गर्भधारणेदरम्यान योगा

0
538
गर्भधारणेदरम्यान योगा
गर्भधारणेदरम्यान योगा

 

नमस्कार मित्रांनो. आपले शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी योगासन करणे हे खूपच उत्तम दायक ठरत असते. योगासने केल्यामुळे आपले शरीर लवचिक राहण्यास देखील मदत होत असते तसेच शरीराच्या हालचाली केल्या मुळे आपले स्वास्थ्य देखील चांगले राहते. तसेच गर्भधारणेदरम्यान योगा करणे खूपच उत्तम दायक ठरत असते. गर्भवती महिलेने जर पहिल्यापासून योगासनाची सवय ठेवलेली असेल, तर डिलिव्हरी हे नॉर्मल होण्यासाठी देखील मदत होत असते. कारण योगासनं केल्यामुळे शरीर हे ॲक्टिव्ह होण्यास मदत होत असते. ज्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल होण्यास देखील मदत होत असते. गर्भवती महिलेने गर्भावस्थेत दरम्यान योगासने करणे उचित ठरत असते.

गर्भधारणेनंतर सुरवातीपासून व्यायाम करण्याची सवय ठेवल्यामुळे पुढे जाऊन डिलेव्हरी होण्यास कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ शकत नाही. बऱ्याच गर्भवती महिला अशा असतात की ते कुठल्याही प्रकारची जास्तीत जास्त हालचाल करत नाहीत. म्हणजेच कामाच्या त्याबाबतीत अंग चोरून घेणे,काम करण्यास कंटाळा करणे, नाहीतर जागेवरच आयते बसून खाणे असे देखील करताना दिसून येत असतात. परंतु असे केल्यामुळे बसल्या बसल्या सर्व जागच्या जागेवर मिळाल्याने शरीराची कुठल्या प्रकारची हालचाल होत नाही. आणि गर्भवस्थे दरम्यान शरीराच्या हालचाली व्यवस्थित प्रकारे करणे आवश्यक ठरत असते. गर्भावस्थेत दरम्यान कुठल्या प्रकारचे योगासन केले पाहिजेत आणि कोणते योगासन केले पाहिजेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो गर्भधारणेदरम्यान योगा याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

गर्भधारणेदरम्यान व्यायाम करणे का आवश्यक ठरत असते ?

        मित्रांनो व्यायाम केल्यामुळे शरीराचे स्वास्थ्य चांगले राहते. तसेच गर्भधारणेदरम्यान योगा करणे देखील खूप आवश्यक ठरत असते. गर्भधारणेदरम्यान सुरुवातीचे दोन ते तीन महिने तरी खूप काळजी घ्यावी लागत असते. सुरुवातीचे काळामध्ये तुम्ही स्वतःला जपायला हवं. परंतु, त्यानंतर थोडं थोडं करून व्यायाम करायला सुरुवात करायला हवी. व्यायाम केल्यामुळे शरीराच्या हालचाली व्यवस्थित प्रकारे राहतात.

त्याचप्रमाणे व्यायाम केल्यामुळे गर्भवती महिलेचे आणि बाळाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. तसेच घरातील छोटी-मोठी कामे देखील गर्भवती महिलेने करणे आवश्यक ठरत असते. अवघड कामे करण्यापासून वाचले पाहिजे. घरातील छोटी-मोठी कामे म्हणजेच घरात झाडू मारणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे इत्यादींसारखे छोटी-मोठी कामे घरात केली पाहिजे. यामुळेदेखील शारीरिक हालचाली व्यवस्थित होत राहतात. गर्भधारणेदरम्यान शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतात त्याचप्रमाणे शरीरामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून येत असतात. म्हणून या साठी योगासने करणे खूप उत्तम भरत असते.                                                   

वाचा  केस दाट होण्यासाठी काय खावे

          गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांना हा उलटीचा त्रास होत असतो तसेच पोट साफ न होण्याची समस्या देखील उद्भवत असते. आणि योगासन केल्यामुळे या समस्या दूर होऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भधारणे दरम्यान जो त्रास होणार असतो तो योगासनं केल्यामुळे नाहीसा होत असतो. गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलेचे वजन हे वाढत जात असते तर हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्भवती महिलेने व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असते. गर्भवती महिलेने व्यायाम करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करणे देखील गरजेचे ठरते. हल्ली तर आता दवाखान्यात देखील गर्भवती महिलांकडून व्यायाम करून घेतले जात असतात. गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होत असते. म्हणून गर्भावस्थेत दरम्यान व्यायाम करणे आवश्यक ठरते. तर मित्रांनो गर्भधारणेदरम्यान कोणत्या प्रकारचे व्यायाम करणे उत्तम ठरते याबद्दल देखील आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

गर्भधारणेदरम्यान कोणत्या प्रकारचे योगासने करायला हवीत ? 

       मित्रांनो, गर्भधारणेदरम्यान योगासने करणे आवश्यक ठरत असते. कारण सुरवातीपासून जर तुम्ही गर्भधारणेदरम्यान योगा  करत असाल तर तुमची डिलिव्हरी ही सुखरूप आणि नॉर्मल होऊ शकते. त्याचप्रमाणे योगासने केल्यामुळे शरीर देखील ऍक्टिव्ह होत असते. गर्भवती महिला ज्या वेदना सहन करावे लागत असतात ते वेदना सहन करण्याची शक्ती देखील योगासनांमुळे प्राप्त होत असते. तर मित्रांनो,  गर्भधारणेदरम्यान कोणत्या प्रकारचे योगासने करायला हवीत हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

अनुलोम-विलोम योगासन :

     गर्भधारणेदरम्यान तुम्ही अनुलोम-विलोम हा व्यायाम करू शकतात. अनुलोम-विलोम हा व्यायाम करण्यासाठी सर्व सर्वप्रथम एक चटई टाकून घ्या. चटईवर बसायला होत नसेल तर तुम्ही एखादे  ब्लॅंकेट टाकून घ्या. आणि त्यावर रिलॅक्स मोशन मध्ये व्यवस्थित बसून घ्या. आता दोघ डोळे बंद करून घ्या. आणि एका हाताचा अंगठा उजवी नाकपुडी वर ठेवा. व दुसऱ्या म्हणजेच डाव्या नागपूरने दीर्घ श्वास आत घ्या. आता डाव्या नाकपुडीवर हाताचा दुसऱ्या बोट ठेवून उजव्या नाकपुडी वरचा अंगठा काढून त्या नाकपुडी ने आत घेतलेला श्वास हळुवारपणे बाहेर सोडा. आता त्याच प्रमाणे उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या आणि डाव्या नाकपूडीने श्वास बाहेर हळुवारपणे सोडा अशी ही क्रिया तुम्ही सतत दहा मिनिटे करावी. हा व्यायाम तुम्ही रोज केला पाहिजे. यामुळे बाळाला देखील  देखील ऑक्सिजन मिळण्यास मदत होत असते.

वाचा  तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय :

स्ट्रेचिंग करणे :

     गरोदर महिलेने शरीराच्या जेवढ्या हालचाली केल्या तेवढ्या तिच्यासाठी त्या चांगला असू शकतात. गरोदर महिलेने पहिल्यापासून व्यायाम करायची सवय ठेवली तर डिलिव्हरी सुखरूप आणि नॉर्मल पद्धतीने देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे डिलीव्हरीच्या वेळेस कुठल्या प्रकारची अडचण येऊ शकत नाही. कारण व्यायाम करण्याने शरीर हे ऍक्टिव्ह झालेले असते. गर्भधारणेदरम्यान स्ट्रेचिंग करण्याचा व्यायाम देखील करणे आवश्यक ठरत असते. यासाठी सर्वप्रथम एक टाकून त्यावर आराम आरामदायक स्थिती मध्ये बसून घ्या. नंतर दोन्ही हात हे हळुवारपणे वरती न्यावे आणि तर हातांचा गोलाकार फिरून व्यायाम करणे. असे तुम्ही दोन ते तीन मिनिटे करावे. पुन्हा खालच्या स्थितीमध्ये हळुवारपणे आणून आरामदायक स्थितीमध्ये बसावे. आता दोन्ही पाय हे समोर सरळ करून तळपायांच्या गोलाकार फिरून व्यायाम करणे. तळपाय गोलाकार फिरूवत हे दोघे पोझिशनमध्ये फिरवणे. असे तुम्ही तीन ते चार मिनिटे करू शकतात. असा व्यायाम केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन हे व्यवस्थित होत असते बऱ्याच महिलांना गरोदरपणामध्ये पायाला सूज येण्याची समस्या उद्भवत असते स्त्रेचींग करणे हा व्यायाम केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते त्यामुळे सूज येण्याची समस्या कमी होते.

बटरफ्लाय पोझिशन मधला व्यायाम करणे :

    गरोदर महिलेने बटरफ्लाय पोझिशन मध्ये देखील व्यायाम केला पाहिजे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही आसनावर  आरामदायक स्थितीमध्ये बसा. आता दोन्ही पाय हे म्हणजे दोन्ही पायांचे तळवे हे एकमेकांजवळ आणावे. आणि दोन्ही पाय हे बटरफ्लाय पोझिशन मध्ये हलवावे. बटरफ्लाय हा व्यायाम केल्यामुळे पायाचे मसल्स ताणले जातात. हा व्यायाम केल्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितरीत्या होत असते. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरीत्या होण्यासाठी हा व्यायाम करणे देखील उत्तम ठरत असते. शरीरामध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितरित्या झाल्यामुळे बाळापर्यंत देखील रक्त व्यवस्थित पोहोचत असते.

त्रिकोणासन करणे :

     गर्भधारणेदरम्यान तुम्ही त्रिकोणासन हे आसन देखील करू शकतात. त्रिकोणासन हा व्यायाम केल्यामुळे मानेचा, पाठीचा, आणि कमरेचा व्यायाम हा व्यवस्थित रित्या होत असतो. म्हणजेच हे आसन केल्यामुळे मान, पाठ आणि कंबर मजबूत होण्यास मदत होत असते. बऱ्याच महिलांना गर्भावस्थेत दरम्यान अन्नपचनाची समस्या उद्भवत असते. म्हणजेच, पचनक्रिया ही व्यवस्थित होत नसते. परिणामी, पोट देखील व्यवस्थित साफ होत नसते. त्याचप्रमाणे,गर्भवती महिलांना ॲसिडिटीचा त्रास देखील जास्त प्रमाणात उद्भवत असतो  म्हणून, त्रिकोणासन हे आसन करणे आवश्यक ठरते. हे आसन केल्यामुळे ॲसिडिटीची समस्या देखील दूर होण्यास मदत होऊ शकते

वाचा  लहान मुले सतत झोपेत दात खाणे या समस्येवर घरगुती उपाय

 त्याचप्रमाणे, पचनाची क्रिया व्यवस्थित व सुरळीत होण्यास मदत होते. गर्भावस्थेत दरम्यान  महिलांना या समस्या होत असतील त्यांनी त्रिकोणासन जरूर करून बघावे.

ध्यानधारणा करणे :

       गर्भधारणेदरम्यान ध्यानधारणा करणे हा व्यायाम देखील फार उत्तम ठरत असतो. बर्‍याच गर्भवती महिला या काहीनाकाही चिंतेत असतात तसेच काही जण तणावरहित देखील असताना दिसून येतात तर काहीजण सतत अशी चिंता करत असतात की डिलिव्हरी कशी होईल? सुखरूप तर होईल ना? वगैरे वगैरे. परंतु अशा काळात महिलांनी शांत राहणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे, तणावरहित देखील राहणे खूप आवश्यक ठरते कारण, जर तुम्ही ताण तणावात असाल तर त्याचा सरळ परिणाम हा पोटातल्या बाळावर होत असतो.म्हणून तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढे तुमचे बाळ देखील उत्तर राहील यासाठी तुम्ही ध्यानधारणा करू शकतात.

ध्यानधारणा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही चटईवर आरामदायक स्थितीत बसून घ्या त्यानंतर डोळे बंद करून घ्या. दोघही हात मांडीवर सरळ दिशेने ठेवून ओमकार स्थितीमध्ये बसावे आणि एक दीर्घ श्वास घेउन ओमकार करावा. ओमकार हा तुम्ही पाच ते दहा मिनिटे देखील करू शकतात आणि झाल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर हीट जनरेट होईपर्यंत घासावे आणि हे दोन्ही हातांचे तळवे दोघं डोळ्यांवर अलगद पणे लावावी आणि त्यानंतर डोळे हे हळुवारपणे उघडावे असे केल्याने मन एकदम शांत होते आणि जे तुमचे काही ताणतणाव, चिंता असेल ती दूर होण्यास देखील मदत होत असते. ओमकार केल्यामुळे  बाळावर देखील चांगला परिणाम होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही तणावरहित राहण्यासाठी, चिंता मुक्त राहण्यासाठी तसेच मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करणे आवश्यक ठरते.

     मित्रांनो, वरील प्रकारचे व्यायाम तुम्ही गर्भधारणेदरम्यान करू शकतात. गर्भधारणेदरम्यान योगा करण्याची जर तुम्ही सवय  ठेवली तर डिलिव्हरी हे नॉर्मल होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे,शरीर देखील लवचिक राहते आणि व्यायाम केल्यामुळे डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्याची शक्ती देखील मिळत असते. मित्रांनो वरील व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. नाहीतर व्यायाम करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कोणते व्यायाम करावे हे देखील जाणून घेणे आवश्यक ठरते. कारण, गर्भधारणेदरम्यान तुम्ही  तुम्ही व्यायाम करू शकतात की नाही?  याबद्दल डॉक्टरांना अधिक माहिती असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलेही प्रकारचे व्यायाम करू नये. 

         मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

        धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here