काळे तीळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
1391
काळे तीळ खाण्याचे फायदे
काळे तीळ खाण्याचे फायदे

 

 

नमस्कार मित्रांनो आपले स्वास्थ्य उत्तम असेल तर आपण कुठलेही काम न थकता अगदी सहज रित्या करत असतो. तसेच आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण आपला नेहमीचा आहार यामध्ये पौष्टिक घटक सर्व प्रकारचे विटामिन्स यांचा समावेश करणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी लागणारे सर्व घटक जर आपल्याला मिळत असले तर आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असतो शिवाय आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरात अशा बर्‍याच काही गोष्टी असतात की ज्याचा आपल्या शरीराला फायदा होत असतो. मसाले पदार्थ म्हटले तर मसाला पदार्थांचा देखील आपल्या शरीराला एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात. मित्रांनो, तीळ हि सर्वांनाच ठाऊक आहे. तर बरेच जण मसाला पदार्थांमध्ये तिळाचा उपयोग करत असतात. म्हणजेच, काळे तीळ याचा. बरेच लोकं त्यांच्या मसाला पदार्थां मध्ये काळे तीळ यांचा देखील समावेश करत असतात.  काळे तीळ खाण्याचे फायदे शरीराला अनेक प्रकारचे आणि महत्वाचे असतात. तीळ ही आकाराने खूपच छोटीशी असते. परंतु या छोट्याशा तीळ हीचे मोठे मोठे फायदे आपल्याला होत असतात. अर्थातच शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तिळाचा देखील मोठा वाटा असतो.

      अनेक लोक हे काळे तीळ चाऊन खात असतात. काळे तीळ सावन खाल्ल्यामुळे त्याचे भरपूर प्रमाणात चे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तीळ मध्ये विटामिन ई चे प्रमाण चांगल्या प्रकारे असते. जे आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरत असते. तीळ खाल्ल्यामुळे आपण एक ना अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. अगदी पूर्वीचे लोक का या तिळाचा जास्तीत जास्त वापर करत असे. आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील काळया तीळला खूप महत्त्व दिले जाते. पूर्वीची लोक काळे तीळ हे नियमित जाऊन खात असत त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा हाडे दुखीचा त्रास व्हायचा नाही. काळे तीळ  रोज नियमित जाऊन खाल्ल्यामुळे आपण संधिवात या समस्येपासून देखील दूर राहू शकतो. तर मित्रांनो काळे तीळ हे सर्वांनाच ठाऊक आहे. आज आपण काळे तीळ खाण्याचे फायदे, या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग काळे तीळ खाल्ल्यामुळे कुठल्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात? तसेच, काळे तीळ हे कधी खाल्ल्याने जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

काळे तीळ खाण्याचे कोणते फायदे आपल्याला होऊ शकतात?

मित्रांनो स्वयंपाक घरात मसाले पदार्थांमध्ये काळे तीळ याचा देखील वापर होत असतो. काळे तीळ हे किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असते. मित्रांना तिळाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पांढरे तीळ व दुसरे म्हणजे काळे तीळ. तर या दोघहि प्रकारांचे देखील वेगवेगळे प्रकारचे वैशिष्ट आपण आढळत असतात. काळे तीळ चावून खाल्ल्यामुळे आपल्याला एक ना अनेक फायदे होत असतात. तर काळे तीळ चावून खाल्ल्यामुळे आपल्या कशाप्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.

वाचा  मास्क का व कसा वापरावा

संधिवाताच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होत असते.

मित्रांनो काळे तीळ चावून खाल्ल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो तसेच बऱ्याच लोकांना संधिवाताचा त्रास होत असतो. काही लोकांना लवकर त्रास होत असतो आपल्या शरीरातील हाडांचे ओईल कमी झाल्यामुळे हा त्रास लवकर होतो. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील हाडे बळकट ठेवायचे असतील शिवाय शरीरातील हाडांमध्ये ओईल व्यवस्थित राहायला हवे असे वाटत असेल तर तुम्ही सकाळी उठून नियमित काळे तीळ चावून खायला हवेत. असे तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या शरीरातील हाडे देखील बळकट होऊ लागतील शिवाय हाडांमध्ये ऑईलचे प्रमाण देखील व्यवस्थित राहू लागेल. ज्यामुळे संधिवात सारखी समस्या आपणास उद्भवणार नाही. तर नक्कीच मित्रांना तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी काळे तिळाचे सेवन करायला हवे. ज्यामुळे तुम्हाला हाडे दुखीचा त्रास देखील येणार नाही.

केसांची वाढ चांगल्या रीतीने होण्यास मदत होत असते.

मित्रांनो काळे तीळ खाल्ल्यामुळे तुमची केसां विषयीची समस्या देखील सुटू शकते. अनेक लोकांना अकाली केस पांढरे होणे केस गळती होणे केसांची वाढ खुंटणे केस निस्तेज दिसू लागणे अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. तर या समस्येपासून दूर जाण्यासाठी तुम्ही काळया तीळ चा तुमच्या आहारात समावेश करायला हवा. जर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ चांगली राहावी असे वाटत असेल, तर रोज सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम काळे तीळ एक चमचा भर नियमित चावून खायला हवी. जर तुम्ही नियमित रोज एक चमचा तीळ चावून खाल्ली तर तुमच्या केसान विषयीच्या समस्या दूर जाण्यास मदत होईल तुमचे केस हे जलद रीतीने वाढू लागतील. तसेच तुमचे केस हेमो व मुलायम देखील होण्यास मदत होईल तुमच्या केसांच्या त्वचेची पोत देखील सुधारण्यास मदत होईल. तसेच तुम्ही तिळाचे तेल केसांना लावल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होतील. त्यामुळे तुमचे अकाली केस पांढरे होणे देखील थांबेल आणि त्याजागी काळे केस येऊ लागतील तसेच तुमच्या केसांमध्ये कोंडा जमलेला असेल तर तो देखील निघून जाण्यास मदत होईल म्हणजेच तुमच्या केसांच्या अनेक समस्या जाण्यासाठी तुम्ही काळया तीळ चा उपयोग केला पाहिजे.

वाचा   कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यावर रोज एक चमचा काळे तीळ याचे सेवन करत असाल, तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकाल. तिळे मध्ये विटामिन ई चे प्रमाण चांगल्या प्रकारे असते. ज्या मुळे आपल्या शरीराला त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होत असतो. जर तुम्ही नियमित काळे तीळ खात असाल तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकेल. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होत असते.

त्वचा चांगली होण्यास मदत होत असते.

मित्रांनो जर तुम्ही काळया तिळाचे नियमितपणे सेवन करत असाल, तर तुमची त्वचा देखील सुंदर दिसू लागते. तसेच काळया तिळाचे तेल चेहऱ्यावर लावल्यामुळे देखील चेहऱ्यावर एक नैसर्गिक प्रकारे चमक येऊ लागते. शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत देखील मदत होत असते. तसेच काळे तीळ हे नियमित चाऊन खाल्ल्यामुळे, त्वचेवर होईल चे प्रमाण हे व्यवस्थित लागते शिवाय बऱ्याच लोकांना चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत असतात. तुम्ही जर नियमितकाळे तीळ चे  सेवन करत असाल, तर ही समस्या देखील तुमच्या पासून दूर राहू शकते. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्यात धुऊन चेहऱ्यावर काळा तिळाच्या तेलाने नियमित मसाज केल्यामुळे देखील चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात शिवाय लवकर सुरकुत्या देखील पडत नाही.

काळ्या तीळाचे तेल खाण्याचे फायदे

मित्रांनो, काळे तीळ चावून खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. शिवाय आपल्या हाडांसाठी जे ऑइल उपयुक्त असते ते ऑइल टिकून राहण्यासाठी देखील काळे तीळ याचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो काळे तीळ खाण्याच्या देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.

     काळे तिळाचे तेल स्वयंपाकात वापरल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदा होण्यास मदत होत असते बरेच लोक असे असतात की त्यांना डोळ्या बद्दल समस्या येत असतात. जर डोळ्यांविषयी समस्या येत असतील तर अशा लोकांनी जेवणामध्ये काळे तिळाचे तेल याचा वापर करायला पाहिजे. काळे तिळाचे तेल याचा वापर केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होत असते. तसेच काळे तिळाचे तेल जेवणात वापरल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होत असते काळे तीळ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येऊ लागते. शिवाय काळे तीळ चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग जाण्यासाठी मदत होत असते. मित्रांनो काळे तीळ चे तेल खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे वजन देखील नियंत्रित राहण्यास मदत होत असते. तसेच काळे तीळ यामध्ये लिंबूचा रस मिक्स करून त्याचे सेवन केल्यामुळे देखील आपले वजन हे नियंत्रित राहू शकते. काळे तीळ आणि लिंबाचा रस हे मिक्स करून खाल्ल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत असते. ज्यामुळे आपल्या वजन देखील नियंत्रित राहावे लागते.

वाचा  मन मोकळे करणे का गरजेचे असते ?

       तसेच, काळे तिळाचे तेल सेवन केल्यामुळे आपल्याला आपल्या हृदया विषयी देखील समस्या निर्माण होत नाहीत. म्हणजेच हृदय यासंदर्भात येणाऱ्या समस्या काळे तीळ चे तेल खाल्ल्यामुळे येत नाहीत. तसेच, काळया तिळाचे तेल खाल्ल्यामुळे पोटातील जंत देखील जात असतात. काळा तिळाचे तेल अँटिऑक्सिडंट ने भरपूर असते त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला देखील फायदा होत असतो.

      तर मित्रांनोकाळे तीळ चावून खाल्ल्याने तसेच, काळे तिळाचे तेल सेवन केल्याने आपल्याला किती प्रमाणात फायदे होऊ शकतात याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही देखील काळे तिळाचे सेवन करून बघा तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढ होईल शिवाय तुमच्या शरीराला देखील याचे अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.

         मित्रांनो,वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

    

       धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here