उंदरापासून पसरणारा लासा ताप 

0
122
उंदरापासून पसरणारा लासा ताप 
उंदरापासून पसरणारा लासा ताप 

नमस्कार मित्रांनो. वाढत्या प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या आजार निघत असतात. हल्ली तर विविध प्रकारचे रोग निघालेले आहेत. काही रोग हे संसर्गजन्य रोग असतात. जसे की, एका व्यक्तीला जर एखादा आजार झाला असेल,  रोग झाला तर, त्या व्यक्तीमार्फत हा रोग इतर व्यक्तींनाही होत असतो. उंदरापासून पसरणारा लासा ताप हा प्रथम  नायजेरिया देशातील लासा शहरांमध्ये एक रुग्ण आढळून आला.जर त्या व्यक्तीने एखाद्याला मिठी मारली असेल अथवा त्या व्यक्तीच्या शिंकेपासून त्या व्यक्तीच्या तोंडातील द्रव पदार्थ बाहेर पडल्यामुळे अथवा त्या व्यक्तीने हस्तोदोलन केल्यामुळे हा रोग इतर व्यक्तींना पसरत असतो, त्या व्यक्तींनाही या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता तर विशिष्ट प्रकारची रोग निघालेले आहेत. हल्ली संपूर्ण देश आता कोरोना रोगापासून सावरत आहे. कोरोना रोग हा देखील असाच भयंकर रोग आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण देशात हा रोग पसरत गेला, त्यामुळे या रोगाने रौद्र रूप ही धारण केले होते. कोरोना रोगामुळे अनेक जणांना आपले जीव देखील गमवावे लागले. त्याचप्रमाणे, लासा ताप हा देखील एक नवीनच रोग निघालेला आहे. हा देखील संसर्गजन्य रोगांमध्ये मोडला जातो. मित्रांनो, लासा ताप हा नेमका काय आहे? याबद्दलही अनेक जणांना माहिती जाणून घ्यावीशी वाटत असेल. तर मित्रांनो, आज आपण उंदरापासून पसरणारा लासा ताप या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, उंदरापासून बसणारा लासा ताप याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

उंदरापासून पसरणारा लासा ताप:-

मित्रांनो, उंदरापासून पसरणारा लासा ताप हा नेमका काय आहे? याबद्दल आपण आता प्रथम माहिती जाणून घेऊयात!नायजेरिया या देशांमध्ये लासा नावाचे शहर आढळून येते. तर या नायजेरिया देशातील लासा शहरांमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्या रुग्णाचे निदान न झाल्यामुळे, तो रोग लवकर न समजल्यामुळे, त्या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला. जेव्हा या रुग्णाच्या रोगाचे निदान झाले तो रुग्ण नेमका कोणत्या आजाराने ग्रस्त होता? हे समजल्यानंतर त्या रोगाला लासा ताप असे नाव देण्यात आले. हा रुग्ण १९६९ मध्ये प्रथम आढळून आला होता.

वाचा  लहान मुलांचे वजन कसे कमी करावे

 मित्रांनो, लासा ताप हा एका विशिष्ट उंदरामुळे होत असतो. विशिष्ट उंदराच्या विष्टेमुळे हा रोग पसरत असतो. ही विष्ठा जर एखाद्या माणसाच्या पोटात गेली, तर त्या व्यक्तीला हा रोग होण्याची शक्यता असते आणि ज्या व्यक्तीला हा रोग झालेला असेल, तर त्या व्यक्तीच्या मार्फत इतर व्यक्तींना होत असतो. जसे की, जर त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हस्तांदोलन केले असेल, किंवा मिठी मारली असेल, त्या व्यक्तीच्या शिंकल्यापासून उडालेल्या द्रव पदार्थ उडाल्यामुळे, त्या व्यक्तीच्या सर्दीमुळे हा रोग पसरण्याची शक्यता असते.

 एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तींना, तर दुसऱ्या व्यक्तीमुळे अजून इतर व्यक्तींना हा रोग पसरत असतो. त्यामुळे लासा ताप हा संसर्गजन्य रोगच आहे. मित्रांनो, लासा तापाची नेमकी लक्षणे कोणती आहेत याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

उंदरापासून पसरणारा लासा ताप  (1)
उंदरापासून पसरणारा लासा ताप  (1)

लासा तापाची लक्षणे:- Lasa Tapachi Lakshane

लासा ताप हा उंदराच्या विष्ठा यामार्फत इतर व्यक्तीला, तर व्यक्तीपासून इतर व्यक्तींना अशा स्वरूपात पसरत असतो. लासा ताप झाल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागु शकतो. परंतु, या रोगावर जर व्यवस्थित निदान झाले तर, जीव गमवण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते.  व्यक्तीमध्ये तीन ते चार आठवड्यानंतर या लासा तापाची लक्षणे दिसत असतात. तर या लासा तापाची लक्षणे नेमकी कोणती असू शकतात? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • उलट्या होणे.
 • भयंकर ताप येणे.
 • थकवा येणे.
 • विकनेस येणे.
 • श्वास घ्यायला त्रास होणे.
 • अधिक रक्तस्राव होणे.
 • चेहरा तसेच संपूर्ण शरीराला सूज येणे.
 • पोट दुखणे.
 • छाती दुखण्याचा त्रास होणे.
 • पाठ दुखणे.
 • अन्न खावेसे न वाटणे.

मित्रांनो, लासा ताप याची लक्षणे, ही आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेली आहेत. जर व्यक्तीमध्ये अशी लक्षणे आढळून आली, तर त्या व्यक्तीला लासा ताप हा रोग झालेला आहे, असे समजून घ्यावे व वेळीच डॉक्टरांकडे जाऊन त्या व्यक्तीने निदान केले पाहिजे.

वाचा  लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे.

योग्य ते उपचार घेतले पाहिजे. जेणेकरून, ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊ शकेल. लासा ताप यावर जर योग्य निदान झाले नाही, जर तुम्ही योग्य उपचार करून घेतले नाहीत, तर परिणामी जीव गमवावा लागू शकतो. म्हणून, आपण वेळीच निदान करून घेणे आवश्यक ठरते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आपण उंदरापासून पसरणारा लासा ताप हा काय आहे? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here