कांद्याच्या रस चे फायदे

0
834
कांद्याच्या रस चे फायदे
कांद्याच्या रस चे फायदे

नमस्कार मित्रांनो. सौंदर्य जपणे हे कुणाला आवडत नाही बरे. आज-काल सर्वजण आपले सौंदर्य देखील चांगले असावे. आपली त्वचा सुंदर, नितळ असावी. तसेच, आपले केस घनदाट, मऊ व मुलायम असावेत असे, सर्वांनाच वाटत असते. आपले सौंदर्य जपण्यासाठी अनेक जण काही ना काही प्रयोग स्वतःवर करत असतात. तर काहीजण हे बाजारातून महागडे प्रोडक्टस घेऊन स्वतःवर त्याचा वापर करत असतात. परंतु मित्रांनो बाजारातील वस्तू ह्या तर महागडे असतात शिवाय त्याचा योग्य फायदा आपल्याला होऊ पण शकतो किंवा होऊ देखील शकत नाही. तसेच या वस्तू केमिकल रहित असतात त्यामुळे त्याचा वापर शक्यतो आपण जीवनात टाळू तेवढे आपल्यासाठी चांगले ठरू शकते. मित्रांनो, आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक काही वस्तू आहेत त्यांचे वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट आणि गुणधर्म असतात. आपल्या स्वयंपाक घरात अशा बर्‍याच वस्तू असतात की ज्यामुळे आपल्याला सौंदर्याबद्दल फायदे होऊ शकतात. अगदी स्वयंपाक घरातील मसाले देखील आपण आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, स्वयंपाक घरातील एक वस्तू म्हणजेच कांदे. कांद्याच्या रस चे फायदे भरपूर आहेत.

हो मित्रांनो आपण हि एक मंडळ ऐकलेली असेल ” एवढुसा गडू त्याले देखी देखी रडू”म्हणजेच कांदा. मित्रांनो कांदा कापताना बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यातून पाणी येत असते अर्थातच डोळ्यातून पाणी येणारच त्यामध्ये सल्फर असते. कांदे कापल्यामुळे डोळ्यातून पाणी आल्यामुळे आपले डोळे देखील स्वच्छ होण्यास मदत होत असते. कांदा हा आकाराने छोटा जरी असला तरी त्याचे अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात. आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या करत असतं तेव्हा त्यासाठी कांदा हा आवश्यक असतं. कारण कांद्यामुळे एक प्रकारे भाजीला चवच येत असते. शिवाय कांद्यामुळे भाजीचे पौष्टिकता देखील वाढू लागते. कांदा खाल्ल्यामुळे आपल्या अनेक फायदे होत असतात. मित्रांनो कांद्याचे गुणधर्म सांगायला गेले तर ते आणि प्रकारचे असतात. कांद्यामध्ये विशिष्ट प्रकारचे घटक असतात ज्यामुळे आपला शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मदत होत असते. तर मित्रांनो आज आपण कांद्याच्या रसाचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, कांद्याच्या रस चे फायदे आपला कोणत्या प्रकारचे होऊ शकतात ? तसेच कांद्याच्या रस चे फायदे आपल्याला शरीराला होऊ शकतात ? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात !

कांद्याच्या रस पिल्यामुळे होणारे फायदे :-

मित्रांनो, कांदा हा तर सर्वांनाच ठाऊक आहे. घरात कुठल्याही प्रकारची भाजी बनत असो, तर ती भाजी बनवण्यासाठी कांदा हा आवश्यक असतो. कारण एक प्रकारे कांद्यामुळे भाजीला चव देखील येते. तसेच, याशिवाय भाजीची पौष्टिकता देखील वाढण्यास मदत होत असते. तर मित्रांनो, तुम्ही जेवणासोबत जरी कांदा खात असाल, तर त्यामुळे देखील तुम्हाला अनेक फायदे होत असतात. कांद्याच्या रसामध्ये विटामिन ई आणि अजून बऱ्याच विटामिन्सचा समावेश असतो. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असते. त्याचप्रमाणे कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे देखील आपल्या शरीराला फायदा होत असतो. कांद्याचा रस हा उष्णता कमी करण्यासाठी देखील वापरला जात असतो. कांद्याचा रस हा शरीरातील उष्णता कमी करत असतो. त्यामुळे, कांद्याचा रस हे उन्हाळ्यात सेवन केल्याने अनेक फायदे आपणास होऊ शकतात. एक प्रकारे कांद्याचा रस पिल्यामुळे आपल्या पोटात होणारी जळजळ कमी होण्यास देखील मदत होत असते.

वाचा  मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय

कांद्याचा रस सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य देखील सुधारत असते. अनेक लोकांना डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचा त्रास होत असतो. तर अशा लोकांनी कांद्याच्या रसाचे सेवन करायला हवे जेणेकरून त्यांचे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होईल. एक प्रकारे कांद्याचा रस पिल्यामुळे डोळ्यांचे विकार देखील होत नाहीत. शिवाय डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होत असते. कांद्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता देखील वाढण्यास मदत होत असते. शिवाय कांद्याचे रस सेवन केल्यामुळे मन शांत राहून झोप देखील शांत लागत असते. कांद्याचे रस सेवन केल्यामुळे आपली त्वचा देखील चांगले होण्यास मदत होत असते. कांद्याचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील सर्कुलेशन देखील व्यवस्थित वाढू लागते. आणि शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. ज्या लोकांना बीपी चा त्रास होत असेल त्या लोकांनी कांद्याचे रसाचे सेवन करायला हवे किंवा कांदा चावून खाल्ला पाहिजे. जेणेकरून त्यांना बीपीचा त्रास होणार नाही. अनेक लोकांना एखादवेळेस पडल्यामुळे मार लागल्यामुळे त्या ठिकाणी सूज येत असते. आणि जर अशा वेळी तुम्ही कांद्याचा रस प्यायलात तर त्यामुळे, ज्या ठिकाणी मार लागलेला असेल तर ठिकाणची सूज कमी होण्यास मदत होत असते.

बऱ्याच वेळा काही लोकांच्या मुखातून दुर्गंध येत असतो. मुखांतून दुर्गंधी येऊ नये यासाठी देखील तुम्ही कांदा चा रसाचे सेवन करायला हवे किंवा कांदा चावून खाल्ला पाहिजे. यामुळे तुमच्या मुखातील दुर्गंध देखील जाण्यासाठी मदत होत असते. अनेकजणांना दात  दुखीची समस्या होत असते. तर अशावेळी कांद्याचा उपयोग होत असतो. कांदा चाळ खाल्ल्यामुळे दात दुखी ची समस्यादेखील कमी प्रमाणात होत असते. कारण कांद्यामध्ये बरेच घटक असतात ज्यामुळे दुखणे थांबत असते. अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भरपूर प्रकारच्या वेदना होत असतात. तर अशा वेळेस महिलांनी मासिक पाळी येण्याच्या आधी कांद्याच्या रसाचे सेवन करायला हवे त्यामुळे तुमच्या होणाऱ्या वेदना देखील कमी प्रमाणात होतील. शिवाय तुम्हाला जास्तीचा थकवा देखील येणार नाही.

तसेच कांद्याचे रसाचे सेवन केल्यामुळे अथवा जेवताना कांदा चावून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते. जर का तुम्हाला नुसतच खायला आवडत नसेल तर तुम्ही जेवताना कांदा काकडी कोशिंबीर सगळे मिक्स करून त्याचे सलाड करून खायला हवे. त्यामुळे त्याला चव देखील येईल आणि कांदा देखील खाल्ला जाईल. शिवाय जोज सलाड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू लागेल. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. तर मित्रांनो कांदा चा रसाचे सेवन केल्यामुळे अथवा कांदा चावून खाल्ल्यामुळे किती प्रकारचे फायदे आपल्या होऊ शकतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर नक्की तुम्हीदेखील कांद्याच्या रसाचे सेवन करून बघा. यामुळे तुम्हाला देखील भरपूर प्रकारचे फायदे होण्यास मदत होऊ शकेल.

वाचा    शारीरिक कसरत करण्याचे फायदे !

कांद्याचा रस केसांना लावण्याचे फायदे :-

मित्रांनो, कांद्याचा रस प्यायला ने तसेच कांदा चाळ खाल्ल्यामुळे आपला शरीरासाठी अनेक प्रकारचे फायदे होत असतात. तसेच कांद्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. कांद्याचा रस सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील सुधारते. त्याचप्रमाणे मित्रांनो कांद्याचा रस केसांना लावल्याने मुळे देखील अनेक प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात. तर कांद्याचा रस केसांना लावल्याने मुळे कोणते फायदे होऊ शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया !

  • अनेक लोकांना केस गळतीची समस्या होत असते. आपल्या केसांची गळती थांबावी यासाठी तुम्ही एक कांदा घेऊन तो स्वच्छ धुवून त्याची पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्यावा. एका वाटीमध्ये नारळाचे तेल घ्या. आणि हे तेल कोमट करून त्यामध्ये कांद्याचे रस मिक्स करून घ्या. या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांच्या मुळांचे मालिश करा. मालिश केल्यामुळे तुमच्या केसातील त्वचेचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होऊ लागते. आणि दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत हाऊ पण तुम्ही आठवड्यातून तीन-चार वेळा करू शकतात. असल्या या उपाय केल्यामुळे तुम्हाला काही दिवसातच फरक जाणून घेईल. तुमच्या केसांची गळती होणे थांबेल. शिवाय तुमचे केस देखील चांगल्या प्रकारे वाढू लागेल.
  • काही लोकांचे केस हे निस्तेज दिसत असतात. तर कांद्याचा रस हा केसांना लावल्यामुळे केसांची चमक जर गेली असेल, तर केसांना चमक देखील येऊ लागते. त्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलामध्ये कांद्याचा रस मिक्स करून ते केसांच्या मुळापासून तर खालच्या टोकांपर्यंत च्या केसांना लावायला हवे. असे केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक येऊ लागते.
  • बऱ्याच लोकांचे केसांची वाढ ही खुंटत असते. म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ चांगल्या रीतीने व्हावे असे वाटत असेल तर त्या साठी तुम्ही तुमच्या केसांना कांद्याचा रसाचा उपयोग केला पाहिजे. कांद्याचा रस केसांच्या मुळांशी लावून मसाज केल्यामुळे केसांची वाढ ही जलद रीतीने देखील होऊ लागते.
  • तसेच घरगुती पद्धतीने कांद्याचे तेल तयार करून त्याचा वापर आपण आपल्या केसांसाठी केल्यामुळे आपल्या केसांबद्दल च्या अनेक तक्रारी नाहीशा होऊ लागतो शिवाय आपली केस घनदाट मुलायम व चमकदार देखील दिसू लागतात तसेच, केसांची गळती देखील बंद होऊ शकते.
वाचा  ताक चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तर मित्रांनो, कांद्याचा रस केसांना लावल्याने एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात आपले केस अकाली पांढरे होत असतात ते देखील होणे थांबते व काळे केस येऊ लागतात. तसेच केस घनदाट मुलायम जाड होण्यासाठी देखील मदत होत असते.

कांद्याच्या रसाचे त्वचेसाठी फायदे :

कांद्याचा रस हा आपल्या शरीरासाठी बहुगुणी ठरत असतो कांद्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात तसेच कांद्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक देखील असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या त्वचेसाठी देखील फायदा होऊ शकतो. कांद्याचा रस चेहऱ्याच्या त्वचेवर लावल्यामुळे देखील आपल्या अनेक प्रकारचे फायदे होत असतात. बऱ्याच जणांना चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या येत असते. तसेच मुरमांमुळे त्वचेवर डाग देखील पडण्याची शक्यता असते. तर हे चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा उपयोग करू शकतो त्यासाठी अर्धा चमचा कांद्याचा रस व अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी चेहऱ्यावर डाग असतील त्या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित लावावे आणि 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. हा उपयोग नेहमी केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होईल. तसेच बरेच जण डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील आलेले असतात.

डोळ्याखालची काळी वर्तुळे निघून जाण्यासाठी देखील कांद्याच्या रसाचा उपयोग होत असतो. तसेच चेहर्‍यावर ज्या ठिकाणी काळे डाग सर्कल पडलेले  असतील तर त्या ठिकाणी देखील कांद्याचा रस लावल्यामुळे आपल्याला फायदे होऊ शकतात. तर मित्रांनो चेहऱ्यावर देखील कांद्याचा रस लावल्यामुळे आपल्या एक ना अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. बऱ्याच जणांच्या भुवया या विरळ होत जातात. तर चेहऱ्यावरील भुवयांचे केस घनदाट होण्यासाठी देखील आपण कांद्याच्या रसाचा उपयोग करू शकतो. तर त्यासाठी कांद्याचा रस घेऊन त्यामध्ये विटामिन ई कॅप्सूल चे दोन थेंब टाकून ते मिक्स करून भुवयांवर लावावे. असा उपाय नियमित केल्यास तुमचे चेहऱ्यावरील भुवयांचे केस दाट होण्यासाठी मदत होऊ लागेल. त्यामुळे चेहरा आकर्षित दिसू लागेल.

मित्रांनो, कांद्याच्या रस चे फायदे आपल्याला होऊ शकतात, या विषयाबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. कांद्याचा रस हा प्यायल्यामुळे तसेच कांद्याच्या रसात चा उपयोग हा केसांसाठी त्वचेसाठी केल्यामुळे बरेच फायदे आपल्याला होऊ शकतात. तसेच कांद्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म देखील आढळून येत असतात की जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा पण कळू शकतात.

 

 धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here