छातीत जळजळ होणे घरगुती उपाय

0
762

            नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत छातीत जळजळ होणे या वर काही घरगुती उपाय हल्ली सर्वच जण हे फास्टफूड खाण्याच्या च्या नादी लागलेले असतात. आपली आई घरात एवढे स्वादिष्ट जेवण बनवून आपल्याला देत असते तरी देखील आपले मात्र लक्ष हे बाहेरच्या जेवणावरच असते. बरेच जण हे बाहेर जाऊन फास्ट फूड खाणे पसंत करतात आणि ते अजून आवडीने खातात . परंतु मित्रांनो,या सर्व चुकीच्या सवयी असतात. नेहमी बाहेरचे जेवण केल्यामुळे सतत  फास्टफुड खाल्ल्यामुळे शरीरासाठी आवश्यक ते पोषक तत्व मिळण्यापासून आपण वंचित राहतो. शरीरासाठी जो योग्य आहार आहे जे विटामिन्स आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत ते पुरेशा प्रमाणात फास्ट फूड खाल्ल्यामुळे मिळत नाही. बऱ्याच लोकांना बाहेर जेवण करण्यात, फास्टफुड खाण्यात मजा वाटते, परंतु यामुळे अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात. कारण सतत बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे, गरम व मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये छातीमध्ये जळजळ वाढण्याचे प्रमाण देखील वाढत असते. यामुळे शरीरातील ऍसिडिटी चे प्रमाण वाढण्याची संभावना असते. आणि शरीरातील ऍसिडिटी वाढली तर अनेक त्रास होऊ शकतात. छातीत जळजळ होणे ही समस्या अनेक जणांना जाणवत असते. छातीत जळजळ होणे ही समस्या एक ना अनेक कारणांमुळे उद्‍भवत असते. आणि याविषयी आपल्याला माहित असणे गरजेचे असते. तर मित्रांनो आज आपण छातीत जळजळ का होते? आणि या साठी आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो? तसेच छातीत जळजळ होऊ नये म्हणून काय करावे? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, छातीत जळजळ होणे या विषयावर खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

छातीत जळजळ होण्याची कारणे कोणती असू शकतात?

 मित्रांनो, बऱ्याच लोकांची चुकीची जीवनशैली यामुळे अनेक समस्यांना ते सामोरे जात असतात. शिवाय अनेक जणांना बाहेरचे अन्न खाण्याची सवय झालेली असते. घरातील स्वादिष्ट पोषक तत्वांचे जेवण करणे सोडून बाहेरच अन्न खाणे ते पसंत करतात. सतत बाहेरचे अन्न खाणे, फास्टफुड खाणे,तिखट व मसालेदार पदार्थ खाणे यामुळे एक ना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत असते. यामुळे ॲसिडिटीचा त्रास हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच नेहमी छातीत जळजळ होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. छातीत जळजळ होण्याची अजून कोणती कारणे असू शकतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 • चुकीची जीवनशैली म्हणजेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे किंवा आपली झोप न होणे, अपुरी झोप होणे यामुळे ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
 • सतत गरम, तिखट आणि मसाले पदार्थांचे सेवन केल्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
 • सतत चहा पिल्यामुळे देखील छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
 • नेहमी कॉफी किंवा कोल्ड्रिंग सारखे पदार्थ सेवन केल्याने मुळे देखील ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
 • बऱ्याच लोकांचा हा धूम्रपान,मद्यपान आणि तंबाखू यांसारखे सेवन केल्या शिवाय दिवस जात नसतो. परंतु, या मुळे त्यांना नेहमी सतत ॲसिडिटीचा त्रास होत असतो. नेहमी छातीमध्ये जळजळ होत राहते आणि हे शरीरासाठी देखील हानीकारक ठरू शकते.
 • तसेच कामाच्या धावपळीमुळे अनेकांना योग्य वेळेस जेवण करणे शक्य होत नाही. तसेच जेवणाच्या वेळा योग्य न पाळल्यामुळे देखील छाती मध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढत असते.
 • अनेक लोकांना हा कामाचा ताणतणाव नेहमीच राहतो. यामुळे सतत टेंशन घेतल्यामुळे देखील ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
 • अनेक लोक हे डोकेदुखी होत असल्यास किंवा अंगदुखी होत असल्यास डॉक्टरांना न विचारता मेडिकलमध्ये जाऊन वरच्यावर गोळ्या घेत असतात. परंतु, हे अशाप्रकारे गोळ्या घेतल्यामुळे देखील छातीमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढते तसेच हे  वरचेवर गोळ्या घेणे शरीरासाठी देखील धोकादायक ठरू शकते.
 • त्याचप्रमाणे नेहमी सतत उपवास करणे, अधिक वेळ उपाशी राहणे, अवेळी जेवण करणे यामुळे देखील ऍसिडिटी चे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
वाचा  स्वप्नात फेविकॉल दिसणे शुभ की अशुभ

 मित्रांनो, वरील प्रमाणे सर्व कारणे ही ऍसिडिटी चे असू शकतात. त्यामुळे छातीमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. मित्रांनो, नियमित पणे तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल छातीमध्ये जळजळ होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेऊ शकतात. ऍसिडिटी एखाद वेळेस होत असेल तर ती काही घरगुती उपाय केल्याने देखील जाऊ शकते. तरी यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतात अथवा कशाप्रकारे काळजी घ्यावी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

ॲसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

मित्रांनो अनेक लोकांना ऍसिडिटी म्हणजे छातीत जळजळ होणे या समस्येला सामोरे जावे लागत असते. चुकीची जीवनशैली वेळी-अवेळी खाणे, जास्तीचे जेवण करणे जागरण करणे, सतत चहा पिणे, वरच्यावर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या खाणे इत्यादी सर्व कारणांमुळे शरीरातील ऍसिडिटी चे प्रमाण वाढत असते. परंतु आपण काही घरगुती उपाय करून ऍसिडिटी चे प्रमाण कमी करू शकतो यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 1. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही जेवण करतात त्यावेळी जेवण करताना अजिबात घाई करू नका म्हणजेच जेवण हे घाईघाईने करू नका जेवण करताना ते अतिशय हळुवार पद्धतीने म्हणजेच आरामात व शांततेत करावे. असे केल्यामुळे तुम्ही जो खास खात आहात तो व्यवस्थित चावला जाईल, आणि त्यामुळे अन्नाचे पचन देखील व्यवस्थित व्हायला मदत होईल. बरेच जण हे लहानपणापासून एक वाक्य ऐकले असेल ते म्हणजेच “एक घास खाताना तो 32 वेळा चावावा” असे ऐकायला गंमत वाटत असेल परंतु खरंच एक घास जेवताना तो शांततेत आणि बारीक होईपर्यंत चावला जावा यामुळे शरीरातील अन्नपचनाची क्रिया ही व्यवस्थित होत असते. आणि यामुळे तुमच्या छातीत जी जळजळ होते ती होणार नाही.
 2. छातीत जळजळ होऊ नये यासाठी नियमित आहारामध्ये जास्त तूप कट, तेलकट, तिखट, गरम आणि मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो जितके टाळता येतील तितके टाळावेत. कारण असे पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी चे प्रमाण वाढत असते. म्हणून तुम्ही हे पदार्थ शक्यतो खाणे टाळावेत.
 3. तसेच आहारामध्ये शिळे पदार्थ, पापड, लोणची खाणे टाळावेत. हे खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याचे प्रमाण वाढत असते.
 4. जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा तोंडात टाकावा आणि हा गुळाचा खडा न चावता तो तसाच चघळत रहायचा यामुळे, जेवण झाल्यानंतर पचनाची क्रिया सुलभ होण्यास मदत होते, परिणामी छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवणार नाही.
 5. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर तुम्ही नेहमी भाजलेली बडीशोप खावी. कारण जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप खाल्ल्यामुळे पचनाची क्रिया ही वाढत असते. आणि शरीरातील पाचक शक्ती वाढल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित रित्या होऊन छातीमध्ये जळजळ होत नाही.
 6. तसेच छाती मध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढले असेल तर आल्याचा तुकडा चाऊन खावा, यामुळे छातीतील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
 7. तुमच्या छातीमध्ये जळजळ होऊ नये यासाठी दिवसभरातून भरपूर पाणी पिणे आवश्यक ठरते. आणि पाणी पिल्यामुळे शरीर देखील हायड्रेट राहते.
 8. शरीरामध्ये जळजळ होत असल्यास तुळशीचे पाने चावून खावीत यामुळे छाती मधील जळजळ पणा कमी होऊ शकतो.
 9. ॲसिडिटीचा त्रास उद्भवल्यास म्हणजे छातीत जळजळ होत असल्यास एक ग्लास थंडगार दूध प्यावे याने नक्कीच आराम मिळेल आणि ऍसिडचे प्रमाण देखील कमी होईल.
 10. मित्रांनो, छातीमध्ये जळजळ होत असल्यास लिंबू पाणी पिणे शक्यतो टाळावे. कारण, लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढत असतं त्यामुळे छातीमध्ये जास्त जळजळ होऊ शकते.
 11. छातीमध्ये जळजळ होत असल्यास केळी खावी केळ खाल्ल्यामुळे देखील छाती मध्ये जळजळ होणे कमी होऊ शकते.
 12. तसेच दुधामध्ये मनुका उकळून घेतल्यावर ते तसेच थंड होऊ द्यावे आणि हे थंड दूध प्यायल्याने देखील छातीमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
 13. छाती मध्ये जळजळ होऊ नये यासाठी धूम्रपान तंबाखूचे सेवन, मद्यपान करणे शक्यतो टाळावे. बऱ्याच लोकांना याचे सेवन करण्याची सवय असते परंतु यामुळे शरीराला हानी पोचू शकते.
 14. छातीमध्ये जळजळ होत असल्यास शक्यतो मांसाहार, हरभऱ्याची डाळ, कच्चा कांदा, टोमॅटो ओले खोबरे यांसारखे पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे छातीमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढत असते.
वाचा  पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो

मित्रांनो वरील प्रमाणे, साधेसुधे घरगुती उपयोग करून तुम्ही तुमच्या शाळेतील ऍसिडिटी घालू शकतात. तसेच ॲसिडीटी होऊ नये म्हणून काय खावे आणि काय खाऊ नये हे वरील प्रमाणे आपण जाणून घेतले आहे. जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या ही जास्त प्रमाणात उद्भवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या सल्ल्याने उपचार घेऊ शकतात.

     वरील प्रमाणे, आज आपण ऍसिडिटी म्हणजे छातीत जळजळ होणे, छाती मध्ये जळजळ का होते?त्याची कारणे कोणती? तसेच त्यावर कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील? याविषयी माहिती जाणून घेतली आहे. आम्ही सांगितलेली  माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

         धन्यवाद.

किड्नी खराब होण्याची कारणे व या समस्येवर घरगुती उपाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here