चेहऱ्यावरील चरबी ची समस्या व उपाय – How to reduce Face Fat ?

0
813
चेहऱ्यावरील चरबी च्या समस्या व उपाय - How to reduce Face Fat
चेहऱ्यावरील चरबी च्या समस्या व उपाय - How to reduce Face Fat

नमस्कार, आजची ही धावपळीचू दुनिया आहे. या मध्ये कोणाला कोणाशी बोलायला ही वेळ मिळत नाही. तसेच आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामा व्यतिरिक्त कशा कडेही लक्ष देत नाही. तसेच आपण आपल्या शरीरावर ही लक्ष देत नाही. कामाच्या धावपळीत आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या तर लांबच ठेवतो. पण आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहे, ते हि दूर ठेवतो. मग त्याच्या आभावामुळे आपल्या शरीरात फॅट्स जमा होतो. मग आपले वजन वाढते. आपण स्थूल दिसतो, आपले हात पाय जाड होतात. तसेच आपल्या चेहऱ्यावर ही चरबी जमा होते. आपले गाल हे एकदम जाड दिसतात, तसेच सुजल्यासारखे दिसतात. मग आपल्याला कुठेही बाहेर जाताना अवघडल्यासारखे वाटते. मग चेहऱ्यावरील चरबी ही कशी,व कोणत्या कारणांमुळे जमा होते ? ते बघूयात. 

कुठल्या कारणांमुळे चेहऱ्यावर फॅट्स जमा होतात ? 

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, मग आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेत नाही. याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील चरबी जमा होते. तसेच अंगावरही फॅट जमा होतो. आपण जाड दिसतो. मग ते नेमके कोण कोणत्या कारणांमुळे होतो? ते बघूयात. 

  • दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे, 
  • तेलकट, तुपकट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे, 
  • अति गोड पदार्थ खाल्ल्यामुळे, ही शरीरात फॅट जमा होतात. त्याच्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर फॅट्स जमा होतो. आपले गाल जाड दिसतात. 
  • भात जास्त खाल्ल्यामुळे ही, 
  • हिरव्या पालेभाज्या यांच्या अभावामुळे. 
  •  कडधान्य युक्त आहार न घेतल्यामुळे, 
  • चहा-कॉफीचे अति सेवन केल्यामुळे, 
  • शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे, 
  • हार्मोन इन बैलेंस, 
  • डीहायड्रेशन
वाचा  पोट साफ न होणे या समस्याची लक्षणे व घरगुती उपाय

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही उपचार- How to reduce Face Fat ?

आता आम्ही वरील दिलेल्या माहितीमध्ये, कोणत्या कारणांमुळे तुमच्या शरीरावर व चेहऱ्यावरील चरबी जमा होते, ते सांगितले आहेत. आता चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी, काही उपाय आहेत ते जाणून घेऊयात! 

स्प्राऊट युक्त आहार घ्या :

हो जर तुम्ही मटकी, चणे, हरभरे, मुग यासारख्या कडधान्यांचा तुमच्या आहारात समावेश केला, तर तुमच्या शरीरातील व चेहर्यावरील चरबी कमी होते.  कारण त्यामध्ये प्रोटीन्स कार्बोदके, विटामिन्स, मिनरल्स, मुबलक प्रमाणात असतात. जे तुमच्या शरीरासाठी फार फायद्याचे आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात या कडधान्यांचा समावेश केला, तर तुमचे वजन ही लवकर कमी होते, तसेच चेहऱ्यावरील चरबी ही कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही भिजवलेले कडधान्य उकळून, त्यात मीठ टाकून खाल्ल्याने ही तुम्हाला फायदा होईल. 

भरपूर पाणी प्या :

आपल्या शरीराला पाण्याची गरज ही भरपूर प्रमाणात असते, आपले शरीर हे 60 ते 65 टक्के पाण्याने भरलेले आहे. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता आली, तर आपल्याला, डीहायड्रेशन सारख्या समस्या होतात. जर तुम्ही योग्य रित्या पाणी पिले, तर तुमचे वजन वाढीचे समस्याही होत नाही. शिवाय चेहऱ्यावर ही चरबी जमा होत नाही. ज्यावेळी तुम्ही जेवायला बसाल, तर  जेवणाअगोदर एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. म्हणजे तुम्हाला जास्ती जेवण जाणार नाही, शिवाय तुमची पोट भरल्यासारखे वाटते, आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय तुमच्या गालावरची चरबी चढणार नाही. शरीरात पाणी जास्त प्रमाणात गेल्याने, वजन वाढीचे समस्या या भरपूर प्रमाणात दूर राहतात. 

हिरवे पालेभाज्या खा :

आजकालच्या धावपळीच्या युगात तर हिरव्या भाज्या खायला आणि निवडायला  कोणाला वेळ मिळत नाही.  पण त्या आपल्या शरीरासाठी फार जरुरी आहे. कारण हिरव्या भाज्यांमध्ये विटामिन्स, प्रथिने, कार्बोदके, लोह आणि आवश्यक ते जीवनसत्वे आहेत. जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल घटण्यास मदत करतात. ज्या वेळी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल घटते, त्यावेळी तुमच्या वजन वाढीच्या समस्या कमी होतात. त्यासाठी तुम्ही योग्य तो आहार घ्यायला हवा. जसे की तुम्ही पालक, शेपू, मेथी, यासारख्या भाज्यांमध्ये कोलेस्ट्रॉल घटवण्याचे गुण असतात. यांचा तुमच्या आहारात समावेश केला, तर तुमच्या शरीरावरील आणि गालावरील ही चरबी कमी होण्यास मदत मिळेल. 

वाचा   गावरान तूप खाण्याचे फायदे

ज्वारी नाचणीची भाकर खा :

ज्वारी, नाचणीला तृणधान्य असे म्हणतात. जर तुम्ही तुमच्या आहारात सकाळ-संध्याकाळ या तृणधान्यांच्या समावेश केला, तर तुमच्या शरीरात लो फॅट राहतो. आणि वजन वाढीचे समस्याही कमी होतात. त्याशिवाय ज्यावेळी तुमचे वजन कमी होते, तेव्हा तुमचे शरीरावरील व गालावरील चरबी कमी होते. 

नियमित व्यायाम करा :

नियमित व्यायाम करा, हा सल्ला तर सगळेच देतात. पण नियमित व्यायाम कसा करावा, की तुम्ही वॉकिंग करा, कार्डियो करा, जिमला जा, योगासने करा, तुम्ही नियमित व्यायाम केला, तर तुमच्या वजन वाढीचे आणि चेहऱ्यावरील चरबी येण्यासारख्या, समस्या लवकरात लवकर कमी होतात. 

लिंबू मध मिक्स करून प्या :

लिंबू मध्ये विटामिन सी असते. जर तुमच्या  वजनाच्या समस्या असतील, तसेच चेहऱ्यावर चरबीच्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही निंबु पाणी पिलात, तर तुमच्या वजन वाढीच्या समस्या लवकरात लवकर कमी होतात. त्यासाठी तुम्ही सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध एक ग्लास पाण्यात टाकून प्यायचे आहे. 

चेहऱ्यावरील चरबी जाण्यासाठी काही व्यायाम :

आता आम्ही तुम्हाला तुमच्या शरीरावरील आणि चेहऱ्यावरील चरबी जाण्यासाठी काही घरगुती उपचार सांगितले आहेत. तसेच आता चेहऱ्यावर चरबी असेल, यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा? हे आपल्याला माहित नसते, चला तर मग जाणून घेऊयात! 

हिरवा वेलदोडा चघळत राहा :

हिरव्या वेलदोडा मध्ये जीवनसत्व विटामिन बी  असते, जे आपल्या शरीरासाठी पाचक असतात. तसेच जर तुम्ही हिरवा वेलदोडा तोंडात टाकून चघळत राहिल्यावर, तुमच्या गालाचा व हनुवटी चा व्यायाम होतो, आणि तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

कच्ची बडीशोप खात राहा :

हो, जर तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळेस कच्ची बडीशोप ही खात राहिले, तर तुमच्या दातांचा व गालांचा व्यायाम होतो, व तुमच्या गालावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

तिळाच्या तेलाने मालिश करावे :

हो, तिळाचे तेल हे तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तिळाचे तेल हे उष्ण असते. जर तुम्ही तिळाचे तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर, गालावर, गोलाकार सर्कुलेशन पद्धतीने मसाज केला, तर तुमच्या चेहऱ्यावरील चरबी हळू कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही तिळाच्या तेलाने  रात्री  झोपतेवेळी मसाज केल्याने चेहऱ्यावरील चरबी, अतिरिक्त चरबी कमी होते. 

वाचा  छोटी-मोठी कामे केल्यानंतर धाप लागणे कारणे आणि घरगुती उपाय :-

ऊस खा :

पूर्वीच्या काळापासून लोक हे घरगुती उपायांमध्ये ऊस खायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऊस खाल्ल्याने आपल्या जबड्याचा व्यायाम होतो. ज्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर व गालावर चरबी जमा असेल, अशावेळी जर तुम्ही उस खाल्ला, तर तुमच्या चेहऱ्यावरील चरबी ही कमी होईलच, शिवाय तुम्हाला उसाचा रस ही मिळेल. किती छान आहे ना, किती सोपा उपाय आहे, करून बघा. 

घरच्या घरी मसाज करा :

 ज्यावेळी तुम्हाला वाटते की तुमच्या चेहऱ्यावर चरबी जमा झाली आहे, अशा वेळी तुम्ही घरच्या घरी मसाज करू शकतात. जर तुम्ही घरी मसाज केला, तर तुमच्या गालावरील नसांमधील रक्ताभिसरण सुरळीत होते, व चरबी कमी होण्यास मदत मिळते. मग मसाज  कशाप्रकारे करावा, तर तुम्ही एका वाटीमध्ये दूध त्यात चिमूटभर हळद मिक्स करून, तुमच्या चेहऱ्यावर व गालावर वर्तुळाकार सर्कुलेशन पद्धतीने फिरवावे. मानेपासून वरच्या हनुवटी पर्यंत, खालून वर या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर दुधाने मसाज करावा. असे तुम्ही एक ते दोन आठवडे केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील चरबी ही तुम्हाला हळू कमी होताना दिसेल. 

 गालावरील चरबी करण्यासाठी काही व्यायाम :

गालावरील चरबी कमी करण्यासाठी, आम्ही तुम्हाला काही छोटी टीप देतोय, ती करून बघा. 

  • जसे की गाल फुगवा, 
  • जोराजोराने हसा, 
  • ओठ उजव्या, डाव्या बाजूला हलवा. 
  • वरचे दात खालचे दात दोघांमध्ये एकदम घट्ट दाबून ठेवा. 
  • मान वर्तुळाकार फिरवा, 
  • मेडिटेशन करा, 
  • डोळे खालीवर फिरवा. 

असे काही साधे सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील व गालावरील चरबी कशामुळे येते, त्याची कारणे नेमकी कोणकोणती, व त्यावर कोणते उपाय योजना कराव्यात, तसेच चेहऱ्यावरील चरबी आल्यास कोणते व्यायाम करावे, तेही आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या काही घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये, जरूर कळवावे.

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here