नाकातून घाण वास येणे

0
2481
नाकातून घाण वास येणे
नाकातून घाण वास येणे

नमस्कार मित्रांनो. आपण नेहमी आपल्या शरीराचे अवयव हे जपले पाहिजेत. आपल्या शरीरातील सर्व अवयव हे व्यवस्थित, ठणठणीत असतील तर आपले आरोग्य हे देखील उत्तम राहील. आपल्या शरीरातील पंचेंद्रिय हे खूप महत्वपूर्ण अवयव आहेत. आणि याची काळजी आपण नियमितपणे घेतली पाहिजे. शरीराच्या पंचेंद्रिया शिवाय आपण कुठलेही काम हे व्यवस्थित व सहजरीत्या करू शकत नाही. म्हणून नियमितपणे यांची योग्य ती काळजी घेणे उत्तम ठरते. त्यातलेच एक अवयव म्हणजेच नाक. नाकातून आपल्याला गंधाची जाणीव होत असते. अगदी घरात काय स्वयंपाक बनतोय, कुठल्या पदार्थ बनतोय हे देखील आपल्याला नाकाद्वारे लगेच कळत असते. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा वास घेण्याची क्रिया ही आपल्या नाका कडून होत असते.पण जर नाकातून घाण वास येत असेल तर?

आपल्याला जर सर्दी झाली तर नाका संबंधित समस्या  निर्माण होत असतात. म्हणजेच नाकातून पाणी येणे, नाक बंद होणे, म्हणजेच नाकातून श्वास न घेता येणे, त्यामुळे डोके दुखू शकते तसेच ताप येऊ शकतो यांसारख्या समस्या येतात. नाका संदर्भात एक ना अनेक समस्या या आपल्याला उद्भवत असतात. म्हणून वेळोवेळी नाका संदर्भात आपण योग्य तो उपचार घेणे आवश्यक ठरते. मित्रांनो, नाकातून घाण वास येणे ही देखील एक मोठी समस्याच असते. नाकातून घाण वास येणे याचे नेमके कारण कोणते याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, नाकातून घाण वास येणे याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

नाकातून घाण वास का येतो ?

मित्रांनो, सर्दी झाल्यामुळे आपल्या नाका संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. जसे की नाक बंद होणे या कारणामुळे नाकातून श्वास न घेता येणे, नाकातून पाणी येणे अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाऊन वेळीच काळजी घेतली तर आपण या समस्यांपासून दूर राहू शकतो. मित्रांनो नाकामध्ये एक पडदा असतो. त्याचप्रमाणे हाड देखील असते आणि या  पडद्याला किंवा हाडाला इजा झाल्यामुळे देखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नाकाच्या हाडाला किंवा पडद्याला काही इजा झाल्यास त्याला आतून सूज येत असते. त्याचप्रमाणे कालांतराने ताप देखील येऊ शकतो.तसेच जर नाकाचे हाड थोड्या प्रमाणात वाकले असेल तर त्यामुळे श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो. यालाच सायनसचा संसर्ग असे देखील म्हणतात. यामुळे घोरणे सुरू होतं. तसेच नाकातून रक्त देखील येऊ शकते. याच मुळे कानाचा त्रास देखील उद्भवू शकतो.

वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

शरीराचे अवयव हे एकमेकांना जोडल्या मुळे एकाला त्रास झाला की दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. सायनस मुळे जेव्हा नाकातून  श्वास घेतो तेव्हा कानाचा पडदा देखील ओढला जाण्याची शक्यता असते. आणि यामुळे कानातून देखील पाणी येऊ शकते अथवा कानाला बहिरेपणा देखील येऊ शकतो. म्हणून पुढे जाऊन जास्त गंभीर आजार होऊ नये यासाठीच वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घेतले तर योग्य ठरेल. तसेच सायनस पासून कर्क रोग देखील होऊ शकतो. आणि यामुळेच नाकातून घाण वास येणारा द्रव्य पदार्थ बाहेर पडू शकतो. तसेच रक्तमिश्रित द्रव पदार्थ देखील बाहेर पडत असतो. आणि यामुळे नाकातून घाण वास येतो. मित्रांनो, तुम्हाला जर अशी लक्षणं दिसून आली तर न घाबरता ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळीच उपचार घ्या.जर सायनस चा कर्क रोग असल्याचे समजले तर तो फक्त सायनस पर्यंत पसरलेला असेल तर वेळीच ऑपरेशन करून बरा करता येऊ शकतो. इतर ठिकाणी पसरण्यापासून वाचवू शकतो. म्हणून वेळीच उपचार घेणे योग्य ठरेल.

नाकातून घाण वास आल्यास काय काळजी घ्यावी ?

नाकातून जर घाण वास येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार वेळीच घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे पुढील गंभीर आजारास आळा घालता येतो. सर्दीमुळे जर तुमचे नाक बंद झाले असेल तर तुम्ही गरम पाण्यात निलगिरीचे दोन-तीन थेंब टाकून त्याची वाफ घ्या, याने नक्कीच तुमच्या नाकाला आराम मिळू शकतो. सायनस ची समस्या उद्भवली तर तुम्ही एक चमचा मधामध्ये मध्ये दोन चमचे एप्पल साइडर व्हीनेगर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण प्या. याने तुम्हाला आराम येऊ शकेल. तसेच सायनसचा त्रास हा कमी व्हावा यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकतात.

हळदीचा वापर हा जेवणामध्ये तसेच गरम पाण्यात थोडी हळद मिक्स करून अशा प्रकारे वापर केल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न देखील करावा. नियमित योग्य त्या प्रमाणात पाणी प्यावे. तसेच गरम पाणी हे वेळोवेळी प्यावे फळांचा ज्यूस आणि नारळ पाणी वेळोवेळी घ्यावे. यामुळे तुम्ही डीहायड्रेट होण्यापासून वाचू शकतात. आणि जेव्हा जास्तीत जास्त आराम करता येईल तेवढा आराम करावा. तसेच नेहमी तणाव मुक्त रहा.  जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या शरीराच्या अवयवांची काळजी घेता येईल तितकी घ्या.त्यामुळे तुमचे स्वास्थ्य देखील उत्तम राहु शकते.

वाचा  अननस याचे आपण सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व तोटे :

मित्रांनो, वरील प्रमाणे आपण नाकातून घाण वास येणे, याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार घेणे योग्य ठरेल. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली,हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here