डिलिव्हरी नंतर काय खावे?

0
3381
डिलिव्हरी नंतर काय खावे
डिलिव्हरी नंतर काय खावे

नमस्कार मित्रांनो. ज्याप्रमाणे गरोदर असताना आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने नेहमीच्या आहारामध्ये योग्य त्या पोषक घटकांचा पोषक तत्वांचा समावेश करत असतो. अगदी त्याचप्रमाणे डिलिव्हरी नंतर देखील आहारामध्ये योग्य त्या पोषक तत्त्वांचा समावेश करणे आवश्यक असते. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची व बाळाच्या आईचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते. डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेणे आवश्यक ठरते. ज्याप्रमाणे पोटामध्ये बाळ असताना त्याच्या वाढ होण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने काय खावे काय खाऊ नये याचा सल्ला घेऊनच योग्य त्या घटकांचा आहारामध्ये समावेश करत होतो, अगदी त्याचप्रमाणे डिलिव्हरी झाल्यानंतर देखील बाळाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचे ठरते. तसेच डिलिव्हरी नंतर काय खावे ? काय खाऊ नये ? याची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

ज्यामुळे बाळाला आणि आईला दोघांनाही त्रास होणार नाही. तसेच डिलिव्हरी दरम्यान बाळंतिणीला खूप त्रास झालेला असतो. त्याचप्रमाने, शरीराची देखील झीज झालेली असते तर ती झीज भरून निघण्यासाठी बाळंतिणीला डिलिव्हरी झाल्यानंतर योग्य आहार देणे खूप आवश्यक असते. बांधणीच्या आहारामध्ये योग्य त्या पोषक घटकांचा तत्त्वांचा समावेश करणे जरुरी असते. तर मित्रांनो आज आपण डिलिव्हरी झाल्यानंतर काय खावे? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग डिलिव्हरी झाल्यानंतर काय खावे? याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

डिलिव्हरी नंतर काय खावे, आहार कशाप्रकारे घेतला पाहिजे ?

डिलिव्हरी नंतर आईचे शरीर हे एकदम कमजोर झालेले असते. तसेच, डिलिव्हरी च्या काळामध्ये बाळाला जन्म देण्याचा दरम्यान खूप रक्तस्राव झालेला असतो. त्याचप्रमाणे शरीराचे देखील झालेली असते तर शरीराची झीज भरून निघावी. तसेच बाळाला देखील पुरेसे दूध मिळावे, यासाठी डिलिव्हरी झाल्यानंतर योग्यप्रकारे आहार घेणे खूप आवश्यक ठरत असते. तर डिलिव्हरी झाल्यानंतर कोणत्या प्रकारे आहार दिला पाहिजे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 •  दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारामध्ये करणे खूप आवश्यक ठरत असते. कारण दुधाने दूध वाढते असे देखील म्हटले जात असते. यासाठी बाळंतिणीला दोन टाइम दूध देणे आवश्यक ठरत असते. तसेच दुधामध्ये शतावरी कल्प दोन चमचे मिक्स करून त्याचे सेवन करायला द्यावे. असे केल्यामुळे बाळाला देखील पुरेसे प्रमाणात दूध मिळत असते म्हणजेच दुधामध्ये शतावरी कल्प टाकून घेतल्यामुळे आईचे दूध वाढण्यासाठी मदत होत असते. तसेच दूध पिल्याने आईला देखील योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळत असते.
 • बाळंतिणीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. कारण डिलिव्हरी दरम्यान बाळाला जन्म देताना  रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झालेला असतो. म्हणून आहारामध्ये पालक व मेथी या हिरव्या पाले भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. कारण ही वेळ पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि यामुळे रक्ताची कमतरता भरून निघत असते. ह्याशिवाय हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे आईचे दूध देखील वाढण्यास मदत होत असते.
 • तसेच बाळंतीणीला जर मांसाहारी पदार्थ सेवन करत असेल तर मासे,अंडी, मटन, पाया सूप यांचा समावेश देखील आराम मध्ये करावा.
 • बाळंतिणीला आहारामध्ये कडधान्यांचा समावेश आवर्जून करावा. तांदूळ, गहू, , ज्वारी व बाजरी ची भाकरी, मुगाची डाळ इत्यादींचा समावेश करणे आवश्यक ठरते.
 • तसेच बाळंतिणीला जेवण देताना नाचणीचे पापड आवर्जून खायला द्यावे.
 • तसेच नेहमीच्या आहारामध्ये योग्य त्या फळांचा समावेश जरूर करावा. कारण, फळे खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात विटामिन्स आईला व बाळाला दोघांनाही मिळत असते.
 • त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात दूध द्यावे यासाठी तुम्ही नेहमीच्या आहारामध्ये मेथीचे लाडू डिंकाचे लाडू आवर्जून द्यावी. त्यामध्ये खारीक खोबरं गुळ बादाम  डिंक इत्यादी घटकांचा समावेश असतो त्यामुळे पुढे जाऊन होणारी पाठ दुखी, कंबर दुखी यांसारखे त्रास उद्भवू शकत नाही.
 • बाळंतिणीला खसखस आणि आणि खोबरे युक्त बट्ट आवर्जून खायला द्यावे यामुळे आई व बाळ दोघांनाही शांत झोप लागत असते. तसेच हे खाल्ल्यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील होत नाही.
 • बाळंतिणीला सकाळी नाश्ता देण्यासाठी गव्हाच्या पिठाचा घाटा खाऊ घालावा आणि त्यामध्ये दोन चमचे गायीचे गावरानी तूप आवर्जून घालावे.
 • तसेच बाळंतीणीला नाश्त्यामध्ये मुगाच्या डाळीचे पराठे आवर्जून खाऊ घालावे. यामुळे अनेक पौष्टिक घटक मिळत असतात.
 • त्याचप्रमाणे बाळंतिणीला मुगदाळ युक्त खिचडी आवर्जून खाऊ घालावी यामुळे बऱ्याच प्रमाणात पौष्टिक घटक मिळत असतात.
 • डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीच्या आहारात तुपाचा समावेश नक्की करावा कारण डिलिव्हरी दरम्यान प्रचंड वात वाढलेला असतो. अशामुळे त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
 • बाळंतिणीला जेवण देताना हे गरम गरम जेवण द्यावे जेवण थंडगार देऊ नये.
 • तसेच बाळंतीणीला सुक्या, कोरड्या भाज्या खायला देऊ नयेत तर त्या पतल्या म्हणजेच पातळ युक्त असाव्यात याने दूध वाढण्यास मदत होते आणि बाळाची स्किन देखील चांगली व टवटवीत राहते.
 • हिवाळा असेल तर हिवाळा मध्ये बाजरीचा घाटा आवर्जून खाऊ घालावा.
 • त्याचप्रमाणे बाळंतपणात जास्तीत जास्त पाणी प्यावे पाणी पिताना ती थंडगार ना पिता कोमट करून प्यावे यांनी जास्त फायदा होऊ शकतो.
 • बाळंतिणीच्या आहारामध्ये फळभाज्यांचा समावेश जरूर करावा जसे की, भेंडी, गोल भेंडी, पत्ताकोबी, लाल भोपळा इत्यादी सारख्या फळ भाज्या यांचा समावेश करावा.
वाचा  दाढ काढण्यासाठी किती खर्च येतो

वरील प्रमाणे बाळंतिणीच्या आहारामध्ये योग्य त्या पोषक घटकांचा तत्त्वांचा समावेश आवर्जून करायला हवा. त्यामुळे आई आणि बाळा दोघांची तब्येत चांगली राहण्यास मदत होते तसेच बाळाला पुरेसे दूध देखील मिळते. तसेच बाळंतिणीच्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये तसेच बाळंतिणीने काय खाऊ नये, याविषयी देखील आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

 1. बाळंतिणीला आहारामध्ये तिखट व जास्त मसाले युक्त भाज्या खायला देऊ नयेत. त्यामुळे ॲसिडीटी होण्याचा त्रास होऊ शकतो. परिणामी बाळाला देखील त्रास होत असतो.
 2. बाळंतिणीला तिला बाहेरचे अन्न खाऊ देऊ नये. त्यामुळे आई व बाळाची तब्येत बिघडण्याची शक्यता असते.
 3. डिलिव्हरी झाल्यानंतर आहारामध्ये लोणची, तिखट पापड, मसाले युक्त पापडांचा समावेश करू नये. त्याऐवजी तुम्ही नागलीचे पापड देऊ शकतात.
 4. बाळंतिणीला फ्रिजमधील थंड पाणी तसेच कोल्ड्रिंक्स, शीतपेय देऊ नयेत. कारण शीतपेयांमध्ये थंड गार पिल्यामुळे आईला सर्दी होऊ शकते परिणामी बाळाला देखील सर्दी होण्याचा त्रास होऊ शकतो.
 5. डिलिव्हरी नंतर बाळंतिणीला जास्तीत जास्त गोड पदार्थ खाणे वर्ज्य करावे. तसेच, मैद युक्त पदार्थ जसे की तळलेले कचोरी, समोसे, वडापाव इत्यादींचे सेवन करण्यास टाळावे.
 6. बाळंतिणीला एकदमच मोड आलेले कडधान्य खाऊ घालू नये.

डिलिव्हरी नंतर बाळंतिणीच्या आहारामध्ये योग्य त्याच पदार्थांच्या, फळांचा, घटकांचा समावेश करावा. वरीलप्रमाणे बाळंतिणीच्या आहाराबद्दल काळजी घ्यावी. त्यामुळे बाळाला आई दोघांचे आरोग्य चांगली राहण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

   धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here