तिळाचे तेल फायदे

0
1066
तिळाचे तेल फायदे
तिळाचे तेल फायदे

नमस्कार मित्रांनो. अनेक गोष्टी अशा असतात की ज्यांचा आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी पुरेपूर फायदा होत असतो. आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी आपण प्रत्येक वस्तू वापरताना ती पडताळून बघत असतो. आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी आपण आपल्या आहारामध्ये योग्य त्या घटकांचा समावेश करत असतो. तसेच बरेच जण हे जेवण बनवताना नेमके कोणते तेल वापरावे हे देखील पडताळून घेऊनच त्याचा वापर करत असतात. तेलाचे अनेक प्रकार आहेत. तेल म्हटले तर सोयाबीन, जवस, कलोंजी, सूर्यफूल, शेंगदाणे आणि तीळ यापासून आपल्याला तेल मिळत असते. प्रत्येक घटकानुसार म्हणजेच प्रत्येक वस्तू नुसार त्याचे वैशिष्ट्य हे बदलत असते त्याचे गुणधर्म बदलत असतात. तेलाचे म्हटले तर सोयाबीन तेलाचे वेगळे गुणधर्म असतात. शेंगदाण्याचे वेगळे, सुर्यफुलाचे वेगळे आणि तिळाचे तेल याचे वेगळे वैशिष्ट व गुणधर्म असतात.

मित्रांनो, तीळ हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. तीळ ही आकाराने एकदम छोटीशी असते. परंतु “तीळ आकाराने जरी छोटी असली तरी तिचे फायदे हे डोंगराएवढे मोठ-मोठे असतात” ‘इवलीशी तीळ परंतु अत्यंत बहुगुणकारी’ मित्रांनो, असे म्हणण्यास हरकत नाही. तीळ हे आकाराने जरी छोटे असले तरी त्याचा आपल्या शरीराच्या दृष्टीने अनेक फायदे आपल्याला होत असतात. तीळ मध्ये विटामिन ई चे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या तिळाचे एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात. संक्रांत म्हटली तर तीळ ही सर्वात आधी लागत असते. संक्रांत ही हिवाळ्यात येत असते. अर्थातच हिवाळा म्हटलं तर वातावरण हे थंड असते.

आणि अशावेळी तीळ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरत असते. तसेच तिळाचे तेल हे अनेक जण स्वयंपाकासाठी वापरत असतात. त्यामुळे देखील एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. अगदी जुन्या काळापासून बायका जाऊन खात असे. जेणेकरून त्यांना हात पाय दुखी त्रास होत नव्हता.हो मित्रांनो जर तुम्ही नियमीत सकाळी उठल्यावर तिळाचे सेवन करत असाल तर तुम्ही सांधेदुखी या समस्यांपासून दूर राहू शकतात. तर मित्रांनो आज आपण तिळाचे तेल याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग तिळाचे तेल यापासून आपला कुठले कुठले फायदे होऊ शकतात तसेच तिळाचे तेल हे कसे वापरायला हवे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

तिळाच्या तेलाचे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात ?

मित्रांनो, तीळ ही तर सर्वांनाच ठाऊक असते. अनेक जण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी तिळाचे सेवन करत असतात. शिवाय तीळ चावून खाल्ल्यामुळे देखील आणि प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. त्याचप्रमाणे तिळाचे तेल वापरण्याचे देखील एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या होऊ शकतात तर ते फायदे नेमके कोणते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

तिळाचे तेल स्वयंपाकात वापरल्या मुळे होणारे फायदे :- 

मित्रांनो अनेकजण स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरत असतात. घरा नुसार तेलाचे प्रकार देखील बदलत असतात. तर काही जण हे स्वयंपाक खरात जेवण करण्यासाठी तिळाच्या तेलाचा उपयोग करत असतात. तिळाच्या तेलामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असते. शिवाय हे अंतीबॅक्टरियल ने भरपूर असते. त्यामुळे तिळाच्या तेलाचे आपल्या शरीराला एक नाणे प्रकारचे फायदे होत असतात. तिळाचे तेल वापरल्यामुळे आपल्या शरीराची हाडे बळकट होण्यास मदत होत असते. शिवाय ज्या लोकांना संधिवात या विषयी समस्या असते, तर अशा लोकांनी देखील तिळाचे तेलाचे सेवन करायला हवे. आणि जर जे लोकं तिळाचे तेल वापरत असतील त्यांना भविष्यात होणारी संधिवाताची समस्या यापासून ते दूर राहू शकतात. तिळाचे तेल वापरल्यामुळे हाडांमध्ये आवश्यक ते तेल टिकून राहण्यास मदत होत असते. ज्यामुळे हाडांची हालचाल व्यवस्थित प्रकारे होत असते. आणि यामुळे हाडे दुखण्याची समस्या निर्माण होत नाही. तिळाचे तेलाचे बहुगुनी फायदे आपल्याला होत असतात.

तिळाचे तेल त्वचेवर लावण्याने होणारे फायदे : –

मित्रांनो, तीळ खाण्याचे तर आणि प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय हिवाळ्यात तीळ खाणे महत्वपूर्ण मानले जाते. कारण ठेवा थंड वातावरण असते आणि तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता मिळत असते. शिवाय आपल्या आरोग्य देखील चांगले राहाते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तिळाचे तेल लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला एक ना अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. तिळाचे तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचा ही मऊ व मुलायम होण्यास मदत होत असते. तिळाच्या तेलामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असते जे त्वचेसाठी फार उपयुक्त असते. तिळाचे तेल नियमित सरावाने त्वचेवर लावल्यामुळे आणि त्याने त्वचेला मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेवरील सुरकुत्या देखील नाहीशा होऊ लागतात शिवाय येणाऱ्या सुरकुत्या देखील लवकर पडत नाहीत. तसेच त्वचा ही जर नसतेच असेल तर अशावेळी देखील तुम्ही तिळाचे तेल लावत असाल तर तुमची त्वचा ही चमकदार दिसू लागण्यास मदत होते. तसेच त्वचा हे नितळ देखील दिसू लागते.

वाचा  आमचूर पावडर म्हणजे काय आमचूर पावडरचे फायदे आणि वापर

केसांना तिळाचे तेल लावण्याचे फायदे :-

असे कोणीही नाही ज्यांना केसान संदर्भात समस्या येत नसेल. अनेकांना केस गळतीची, केस निस्तेज दिसण्याची समस्या येत असते. तुम्हाला केसांचे आरोग्य चांगले राहावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या केसांसाठी तिळाच्या तेलाचा उपयोग करू शकतात. तिळाचे तेल केसांना लावल्यामुळे तुमचे केस हे मऊ व मुलायम होण्यास मदत होते. शिवाय निस्तेज झालेले केस देखील चमकदार दिसू लागतात. एक प्रकारे नैसर्गिक चमक केसांना येऊ लागते. तिळाच्या तेलाने केसांना मुळाशी मालीश केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होऊन केस गळती थांबून लागते. आणि केस घनदाट व लांब सडक होण्यास देखील मदत होऊ लागते. शिवाय ज्यांना केस अकाली पांढरे होण्याची समस्या असेल त्यांचे केस देखील काय येण्यास मदत होऊ लागते. तसेच केसात जमलेला कोंडा देखील निघून जाण्यास मदत होत असते. म्हणजेच तिळाचे तेल केसांना लावण्याचे एक ना अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होऊ शकतात.

लहान मुलांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे होणारे फायदे :-

लहान मुलांना जर तुम्ही तिळाच्या तेलाने मसाज करत असाल तर यामुळे त्यांना देखील भरपूर प्रकारे फायदे होऊ शकतात. लहान मुलांना तिळाचे तेल हे कोमट करून त्या तेलाने मसाज करायला हवी. यामुळे त्यांच्या शरीराचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित प्रकारे होऊ लागते. शिवाय त्यांची त्वचा देखील चमकदार व मुलायम होण्यास मदत होते. तसेच तिळाच्या तेलाने लहान मुलांना नियमित मालिश केल्यामुळे शरीरातील हाडे देखील बळकट होण्यास मदत होते. तसेच तेलाने मसाज केल्यामुळे मुलांना शांत झोप लागण्यास मदत होते मुलांची चिडचिड देखील कमी होते आणि पुरेपूर व शांत झोप मिळाल्यामुळे मुलेही आनंदी देखील होऊ लागतात.

तिळाचे तेल जेवणात वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होत असते :

अनेक जण हे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तेल हे जेवण करण्यासाठी वापरत असतात. परंतु जर तुम्ही तिळाचे तेल जेवण करण्यासाठी वापरले तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तिळाचे तेल यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे तुम्ही जेवण केल्यामुळे तुमचे पोट लवकर भरते.शिवाय, लवकर भूक देखील लवकर लागत नाही आणि यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहू शकते. म्हणजेच एक प्रकारे तिळाचे तेल जेवणात वाढल्यामुळे तुमचे वजन हे नियंत्रित राहण्यास मदत होत असते.

वाचा  नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? Non sticky bhandyat jevan kase banval

मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तिळाचे तेलाचे फायदे :

तिळाचे तेल जेवणात वापरल्यामुळे एक प्रकारे आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. त्याच्या तेलामध्ये एक ना अनेक प्रकारचे घटक आढळून येत असतात. शिवाय तिळाच्या तेलाचे गुणधर्म देखील जास्त असतात. जर आपण तिळाचे तेलाचे जेवणात द्वारे सेवन करत असाल तर त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते. तसेच आपण नेहमी सकारात्मक विचार देखिल करू लागतो. अनेक प्रकारच्या ताण-तणावापासून देखील आपण दूर राहू शकतो.

डायबिटीज न होण्यास तिळाच्या तेलाचे फायदे :

जर जेवणाच्या माध्यमातून आपण तिळाच्या तेलाचे सेवन करत असाल तर डायबिटीस सारख्या आजारापासून देखील आपण दूर राहू शकतो. बऱ्याच वेळा शरीरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्याच्या त्यामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होत असते. जेणेकरून आपण डायबिटीस समस्या पासून दूर राहू शकतो आणि ज्या लोकांना डायबिटीज असेल त्या लोकांनी तिळाच्या तेलाचे सेवन करायला हवे जेणेकरून त्यांचे डायबिटीस नियंत्रित राहू शकेल.

तर मित्रांनो, तिळाच्या तेलाचे किती प्रकारचे फायदे आपण होऊ शकतात? याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. शिवाय तुम्ही जेवणामध्ये कुठल्या प्रकारचे तेल वापरायला हवे याबद्दल तुम्ही डॉक्टरांना देखील विचारू शकतात. जेणेकरून तुमचे शारीरिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होऊ शकेल.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here