सिझेरियन नंतर काय खावे

0
1836
सिझेरियन नंतर काय खावे
सिझेरियन नंतर काय खावे

नमस्कार, मैत्रिणींनो ज्यावेळी तुम्हाला नवीन पाहुण्याची उत्सुकता वाटते, तसेच त्याच्या पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत, आपण त्याची खूप देखभाल करतो, त्याची काळजी घेतो, त्याच्यासाठी जी नाही ते फळ खातो, व त्याला आपल्या पोटात वाढवतो. तो अनमोल क्षण आपल्याला विसरता येत नाही. आपण त्याच्या हालचालींवर ही लक्ष ठेवतो, आणि ज्यावेळी तो पाहुणा बाहेर येतो, त्यावेळी ची बेचैनी एकदम वेगळीच असते. आपल्याला असे वाटते की तो कधी बाहेर येतो, आणि मी कधी त्याला माझ्या कवेत घेऊ, तसेच डिलिव्हरी होण्याच्या भीतीने अनेक महिला घाबरतात, की कसे होईल. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, तो काळ जरी कठीण असला, तरी त्याचे मागची सुख आपल्याला मिळते. त्या काळाला सामना देण्यासाठी, आपल्याला शरीरात एनर्जी टिकून राहावे लागते. डिलिव्हरी दोन प्रकारे होते. एक नॉर्मल डिलिव्हरी आणि दुसरी सिजेरियन डिलीवरी, आज आपण बघणार आहोत, की सिझेरियन नंतर काय खावे, महिलांनी त्यांचा आहार कसा व कोणत्या प्रकारे घ्यावा ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

सिझेरियन डिलीवरी कशी होते ? 

C-section डिलिव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी च्या प्रसूतीच्या वेदना तीव्र होतात. आणि ते आपल्याला सहन होत नाही. तसेच काही अडचण आल्यास, किंवा नऊ महिने पूर्ण होऊनही, जर तुम्हाला पोटात प्रसूतीच्या कळा येत नसतील, अशा वेळी तुमची सेक्शन डिलिव्हरी ही केली जाते. तसेच सिजेरियन डिलीवरी च्या वेळेस तुम्हाला भूल देऊन, त्यावर प्रसूती करून तुमच्या पोटावर परत टाके देण्यात येतात. ज्यावेळी तुम्हाला भूल दिलेली असते. अशावेळी तुम्हाला त्याचा त्रासही होत नाही, आणि नंतर ज्यावेळी तुमची भूल उतरते, त्यावेळी तुम्हाला त्याचा त्रास जाणवतो. पण तो कमीत कमी 15 ते 20 दिवस होतो, नंतर हळू ते दुखणे व त्रास हा कमी कमी व्हायला लागतो. 

वाचा  शिरोळ्याची भाजी खाण्याचे फायदे

सिझेरियन नंतर काय खावे ? 

बऱ्याच वेळेस अनेक महिलांना शंका असतात, नॉर्मल आणि सिझेरियन मध्ये काही फरक असतो, तर त्यात खाण्यापिण्यात मध्ये काही फरक असतो का ? तर आज आपण जाणून घेणार आहोत, की सिझेरियन नंतर काय, खावे व प्यावे चला तर मग जाणून घेऊयात. 

योग्य प्रमाणात पाणी प्या :

सिझेरियन नंतर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवेत. आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात. तसेच बाळंतिणीने पाणी गरम करूनच, कोमट कोमट प्यायला हवेत. तसेच दिवसातून तुम्ही 10 ते 12 ग्लास पाणी प्यायला हवेत. त्याने तुमच्या शरीरात एनर्जी येते, तसेच जर तुम्ही ओवा ,जिरा एक यांचे पाणी कोमट करून, थंड झाल्यावर सकाळी उपाशी पोटी पिल्याने, तुम्हाला तुमच्या शरीरात भरपूर ऑंटी एक्सीडेंट गुणधर्म मिळतात. तसेच तुम्हाला गॅस, एसिडिटी व बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच या गुणधर्मामुळे तुमचे व बाळाचे आरोग्यही चांगले राहते. 

फळांचे ज्यूस पिऊ शकतात :

हो, फळांचे ज्यूस पिल्याने तुम्हाला एनर्जी मिळते. मग ते नेमके कोणते? अनेकजणांच्या शंका असतात, की फळांचे ज्यूस पिल्याने बाळाला सर्दी होते. तर होऊ खरच, पण तसे फळ आपण पाळायला हवेत. आपण आंबट फळ खाऊ नका. तसेच तुम्ही नारळाचं पाणी, संत्री चा रस, तसेच एप्पल चा ज्युस, चिकू चा ज्यूस या सारखे फळांचा ज्यूस तुम्ही पिऊ शकतात. त्याने तुम्हाला एनर्जी मिळते, व त्यातील घटक द्रव्य तुम्हाला व बाळाला ही मिळतात. 

मेथी व गुळाचे डिंकाचे लाडू खा :

हो, खरंच मेथीचे गुळाचे व डिंकाचे लाडू जर तुम्ही खाल्ले, तर तुमच्या शरीरात एनर्जी येते. मेथीच्या लाडू  सहसा करून डिलिव्हरी नंतर बाळंतिणीला फार फायद्याचे ठरते. कारण गॅसेस, ऍसिडिटी पोट साफ न होणे, समस्या होऊ शकतात. त्यासाठी मेथीचे लाडू फायदेशीर ठरतात. मेथीचे लाडू खाल्ल्याने, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही, तसेच मेथीचे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारक, शक्तीही वाढते. डिलिव्हरीनंतर बाळंतिणीची शरीराची झीज मेथीचे लाडूनी, भरून निघते. मग आता मेथीचे लाडू बनवायचे कसे, तर आपण जाणून घेणार आहोत. 

वाचा  सतत आळस येणे.

कृती:- सगळ्यात आधी तुम्हाला पाव किलो मेथी घेऊन, त्यात 500 ग्रॅम गहू घ्यायचे आहेत.  मेथी आणि गहू भाजून गिरणी मध्ये, ते दळून आणून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला शेंगदाणा तेल एक किलो, गूळ एक किलो, डिंक पाव किलो, काजू 200 ग्रॅम, बदाम 200 ग्रॅम, शिंगाडा पीठ 100 ग्रॅम, गोडंबी 100 ग्रॅम, खारीक एक किलो, खोबरे अर्धा किलो, हे तुम्हाला सगळे मिश्रण बारीक करुन, त्या मध्ये मैच करायचे आहेत, व तेल गरम करून त्यात गूळ टाकून गूळ वितळल्यावर, त्या पिठामध्ये टाकायचे आहे, व त्यांना एकजीव करून, त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. यालाच मेथीचे लाडू म्हणतात. तसेच मेथीचे लाडू खाल्ल्याने, बाळंतिणीला दूध ही चांगल्या प्रमाणात येते, व आवश्यक ते घटक द्रव्य बाळाला मिळतील. 

हिरव्या पालेभाज्यांचे सूप व हिरव्या पालेभाज्या खायला द्या :

सहसा करून डिलिव्हरी नंतर बाळंतिणीची, रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन जाते. अशा वेळी जर तुम्ही त्यांना हिरव्या पालेभाज्या खायला दिल्यात, तर त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती मिळते, व त्यांच्या शरीरात डिलिवरी च्या वेळेस गेलेल्या रक्तप्रवाह कमी भरून निघते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, झिंक व मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट पदार्थ असतात. त्यामुळे त्यांना ते त्याना मिळतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, बाळंतिणीला दूध ही चांगले येते. त्यामुळे बाळाचे आरोग्यही उत्तम राहते. 

डाळी खाऊ शकतात :

हो, डिलिव्हरी नंतर तुम्ही बाळांतीनला मुगाची डाळ, तुरीची डाळ वरण, किंवा सूप देऊ शकतात. तसेच तुम्ही मुगाचे डाळीचे धिरडे,  बनवून देऊ शकतात. मुगाची डाळही पचण्यास हलकी असते. तसेच तुम्ही  सिझेरियन झालेल्या बाळांतीनला मुगाची डाळीचे वरण व भात व त्यावर साजूक तूप टाकून दिल्याने, त्यांच्या शरीरातील झीज भरून निघण्यास मदत मिळते. 

बाजरी च्या घाटा व गव्हाच्या पिठाचा घाटा करून प्यायला द्या :

अनेक लोकांना शंका असते, की घाटा हा नेमका काय असतो? तर घाटा म्हणजे फक्त थपथपीत पातळशी लापशी होय. जर तुम्ही बाळांतीन ला बाजरीचे पीठ दळून, तेलामध्ये ते भाजून, त्यात पाणी टाकून चांगले मऊसर शिजवून घ्यावे, व त्यामध्ये एक चिमूटभर मीठ, व गुळाचा खडा घालून, प्यायला द्यावे. त्याने तिची आरोग्यही उत्तम राहते. शिवाय बाळालाही दूध पुरेसे येते. 

वाचा  कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय

तसेच गव्हाचा घाटा हा गहू हे जाडसर दळून आणायचे, मग त्यांना साजूक तुपात भाजून, त्यामध्ये गुळाचे पाणी घालून शिजवून घ्यावे, व त्यात तुम्ही काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रुट्स घालून पातळ पातळ शिजवून द्यावे, त्याने त्यांना आवश्यक ते घटक द्रव्य मिळतात. 

खारीक खोबर याचा शिरा द्या :

तुम्ही  खारीक खोबरे मिक्सर मध्ये दळून ठेवावे, व त्यात काजू , बदाम याची पुड ही टाकावी, आणि तुम्ही तुपामध्ये खोबरे आणि खारीक यांना लालसर भाजून घ्यावे, त्यानंतर गूळ टाकून, थोडे पाणी टाकून, त्यांना शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यावर  ड्रायफूट टाकून द्यावे, हा शिरा खाल्ल्याने तिच्या शरीराची झीज भरून निघते, शिवाय काजू, बदाम, खारीक, खोबरे यामधील आवश्यक विटामिन्स मिळतात, व त्यांचे आरोग्य एकदम तंदुरुस्त राहते.

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सिझेरियन झाल्यावर काय खावे, व काय प्यावे, ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका येत असतील, तर तुम्ही डॉक्टरांना ही विचारून घ्यावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here