जेवण करताना चे श्लोक तुम्हाला माहित आहेत का ?

0
9959
जेवण करताना म्हणायचे श्लोक
जेवण करताना म्हणायचे श्लोक

नमस्कार, धावपळीच्या युगात आपण आपले जेवण नीट करत नाही. आपण स्वतःची काळजी घेत नाही. अशा वेळी आपण जे खातो, ते आपल्या अंगी लागत नाही. ज्यावेळी मी इतक्या धावपळीत जेवायची त्यावेळी माझी आई मला नेहमी म्हणायची, की तुझ्या मागे कुत्रा लागला आहे का, पण त्या म्हणीचा अर्थ मला आता समजायला लागला आहे. माझी आई म्हणायची, की जेवण एकदम शांतचित्ताने करावे, आपण आपली काळजी घ्यावी, माझी आई, बाबा, आजी, लहानपणापासून मला नेहमी सांगायचे जेवण करताना मंत्र म्हणायचे.

आजी-बाबांच्या म्हणण्यानुसार,  आपण जेवण हे देवाच्या नामस्मरणाने करावे. जे आपल्याला अन्न देतात, ते परब्रम्ह असतात. त्यांच्या आशीर्वादाने आपण जे खातो, ते आपल्या अंगी लागते, आणि आपण ज्या मनाने खातो, त्याच्या मनाने ते आपल्याला फळ देते. जेवतांना नेहमी डाळ, भात, हिरवी भाजी, चपाती, काकडी आणि एखादा गोड पदार्थ, आपल्या ताटात असायला हवा. पण पूर्वी मला त्या गोष्टींचा राग यायचा, पण आता मी , स्वतः माझ्या मुलांना सांगते, की माझी आजी मला असे सांगायची, बाबा मला तसे सांगायचे. त्यावर मला आता विश्वासच बसत नाही. आता मी स्वतः तो मंत्र म्हणते, आणि माझ्या मुलांनाही म्हणवते. मग जेवण करताना म्हणायचे श्लोक कोणते, ते पहिले ते जाणून घेऊयात!

जेवण करताना कोणता मंत्र म्हणावा ? What to chant before meal :

म्हणतातच, ना अन्न हे पूर्णब्रम्ह! आपण जसे अन्नाचा मान ठेवतो, तसेच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, कृषिराजा शेतकऱ्याने अन्न हे खूप मेहनत करून पिकवलेले असते, आपण त्याचा अपमान करू नये, शांतचित्ताने ऐकावे व जेवावे, जेवण करताना शांत बसावे. टीव्ही बघू नये. कोणाशी बोलू नये. तुम्ही जसा सात्विक आहार घ्याल, तो तुमच्या अंगी लागेल. तसेच जेवण करताना आजी, बाबा , आपले पूर्वज सांगायचे की, शांतपणे बसावे, डोळे बंद करून मंत्र म्हणावा. मग तो मंत्र नेमका कोणता आहे, तो बघूयात,  

वाचा  दररोज ध्यान केल्यामुळे आपल्या शरीराला होणारे विविध फायदे :-

जेवण करताना चा मंत्र- Mantra

 वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे || सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ||

जीवन करि जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म ||उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म || 

जनीं भोजनी नाम, वाचे वदावे || अती आदरे, गद्यघोषे म्हणावे ||

हरीचिंतने अन्न, सेवित जावे || तरी श्रीहरी, पाविजेतो स्वभावे ||

जेवण करताना आधी मंत्र का म्हणावा ? Why to chant Mantra ?

अन्न हे पूर्णब्रह्म असते. आपल्या जीवनात अन्न असेल, तर आपण आहोत. मग अशा अन्नाचा अपमान करू नये. अन्नाचा एक कण मिळवण्यासाठी, शेतकरी राजाला किती कष्ट घ्यावे लागतात, हे त्यालाच माहिती आहे. मग ज्या वेळी आपण जेवायला बसतो, आणि अन्न उष्टे पाडतो, त्यावेळी त्या शेतकरी राजाचा विचार करा, की त्याने अन्नाच्या एका दाण्यासाठी किती मेहनत घेतलेली असते, आणि जेवन करताना मंत्र म्हटल्यामुळे आपण जे अन्न खातो, त्याला आपण वंदन करायला पाहिजे कारण अन्न आपल्या भारत मातेच्या पोटात पिकवले गेले असते. अन्नामुळे आपल्याला आयुष्य, आरोग्य, वृद्धि मिळते.

माझी आजी नेहमी म्हणायची की, जेवण करताना नेहमी खाली बसून जेवण करावे, जेवताना नेहमी सात्विक आहार घ्यावा, जसे की डाळ, भात, चपाती, हिरवी भाजी, कडधान्य आणि गोडाचा एक पदार्थ, हा आहे सात्विक आहार. पाटाच्या भोवती रांगोळी असावी, जेवताना कुणाशी बोलू नये, तसेच जेवताना टीव्ही बघू नये, तुम्ही जे अन्न खातात, ते एकाग्र शांतचित्ताने खावे, माझी आजी नेहमी म्हणायची, जेवताना मांडी घातल्यावर, आपल्या पोटाला ताण मिळतो, व त्यामुळे आपल्या स्नायूंना बळकटी मिळते. तसेच जेवण करताना पाणी पिऊ नये, जेवणानंतर कधीही अर्धा तासाने पाणी प्यावे, आणि जेवण झाल्यावर तीन वेळा आपण चूळ भरायला हवी, म्हणजे आपल्या दातातील जी अन्नपदार्थ असतात, ते आपल्या पोटात जातात. व दातांना कीड लागत नाही. व जेवणाच्या ताटात कधीही जास्ती उष्टे अन्न पाडू नये, जेवढे लागेल, तेवढेच घ्यावे. आणि जेवण झाल्यावर लगेच झोपू नये, शतपावली करावी.

वाचा  श्वास घेताना अंग दुखणे  - छाती, पाठ, पोट

अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी असतात. पण आपण करायला किती कंटाळा करत असतो. आता हल्लीच्या दुनियेत बघितले, तर लोक डायनिंग टेबल वर जेवायला बसतात. जेवताना त्यांचे लक्ष टीव्ही, मोबाईल वर असते, तसेच जेवणाच्या आहारात पौष्टिक आहार न घेता, तेलकट-तुपकट, मसालेदार तसेच जंक फ्रूट्स हे पदार्थ त्यांच्या ताटात असते. तसेच जेवण झाल्यावर लगेच झोपतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढीचे सारख्या समस्या त्यांना होतात. तसेच, त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते. आपण जसे वागतो, तशी आपली मुले वागतात.  म्हणून लहान  मुलांना शिकवण्याआधी, आपण या चांगल्या संस्कारांची जाणीव केली पाहिजे. अन्न ला मान दिला पाहिजे. 

जेवणानंतर काय म्हणायचे ? – What to chant after meal.

जेवणानंतर कधीही ताटात हात धुउ नयेत. आपण जर जेवणानंतर ताटात हात धुतला, तर तो आपल्या अन्नाचा अपमान असतो. तसेच ज्या वेळी आपण जेवण करून उठतो, अशावेळी ताटाला वंदन करून, विनंती करायची की, ‘हे देवा तुझ्यामुळे आज आम्हाला अन्नग्रहण मिळालेले आहेत, तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे’, ही विनंती करून खाली खाली पडलेले उष्टेअन्न ताटात घ्यावे, त्यावर पाय ठेवू नये. तो ताट उचलून किचन मध्ये ठेवावा, हा पूर्णपणे त्या अन्नाचा व आपल्या ताटाला ला मान देणे होय. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह कसे आहे, ते सांगितले आहेत. तसेच जेवणानंतर कोणता मंत्र म्हणावा, तेही सांगितलेले आहेत. तसेच जेवणानंतर काय करावयाचे, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here