नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सिताफळाच्या पानाचे फायदे. आपण नियमित एका फळाचे जरी नियमित सेवन केले तर त्यामुळे आपले आरोग्यही सुदृढ होण्यास मदत होते. वर्षानुसार सीजनल फळे देखील मिळत असतात म्हणजेच प्रत्येक ऋतूनुसार आपण ऋतू वाईज फळांचे सेवन केले पाहिजे.त्यामुळे आपले शारीरिक स्वास्थ्य हे तर चांगले राहतेच. शिवाय, आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. आपण ऋतूनुसार फळांचे सेवन केले तर त्याचा फायदा देखील आपल्याला होत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट बघत असतात.
तर हिवाळ्यामध्ये स्ट्रॉबेरी मिळत असते. तर काही फळे अशी असतात, की ते वर्षभर मिळत राहतात. मित्रांनो, सिताफळ हे देखील सीजन नुसार येणारे फळ आहे. आयुर्वेदानुसार सीताफळ या फळाची देखील गुणकारी विशेष महत्त्व आहे. सीताफळ हे हिरव्या रंगाचे असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा गर असतो. शिवाय त्यामध्ये बियांचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असतील. सीताफळ हे फळ खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला तसेच त्वचेला देखील होत असतात.
सिताफळ हे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कफाचा त्रास होत नाही. सीताफळ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कफाचे प्रमाण जमत नाही शिवाय ज्यांना कफ झाला असेल, तर त्यांनी सिताफळाचे नक्की सेवन करायला हवे. सीताफळ हे खायला खूप छान लागत असते. याची चव गोड असते शिवाय, सीताफळ खाणे हे पौष्टिक देखील असते. सिताफळ यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे पौष्टिक घटक आढळून येतात. जर तुम्हाला वाताची समस्या असेल तर अशा वेळेस तुम्ही सीताफळाच्या फळ खाल्ले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. सीताफळ खाल्ल्यामुळे वात विकार होत नाही.
सीताफळ या फळाची इतका फायदा आपल्या शरीराला होतोच शिवाय सिताफळाच्या पानांचा देखील अनेक प्रकारे फायदा आपल्या शरीराला होत असतो. सीताफळाची पाने हे देखील गुणकारी असतात. सिताफळाच्या पानांचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदा होत असतो. तर मित्रांनो, सिताफळाच्या पानांचा आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो? याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. आज आपण सिताफळाच्या पानांचा उपयोग या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग सिताफळाच्या पानांचे फायदे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
सिताफळाच्या पानाचे फायदे :-
सीताफळ हे ऋतूनुसार येत असते. सीताफळ यामध्ये विटामिन सी चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे शरीराला फायदा होत असतो. सीताफळ यामध्ये अनेक पोषक तत्वे, पोषक घटक आढळून येतात. शिवाय, सिताफळ खाल्ल्यामुळे आपल्याला कफ होण्याचा त्रास देखील होत नाही. सिताफळ खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला तर होतातच शिवाय सिताफळाच्या पानांचा देखील आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. तर सिताफळाच्या पानांचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो शिवाय त्यामुळे आपला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात!
केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी सिताफळाच्या पानाचे फायदे :–
प्रत्येकाला वाटत असते की आपल्या केसांचे आरोग्य निरोगी रहावे. बऱ्याच लोकांना केसान विषयी तक्रारी असतात त्यांची केस अकाली पांढरे होणे सतत ढवळत राहणे केसांमध्ये जास्तीचा कोंडा होणे केसांची वाढ खुंटणे अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल, कोंडा होण्याचे प्रमाण हे जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला सीताफळाच्या पानाचा उपयोग होऊ शकतो. केसातील कोंडा निघावा यासाठी तुम्ही सिताफळाचे पान तोडून घ्यावीत. त्याचप्रमाणे तुम्ही सिताफळाची जेवढी पानं घेतलेली असतील तेवढ्याच प्रमाणामध्ये लिंबू च्या झाडाची पाने व चिकूच्या झाडाची पाने हे सारख्या प्रमाणात घ्यायची.
नंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावीत. नंतर ही सर्व पाने एकत्रित करून त्यांचा रस काढून घ्यावा. हा रस व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर तुम्ही एकत्रित केलेला रस तुमच्या केसांच्या त्वचेला, केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावून घ्या. हे लावल्यानंतर तुम्ही दोन तास ते तसेच केसांमध्ये राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावेत. हा उपाय तुम्ही महिनाभर केल्याने म्हणजेच, आठवड्यातून दोनदा केला तर महिनाभरात तुम्हाला तुमचे केसांमधील कोंडा गेलेला दिसेल. तुमच्या केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण फारच कमी प्रमाणात असेल, शिवाय कोंडा देखील लवकर होणार नाही. तर अशाप्रकारे तुम्हाला सिताफळाच्या पानांचा उपयोग करता येईल.
केसांमध्ये चाई पडलेली असल्यास :-
अनेक जणांना केसांमध्ये चाई पडण्याची समस्या येत असतील. तर काहींची केसा हे खूपच विरळ होत असतात. आजकाल अगदी तरुण मुलांमध्ये देखील केसांमध्ये चाई पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जर तुमचे केसांमध्ये चाई पडलेली असेल तुमचे केस हे खूपच पातळ व पत्रे होत असतील तर त्यासाठी तुम्ही सिताफळाच्या पानांचा उपयोग करू शकतात. सिताफळाच्या पाणी स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावेत व त्या पानांचा रस काढून घ्यावा.
तुमच्या केसांमध्ये ज्या ठिकाणी चाई पडली असेल त्या ठिकाणी केस हे विरळ व पातळ झालेले असतील अशा ठिकाणी तुम्ही सिताफळाच्या पानांचा रस लावून घ्यावा. त्यानंतर ते एक ते दीड तास तसेच राहू द्यावे. आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाकावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकतात. हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये चाई पडलेल्या ठिकाणी केस येण्यास सुरुवात होईल. शिवाय, जे पातळ व विरळ केस असतील, ते देखील घनदाट होण्यास मदत होऊ शकते.
छातीमध्ये कफ झाल्यास:-
अनेक थंड प्रकारचे पेय पिल्यामुळे, वातावरण बदलामुळे आपल्या छातीमध्ये कफ होण्याची समस्या येत असते. छातीमध्ये कप जमल्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. तुमच्या छाती मधला कप जाण्यासाठी तुम्ही सिताफळाच्या पानांचा उपयोग करू शकतात. त्यासाठी सीताफळाच्या पाने स्वच्छ धुऊन त्याचा चमचाभर रस काढून घ्यावा. त्यामध्ये तुम्ही देसी गाईचे गावरान तूप एक चमचा व मधाचा एक चमचा हे सर्व एकत्रित मिश्रण तयार करून घ्यावे. आणि हे मिश्रण दिवसभरातून तीन वेळा तुम्ही थोडे थोडे द्यावे. असे केल्यामुळे तुमच्या छातीमधील कफ निघून जाण्यास मदत होईल. शिवाय सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे छातीमध्ये कप देखील तयार होऊ शकणार नाही.
जखम भरण्यासाठी :-
अनेक वेळा धावपळीत अथवा खेळता-खेळता, कुठले कारणामुळे आपल्याला जखम होण्याची संभावना असते. लहान मुले तर चालता-बोलता खेळता खेळता धडपडत असतात. त्यामुळे देखील त्यांना लवकर जखम होते. तर जखम भरण्यासाठी देखील तुम्ही सिताफळाच्या पानांचा उपयोग करू शकतात ज्या ठिकाणी दमारा जखम झालेली असेल त्या ठिकाणी बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही सिताफळाच्या पानांचा रसाचे उपयोग केल्यामुळे खूप फायदेशीर ठरू शकते. सिताफळाच्या पानांचा रसाचा उपयोग केल्यामुळे जुनी जखम देखील भरण्यास मदत होत असते.
त्यासाठी तुम्ही सिताफळाची पाने स्वच्छ धुऊन ती वाटून त्यामध्ये काळे मीठ मिसळून घ्यावे. तर काहीजण त्याला सेंधव नमक देखील म्हणतात. हे वाढलेल्या पानांमध्ये व्यवस्थित मिसळून ज्या ठिकाणी जखम झालेले असेल तर त्या जखमेवर व्यवस्थित बांधून घ्यावेत असे केल्यामुळे लवकर जखम भरण्यास मदत होते शिवाय जखमेमध्ये किडे पडलेले असतील बॅक्टेरिया झाले असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते.
डायबिटीज झालेल्या लोकांसाठी फायदेशीर :-
सिताफळाच्या पानांचा रस हा ज्या लोकांना डायबिटीज झालेले असेल, त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतो. सीताफळाच्या पाण्यामध्ये फायबरचे प्रमाण हे एक चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण राहण्यास मदत होत असते. ज्या लोकांना डायबिटीज झालेला असेल तर अशा लोकांनी सिताफळाच्या पानांचा काढा घेतला पाहिजे. झाडाच्या पानांचा काढा नेमका कसा घ्यावा? व कधी घ्यावा? हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर सिताफळाच्या पानांचा काढा तुम्ही कसा बनवावा याबद्दल आपण पहिले जाणून घेऊयात. सीताफळाच्या झाडाची तीन ते चार पाने तोडून घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावीत.
नंतर एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये ही पाने चांगल्या प्रकारे करून उकळून घ्यावीत. हे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर पाण्याचा रंग देखील तुम्हाला बदललेला दिसेल आणि अशाप्रकारे तुमचा काढा तयार होईल. हा काढा तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घ्यायला हवा. रिकाम्या पोटी काढा पिल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय, डायबिटीस वर तुमचे नियंत्रण राहण्यास मदत होऊ शकते.
सिताफळाच्या पानाचे इतर उपयोग :-
- सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य हे देखील सुरळीत राहण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे, हृदयविकारापासून देखील आपण दूर राहू शकतो.
- ज्या व्यक्तींना बीपी चा त्रास होत असेल, तर अशा लोकांनी देखील सीताफळाच्या पानाचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे बीपी नियंत्रणात राहू शकतो.
- सीताफळाच्या पानाचा रस घेतल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया हेदेखील व्यवस्थित सुरळीत चालू राहण्यास मदत होते.
- ज्या लोकांना अपचन होण्याची समस्या असेल खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नसेल तर अशा लोकांनी सिताफळाच्या पानांचा रस घेणे फायदेशीर ठरते. सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे आपल्या शरीरातील पचन संस्था ही सुरळीत राहण्यास मदत होते शिवाय पचन संस्था चांगली असेल तर आपण पोटाचे विकार यापासून दूर राहू शकतो.
- शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यासाठी देखील सिताफळाच्या पानांचा रस त्यांचा उपयोग होऊ शकतो. अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्य जमत असतात तर ते विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सीताफळाच्या पानाचा रसाचा उपयोग होऊ शकतो.
- सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे शरीराचा थकवा देखिल निघून जाण्यास मदत होते. शिवाय, आपला शरीराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
मित्रांनो, सीताफळाच्या पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे पोषक घटकांचा समावेश असतो शिवाय त्यामध्येच खनिजांचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. सिताफळाच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगल्या प्रमाणात असते शिवाय या पानांचा रस घेतल्यामुळे ते आपल्या शरीराच्या रक्तासाठी देखील फायदेशीर ठरते. तुम्हाला जर छातीमध्ये कफ होण्याची समस्या असेल, तर तुम्ही सिताफळाच्या पानांचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. सिताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळे छातीतला कफ मोकळा होण्यास मदत होते.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली,हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.
धन्यवाद !