कानदुखी चे कारणे व उपाय

0
1355
कानदुखी चे कारणे व उपाय
कानदुखी चे कारणे व उपाय

नमस्कार, अनेकांना शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतो, कधी कोणाचे काय दुखते, तर कधी कोणाचे काय, त्यामध्ये कान दुखी ही अनेकांना होते, कानदुखी साठी वेळ टाईम टेबल नसतो, ही केव्हाही होऊ शकते. कान दुखी म्हणजे नेमके काय ? तर कोणाच्या कानात ठणक येते, तर कोणाच्या कानात सुजन येते, तर काहींच्या कानातून पाणी व पिवळसर पू येणे होय. यासारख्या समस्या होतात. कान दुखण्याची अनेक कारणे आहेत, आपण आपल्या कानाची ही योग्य काळजी घेतली पाहिजे. शरीराचा एखादा अवयव दुखला, की आपले लक्ष त्यातच लागून राहते.

कान दुखी हिवाळ्यात व सर्दी मध्ये, तसेच जास्त आवाजामुळे अशा  कारणांमुळे होऊ शकते. तसेच कानामध्ये काडी घातल्याने ही कान दुखी होते, आई तर मला लहानपणी खूप रागवायची, कानात काडी  घालू  नको, कानाचा पडदा फाटणार, त्यावेळी मला ते फारसे वेगळेच वाटायचे, आणि हसूही यायचे, मी आईला म्हणायची, की कानात थोडी पडदा असतो, पण जसे जशी जशी मी मोठी झाली, तसं-तसं मला माहिती पडले की, आपल्या शरीराचा एक अवयव किती नाजूक असतो, त्याची रचना किती व्यवस्थित केलेली आहे, ना देवाने खरंच ! तर आज आपण कान दुखी ची अजून काय काय कारणे आहेत? ते आपण जाणून घेऊयात! 

कान दुखी ची कारणे ?

अनेक कारणांमुळे कान् दुखू शकतो, पण ते नेमके कोणकोणते ते जाणून घेऊयात ! 

 • सर्दी पडसे झाले, की कान दुखायची समस्या होऊ शकते. 
 • सारखे जोरजोरात नाक ओढून, ही कान दुखते. 
 • ज्यांना सायनस चा आजार आहे, त्यामुळे ही कान दुखतो. 
 • कानात पुळी झाल्यास, कान दुखू शकतो. 
 • कानात काडी, बोट, एअर बर्ड्स घातल्याने ही, कानाच्या पडद्याला धक्का लागून कान दुखू शकतो, कानात जखम होऊ शकते. 
 • अति डोकेदुखी झाल्यानेही, कान दुखू शकतो. 
 • ताप आल्याने, ही कान दुखू शकतो. 
 • जोराचे आवाज ऐकल्याने, 
 • कानात पाणी गेल्याने, ही कान दुखतो. 
 • कानात किडा गेल्यावर, ही कान दुखू शकतो. 
 • ज्यांच्या नाकाचे हाड वाढले असेल, त्यांचे कान दुखू शकतात, कानातून पु येऊ शकतो. 
 • जर तुमच्या श्वसन संबंधित काही इन्फेक्शन झाले, तर त्याचा परिणाम कानदुखीवर होऊ शकतो. 
 • कानात हेडफोन जास्त घातल्यामुळे ही कान दुखू शकतात. 
 • कानात मळ जास्त साठल्याने, ही कान दुखतो. 
 • कान टोचल्याने  कान दुखू शकतो.
वाचा  मन मोकळे करणे का गरजेचे असते ?

कान दुखी ची लक्षणे :

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुमचे कान कोणत्या कारणामुळे दुखते सांगितले, आता आपण कान दुखी ची लक्षणे जाणून घेऊयात. 

 •  तुमचा कान दुखतो, त्यावेळी तुम्हाला असह्य वेदना होतात. 
 • कान दुखी होते तेव्हा तुमची चिडचिड होते. 
 • आणि दुखणे आले कि डोके दुखते. 
 • कान दुखी होते, त्याही कानातून आवाज येतो आणि त्यातून पांढरा पिवळा द्रवरूप पदार्थ बाहेर निघतो. 
 • जर कानात बोट किंवा एअर बर्ड्स अतिप्रमाणात गेल्याने, कान दुखतो. त्यावेळी रक्तही येण्याचे चान्सेस असतात. 
 • कान दुखतो, तेव्हा कानात तानल्यासारखे वाटते. 
 • कानात किडा गेल्यास, कानात आवाज येतो. 
 • कानाच्या आजूबाजूस सूज येते. 
 • कान दुखतो त्यावेळी ताप येतो, खोकला येतो. 
 • कान दुखतो त्यावेळी ऐकायलाही कमी येते. 

ज्यावेळी कान दुखतो त्यावेळी कोणते घरगुती उपचार करावे ?

 वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की कानदुखी ची नेमकी कारणे कोणती व त्याची लक्षणे कोणती आहे. आता आपण जाणून घेऊया की, कान दुखत असल्यावर कोणते घरगुती उपचार तुम्ही करू शकतात. चला तर मग बघुयात. 

कानाला शेकून बघा :

हो, बरेचदा कान दुखतो, त्यावेळी ठणकतो आणि त्याच्या आजूबाजूला फार सूज येते. अशा वेळी तुम्ही हॉटपॅड चा वापर करून बघा. हल्ली मार्केटमध्ये मेडिकल्स मध्ये हॉटपॅड हे मिळतात. त्यात तुम्ही गरम पाणी टाकून, कानाचे आजूबाजूला सुजलेल्या ठिकाणी अलवार शेकावे, परंतु शेकताना योग्य काळजी घ्यावी. जर तुमच्याकडे हॉटपॅड नसेल, तर तुम्ही तवा किंवा कढई गरम करून त्यात कपडा टाकून, कान शेकावे. त्याने तुम्हाला आराम मिळेल , कान शेकताना, तुम्ही पाच ते दहा मिनिटे शेकावे. जास्ती वेळ शेकु नये. ही काळजी घ्यावी. 

तुळशीच्या पानांचा वापर करून बघा :

तुळशी ही ऑंटीबॅक्टरियल अँटीसेफ्टीक गुणधर्म आहेत. जर तुमचे कान दुखत असेल, अशावेळी तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर केला, तर तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला तुळशीची आठ ते दहा पाने वाटून, त्यात कापूरवाडी मिसळून, एका बाटलीतील वस्त्रगाळ करून, त्याचे दोन थेंब तुम्ही कानात टाकू शकतात. त्याने कान दुखीवर थोडा आराम मिळेल. पण त्याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

वाचा  पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

कांदा वापरून बघा :

हो, आता तुम्ही म्हणाल, कांदा हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे, आणि कानदुखी वर कसा फायदेशीर ठरेल.  खरच तुम्ही जर कांदा वापरला, तर त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कांदा हा खरपूस भाजून, त्या कांद्याचे चूर्ण तयार करायचे, हे चूर्ण गाजराच्या रसामध्ये टाकून, वस्त्रगाळ करून कापसाच्या बोळ्याने, कानाला हळू लावावे. त्याने कान दुखी थांबते. तसेच तुम्ही कांद्याचा रस काढून गरम करून, त्याचे दोन थेंब तुम्ही कानात टाकू शकतात. त्याने तुमचे कानदुखी वर आराम मिळेल. 

लसून वापरून बघा :

लसूण मध्ये अँटीसेफ्टीक आणि फंगल इन्फेक्शन गुणधर्म असतात. जर तुमचे कान दुखत असेल, अशावेळी तुम्ही जर लसूण वापरला, तर तुम्हाला कानदुखी वर फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल, त्यामध्ये लसुन ची पाकळी, काळसर होईपर्यंत उकळून, नंतर ते तेल गाळून, त्याचे काही थेंब तुम्ही कानात टाकले, तर तुमच्या कानाचे दुखणे कमी होते.  शिवाय आता मार्केटमध्ये लसणाचे तेलही मिळते. कापसाच्या बोळ्यावर घेऊन, कानाच्या बाहेरील बाजूस सूज आल्यास, त्या जागी लावू शकतात. त्याने तुमची सूज कमी होऊन, कानाची ठणक बंद होते. 

राईचे तेल वापरून पहा :

ज्यावेळी तुमचे कान दुखते, अशावेळी तुम्ही राईचे तेल वापरू शकतात. कानात मळ झाल्याने, ही कान दुखतो. असे आम्ही तुम्हाला वरील माहितीमध्ये सांगितले आहे. अशावेळी जर तुम्ही राईचे तेल कोमट करून, तुमच्या कानात त्याचे तीन ते चार थेंब टाकले, तर कानातील मळ बाहेर निघून, कान दुखणे कमी होते. 

आल्याचा रस वापरून बघा :

कान दुखणे यावर आल्याचा रस तुम्हाला प्रभावशाली ठरेल, कारण आल हा वेदना व तुमच्या शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतो. ज्यावेळी तुमचा कान दुखतो, त्यावेळी कानाचा आजूबाजूचा भाग सुजतो आणि कानात सारखी ठनक येते, जर आल्याचा रस कानात टाकला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला आल्याचा रस काढून, तो वस्त्रगाळ करून, त्याचे दोन थेंब कानात टाकावे. 

वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा कसा असावा?

खोबरेल तेल वापरून बघा :

खोबरेल तेलाचा वापर हा पूर्वीच्या काळापासून होत आहे. ज्यावेळी तुमच्या कानात मळ बसलेला असतो, अशा वेळी  पूर्वीचे लोक कानात खोबरेल तेल टाकायचे. खोबरेल तेल कानातील मळ भिजवून अलगद बाहेर काढण्यास मदत करतो, व कान दुखी ची समस्या कमी होते. 

कान दुखल्यास कोणती काळजी घ्यावी :

कान दुखत असेल, त्यावर कोणते घरगुती उपचार करावे ते  आम्ही तुम्हाला सांगितले आहे. आता कान दुखत असेल, त्यावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी? ते जाणून घेऊयात. 

 • कानदुखी असेल, अशावेळी जास्त ध्वनिप्रदूषण मध्ये जाऊ नये. 
 • जेवण करताना कठीण पदार्थ खाऊ नयेत. 
 • आंघोळ करताना, कानात पाणी जाऊ देऊ नये. 
 • अतिथंड पदार्थ खाऊ नये, त्याने दातांना ठणक लागून कान दुखतो. 
 • कानात कोणतेही तेल टाकण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 
 • कानात एयर बर्ड्स  किंवा बोटे घालू नये. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला कान दुखत असतील, अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी. त्यावर कोणते उपचार करावेत. हे आम्ही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले, घरगुती उपाय करूनही, तुम्हाला फरक जाणवत नसेल. तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आणि कुणाला कशाची ऍलर्जी असेल, तर डॉक्टरांना विचारून हे घरगुती उपचार करावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या, माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका-कुशंका  असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                     धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here