मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. तसेच अति कामाचा ताण तणाव यामुळे आपण स्वतःकडे देखील दुर्लक्ष करत असतो. पण यामुळे आपल्या आरोग्यावर अयोग्य परिणाम होतो. कामाच्या अति लोड किंवा टेन्शन ह्याचा प्रभाव हा तुमच्या झोपेवर होतो. आणि अपुरी झोप झाल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. प्रत्येकाला वाटत असते आपला चेहरा देखील इतरांप्रमाणे स्वच्छ व सुंदर दिसावा. आपला चेहरा इतरांप्रमाणे गोरा दिसावा. खरंतर कामा निमित्ताने घराबाहेर पडावे लागते आणि बाहेरील उन्हामुळे तुमचा चेहरा काळा पडू शकतो. त्यामुळे चेहऱ्याच्या संदर्भात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुमचा चेहरा चांगला दिसावा यासाठी तुम्ही पार्लर मध्ये धाव घेतात, चेहरा साफ करण्यासाठी नाही ते उपाय करतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वेग वेगळे प्रयोग करतात. बाजारातून महागड्या क्रीम आणतात. मात्र यामुळे तुमचा चेहरा अजून खराब होऊ शकतो.
तुम्हालाही तुमचा चेहरा इतरांप्रमाणे स्वच्छ गोरापान दिसावा असे वाटते का? यासाठी नेमके करावे तरी काय? पण मित्रांनो जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमचे आरोग्य चांगले तर याचाच परिणाम म्हणून चेहऱ्यावर ही दिसून येतो. तुम्ही बाहेरील फास्टफूड खाणे बंद करू शकता. तुम्ही योग्य तो संतुलित आहार घ्या. तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा व फळांचा जास्तीत जास्त समावेश करा. तुम्ही तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा देखील समावेश करू शकता. आणि तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये व्यायाम करण्याची सवय करून घ्यायला हवी. रोज नियमित व्यायाम करण्याने देखील तुमची शरीराची त्वचा ही ताजीतवानी व टवटवीत राहू शकते. तसेच तुमचा चेहरा स्वच्छ राहण्यासाठी तुम्ही घरगुती काही आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता. बाजारातून महागड्या क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही घरी आयुर्वेदिक उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तरी यासाठी आपण कोणत्या आयुर्वेदिक उपाय केले पाहिजे चला तर मग हे जाणून घेऊया !
चेहरा साफ करण्यासाठी घरगुती उपाय :
मित्रांनो, इतरांप्रमाणे आपली चेहऱ्याची त्वचा देखील स्वच्छ व्हावी यासाठी तुम्ही घरगुती आयुर्वेदिक उपाय करू शकतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते यासाठी तुम्ही खालील प्रमाणे उपाय करून बघू शकतात.
पपई :
मित्रांनो, पपई हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पपई ही चवीला तर गोड आहेच शिवाय याचे गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात आहे. पपई डोळ्यांसाठी फार उत्तम. पण पपई चा फक्त खाण्यासाठी उपयोग होतो असे नाही. पपई चा उपयोग आपण चेहरा स्वच्छ करण्यासाठी देखील आणू शकतो. पपई चा उपयोग चेहर्यासाठी कसा करावा हे आपण जाणून घेऊया.
यासाठी पपईचा गर काढून घ्या. आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. पपईचा गर आणि मध हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. त्यानंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावून द्या. चेहऱ्यावर लावल्यावर पंधरा मिनिटे राहू द्या. चेहरा व्यवस्थितपणे कोरडा झाल्यावर त्याने तुमच्या चेहऱ्याची मालिश करा. आणि थंड स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. नक्कीच तुम्हाला फरक आढळून आलेला जाणवेल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी पपईचा उपयोग करू शकतात.
ग्लिसरीन व लिंबाचा रस :
मित्रांनो, तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन व लिंबाचा रस याचा देखील उपयोग करू शकता. लिंबा मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. जे आरोग्यसाठी फार उत्तम ठरते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहात लिंबाचे सेवन केल्यास तुम्हाला नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवून येईल. ग्लिसरीन व लिंबाचा रस याचा उपयोग चेहरा स्वच्छ करण्यासाठी कसा करावा हे आपण जाणून घेऊया.
एक वाटी मध्ये पाच चमचे ग्लिसरीन टाकून घ्या. त्यात तुम्ही लिंबाचा रस टाका. ग्लिसरीन आणि लिंबाचा रस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्या. हे लावण्याआधी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. चेहरा स्वच्छ पुसून घेऊन हे मिश्रण तुमच्या शरीराला हळुवारपणे लावा. आणि चेहर्यावर पाच मिनिटे मालिश करा. अर्धा तास तसेच राहू द्या.अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका. याने तुमचा चेहरा स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते.
बेसन पिठाचा वापर करून बघा :
मित्रांनो तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी बेसन पिठाचा नक्कीच वापर करून बघा. यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होऊ शकते. बेसन पीठ हे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यास मदत करते. बेसन पीठ हे चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. तेलकट त्वचा असो किंवा कोरडी त्वचा असो तरी देखील तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकतात. याने कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर तुम्ही बेसनपीठ याचा वापर करू शकतात. तर या बेसन पिठाचा वापर नक्की कसा करावा चला तर मग हे आपण जाणून घेऊयात.
- दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा व त्यात थोडेसे दूध मिसळा. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. आता हे मिश्रण लावून ते अर्धा तास तसेच राहू द्या. चेहरा सुकल्यावर त्याने पंधरा मिनिटे मालिश करा आणि आता चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाका. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात नक्कीच फरक जाणून आलेला दिसेल.
- दोन चमचे बेसन पीठ घ्या त्यात चिमूटभर हळद टाका. आता त्यात एक चमचा दही टाका. आता त्यात एक छोटा चमचा मध टाकून घ्या. आणि एक चमचा गुलाबजल टाका. हे मिश्रण एकजीव करून घ्या. चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हे मिश्रण व्यवस्थितपणे तुमच्या चेहर्यावर व मानेवर लावून घ्या. लावल्यानंतर ते अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. याने तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो आलेला दिसू शकतो. दही मुळे चेहरा मुलायम होण्यास मदत होते. तर हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता.
मित्रांनो, तुम्ही तुमचा चेहरा साफ करण्यासाठी वरील प्रमाणे सांगितलेले घरगुती उपाय नक्कीच करून बघा.त्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसून येऊ शकतो.बाहेर जाऊन महागडे उपचार करण्यापेक्षा तुम्ही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
क्रीम :
मित्रांनो तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ साफ करण्यासाठी कुठल्या प्रकारे घरगुती आयुर्वेदिक उपाय केले पाहिजे हे तर आपण जाणून घेतले. तसेच तुमचा चेहरा चांगला दिसावा यासाठी कुठल्या प्रकारचे क्रिम वापरले पाहिजे हे देखील जाणून घ्यायला हवे यासाठी बाजारातून महागड्या क्रीम न आणता घरगुती आयुर्वेदिक क्रीम यांचा देखील वापर केला पाहिजे. तुमचा चेहरा चांगला राहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आयुर्वेदिक क्रीमचा वापर केला तर योग्य ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील तुम्ही आयुर्वेदिक क्रीम जाणून घेऊ शकतात.
विको टर्मरिक चा वापर करून बघा :
मित्रांनो, तुम्ही तुमच्या चेहऱ्या साठी विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम चा वापर करू शकता. फार कमी जणांना विको टरमरिक क्रीम चा वापर माहीत असतो. विको टर्मरिक या क्रीम मुळे तुमच्या चेहर्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. शक्यतो तुम्ही विको टर्मरिक चा रात्रीच्या वेळी वापर करा. विको टरमरिक क्रीम मध्ये हळदीचा वापर केलेला असतो. आणि हळद ही आपल्या चेहर्यासाठी बहुगुणकारी! तर मित्रांनो तुम्ही विको टर्मरिक या क्रीमचा नक्कीच वापर करून बघू शकतात.
ऑरगॅनिक क्रीम :
मित्रांनो, तुमचा चेहरा हा इतरांप्रमाणे टवटवीत दिसावा चेहऱ्यावरील काळे डाग जावे आणि चेहरा ग्लो करावा यासाठी तुम्ही घरगुती ऑरगॅनिक क्रीम तयार करू शकतात. पण ऑरगॅनिक क्रीम तरी कशी तयार करावी? अगदी सहज वरीलरित्या आपण ही आयुर्वेदिक ऑरगॅनिक क्रीम तयार करू शकतो चला तर मग जाणून घेऊया ऑरगॅनिक क्रीम कशाप्रकारे तयार करावी.
ऑरगॅनिक क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही दोन ते तीन चमचे मसूरडाळ घ्या. मसूर डाळ ही स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. धुतल्यानंतर त्यात गुलाब जल टाका. 5 ते 6 घंटे मसूर डाळ ही गुलाबजल च्या पाण्यात भिजवून ठेवा. मसूर डाळ व्यवस्थितपणे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. आणि चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्या. वाटून घेतल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने गाळून घ्या. आता एका वाटीत मसुराचे डाळीचे पाणी दोन चमचे घ्या. त्यामध्ये दोन चमचे बदाम तेल घ्या बदाम तेल नसेल तर ऑलिव्ह ऑइल देखील घेऊ शकतात. त्यानंतर दोन चमचे ग्लिसरीन टाका. आता त्यात दोन चमचे कोरफडीचा रस टाकून घ्या आणि आता यात रोज इसेन्शियल ऑईल चे काही थेंब टाका हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. एकजीव केल्यानंतर एका छोट्याशा काचेच्या डबीत हे मिश्रण भरून घ्या. अशाप्रकारे तुम्ही घरगुती ऑरगॅनिक क्रीम तयार करू शकता. या ऑरगॅनिक क्रीमचा तुम्ही इतर क्रीम प्रमाणे वापर करू शकतात.
या घरगुती आयुर्वेदिक ऑरगॅनिक क्रीम चा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येऊ शकतो. तुमचा चेहरा सॉफ्ट म्हणजेच मुलायम होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तुमचा चेहरा डाग विरहित होऊ शकतो. तुमची त्वचा देखील इतरांप्रमाणे चमकदार होऊ शकते. या घरगुती आयुर्वेदिक क्रीम की तुम्हाला खूप सारे फायदे नक्कीच होऊ शकतात. तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही आयुर्वेदिक क्रीम नक्कीच करून बघा.
चला तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही सांगितलेले घरगुती आयुर्वेदिक उपाय नक्कीच तुमच्या कामात येऊ शकतात. आणि याने देखील उपयोग होत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
धन्यवाद !