सतत आळस येणे.

0
1246
सतत आळस येणे
सतत आळस येणे

नमस्कार मित्रांनो. हल्ली धावपळीच्या जगामध्ये सर्वांनाच कामाचा अतिलोड येत असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. सतत काम करत राहणे व आहाराकडे दुर्लक्ष करणे यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होताना दिसून येतात. काही जणांना तर कुठले काम हाती घेतले तरी सतत आळस येत असतो. आपल्या काम करण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न करणे आवश्यक ठरत असते. जर आपले रोजची दिनचर्या हे व्यवस्थित असेल तर आपण कुठले काम हे न थकता न देता व्यवस्थितपणे पार पाडू शकतो.

त्यासाठी नियमित सकाळी लवकर उठून व्यायामाचा सराव करणे, नाश्ता व्यवस्थित घेणे, दुपारचे जेवण व्यवस्थित घेणे, संध्याकाळचा नाष्टा घेणे, रात्रीचे जेवण या सर्व वेळा जर तंतोतंत पाळल्या तर आपले शरीर हे तंदुरुस्त राहू शकते. शिवाय, आपल्या शरीरासाठी जी आवश्यक ऊर्जा आहे ती  देखील व्यवस्थित प्रकारे मिळण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही देखील व्यवस्थित वाढण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्या लवकर थकवा येत नाही. आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.

परंतु, काही वेळा आपण आहाराकडे दुर्लक्ष करत असतो, त्यामुळे, व्यवस्थित पोषक घटकांचा पुरवठा आपल्या शरीराला होत नसतो. आपल्या शरीराला आवश्यक जी ऊर्जा आहे ती मिळत नसते. आणि अशा कारणामुळे आपल्याला सतत थकवा येत असतो शिवाय थकवा आल्यामुळे अंगदुखी होणे मानसिक टेन्शन येणे एक ना अनेक प्रकारचे समस्या येऊ लागतात. कुठले काम करायला गेलो तर सतत आळस येत असतो. शिवाय, कामांमध्ये मन देखील रमत नाही. तर हे नेमके असे का होते? या विषयी आपल्या माहिती असायला हवे. तर मित्रांनो आज आपण सतत आळस येणे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सतत आळस येणे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

सतत आळस येण्याचे कारण नेमकी कोणती असू शकतात ?

    मित्रांनो, बऱ्याच लोकांना काम करताना करता सतत आळस येत असतो. कुठले काम करायला घेतले तर त्यांना थकवा लवकर जाणवत असतो. तर आपल्याला सतत आळस का येऊ शकतो? शिवाय, कुठले काम करायला गेले तर लवकर थकवा का येत असतो? तसेच, आळस येणे यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात? याबद्दल आपला जाणून घ्यायला हवे.

  • आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याची अत्यंत आवश्यक असते. जर आपल्या खेळायला ऊर्जेचा पुरवठा होत नसेल तर आपण सतत आळस येऊ लागतो. जर आपण नियमित व्यायामाचा सराव करत नसेल, तर आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीराला लवकर थकवा येत असतो.
  • सकाळचा नाष्टा हा पुरेसा व्यवस्थित न घेतल्यामुळे किंवा नाश्ता न केल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला सतत आळस येण्याची समस्या निर्माण होत असते.
  • आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा पौष्टिक तत्वांचा समावेश करत नसाल, तर त्यामुळे देखील सतत आळस येणे ही समस्या निर्माण होऊ शकते.
  • आपल्याला आहारा मधून कॅल्शिअमचे प्रमाण, प्रोटीनचे प्रमाण, फायबरचे प्रमाण मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळत असते. परंतु आपल्या आहारामध्ये यांची कमतरता असल्यामुळे आपल्याला सतत थकवा येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
  • जर दिवसातून तुम्ही व्यवस्थित पुरेशी झोप येत नसेल अथवा तुम्ही झोप घेत नसाल, तर यामुळे देखील तुम्ही कोणतेही काम हाती घेतल्यावर सतत आळस येत असतो आणि लवकर थकवा जाणवत असतो.
  • तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल अथवा मानसिक टेन्शन येत असेल, तर त्यामुळे तुमच्या कामांमध्ये तुमचे मन रमत नाही आणि त्यामुळे सतत तुम्हाला आळस येण्याची समस्या येत असते.
  • आपल्या अवतीभोवती सकारात्मक विचार न करणारे म्हणजेच नकारात्मक विचार करणारे लोक असतील तर त्यांच्या नकारात्मक विचारांचा आपल्या कामावर प्रभाव पडत असतो. म्हणजेच सतत नकारात्मक विचार करण्यामुळे आपले आपल्या कामामध्ये लक्ष लागत नाही आणि त्यामुळे सतत आपला आळस येण्याची शक्यता असते व ये की लवकर जाणवत असतो.
वाचा   शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय

तर मित्रांनो, वरील सर्व प्रकारच्या कारणांमुळे आपल्या सतत आळस येत असतो, लवकर थकवा जाणवत असतो. आपल्या शरीराला आवश्यक त्या ऊर्जेचा पुरवठा न झाल्यामुळे देखील आपल्या सतत आळस येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला सतत आळस येऊ नये, यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? व यासाठी काय उपाय केले पाहिजे? त्या विषयाबद्दल देखील आपल्या जाणून घ्यायला हवे. तर आपल्याला सतत आळस येऊ नये यासाठी काय करावे? आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

सतत आळस येऊ नये, यासाठी काही उपाय :-

बऱ्याच लोकांना कोणतेही काम करायचे म्हटले तर सतत आळस येत असतो. शिवाय त्यांच्या कामांमध्ये मन न रमल्यामुळे  त्यांना लवकर थकवा देखील जाणवत असतं. तरी यासाठी काय उपाय केले पाहिजेत कशा प्रकारचे काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  1. आपण रोज सकाळी लवकर उठून नियमित व्यायामाचा सराव करायला हवा. जेणेकरून, आपल्याला शरीरासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते आणि यामुळे आपल्याला लवकर थकवा देखील येत नाही. शिवाय, कोणतेही काम हाती घेतले, तर ते न थकता आणि न आळस देता आपण पूर्णपणे करू शकतो.
  2. नियमित आपण नाष्टा करण्याची सवय ठेवायला हवी. सकाळचा नाष्टा केल्यामुळे आपल्याला आवश्यक त्या ऊर्जेचा पुरवठा होत असतो. त्यामुळे, दिवसभराची ऊर्जा आपला शरीरात टिकून राहते व आपण कुठले काम करायला गेलो तर ते सतत आळस न देता न थकता पूर्णपणे करू शकतो आणि दिवसभर फ्रेश देखील वाटू शकते.
  3. आपल्या सतत आळस येऊ नये यासाठी आपण दिवसभराहून पाणीदेखील जास्त प्रमाणात प्यायले पाहिजे. पाणी जास्त पिल्यामुळे देखील आपणास अगदी आळस येत नाही व थकवा देखील लवकर येत नाही.
  4. जर आपल्या भोवताली नकारात्मक विचारांचे लोक असतील तर त्यांच्याकडून आपण नकारात्मक विचारात घ्यायला नकोत. कारण, सतत नकारात्मक विचार केल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या कामांवर पडत असतो. त्यामुळे, आपले कामांमध्ये मन रमत नाही व त्यामुळे सतत आळस येण्याची शक्यता असते. म्हणून, आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे. जेणेकरून, आपण आपले काम हे व्यवस्थित पार पाडू शकतो व न थकता ते पूर्णपणे देखील करू शकतो.
  5. आपण कोणतेही काम हाती घेतले तर त्याबद्दल आपणास सकारात्मक भावना निर्माण झाली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. जेणेकरून आपण ते काम मन लावून ते काम करू शकतो. ज्यामुळे आपल्याला सतत आळस येत नाही थकवाही लवकर येत नाही.
  6. आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या घटकांचा पोषक तत्त्वांचा समावेश करायला हवा शिवाय आपला आहार मधून सर्व प्रकारचे विटामिन्स देखील मिळायला हवे जेणेकरून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि कुठले काम हाती घेतले तर ते न थकता न आळस देता पूर्ण करू शकतो.
  7. काम करताना आपल्याला ज्या ज्या वेळी आळस येत असेल अशा वेळी आपण थंड पाण्याचा मारा डोळ्यांवर केला पाहिजे, चेहऱ्यावर केला पाहिजे. त्यामुळे आपण आळस येत नाही.
  8. ज्यावेळी आपल्याला काम करताना आळस येत असेल तर अशावेळी काम दोन ते तीन मिनिटे थांबून दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करायला हवा त्यामुळे आपला थकवा व आळस जाऊन आपण ते काम पूर्णपणे लवकर करू शकतो.
  9. त्यामुळे तुम्हाला सतत आळस येत असेल, तर अशावेळी तुम्ही गरम कॉफी अथवा चहाचे सेवन न करता थंड कॉफी अथवा चहाचे सेवन करायला हवे. जेणेकरून, तुमचा आळस लवकर जाण्यास मदत होऊ शकते.
वाचा  सौरचूल सोलार कुकर वापरण्याचे फायदे व तोटे

तर मित्रांनो, सतत आळस येणे यामागे नेमकी कारणे कोणती असू शकतात? शिवाय,आळस आल्यामुळे आपण कोणते उपाय करू शकतो?  कशाप्रकारे काळजी घेऊ शकतो? या विषयाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला देखील काम करताना अथवा इतर वेळी आळस येत असेल, तर तुम्ही वरील प्रकारे उपाय करू शकतात.

शिवाय, तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन, विटामिन्स चा नावाचा समावेश आवर्जून करायला हवा व नियमित न चुकता नाष्टा करण्याची सवय देखील ठेवायला हवी. यामुळे, देखील पुरेशी ऊर्जा तुम्ही सगळ्याला प्राप्त होत असते. जेणेकरून तुम्हाला आळस व थकवा हा येऊ शकत नाही. शिवाय चांगला पोष्टिक आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते त्यामुळे आपल्या लवकर थकवा येऊ शकत नाही.मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here