उपवासात सैंधव मीठ का खातात आणि त्याच्या शरीराला काय फायदे होतात? 

0
312
उपवासात सैंधव मीठ का खातात आणि त्याच्या शरीराला काय फायदे होतात? 
उपवासात सैंधव मीठ का खातात आणि त्याच्या शरीराला काय फायदे होतात? 

नमस्कार, मित्रांनो, आयुर्वेद शास्त्र मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आपले शरीर इतके नाजूक झालेले आहे की, त्याला लवकर काहीतरी बाहेरची इन्फेक्शन होते किंवा त्याचा त्रास होतो. उपवासात सैंधव मीठ का खातात कारण की या पाठीमागे आपल्या हिंदू धर्मात काही तरी शास्त्र मानले जाते.

तर मित्रांनो, हल्ली कोणतेही सण असो, वार असो किंवा पूजा असो, तर काहीजण उपवास करतात. तर काहींचे हप्त्याचे ठरलेले वार हे उपवासाचे असतात. तसेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही जण अतिशय कठोर उपवास करतात. त्यामुळे ते एकच  वेळ फराळ करतात. तर आपल्या शरीराला त्यामुळे इन्फेक्शन होते, त्रास होतो, कारण आपल्याला नेहमीच दोन वेळ जेवण्याची सवय असते.

जर आपण एकच वेळ फराळ करतो. तर त्यामुळे आपल्याला कोणते त्रास होतात, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण त्याच बाबतीत जाणून घेणार आहोत, ज्यावेळी जर तुम्ही उपवास करत असाल तर  सैंधव मीठ खाल्ले, तर तुमच्या शरीराला त्यामुळे खूप फायदे होतात.

तर मित्रांनो, सैंधव मीठ म्हणजे काय? त्याच बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. व त्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात? त्या बाबतीत हे आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात…! 

उपवासाच्या वेळी सेंधव मीठ खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात? 

मित्रांनो, उपवासाच्या वेळी जर तुम्ही सैंधव मीठ खाल्ले, तर तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

सैंधव मिठामधील गुणधर्म? 

मित्रांनो, सैंधव मीठ हे नैसर्गिक युक्त असते. यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला लागणारे गुणधर्म असतात. जसे की गंधक, लोह, झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे असते. तसेच या मिठाचा रंग हा गुलाबीसर, तपकिरीसर असतो. तसेच हे मीठ सगळीकडे उपलब्ध असते. 

सैंधव मीठ म्हणजे नेमके काय? 

मित्रांनो सैंधव मीठ हा सुद्धा एक मिठाचाच प्रकार म्हटला जाते. तसेच सैंधव मिठाला खनिजयुक्त मीठ असेही म्हणतात. कारण हे मीठ खाणी मधून मिळते. तसेच त्यामध्ये भरपूर प्रमाणात गंधक आणि लोहाचे प्रमाण असते आणि आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. म्हणून सेंधव मीठ खाणे केव्हाही चांगले मानले जाते.

  खास करून उपवासाला सैंधव मिठाचा वापर केला जातो.  कारण त्यामध्ये कोणत्याही केमिकल्स चा वापर केलेला नसतो. नैसर्गिक युक्त ते मीठ असते. तर उपवासाला त्यामुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ? 

तुमची पचनक्रिया सुधारते

मित्रांनो, जे लोक सहसा नियमित उपवास करत असतात, त्या लोकांना अपचनाचा त्रास हा भरपूर प्रमाणात होतो. कारण जेवणाची वेळ बदलली, तर आपल्याला यासारख्या समस्या होतात आणि अशावेळी जर तुम्ही उपवासात फराळामध्ये सैंधव मिठाचा वापर केला, तर  तुमचा जठराग्नी सुधारतो आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. अपचनचा त्रास तुम्हाला कमी होतो. 

गॅसेसच्या तक्रारी दूर होतात

मित्रांनो, उपवासाच्या वेळी आपण बटाट्याचे काप, रताळू चा शिरा किंवा शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खिचडी यासारखे पदार्थ खातो, अशा पदार्थांमुळे  काही लोकांना आपल्याला पोटामध्ये गुब्बारा धरल्यासारखे ही जाणवू शकते. गॅसेस ही जाणवू शकतात. अशावेळी जर तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये सैंधव मिठाचा वापर केला, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळतो. 

तुमच्या त्वचेवर तेजी येते

मित्रांनो, सैंधव मीठ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. शिवाय उपवासाची वेळी जर तुम्ही सैंधव मिठाचा वापर केला, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेगळी तेजी त्यामुळे येते. तुमची त्वचा तजेलदार दिसते. कारण उपवासाचे वेळी आपल्याला एक प्रकारचा थकवा जाणवतो. एक वेळी जेवल्यामुळे आपल्याला कधीकधी अशक्तपणा चक्कर आल्यासारखेही जाणवते. अशावेळी तुम्ही उपवासाच्या दिवसांमध्ये सैधव मिठाचा वापर केला की, तुमची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. 

वाचा  टीबी आजाराची लक्षणे कारण व उपाय

वजन कमी होते

मित्रांनो, हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा हा आपल्याला भरपूर लोकांमध्ये दिसून येतो. काही जण वजन कमी करण्यासाठी उपवासही करतात.  उपवासात मध्ये फक्त फ्रुट सलाड किंवा लिंबू पाणी याचा वापर करतात. अशा वेळी जर तुम्ही त्यासोबत सैंधव मिठाचाही वापर केला, तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. कारण सैंधव मिठाचा वापर केल्याने, आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सैंधव मिठाचा वापर हा उपवासाच्या वेळी केल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात. त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.

धन्यवाद 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here