जेवण न जाण्याची कारणे व उपाय

0
3251
जेवण न जाण्याची कारणे व उपाय
जेवण न जाण्याची कारणे व उपाय

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात लोकांचे स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. तसेच, आपले स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी आपण नियमित आहार घेतला पाहिजे परंतूअति कामाच्या ताणामुळे दुर्लक्ष होत असते. कामाचा ताण तणाव इतका असतो की काही जणांना तर भूकही लागत नाही.शरीराच्या स्वास्थ्य यासाठी जेवण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना भूक लागत नाही त्यांच्या समोर कितीही स्वादिष्ट पदार्थ आणले तरी त्यांना खाण्याची इच्छा देखील उरत नाही. खरतर भूक न लागण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की व्यक्ती ताणतणाव असणे. व्यक्ती जेव्हा ताण तणावात असते, तेव्हा तिला भूक लागत नाही किंवा त्या व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्स अनियमित होतात आणि या कारणास्तव त्या व्यक्तीला भूक लागत नाही. याशिवाय काहीही जुनाट आजार असतील तर त्यांचाही परिणाम त्या व्यक्तीच्या  खाण्याचे सवयीवर होत असतो. भूक न लागने  या समस्येला  एनोरेक्सीया असे देखील म्हटले जाते. यामुळे व्यक्ती शरीराने आणि मनाने कमजोर होते.  एनोरेक्सिया या समस्ये ने व्यक्ती हा दीर्घकाळापासून बसलेला असेल तर त्या व्यक्तीचे वजन देखील कमी होते आणि हाडे कमजोर होतात जर भूक लागत नसेल, तर तुम्ही आपल्या दिनचर्येत बदल करणे गरजेचे ठरते. चला बघू जेवण न जाण्याची कारणे व उपाय मराठी मध्ये.

जेवण न जाण्याची कारणे व उपाय
जेवण न जाण्याची कारणे व उपाय

जेवण न जाण्याची कारणे कोणती

भूक न लागणे म्हणजेच काय तर जेव्हा खायची इच्छा कमी होते तेव्हा त्यास भूक न लागणे असे म्हणतात, त्यांची भूक कमी होते त्यांना शेवटचे जेवण केल्यावर किती तासानंतर देखील भूक लागल्याचे जाणवत नाही तसेच त्यांना अन्नपदार्थ पाहताच किंवा त्यांच्या विचार करताच आजारी व थकल्यासारखे देखील वाटू शकते. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही परिस्थितीत भूक कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. सततच्या किंवा दीर्घकालीन आजारपणामुळे देखील भुक कमी होऊ शकते. मग तो तीव्र डोकेदुखी आजार असेल किंवा दुसरा कुठलाही गंभीर आजार असू शकतो. तीव्र आणि दीर्घकालीन असे दोन्ही आजार भूक मंदावणे यास कारणीभूत ठरत असतात.आजार किंवा दुखापतीमुळे होणारी वेदना सुद्धा भूक कमी करण्यास कारण ठरू शकते.भूक न लागण्याची नेमकी कारणे कोणती हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • तीव्र डोकेदुखी म्हणजेच मायग्रेन.हे एक जेवण जाण्याचे कारण असू शकते, कारण वेदनेमुळे लक्ष तिकडे खेचले जाते त्या आधारित जेवण जात नाही. 
  • काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम
  •  हृदय विषयक समस्या
  •  गर्भावस्था 
  • थकवा 
  • दारू किंवा नशेच्या पदार्थांचे सेवन बंद केल्यामुळे
  •  शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या  वेदना 
वाचा  पिंपळाच्या पानाचा वापर केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

वरील विविध कारणांमुळे जेवण जात नाही.भूक दीर्घकाळ मंदवल्यास, चक्कर आल्यासारखे,मन विचलित झाल्यासारखे,अस्वस्थ वाटल्यासारखे वाटू शकते. तसेच छातीत जळजळणे, श्वास घेण्यात अडथळा येणे व तापमानातील बदल सहन न होणे इत्यादी.तसेच तोंडाची चव गेली असेल तर खायची इच्छा होत नाही. भूक लागत नाही. पण आजार लवकर बरा व्हावा, शरीराच्या सगळ्या हालचाली या पूर्ववत व्हायला हव्यात, यासाठी खाणे देखील महत्वाचे आहे. आजारपणात आलेला अशक्तपणा भरून काढायचा असल्यास, आजारपणातून उठल्यावर चौरस आहार घ्यायला हवा.पण जास्त जेवण जात नसेल किंवा भूकच लागत नसेल तर मात्र ती काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच जर भूक लागत नसेल तर त्यासाठी काहीतरी उपाय केले पाहिजेत. 

जेवण न जाण्यावर घरगुती उपाय  

मित्रांनो जेवण न जाण्याचे अनेक कारणे आहेत. एकतर अन्न पचन क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे, पोटभर पोट भरल्यासारखे  वाटणे तसेच कामाचा ताण तणाव इत्यादी कारणांमुळे जेवण जात नाही. जेवण जावे यासाठी  तुम्ही काही घरगुती उपाय करा तसेच, तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल करून बघू शकतात. तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत काय बदल केले पाहिजे खालील प्रमाणे जाणून घेऊया.

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा 

मित्रांनो वजन वाढवणारे पदार्थ खाणे ऐवजी असा आहार घ्या ज्यात पोषक पदार्थ जास्त असतील.त्याने जेवण देखील चांगले होईल. जंक फूड खाऊ नका कारण ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते म्हणून तूम्ही तुमच्या नियमित आहारात पोषक घटकांचा समावेश जेवण केलं पाहिजे.

खूप पाणी प्या

मित्रांनो जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील घाण विषारी द्रव्य बाहेर निघतात त्यामुळे पोट साफ राहते परिणामी भूक चांगली लागते तसेच पाणी हे त्याचे नदितील सुंदर करते तुम्ही दिवसातून किमान पाच ते सहा लिटर तरी पाणी प्यायला हवे.

थोड्या थोड्या वेळाने खात राहा

मित्रांनो, तुम्ही एकाच बैठकीत पूर्ण जेवण घेणे अजित थोडा थोड्यावेळाने खाण्याचा प्रयत्न करून बघा एकच टायमाला जेवण  करण्यापेक्षा तुम्ही दिवसातून थोडे थोडे करून तीन वेळा खा त्यांनी  पचन क्रिया देखील सुधारेल.

वाचा  वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसे असावे?

जेवण सर्वांसोबत करा

असे म्हटले जाते की सर्वांसोबत खाल्ल्याने भूकही चांगली लागते आणि जेवणही चांगले होते.जर तुम्ही एकट्याने  जेवण करत असाल तर तुम्हाला जेवणही जात नाही आणि भुकही कमी लागते. तर तुम्ही सर्वांसोबत जेवण करून बघा.

आहारात फायबरचे प्रमाण कमी करा

फायबर पचण्यासाठी गरजेचे असतात. त्यामुळे ते आहारातून पूर्णपणे वर्ज्य करता येत नाहीत. पण तुम्हाला जर भूक लागण्याचे प्रमाण वाढवायचे असेल, तर आहारातील फायबरचे प्रमाण कमी केल्याने फायदा होईल. आहारात जर जास्त प्रमाणात फायबर  असेल तर त्यामुळे पोट लवकर भरते व जास्त वेळासाठी भरलेल राहते. यामुळे  वजन कमी करण्यासाठी फायबर जास्त प्रमाणात घेणे गरजेचे असते पण ते जर वाढवायचे असेल तर फायबरचे प्रमाण कमी केले पाहिजे फायबर अत्यंत कमी प्रमाणात असतात.

नाश्ता करा

मित्रांनो, जेवण एकाच वेळी होत नसते आणि जातही नाही त्यासाठी तुम्ही रोज सकाळी नाश्ता जरूर करायला हवा. प्रथिने युक्त पदार्थांचा समावेश करा सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी ऊर्जेची गरज असते म्हणून सकाळी नाश्ता करावा आणि रात्रीच्या वेळी हलकेफुलके खावे कारण त्यानंतर आपण झोपत असतो.सकाळचा नाष्टा केल्याने दिवसभर जास्त कॅलरी घटवण्यासाठी मदत होते त्यामुळे भूक लागण्याचे प्रमाण देखील वाढते

तर मित्रांनो वरील प्रमाणे  तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल करून बघा याने नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो जेवण जाण्यामुळे  तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच डॉक्टरांच्या मध्ये भूक लागत नसेल तर डाळिंब आवळा, लाभदायक असतात त्यांनी शरीराला आवश्यक अनेक पोषक द्रव्ये मिळतात शिवाय यामुळे तुमची भूक देखील वाढू शकते.

 

जेवण न गेल्यास जेवण वाढवण्यासाठी योगा करून बघा

मित्रांनो, अतिप्रमाणात ताणतणाव किंवा  सतत आजारपण त्यामुळे भूक मंदावते.डोके दुखी असो किंवा कुठलाही गंभीर आजार यामुळे देखील  जेवण जात नाही.जेवण  न जाण्याची अनेक कारणे आहेत. जेवन हे एकाच वेळी जात नसेल तर तुम्ही थोडे थोडे करून  अन्न खाऊन बघा. यामुळे देखील तुम्हाला मदत होईल तसेच तुम्ही तर रोज भरपूर पाणी यामुळे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडून पोट साफ राहण्यासाठी मदत होत असते. तसेच जेवण केल्यास जेवन वाढण्यासाठी तुम्ही काही ठराविक योगासने देखील केली पाहिजेत योगासनं केल्यामुळे तुमच्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते म्हणजेच शरीराची पचनक्रियेत वाढ होते. तुम्ही जेवण वाढवण्यासाठी योगासने करून बघा.योगा  केल्यामुळे अन्नपचन क्रिया सुधारते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत असते. योगासने केल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. योगासने केल्यामुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते. तसेच शरीरातील पाचक रस व्यवस्थित रित्या जठरामध्ये जात असते.नियमित योगासने केल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहून शरीर निरोगी बनते. मित्रानो, तुम्हाला जर जेवण जात नसेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत नियमित योगासने करावीत. 

जाणून घ्या :जेवणानंतर कोणते आसन करावे व का करावे 

वरीलप्रमाणे, आपण जेवण न जाण्याची कारणे कोणती, त्यावर कोणते उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत कोणते बदल केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकेल, या विषयाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आणि याने देखील तुम्हाला जर मदत होत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही येथे पाहू शकता. 

वाचा  वारंवार भूक लागणे या समस्येची करणे व त्याचे दुष्परिणाम

 धन्यवाद!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here