सायकलिंग मुळे होणारे फायदे

0
692
सायकलिंग मुळे होणारे फायदे
सायकलिंग मुळे होणारे फायदे

तर सायकलिंग हा शब्द कुठे बघितला, ऐकला तर आपल्याला आठवते म्हणजे ते आपले बालपण आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी सायकल नक्की चालवली असणार. तेव्हा मात्र आपण मजेसाठी सायकल चालवत असू पण मोठा झाल्यावर आपण पैसे देऊन सायकल चालवतो. याचे कारण म्हणजे काय ? तर सायकलिंग मुळे फायदे हे आपल्याला मोठा झाल्यावर समजतात आणि समजल्यानंतर आपण कामांमधून जीवा वेळात वेळ काढून सायकलिंग करतो. जिममध्ये/व्यायाम शाळेमध्ये लोक पैसे देऊन सायकलिंग करतात.

आधीची लोकं त्यांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी कुठेही जाताना सायकलवर जायचे. तेव्हा लोकांना सायकलींचे फारसे महत्त्व माहिती नव्हते. म्हणून त्यांना वाटायचे की सायकल वर जर हा माणूस जातोय म्हणजे त्याच्याकडे गाडीने जाण्यासाठी पैसे नसणार पण आता तसे नाही. आता सर्वांनाच सायकलींचे महत्त्व हळूहळू पटू लागले आहे. म्हणून लोक रोज सकाळी उठून देखील मॉर्निंग वॉक सायकलिंग करतात. कारण की आज असा झालेले आहे की आपण जर आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले नाही तर एक ना एक दिवस आपले हे शरीर कोणत्याही कामाचे राहणार नाही आणि जर शरीरात कोणत्या कामाची नसेल तर पैसाअडका यांचा तरी माणूस काय करणार ?

म्हणून सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आधी आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी सर्वात उत्तम व्यायाम म्हणजे सायकलिंग सायकलिंग. सायकलिंग मुळे आपल्या सर्व शरीरातील भागांचा व्यायाम होतो. अजून ही अनेक फायदे आहेत या सायकलींचे चला तर मग आज जाणून घेऊया की नक्की सायकलींचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. तसेच सायकलिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे देखील आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया.

सायकलिंग मुळे कोणते फायदे होतात.

चला तर मग आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू या की नक्की सायकलिंग मुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात चला तर मित्रांनो बघूया.

वाचा  मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते

ब्लड सर्कुलेशन/रक्त प्रवाह :

आपल्या शरीराला सायकलिंग मुळे होणारा सर्वात मोठा फायदा होणार म्हणजेच आपले ब्लड सर्कुलेशन सुधारते. म्हणजेच आपल्या शरीरातील रक्त प्रवाह नियंत्रण मध्ये राहण्यास मदत होते. तसेच हाय ब्लडप्रेशर किंवा अशा समस्यांना देखील आळा बसतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदामुळे लोकांना दवाखान्यात जाण्याची गरज पडत नसे.

पण आजकाल एक सामान्य समस्या म्हणजे बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होतात. तसेच नसांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. तर हे कशामुळे होते तर आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन नीट न झाल्यामुळे तर सायकलिंगचा हा सर्वात मोठा फायदा आहे की आपल्या शरीरातील रक्त प्रवाह हे सुरळीत राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रण मध्ये राहते :

सर्व लोक कामांमध्ये गुंतलेले असतात त्यामध्ये त्यांना वेळ मिळेल तसे ते जेवण करतात. तर काही लोक तर नुसते फास्टफूड खातात. यामुळे याचा वाईट परिणाम शरीरावर असा होतो की आपले वजन वाढत जाते आणि जास्त वजन असणे हे शरीरा करता फार घातक असू शकते. म्हणून सायकलिंग केल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा नियंत्रण मध्ये ठेवायचे आहे त्या लोकांनी रोज सायकलिंग करावी.

स्नायू बळावतात :

शरीराच्या एका उत्तम वाढीसाठी आपल्याला आपल्या शरीर जर सुदृढ बनवायचा असेल तर आधी स्नायू सुदृढ बनवायला लागतात. तर ते कसे बनवावे तर सायकलिंग करून तुम्ही तुमचे स्नायू बळावू शकतात मुख्यता पायाचे स्नायू हे सायकलिंग केल्यामुळे अधिक बळावतात.

मानसिक स्वास्थ्य सुधारते :

दिवसभर मधून आपण काहीसा वेळ आपल्या स्वतःला देतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण असेल. तर वैज्ञानिक अनुसार सायकलिंग केल्याने तो तान हळूहळू कमी होण्यास मदत होते. आपल्याला याचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे फायदा बघायला मिळू शकतो.

हृदयाच्या निगडित समस्या दूर होतात :

तुम्हाला जर हृदयाच्या निगडित बऱ्याच समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. जसे आपण सुरुवातीस बघितले की सायकलिंग केल्यामुळे आपले रक्तदाब नियंत्रण मध्ये राहतो. रक्तपुरवठा सुरळीत राहतो यामुळे हृदयालादेखील याचा फार मोठा फायदा होतो.

वाचा  थंडीमध्ये ताप येणे या समस्या ची लक्षणे व त्यावर घरगुती उपाय :-

श्वसन बळावते :

सायकलिंग केलेले श्वसन बळावते म्हणजेच व्यायाम करताना बऱ्याच लोकांना दम लागतो आणि तो दम कमी करण्यासाठी आपण सायकलींचा वापर करू शकतो. सायकली केल्यामुळे आपल्या फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.

हाईट वाढवण्यासाठी सायकलींचा उपयोग :

सायकलींचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे सायकलिंग मुळे हाईट वाढते तर ती कोणत्या प्रकारे वाढते हे आज आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया !

जसे आपण सुरुवातीस बघितले की सायकलिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्यामधील देखील सर्वात मोठा फायदा म्हणजे हाईट वाढणे. बऱ्याच लोकांची उंची ही कमी असते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की त्यांना उंची कमी असल्यामुळे आत्मविश्वासाची देखील कमी जाणवते. मनामध्ये न्यूनगंड तयार होतो.

तुम्ही जर लहानपणापासून सायकलिंग करत असाल तर तुमच्या शरीराची नक्की सुदृढ वाढण्यास मदत होईल. रोज सायकलिंग केल्यामुळे आपले स्नायू हे तानावले जातात म्हणजेच स्ट्रेच होतात. यामुळे याचा एक मुख्य फायदा आपल्या शरीराला होतो म्हणजे आपली उंची झपाट्याने वाढते. याला बरेचसे अपवाद देखिल असू शकता. पण मुख्यता असे बघितले गेले आहे की जे लोक सायकलिंग करतात त्यांची उंची सायकलिंग न करणाऱ्या मुलांना पेक्षा थोडी अधिक असते.

सायकलिंग केव्हा करावी ?

आपण सर्व या प्रश्नांची उत्तरं बघितली आता आपण जाणून घेऊया की नक्की सायकलिंग आपण कोणत्या वेळी करू शकतो. कोणत्या वेळी केलेली सायकलिंग आपल्या शरीरासाठी फार लाभदायक ठरेल चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया.

आजच्या वैज्ञानिकांची आणि पूर्वजांचे एकच मत आहे की कोणतेही व्यायाम करतांना तो व्यायाम सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये करावा. तसेच सायकलिंग देखील जर तुम्ही करत असाल तर ती सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये करावी. कोवळ्या उन्हामध्ये म्हणजेच सकाळच्या 6 ते 9 या दरम्यान सायकलिंग करावी. याचा फायदा म्हणजे सकाळी उठल्यावर सायकलिंग केल्यामुळे आपल्या शरीराला दिवसभरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही. 

वाचा  दुधासोबत काय खाऊ नये ? जाणून घ्या

तसेच लवकर उठण्याची सवय लागते आणि तिसरा फायदा म्हणजे आपण कवळ्या ऊनामध्ये सायकलींग केल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन डी देखील मिळते. म्हणून शक्यतो सकाळच्या वेळेस सायकलिंग करावी हा पण जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल. तर तुम्ही सायंकाळी देखील सायकलिंग करू शकता. नक्कीच ती सायकलिंग तितकी प्रभावी ठरणार नाही पण तुमच्या शरीराला लाभदायक नक्की ठरले.

तर मित्रांनो आज आपण बघितले की सायकलिंग केल्यामुळे आपल्या शरीराला नेमका कोण कोणते फायदे होतात. याच प्रकारे आपण सायकलींग करण्याची वेळ देखील बघितली. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.       

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here