वास्तुशास्त्रानुसार घराचे कंपाऊंड कसे बनवावे

0
855
वास्तुशास्त्रानुसार घराचे कंपाऊंड कसे बनवावे
वास्तुशास्त्रानुसार घराचे कंपाऊंड कसे बनवावे

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचे कंपाऊंड कसे बनवावे ,वास्तुशास्त्रानुसार घर बांधकाम करताना वास्तुशास्त्रानुसार घराचे  कंपाऊंड हे देखील त्या वेळेस बांधले गेले पाहिजे.जसे आपण वास्तूचे बांधकाम करताना घरातील स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल,टॉयलेट, बाथरूम इत्यादींच्या वास्तुशास्त्रानुसार दिशा जाणून बांधकाम करत असतो. त्याच प्रमाणे घराचे कंपाऊंड देखील योग्य त्या दिशेला असायला पाहिजे. कंपाउंड वॉल म्हणजे घरातील सुरक्षा कवच होय. म्हणून घराचे कंपाऊंड वास्तुशास्त्रानुसार बांधताना योग्य त्या दिशेला बांधले पाहिजे. घरातील प्रत्येक वास्तू वास्तुशास्त्र नुसार बांधली गेलेली असेल, तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.

कंपाउंड म्हणजे आवारा पटांगण आणि या आवारात पटांगणात सभोवतालची उभी केलेली वॉल म्हणजेच कंपाउंड वॉल होय. वास्तूच्या मते सीमा भिंती किंवा कंपाऊंड भिंती बांधताना काही नियम आहेत. स्वतंत्र रहिवासी घरांमध्ये भौतिक सीमारेषा आणि दरवाजे असतात. जे संरचना स्पष्टपणे विभाजित करतात आणि निरुपयोगी  आणि अतिथींच्या प्रवेशा विरुद्ध  त्याचे  संरक्षण करतात. घरात प्रवेश करण्याआधी सर्वात मुख्य गेट म्हणजेच कंपाऊंड. आणि जर घराचे कंपाऊंड योग्य दिशेला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा देत असते. तसेच घरातील कंपाउंड साठी कोणती योग्य दिशा ठरू शकते तसेच कंपाऊंडला कोणता कलर असावा याविषयी आपन माहिती जाणून घ्यायला हवी. तर आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचे कंपाऊंड कसे बनवावे कसे असावे याविषयी माहिती जाणून घेऊया. 

वास्तुशास्त्रानुसार कंपाउंड कसे असावे

वास्तुशास्त्रामध्ये वास्तुच्या अंतर्गत रचनेला  व सजावटीला जितके महत्त्व दिले गेले आहे तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्व वास्तूच्या बहिर्गत  रचनेला पण देण्यात आलेले आहे आणि वास्तुच्या बहिर्गत अंगामध्ये ज्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो त्यांपैकी एक प्रमुख गोष्ट म्हणजे वास्तु सभोवताली बांधलेले वास्तूचे किंवा प्लॉटचे कंपाउंड वॉल!

वाचा  पोटात पाणी होण्याची कारणे आणि उपाय

सर्वसाधारणपणे वास्तू सभोवताली बांधलेले कंपाऊंड हे प्लॉटच्या सरहद्दीवर बांधले जाते पण जर का प्लॉटची सर हद्दच कमी जास्त लांबी रुंदी ची अथवा वेडीवाकडी असेल अथवा आकारात जर योग्य व प्रमाणबद्ध नसेल तर त्या प्लॉटच्या कधी अमुक एक कोपरा वाढतो तर कधी अमुक एक कोपरा कमी होतो आणि जर का अशाप्रकारे प्लॉटचा एखादा कोपरा वाढला असेल किंवा कट झालेला असेल तर अशा प्लॉटमध्ये किती जरी शास्त्रशुद्ध वास्तू बांधली तरी केवळ त्या कोपऱ्याच्या वाढीमुळे किंवा कट मुळे त्या त्या उपदेशाच्या गुणधर्मानुसार स्थिती शुभ किंवा अशुभ फळे त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला हमखास भोगावीच लागतात आणि म्हणूनच  वास्तु भोवताली प्लॉटचे कंपाउंड वॉल बांधताना संपूर्ण प्लॉट हा चौरसाकृती किंवा आयताकृती आकाराचा कसा होईल? या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागते आणि त्या प्रमाणेच संपूर्ण प्लॉट हा चौरसाकृती किंवा आयताकृती आकाराचा होईल अशा पद्धतीने प्लॉटचे कंपाउंड वॉल बांधावे लागते.

कंपाउंड वॉल चे महत्व

          “कंपाउंड म्हणजे आवारा पटांगण आणि या आवारा पटांगणात सभोवताली उभी केलेली भिंत म्हणजेच कंपाउंड वॉल होय” कंपाउंड वॉल  मुळे वास्तु भोवतालची मोकळी जागा कोणाच्या मालकीची आहे? ते सहजपणे कळू शकते. प्लॉटच्या सीमारेषेवर कंपाउंड ची निर्मिती करणे म्हणजेच मुख्य वास्तू व कंपाउंड वॉल मधील म्हणजेच आतील मोकळ्या जागेचा मालकी हक्क सांगणे होय. वास्तूच्या सिंह द्वाराला जसा उंबरठा आवश्यक असतो,तसे प्लॉटच्या सीमारेषेवर कंपाउंड वॉल आवश्यक असते. कारण कंपाउंड वॉल च्या निर्मितीमुळे बाहेरील सर्व अडीअडचणी वाईट व दृश्य- आदृश्य शक्तीचा प्लॉट मध्ये प्रवेश बंद केला जाऊ शकतो. प्लॉट मधील मुख्य वास्तूचे बांधकामसुरू करण्यापूर्वीच प्लॉटच्या सीमारेषेवर कंपाउंड वॉल ची निर्मिती करणे अतिशय फायद्याचे व लाभदायक ठरते. 

कंपाउंड वॉल संबंधित लक्षात घ्यावयाच्या बाबी

प्रत्येक जण घराचे बांधकाम करताना कंपाउंड वॉलचे देखील बांधकाम करत असतात. कंपाउंड वॉल ही घराचे संरक्षण भिंत असते. म्हणून घराची संरक्षण भिंत ही योग्य दिशेला असणे फार गरजेचे आहे. घरात येण्याचा मुख्य प्रवेश कंपाउंड वॉल च्या गेटमधून होत असतो. म्हणून कंपाउंड वॉल योग्य ठिकाणी असेल तर घरात सकारात्मकता टिकून राहते. कंपाउंड वॉल संबंधित कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घ्यायला हव्यात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • प्लॉटचा कुठलाही कोपरा जर योग्यरीत्या वाढलेला असेल किंवा कमी झालेला असेल तर सर्वप्रथम अशा वाढवू कोपर्याचा म्हणजेच भागाचा कोस काढून टाकावा आणि त्यानंतरच चौरसाकृती किंवा आयताकृती  आकाराचे कंपाउंड वॉल बांधावे.
  • कंपाउंड वॉल बांधताना कंपाउंड वॉल  ही प्लॉटमधून जाणाऱ्या चुंबकीय वृत्त समांतर होईल अशा पद्धतीने बांधावी. 
  • उत्तर आणि पूर्वेकडील भागांच्या तुलनेत एक कंपाउंड भिंत दक्षिणेकडे व पश्चिमेकडे जास्त आणि जास्त घनदाट असेल दक्षिण पश्चिम भागातील हरूकेश सूर्यकिरणांना रोखण्यासाठी आणि उत्तर पूर्व बाजूच्या उबदार किरणांना रोखण्यासाठी हे आवश्यक आहे दक्षिण पश्चिम  दिशांमध्ये कंपाउंड ची भिंत बांधली जावी.
  • दक्षिण बाजूला  कंपाऊंड गेट असू नये.
  • मुख्य प्रवेश द्वार दरवाजे नेहमी घड्याळाच्या दिशेने व आतील बाजू मध्ये उघडले पाहिजेत. 
  • मुख्य दरवाजावर शुभचिंतक चिन्हे जसे स्वस्तिक ठेवा. 
  • कंपाउंड भिंती मुख्य घरापेक्षा लंबी नसावीत कारण ती सकारात्मक ऊर्जा रोखू शकते. 
  • कंपाउंड वॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा आरसा बसवू नये. 
  • एक हौस म्हणून अनेक लोक असे करत असतात परंतु ते वास्तुशास्त्रानुसार फार चुकीचे मानले जाते.
  • कंपाऊंडमधील जागा ही नीटनेटकी व स्वच्छ ठेवावी. 
  • कंपाऊंडमध्ये कधीही थुंकू नये. कारण जेव्हा एखादी व्यक्ती थुंकत असते तेव्हा तो त्याची आत्मशक्ती बाहेर फेकत असतो त्यामुळे तुमचे हे निषिद्ध मानले गेले आहे. 
  • कंपाउंड वॉल ला तुम्ही हलका लाईट कलर देऊ शकतात परंतु चुकूनही काळा कलर देऊ नका. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते.
  • कंपाउंड वॉल मध्ये झाडे ठेवताना वास्तुशास्त्रानुसार माहिती जाणून घेऊनच ठेवावेत.
वाचा  वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा कसा असावा?

मित्रांनो, वरील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार कंपाउंड कसे असावे तसेच कंपाऊंड वॉल चे काय महत्व आहे या विषय आपण जाणून घेतले आहे. तुम्हीही घराचे बांधकाम करत असाल त्यासाठी कंपाउंड वॉल देखील बांधत असाल तर या विषयीची अजून जास्त माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही वास्तु तज्ञाचा सल्ला घेऊ शकतात. वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

वास्तूदोष म्हणजे नेमके काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here