत असतील तर त्याची कारणे कोणती तसेच डोळे लाल होणार आपण काही घरगुती उपाय देखील बघितले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here