मांड्या कमी करण्याचे उपाय

0
1235
मांड्या कमी करण्याचे उपाय
मांड्या कमी करण्याचे उपाय

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत, की मांड्या वर चरबी ही नेमकी कशाने येते ? तर मांड्यांवर चरबी ही बदलत्या जीवनशैलीमुळे, बैठेकाम केल्यामुळे, तसेच जंकफूडस, हेवी फूड खाल्ल्यामुळे, शरीरात चरबीचे प्रमाण हे वाढून जाते. त्यामुळे त्याच्या परिणाम हा मांड्यांवर ही येतो, मांड्यांवरही चरबीची होऊन जाते, अक्षरशः पॅंट ची साईज ही आपल्याला एकदम फिट बसते, कंबरचा नंबर वाढतो. मांड्यांवर चरबी जमली, की आपल्याला अक्षरशः चालायला, बसायलाही जमत नाही. उठताना बसताना त्रास होतो. तसेच मांडी घालून बसायला ही त्रास होतो. मांड्या कमी करण्यासाठी नको ते उपाय केले जाता तरी फरक पडत नाही.

हल्ली कम्प्युटरराईज दुनिया आहे. सतत आपण कम्प्युटर वर काम करतो, घरी बसून ऑनलाईन काम करतो. हल्ली कोरोना सारख्या महामारी मध्ये सुद्धा लोकांचे वजन वाढी च्या समस्या भरपूर बघावयास मिळालेल्या आहेतच. कारण त्याला इलाजच नव्हता. सगळ्यांना घरात बसून बैठे काम करावे लागत होते. त्याचा परिणाम शरीरावर स्थूलतेचा दिसून आलेला आहे. हल्ली स्त्रिया व पुरुष दोघेही सारखे दिसायला लागले आहेत. त्यांच्या मांड्यांवर चरबीचे प्रमाण वाढून आलेले आहेत. अशा वेळी मांड्यावरील चरबी कशा प्रकारे कमी करावी ? त्यावर आपण काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

मांड्यांवर चरबी कोणत्या कारणामुळे येते ? 

मांड्यांवर चरबी येण्याचे अनेक कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

 • सतत बैठे काम केल्यामुळे, मांड्यांवर चरबी जमते. 
 • तसेच ज्यांचे वजन अधिक असेल, अशा लोकांच्या मांड्यांवर चरबीचे प्रमाण बघावयास मिळते. 
 • तसेच स्त्रियांची अनियमित मासिक पाळी आल्यामुळे, त्यांचे वजन वाढीच्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. त्यामुळे चरबी वाढल्यामुळे, मांड्यांवर ही चरबी येते. 
 • तासन्तास टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप हे प्रमाण जास्त झाले, की शरीरावर चरबीचे व मांड्यांवर चरबीचे प्रमाण भरपूर प्रमाणात बघावयास मिळते. 
 • तसेच ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, तसेच थायराइड मध्ये दोन प्रकार आहेत, एक वजन कमीचा दुसरा वजन वाढीचा त्यामध्ये, वजन वाढून त्यांच्या शरीरावर व मांड्यांवर चरबी जमते. 
वाचा  चिडखोर मुलांना कसे हाताळावे

मांड्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय :

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की कोणत्या कारणांमुळे तुमच्या मांड्यांवर चरबी जमू शकते, आता आपण त्यासाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

चालायला जावे :

जर तुम्हाला मांडीवरील चरबी खरंच कमी करायची असेल, अशासाठी जर तुम्ही रोजच्या रोज चालायला गेलेत, तर तुम्हाला त्याने अधिक फायदा होईल. चालणे, हे शरीरासाठी चांगले आहे. पण हल्ली सकाळी कोण लवकर उठणार ? संध्याकाळी कोण जाणार ? त्यामुळे आपल्या शरीरात वजन वाढीच्या समस्या बघावयास मिळतात. असे करू नका, रोजच्या रोज जर तुम्ही तीन ते चार किलोमीटर चालण्याने  तुमच्या शरीरावरील तसेच मांडीवरील चरबी जाण्यास मदत मिळेल. व तुमचा शरीर बांधा, हा सुडोल होईल. 

गरम पाणी प्या :

जर तुम्हाला शरीरावरील चरबी व तसेच मांडी कमी करायचे असेल, अशा वेळी जर तुम्ही रोजच्या रोज, सकाळी उठून गरम पाणी पिले, तर त्यावर तुम्हाला फरक पडेल. 

लिंबू + मध पाणी प्यावे :

जर तुमचे वजन वाढले, तर तुमच्या मांड्यांवर ही चरबीचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी जर तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू व मध टाकून पिल्यास, तुमच्या शरीरावरील तसेच मांडीवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

पायऱ्यांचा वापर करा :

जर तुमच्या मांड्यांवर चरबी असेल, तुम्ही सतत दिवसातून चार ते पाच वेळेस पायऱ्या खाली वर चढू तर करावे. त्याने मांड्यावरील चरबी ही कमी होईल. 

तेलाची मालिश करा :

जर तुम्हाला मांड्या कमी करायची असतील, असे वेळ जर तुम्ही तिळाचा तेल व राईचे तेल यांचा वापर केलास, तर तुमच्या मांड्यांची चरबी कमी होईल. त्यासाठी तुम्हाला तिळाचे तेल किंवा राईचे तेल कोमट करून रात्री झोपतेवेळी, मांड्यांवर त्याने मालिश करावयाची आहे. त्याने नसांमधील ताण निघून, मांड्या सुडौल होण्यास मदत मिळते, व मांड्या वरील चरबी ही हळू निघून जाण्यास मदत मिळते. हा उपाय तुम्हाला तीन ते चार महिने सलग करायचा आहे. तर तुमच्या मांडीवरील चरबी कमी होईल. 

वाचा  शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

सायकल चालवत जा :

तुम्हाला जर तुमचे शरीर अगदी योग्य व बारीक हवे असेल, अशा वेळी जर तुम्ही सायकल चालवली, तर तुम्हाला लवकर फायदा मिळेल. तसेच तुमच्या मांडीवरील चरबी कमी करायची असेल, अशा वेळी तुम्ही जर रोजच्या रोज एक किलोमीटर सायकल चालवायला गेलेत, तर तुमची यासारख्या समस्या लवकरात लवकर कमी होतात. 

योग्य आहार घ्यावा :

शरीरात चरबीचे वाढते प्रमाण हे बाहेरचे जंकफ्रुट, उघड्यावरचे पदार्थ खाणे, तेलकट तुपकट पदार्थ खाणे  मैद्याचे पदार्थ खाणे, अवेळी जेवणे, झोप पुरेशी न होणे, तसेच सतत उपवास करणे, तसेच केमिकल युक्त बाहेरचे फूड्स खाणे, तसेच स्त्रियांची मासिक पाळी अनियमित येणे, यासारख्या कारणांमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण बघावयास मिळते. अशा वेळी तुम्ही जर योग्य आहार घेतलात, तर यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांचे सूप, काकडी, गाजर, बीट, पत्ताकोबी, दुधी यांचा आहार तुम्हाला घ्यावयाच्या आहेत. तसेच जेवणात ज्वारीची, नाचणीची व बाजरीची भाकरी, यांचा समावेश करायचा आहे. त्याने तुमच्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. तसेच रोजच्या रोज तुम्हाला जेवण झाल्यावर एक ग्लास ताक प्यायचे, दही चा वापर करायचा, त्याने तुमची पचनक्रिया सुरळीत होऊन, शरीर वृष्टी सुडौल होण्यास मदत मिळते. 

 रोज व्यायाम करावा :

मांड्या कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा, हा प्रश्न अनेक जणांना पडतो, चला तर मग जाणून घेऊयात, की कोणता व्यायाम करावा. 

 • तुम्ही रोजच्या रोज सूर्य नमस्कार करावा, त्याने तुमच्या पोटावरील व मांड्या वरील, हातांवरील म्हणजेच शरीरावरील चरबीचे प्रमाण कमी होते. 
 • सतत पायऱ्यांचा वापर करत राहा, चढ उतार केल्याने, मांड्या वरील चरबी कमी होते. 
 • बटरफ्लाय पोजीशन करा. 
 • धनुरासन करण्याचा प्रयत्न करा. 
 • उष्ट्रासन तसेच भुजंगासन करण्याचा प्रयत्न करा. 
 • तसेच नौकासन करू शकतात, त्याने पोटावरील व मांडवली चरबी कमी होते. 
 • तसेच पद्मासनात बसण्याचा प्रयत्न करा. 
 • भद्रासन करा. 
वाचा  बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.

टिप्पणी:- वरील दिलेले व्यायाम मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते केल्यामुळे तुमच्या मांडी वरील चरबी कमी होईल, हे व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही मोबाईलवर, नेटवर, किंवा युट्युब वर बघू शकतात. त्याप्रमाणे हे व्यायाम करावेत, त्याने तुम्हाला फरक पडेल. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मांड्यांवर चरबी आल्यास, त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, तसेच कोणते व्यायाम करावेत, हे तुम्हांला सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये, जर तुम्हाला काही  शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावेत. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here