चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे

0
979
चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे
चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे

    आपले शरीर चांगले दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या शरीराची विविध रित्या काळजी घेत असतो. शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला चेहरा. या चेहऱ्यामुळे आपल्या शरीराचे सौंदर्य वाढविण्यास आपल्याला मदत मिळते. बऱ्याच वेळा जाहिरातींमध्ये असलेल्या मॉडलचा चेहरा पाहून आपला चेहरा देखील असावा असे भरपूर जणांना वाटत असते. आपला चेहरा देखील त्यांच्यासारखा दिसावा यासाठी ते विविध प्रयत्न देखील करत असतात. पण त्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला विविध नुकसान देखील होऊ शकते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध केमिकलयुक्त क्रीमचा अतिवापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर त्याचे विविध साइड इफेक्ट्स दिसू शकतात. ज्यामुळे आपल्याला विविध अडचणींना किंवा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर केला पाहिजे. चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे अनेक आहेत.

कोरफड ही आपल्या आयुर्वेदानुसार अत्यंत गुणकारी व फायदेमंद आहे हे दर्शविले आहे. त्याचबरोबर कोरफडीचा वापर विविध कामांसाठी हा केला जातो आणि प्राचीन काळापासून कोरफडीचा गर हा विविध समस्या दूर करण्यासाठी उपयोग केला जातो. कारण की कोरफडीच्या गरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषकतत्व यामुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याला त्याचे विविध फायदे होऊ शकतात. ज्यामुळे आपले सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. चेहऱ्याला कोरफडीचा गर लावल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत मिळते. त्यामुळे कोरफडीचा वापर आपण आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी करू शकतो.

चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे :-

    चेहऱ्याला कोरफड लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याला त्याचे विविध फायदे होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की चेहऱ्याला कोरफड लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात व कसे लावावे ? चला तर मग बघुया !

  • चेहऱ्याला कोरफड लावल्याने चेहऱ्यावर मॉश्चर निर्माण  होण्यास मदत मिळते :-

    अनेक लोकांना चेहऱ्याची निगडित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांमधील सर्वात महत्त्वाची समस्या ही बऱ्याच लोकांना उद्भवते ती म्हणजे अनेक लोकांचा चेहरा हा कोरडा असतो किंवा त्यांची त्वचा कोरडी होणे अशा समस्या उद्भवतात व त्यांच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडू नये यासाठी ते विविध गोष्टींचा वापर देखील करून बघतात. पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही. पण जर तुम्हाला देखील तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चर टिकवून ठेवायचे असेल किंवा चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्याला कोरफडीचा गर लावावा. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्यामुळे आपली त्वचा कोरडी जर होत असेल तर ती थांबवण्यास कोरफड आपल्याला मदत करते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चर देखील निर्माण करण्यास कोरफड आपल्याला मदत करते. त्याचबरोबर तुमच्या चेहर्‍यावरील ग्लो वाढवण्यास कोरफड आपल्याला मदत करते.

  • चेहऱ्याला कोरफड लावल्याने चेहऱ्यावरील डाग सर्कल दूर करण्यास मदत करते :-

   बऱ्याच लोकांच्या डोळ्याखाली चेहऱ्यावर डाग सर्कल असतात. डार्क सर्कल्स अति प्रमाणात वाढणे ही समस्या महिलांना अधिक उद्भवत असते. यामुळे त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होतो. चेहऱ्यावर डार्क सर्कल्स निर्माण होण्याची विविध कारणे असू शकतात. पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील डोळ्याखाली डार्क सर्कल्स निर्माण होणे ही समस्या उद्भवू शकते. पण जर तुम्हाला ही तुमच्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स जर दूर करायची असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कोरफडी मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्व यामुळे आपल्या चेहऱ्यावर निर्माण झालेली डार्क सर्कल दूर करण्यासाठी आपल्याला मदत करते. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने आपल्या शरीराला आवश्यक ते विविध पोषक तत्वे मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावर जर डार्क सर्कल निर्माण झाले असतील तर ते डार्क सर्कल दूर होणार आपल्याला मदत मिळते.

वाचा  नाकातून घाण वास येणे

चेहऱ्याला कोरफडीचा गर कसा लावावा ?

   चेहऱ्याला कोरफड चा गर कसा लावावा या संबंधित माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे :-

    कोरफड मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्वामुळे आपल्या विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. चेहऱ्याला कोरफडीचा गर लावण्यासाठी कोरफडीचा ताजा गर एका वाटीमध्ये काढून घेऊन त्यामध्ये थोडेसे गुलाब जल टाकावे व हे मिश्रण एकत्रित करून आपल्याला जिथे डार्क सर्कल असतील त्या ठिकाणी लावावे व त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा असे जर तुम्ही 15 ते 20 दिवस केले तर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल जर निर्माण झाले असतील तर ते दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

       चेहऱ्यावरील मॉइस्चरायझर टिकून ठेवण्यासाठी आपण कोरफडीचा गर घेऊन त्यामध्ये थोडेसे मध टाकावे व थोडेसे गुलाब जल टाकावे व हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर फेस पॅक प्रमाणे लावावे. पंचवीस-तीस मिनिटानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा. असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याशी निगडित असणाऱ्या विविध समस्या तुम्हाला दूर होण्यास मदत मिळू शकते.

चेहऱ्याला कोरफड लावताना कोणती काळजी घ्यावी :

   जर तुम्ही चेहऱ्याला कोरफड लावत असाल तर कोरफडचा गर हा ताजा असला पाहिजे. त्याचबरोबर चेहऱ्यावर कोरफडीचा गर हा अधिक कालावधीसाठी ठेवू नये. जर तुम्ही चेहऱ्यावर हा गर अधिक काळासाठी ठेवला तर त्यामुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे आपण चेहऱ्याला कोरफड लावतानाही काळजी घेणे आवश्यक आहे.

   आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले चेहऱ्याला कोरफड लावल्यामुळे आपल्याला कोण कोणते विविध फायदे होऊ शकतात? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे:-

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here