बाळाचे ओठ फुटणे: कारणे, लक्षणे आणि उपाय

0
1224
बाळाचे ओठ फुटणे कारणे, लक्षणे आणि उपाय
बाळाचे ओठ फुटणे कारणे, लक्षणे आणि उपाय

नमस्कार, मित्रांनो हान बाळाचा चेहरा बघितला की किती छान वाटते ! अगदी निरागस चेहरा असतो ! या चेहर्‍याकडे बघितले की आपला राग तान-तनाव कुठे निघून जातो, आपल्याला कळतच नाही. लहान मुलांचे त्यांचे बोलणे, रडणे, हसणे हे आपल्या मनाला मोहून जाते. पण लहान मुलाला काही त्रास झाला, तर त्यांचा चेहरा अगदी कोमेजून जातो. त्यांच्या चेहऱ्यावर कोमजलेला पणा हा शोभून दिसत नाही. बाळाचे ओठ फुटणे, त्यांना शारीरिक त्रास झाला, की त्यांची चिडचिड होते. सारखे रडतात.

तसेच लहान मुलांचे डोळे नाक तोंड किती छान आहे ना ! अगदी छोटेसे नाजूक, बघितल्यावर अगदी मन मोहून जातेय. काही लहान मुलांच्या अंगात सारखा ताप असतो, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतो, मग त्यांचे चेहऱ्यावर लाल पुरळ कोरडे पडणे, तोंड कोरडे पडणे, अंगावर ताप येणे, यासारख्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. आज  आपण बघणार आहोत, की लहान मुलांचे फुटतात, मग त्यावर तडे जातात, त्यातून रक्त येते, मग हे कोणत्या कारणामुळे होत असेल, हे आपल्याला समजून येत नाहीत. चला तर मग बाळाचे ओठ फुटणे हि समस्या कोणत्या कारणांनी होते ? व त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात ! 

लहान मुलांची ओठ फुटण्याची कारणे ? 

बाळाचे ओठ फुटणे याची अनेक कारणे आहेत. मग ती नेमकी कोणती ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • बदलत्या वातावरणामुळे, लहान बाळांच्या ओठांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांची ओठ फुटतात. 
  • हवेच्या प्रदूषणामुळे लहान बाळांचे ओठ फुटतात. 
  • तसेच लहान बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता आली, की त्यांची ओठ फुटतात. 
  • दीर्घकाळापासून जर बाळ आजारी असेल, अशा वेळी त्यांचा परिणाम बाळाच्या ओठांवर होतो व त्यांचे ओठांना तडे जाऊन रक्त येते. 
  • जास्त प्रमाणात औषधी सिरप दिल्यामुळे, ही त्याचा परिणाम लहान बाळावर होतो, म्हणून त्यांची ओठ फुटू शकतात. 
  • काही बाळांना जास्तीचा प्रवास केल्यामुळे, त्यांचा परिणाम व त्या हवेचा परिणाम त्यांच्या ओठांवर होतो, व त्यामुळे ओठ फुटू शकतात. 
  • तसेच सर्दी पडसे झाल्यावर, लहान मुले नाकाने श्वास न घेता व तोंडाने श्वास घेतात. त्यामुळे त्याचा परिणाम ओठांवर होऊन, ओठांवर कोरडेपणा येऊन ओठ फुटतात. 
  • काही लहान बाळ जास्त बोलतात, बडबड करतात, त्यामुळे ओठांना कोरडेपणा येतो, त्यामुळे कडक होतात, आणि त्याची पापडी निघते. 
  • तसेच काही बाळांची स्कीन हि सेन्सिटिव्ह असते. अशा वेळी त्यांना बाहेरच्या वातावरणाचा त्रास होतो, त्यामुळे ओठांना कोरडेपणा लवकर येतो, आणि त्यांचे सारखे ओठ फुटतात. 
  • हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर बाळांचे ओठ फुटतात. 
  • जर बाळाच्या अंगात ताप असेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर होतो, त्यामुळे चेहरा अगदी कोमेजुन जातो, आणि तोंड कोरडे पडून ओठ कोरडे पडतात, आणि ओठाला तडे जातात आणि ओठ फुटतात. 
  • तसेच लहान बाळाच्या शरीरात विटामिन्स ची कमतरता जाणवल्यास, त्यांचा परिणाम त्यांच्या ओठावर होतो, त्यामुळे ओठ कोरडे पडतात. 
वाचा   गर्भधारणेदरम्यान योगा

बाळाचे ओठ फुटल्यास त्यांची लक्षणे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की लहान बाळाचे ओठ कोणत्या कारणांमुळे फुटतात, आता त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात ! 

  • ज्यावेळी लहान बाळाचे ओठ फुटतात, त्याच्या अगोदर त्यांची तोंड सारखे कोरडे पडते. 
  • ते सारखे-सारखे ओठांना जिभ लावतात, आणि त्याला ओलसरपणा देतात. 
  • त्यांच्यावर त्यांना तडे जातात, पापडी निघते.
  • त्यानंतर ओठांमधुन रक्त येते.
  • तसेच त्यांच्या ओठांचा रंग हा काळसर दिसायला लागतो. 

लहान बाळाचे ओठ फुटल्यास त्यावर कोणते घरगुती उपचार करावे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला ओठ फुटण्याची कारणे व लक्षणे सांगितले, आता आपण त्यावर काही उपचार जाणून घेऊयात ! 

कोरफड चा वापर करा :

लहान मुलांचे ओठ फुटणे, ही सामान्य बाब आहे, कारण लहान मुले सारखे बडबड करतात, त्यामुळे त्यांची ओठ कोरडे पडून, फुटतात. अशा वेळी जर तुम्ही कोरफडीचा वापर केला, तर तुम्हाला त्याने अधिक फायदा होईल. पण कोरफडी कडू असते, लहान मुलं त्यांचे ओठांना लावू देत नाही, त्यांना तोंडाला कडवटपणा जाणवतो. अशा वेळी लहान मुले झोपले असताना, तुम्ही कोरफडचा गर काढून त्यांच्या ओठांचे बाहेरील बाजूला लावावा, त्याने ओठांमधील जखमा लवकर भरून निघतात, ओठांना मुलायमपणा येतो. 

गावरानी तूपाचा वापर करा :

लहान मुलांची ओठ फुटतात, अशा वेळी जर तुम्ही गावरान तूप लहान मुलांच्या ओठावर लावले, तर त्यांना लवकर फायदा होतो. ओठांना ओलसरपणा टिकून राहतो. लहान मुलांचे ओठ फुटणे, त्यातून रक्त येणे, त्याची आग होणे, यासाठी तुम्ही त्यांच्या ओठांवर दिवसातून तीन वेळा शुद्ध गावठी तुपाचा वापर करावा, त्याने त्यांच्या यासारख्या समस्या लवकर सावरतात, शिवाय ओठांवर नैसर्गिक रंग व चमकदारपणा येतो. 

पेट्रोलियम जेली चा वापर करून बघा :

पेट्रोलियम जेली ही मॉइश्चरायझर चे काम करते, त्याचा वापर केल्यामुळे लहान मुलांच्या ओठांना मुलायमपणा येतो. पेट्रोलियम जेली ही लॅनोलिन पासून बनवली जाते. त्यामुळे ओठांना एक मुलायमपणा  येतो, जर तुम्ही लहान मुलांना रात्री झोपत्यावेळी त्यांचे ओठांना पेट्रोलियम जेली लावली, तर त्यांचे ओठ हे नरम पडतील, व त्यातून रक्त येणे, कोरडे पडणे, यासारख्या समस्या वर त्यांना आराम मिळेल. 

वाचा  चामड्याच्या वस्तू वापरण्याचे फायदे

खोबरेल तेलाचा वापर करा :

लहान मुलांच्या अंगात ताप असेल, तसेच पाण्याच्या अभावामुळे, त्यांच्या शरीरात कोरडेपणा येणे, हाता पायांना तडे जाणे, ओठ कोरडे पडणे, यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी जर तुम्ही खोबरेल तेलाने लहान बाळाची मालिश केली, व खोबरेल तेल त्यांच्या ओठांना लावले, तर त्यांच्या शरीरावरील कोरडेपणा व ओठ कोरडे पडणे, या सारख्या समस्येवर त्यांना आराम मिळेल. 

लहान बाळाला भरपूर प्रमाणात पाणी प्यायला द्या :

हल्ली खेळण्याच्या नादात, लहान मुलं पाणी पिण्याचे विसरतात, त्यांना पाण्याची आठवण येत नाही, अशा वेळी तुम्ही दिवसभरात त्यांना टाईम टू टाईम पाणी प्यायला द्यावे. कारण लहान बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर त्यांना आधी डी हायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता आल्यामुळे, त्यांना ओठ कोरडे पडू शकतात. तोंड कोरडे पडते, त्यावेळी तुम्ही त्यांना दिवसभर पुरेसे पाणी प्यायला द्यावेत. 

लहान मुलांना योग्य आहार द्या :

जर तुमच्या लहान मुलांचे ओठ कोरडे पडत असल्याने, अशा वेळी त्यांच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता येणे, होय. तसेच शरीरात पाण्याची कमतरता होय. अशा वेळी तुम्ही मुलांना पुरेसे पाणी पाजायला हवे, व त्यांना योग्य पोषक आहार घ्यायला हवा, मग तो कोणता? तर तुम्ही मुलांना विटामिन सी युक्त फळे, एप्पल, बनाना, रसदार फळे, कलिंगड, पपई, संत्री-मोसंबी, यासारख्या फळांचा आहार तुम्ही त्यांना देऊ शकतात. तसेच तुम्ही लहान मुलांना भाज्यांचे सूप, किंवा काकडी, गाजर यासारखे पदार्थ त्यांना खायला द्यावेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात, रसदार फळांमधून आवश्यक ते घटक द्रव्य त्यांना मिळतील, व त्याचे ओठ कोरडे पडणे, यासारख्या समस्येवर त्यांना आराम मिळेलच. तसेच तुम्ही रोजच्यारोज लहान बाळाला दूध, त्यामध्ये थोडी हळद टाकून, ते दूध प्यायला द्यावेत. त्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की लहान बाळाचे ओठ कोणत्या कारणांमुळे फुटतात, व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत, तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही, जर तुमच्या बाळाला फरक पडत नसेलच, तर तुम्ही बालरोगतज्ञ ला दाखवू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेलच, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये, जरूर कळवावे. 

वाचा  पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध प्रभावशाली घरगुती उपाय

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here