बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

0
932
बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे
बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो बाजरी ही सगळ्यांना ठाऊक असेलच. बाजरी पासून आपण निरनिराळे पदार्थ बनवता येतात. गरिबांच्या घरातली बाजरी तर त्यांचा मुख्य आहार आहे. त्यांच्या जेवणात तर दोघं वेळेस बाजरीची भाकरी असते. बाजरी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात बाजरीचे भाकरीचा उपयोग केला, तर तुम्हाला त्याने खूप फायदे होतील. हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण भाकरी कडे बघतच नाही. काही जणांना गावाकडील बाजरीचे भाकर, झुणका, पिठले यासारख्या गोष्टी खूप आवडतात, तर काहीना तसेच लहान मुल तर, बाजरीची भाकरी बघून नाक मुरडतात. आपण मैद्याचे पदार्थ, बेकरी युक्त पदार्थ, बाहेरचे जंकफूड, उघड्यावरचे पदार्थ खातो, त्यामुळे आपल्याला किती सारे आजारांना तोंड द्यावे लागते.

आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तसेच बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला पोटातले इन्फेक्शन लवकर होतात. त्यामुळे आम्लपित्त, ऍसिडिटी, पोट गच्च असल्यासारखे वाटणे, अजीर्ण, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात बाजरी खाल्ली, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात. कारण ही पचायला हलकी असते. तसेच बाजरी ही लो-कॅलरीज असते. बाजरीच्या भाकरी खाल्ल्यामुळे, तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, खनिजे, प्रथिने, प्रोटिन्स, लोह, कॅल्शियम, विटामिन्स, फायबर तसेच आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे, गुणधर्म बाजरी मध्ये असतात. म्हणूनच गरीब लोकं तसेच शेतकरी लोक हे कित्येक आजारांपासून दूर राहतात. शहराकडील भागात बघितले, की त्यांना त्यांच्या आरोग्य विषयी समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. त्यामुळे जर त्यांनी त्यांच्या नियमात बाजरीचे उपयोग केला, तर त्यांना शारीरिक दृष्ट्या बळकटी येते. शिवाय हाडे मजबूत होतात. तर आज आपण बाजरीची भाकरी खाण्यापासून, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात ? ते आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

बाजरी व बाजरीच्या भाकरी खाल्ल्या पासून, तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात, ते आता आपण जाणून घेऊयात ! 

वाचा  स्वप्नात सोयाबीन दिसणे शुभ की अशुभ

तुमच वजन नियंत्रणात येऊ शकते :

हो बाजरी खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. हल्ली बाहेरचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अतिशय गोड पदार्थ, तसेच बैठे काम, यासारख्या गोष्टीमुळे तुमचे वजनाच्या समस्या तुम्हाला बघायला मिळतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात बाजरी व बाजरीच्या भाकरी खाल्ल्या, तर तुमचे वजन नियंत्रणात येते. कारण बाजरी खाल्ल्यामुळे त्यामधील गुणधर्म व पोषक तत्त्वे तुमच्या शरीराला मिळतात. शिवाय ती पचायला हलकी व लो कॅलरीज असते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल घटवण्याचे गुणधर्म तिच्यामध्ये असतात. त्यामुळे तुमचे वजनासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्ही गव्हाची किंवा मैद्याची चपातीच्या ऐवजी बाजरीच्या भाकरी तुमच्या आहारात खाल्ल्याने  वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळतेच, अतिरिक्त चरबी असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. 

 हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

हो, बाजरी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण बाजरीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, फायबर, तसेच लोह, खनिजे, विटॅमिन चा पुरवठा आहे. त्यामुळे आपल्या शरीरात त्याचे गुणधर्म मिळतातच, तसेच हृदयाला पुरवला जाणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाजरीमध्ये लोह असल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच बाजरी ही लो कॅलरीज असते, त्यामुळे जर तुम्ही नियमित बाजरीची भाकर तुमच्या आहारात खाल्ली, तर तुम्हाला हृदयविकाराच्या त्रासापासून वाचवता येऊ शकते. त्यामुळे रोज नियमित बाजरीची भाकर खावेत. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी बाजरीची भाकरी डॉक्टरांना विचारूनच खावीत. कारण ती उष्ण असल्यामुळे, काही जणांना जुलाब सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

खूप जणांना बाहेरचे इन्फेक्शन लवकर होते, शारीरिक समस्या लवकर होतात. त्याला कारणीभूत म्हणजे, तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीचे कमतरता होय. जर तुम्ही नियमित बाजरीची भाकरी किंवा बाजरी पासून बनवलेले पदार्थ खाल्ले, तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. कारण बाजरीमध्ये पोटॅशियम, फायबर, कॅल्शिअम, फॅटी एसिड, ओमेगा-3,  झिंक, विटामिन्स यासारखे गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास चालना मिळते. शिवाय बाजरी मधील ऊर्जा तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

वाचा  तोंड कोरडे पडणे ? यावर काही घरगुती उपाय

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो :

बाजरी खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. कारण बाजरी ही लो कॅलरीज असते. तसेच ही पचायला हलकी असते, तसेच ज्या लोकांना पोट गच्च भरल्या सारखे वाटणे, पोटात मुरडा येणे, अपचन झाल्यासारखे वाटणे, बद्धकोष्टता असल्यासारखे वाटणे, संडास साफ न होणे, यासारख्या गोष्टींवर ती फायदेशीर ठरते. कारण ती पचायला हलकी असल्यामुळे, तुमचे शरीरातील संतुलन सुरळीत राहण्यास मदत मिळते. 

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत मिळते :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण बाजरी खाल्ल्याने, तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर निघण्यास मदत मिळते. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले, तर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणे, यासारख्या गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात बाजरी, त्यापासून बनवलेले पदार्थ किंवा भाकरी खाल्ली, तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. कारण त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लो कॅलरीज्, ओमेगा-3, लोह, यासारखे गुणधर्म असल्यामुळे तुमची शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल बाहेर निघण्यास मदत मिळते व तुम्ही निरोगी राहतात. 

मधुमेही लोकांसाठी फायदेशीर ठरते :

सहसा करून मधुमेही लोकांना खूप सारे पथ्य पाळावे लागतात. कारण त्यांच्या रक्तातील साखर वाढल्यामुळे, त्यांना खूप सारे या समस्यांना तोंड द्यावे लागतात. त्यामुळे जर त्यांनी त्यांचा आहार योग्य प्रमाणात घेतला, तर त्यांना मधुमेहावर आराम मिळतो. अशासाठी जर त्यांनी नियमित त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश केला, तर त्यांना त्यांचे शरीर व त्यांचे आरोग्य सुरळीत राहण्यास मदत मिळते. कारण बाजरी मधील गुणधर्म त्यांच्या शरीराला मिळतात. शिवाय ती पचायलाही हलकी असते. त्यासाठी जर त्यांनी नियमित सकाळ-संध्याकाळ बाजरीचे पदार्थ किंवा भाकरी खाल्ली तर त्यांना फायदा होतो. 

बाळांतीन साठी फायदेशीर ठरते :

बाजरी ही बाळांतीन साठी फायदेशीर ठरते. डिलिव्हरी नंतर काही स्त्रियांना त्यांच्या अंगावरील  दुधाची कमतरता भासते, जर त्यांनी बाजरीचे पदार्थ, बाजरीच्या भाकरी खाल्ल्या, तर त्यांच्या शरीरावर लवचिकता येते. शिवाय बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळते. शिवाय तुमच्या मार्फत बाळाला ही त्याचे  विटामिन्स व ऊर्जा मिळते, व तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तसेच जर त्यांनी बाजरीचे पीठ दळून त्याची लापसी बनवून त्यांना दिली, तरीही त्यांना शरीरासाठी फायदेशीर ठरते व त्यांच्या शरीराची झीज भरून येण्यास मदत मिळते,

वाचा  गळू पिकण्यासाठी उपाय

पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी त्याचा वापर कमी प्रमाणात करावा. कारण बाजरीचे जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे, जुलाब होण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही उपयोग करताना, डॉक्टरांना ही विचारून घेऊ शकतात. 

सर्दी खोकल्याचा त्रासवर ही आराम मिळतो :

हो बाजरी ही उष्ण असते आणि तिच्या उष्णतेमुळे आपल्या शरिराला ऊर्जा मिळते. जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात बाजरी युक्त पदार्थ खाल्ले, तर तुमच्या शरीराला त्याची ऊर्जा मिळाल्यामुळे, ती कफनाशक असते. ज्या लोकांना सर्दी खोकल्याचा सारखा त्रास होत असेल, त्यांनी नियमित त्यांच्या आहारात, बाजरीचे पदार्थ खायला हवेत. बाजरीची भाकर खायला हवी. तसेच त्यांनी बाजरीची भाकर, त्यावर शुद्ध गाईचे तूप, चिमूटभर मीठ टाकून नियमित खाल्ले, तर त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. जर सर्दी झाली असेल, तर त्यांनी बाजरीचा घाटा करुन गरम-गरम पिल्याने,  छातीतील कफ वितळतो व सर्दी वर आराम मिळतो. शिवाय ती चविष्ट लागते. 

तुमचे शरीराचे सौंदर्य वाढते :

जर तुम्ही तुमच्या आहारात नेहमीच बाजरी युक्त पदार्थ खाल्ले, तर तुमचा त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावरही होतो. कारण त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कोलेस्ट्रॉल घटवण्याचे गुणधर्म, तसेच विटामिन्स, खनिजे, ओमेगा-3, लोह, मिनरल्स यासारखे गुणधर्म त्यात भरलेले असल्यामुळे, ते आपल्या शरीरासाठी सौंदर्यासाठी, तसेच केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच ही पचायला हलकी असल्यामुळे, तुम्हाला ऍसिडिटी, अपचन, अजीर्ण यासारख्या समस्या होत नाहीत. शिवाय तुमचे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला बाजरीची भाकर ही तुमच्या शरीरासाठी कोणकोणत्या प्रकारे फायदेशीर ठरते, ते सांगितले आहेतच. तसेच बाजरी ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतेच, पण तिच्यामध्ये उष्णता चे प्रमाण असल्यामुळे, ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यानी त्यांच्या आहारात, त्याचा वापर कमी प्रमाणात करावा आणि जर करावा लागला,  तर डॉक्टरांना विचारून करावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here