कानाचा पडदा फाटला उपाय

0
3546

नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कानाचा पडदा फाटला असल्यास यावर काही उपाय आपले शरीरही अत्यंत नाजूक आहे. आपण त्याला व्यवस्थित जपायला हवेत, हल्लीच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीरावर व आरोग्यावर ही लक्ष देत नाही, शरीर हे एकदाच मिळते, त्याला आपण जपायला हवेत. आपल्या शरीराचा एखादा अवयव खराब झाला, किंवा तुटला, तर तो परत मिळत नाही. हे आपल्याला माहिती आहे. तरी आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेत नाही. आपण आपला आहार योग्य रित्या घेतला पाहिजे. आपल्या आहारात आपण, सात्विक आहार घ्यायला हवा. कोणतेही पदार्थ खाताना काळजी घ्यायला हवी, की त्याने तुम्हाला त्याची ऍलर्जी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आपण कसे खातो,  थंड पदार्थ खाल्ले की, लगेच  गरम पदार्थ लगेच खातो.  पण ते अगदी चुकीच आहे, त्याने तुम्हाला सर्दी सारख्या समस्या होतात. तुमची तब्येत बिघडू शकते. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. ज्यावेळी तुम्हाला सारखी सर्दी होते, त्यावेळी नाक ओढून -ओढून  तुमच्या कानाचा पडदा फाटणे, चीही शक्यता असते. तसेच कफ प्रवृत्तीच्या लोकांना ही सर्दी झाल्याने कानाचा पडदा फाटू शकतो. 

आज कालच्या लहान मुलांना खेळता – खेळता कानात काही घातले गेले, तरी पडदा फाटण्याची समस्या होऊ शकते. तसेच लहान मुलांची, खेळता खेळता लढाई होते, भांडणे होतात, किंवा पडतात. अशामुळे त्यांच्या कानाला मार लागून, त्यांचा कानाचा पडदा फाटू शकतो.

 आज आपण बघणार आहोत की, कोणत्या कारणांमुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चला तर मग बघुयात. 

कानाचा पडदा कशामुळे फाटतो?

कानाचा पडदा फाटण्याची अनेक कारणे आहेत. ती आपण आता जाणून घेऊयात! 

  • कफ प्रवृत्तीच्या लोकांना सारखे-सारखे नाक ओढून कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • सर्दी पिकल्यामुळेही कानाचा पडदा फाटणे ची समस्या होते. 
  • जर खाण्यात कसली एलर्जी झाली, तरीही कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • कानात सारखे सारखे बोट, एअर बर्ड्स घातल्याने, ही कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • तसेच बॅरोट्रॉमा झाल्याने, म्हणजेच कानातील दाब कमी झाल्यामुळे अचानक बदल, होऊन कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • अति उंच ठिकाणी गेल्यावर, हवेतील बदल झाल्याने ही, जसे की विमान, हेलिकॉप्टर, तसेच उंच बिल्डिंग, वर अशा वातावरणात गेल्यामुळे, हवेतील बदल झाल्यामुळे, कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • एखादा अपघात झाल्यास कानाला मार लागल्यामुळे, ही कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • कानावर कोणी चापट मारल्याने, ही कानाचा पडदा फाटू शकतो. 
  • अति आवाजा मुळे, ध्वनिप्रदूषणामुळे, कानाचा पडदा फाटू शकतो. 
वाचा  स्वप्नात फुलपाखरू दिसणे शुभ की अशुभ

कानाचा पडदा फाटला आहे त्याची लक्षणे काय आहे ते जाणून घेऊयात!

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला कानाचा पडदा फाटण्याची, काही कारणे सांगितले आहेत. आता आपण त्याची लक्षणे जाणून घेऊयात! 

  • कानाचा पडदा फाटला, त्यावेळी कानातून पाणी व पिवळसर पु येतो. 
  • कानाचा पडदा फाटला, तर कानातून रक्त ही येऊ शकते. 
  • तीव्र डोकेदुखी होते. 
  • अंगात सारखा ताप येतो. 
  • सर्दी सारखे जाणवते. 
  • कानाचा आजूबाजूचा भाग सुजतो, 
  • ऐकायला कमी येते. 
  • कानात कसला तरी आवाज, होत असल्यासारखे जाणवते. 
  • चक्कर आल्यासारखे वाटते, 
  • कान खूप दुखतो. 
  • कान सुन्न पडतो. 

कानाचा पडदा फाटल्यास काही घरगुती उपाय!

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला कानाचा पडदा फाटणे, याची काही कारणे व लक्षणे दिलेली आहेत. ज्या वेळी तुमच्या कानाचा पडदा फाटतो, त्यावेळी त्याचे असह्य वेदना आपल्याला सहन होत नाही. तसेच आपले संपूर्ण लक्ष कानावरच राहते. आपला दिनक्रम चुकतो, आणि आपली तब्येत बिघडते, तुमच्या कानाचा पडदा फाटला असेल, अशा वेळी, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊयात चला तर मग बघुयात! 

कानाच्या बाहेरील बाजूस बर्फाने शेक द्या

ज्यावेळी कानाचा पडदा फाटला, त्यावेळी कानाच्या बाहेरील बाजूस फार सूज येते, व कान दुखतो. अशावेळी जर तुम्ही तात्पुरता म्हणून, बर्फाने शेक दिला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला बर्फ एका कापडात गुंडाळून, त्याने तुमच्या कानाच्या आजूबाजूस भागात शेकल्यास, तुमच्या कानाची सूज ही हळू कमी होईल, शिवाय वेदनाही थोड्या कमी होतील, करून बघा. 

खोबरेल तेलाचा वापर करा

ज्यावेळी तुमच्या कानाचा पडदा फाटतो, त्यावेळी कानातून पाणी व पु येते, त्यावेळी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकतात. त्यासाठी खोबरेल तेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन तुमच्या कानाचा आजूबाजूचा भाग कापसाच्या बोळ्याने पुसून घ्यावे, तसेच कानातून पू व पाणी येत असेल, अशावेळी तुम्ही कानात कापसाचा बोळा लावून ठेवावा. 

वाचा  स्वप्नात सत्यनारायण पूजा दिसणे शुभ की अशुभ

पेन किलरची गोळी घेऊन बघा

 कानाचा पडदा फाटला, की कानातुन पाणी येतेच, पण शिवाय तुमचे डोके दुखी, अंग दुखी, ताप यासारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. अशा वेळी तुम्ही तात्पुरता इलाज म्हणून,  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेन किलरची गोळी घ्यावी. त्याने तुम्हाला थोडा फरक पडेल. 

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

ज्यावेळी कानाचा पडदा फाटतो, तेव्हा कानातून    पू , पाणी तसेच रक्त येण्याची संभावना असते, कानाला असह्य वेदना होतात. तसेच ज्या वेळी तुम्हाला वाटते की कानाचा पडदा फाटला असेल, अशावेळी तुमचा कान सुन्न होतो, तुम्हाला कमी ऐकायला येत, आणि चक्कर सारखे वाटायला लागले, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे दाखवून, लवकरात लवकर डॉक्टरांकडून इलाज करून घ्यावे. कारण तुमच्या जर कानाचा पडदा फाटला असेल, आणि त्यावर उपचार उशिराने घेत असाल, तर तुम्हाला त्याच्या बाबतीत, अजून काही समस्या होण्याची संभावना असते. कारण नाक- कान -घसा या तिघांचा एकमेकांशी संबंध असतो. जेव्हा कानाला इजा होते, अशा वेळी नाकाला त्रास होतो, तसेच घशात इन्फेक्शन चे ही प्रमाण वाढायला सुरुवात होते. अशावेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून, त्याच्यावर इलाज करायला हवा, अशावेळी डॉक्टर तुमच्या कानाची पडद्याची फाटण्याची लेव्हल किती आहे, ते तपासून योग्य रीतीने उपचार करून, तुम्हाला कानात टाकायचे ड्रॉप देतील, व औषधे देतील, तसेच जर कानाचा पडदा हा जास्त प्रमाणात फाटला असेल, तर ते तुमची सर्जरीही करतील. पण घाबरून जाऊ नका, त्याने तुमचा कान लवकर बरा होण्यास मदत मिळते. 

कानाचा पडदा फाटला तर काय काळजी घ्यावी?

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही कानाचा पडदा कोणत्या कारणामुळे फाटतो व त्यावर कोणते, घरगुती उपचार करावे, असे सांगितले आहे. 

 तुमच्या कानाचा पडदा फाटला, तर कोणती काळजी घ्यावी, ते बघुयात. 

  • तुमच्या कानातून जे पाणी व पु येते, ते ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे. 
  • कानाच्या बाहेरील बाजूस बर्फाने शेकावे. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, कोणतेही ड्रॉप्स कानात टाकू नका. 
  • कानात कोणतेही तेल टाकू नका. 
  • बाहेर जाताना कानावर, रुमाल बांधावा. 
  • डॉक्टरांना विचारून, अँटिबायोटिक औषधे तुम्ही घेऊ शकतात. 
  • अति उंच ठिकाणी जाऊ नका, कानाची काळजी घ्या. 
  • कानात हेडफोन लावू नका. 
  • अति थंड पदार्थ खाऊ नका. 
  • अति आवाजाच्या ठिकाणी जाऊ नका. 
  • आराम करावा. 
वाचा  पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला कानाचा पडदा, कोणत्या कारणामुळे फाटतो, त्यांची लक्षणे, त्यावर काही उपाय, तसेच कानाचा पडदा फाटल्यास, कोणती काळजी घ्यावी, हे तुम्हाला सांगितलेले आहेत. कान शरीराचा अत्यंत नाजूक भाग आहे. तुम्ही त्यात कोणतेही तेल टाकू नका, जर तुम्हाला काही उपचार करायचे असेल, तर तो डॉक्टरी इलाजच जास्त प्रमाणात करा. कारण कानाचा पडदा फाटणे, हे अती गंभीर असते, त्याने तुम्हाला इन्फेक्शन अति प्रमाणात होऊ शकते, ही काळजी तुम्ही घ्यायला हवी, व डॉक्टरांना दाखवायला हवेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका -कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here