केस गळती वर जास्वंदीचे फूल व त्याच्या वापर कसा करावा ? जाणून घ्या

0
1456
केस गळती वर जास्वंदीचे फूल
केस गळती वर जास्वंदीचे फूल

नमस्कार हल्लीच्या काळात सगळ्यांनाच वाटते की आपले केस छान काळेभोर, लांबसडक असावेत. पण या धावपळीच्या युगात त्यांना त्यांच्या आरोग्याकडे तसेच केसांकडे ही लक्ष देता येत नाही. त्याच्या अभावी त्यांचे केस तुटणे, केसांना फाटे फुटणे, डोक्यात कोंडा होणे , खाज खुजली येणे, अकाली केस गळणे, केस पांढरे होण्याच्या समस्येला त्यांना तोंड द्यावे लागते. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे ही केस गळतीचे समस्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत. हल्ली आपल्याला लहान मुलांचे ही केस लवकर पांढरे होताना दिसतात, तर अशावेळी मग आपण काय वापरावे ? तर केस गळती वर जास्वंदीचे फूल वापरून बघा, खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जास्वंदीचे फूल हे केसांसाठी रामबाण उपाय आहे.

हल्ली घरोघरी-दारोदारी आपल्याला जास्वंदीचे झाड बघायला मिळते. जास्वंदीची फुले ही लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी अशा कलरचे आपल्याला बघायला मिळतात. तसेच जास्वंदीची फुले गणपतीची आवडते फूल आहेत. तर मग फक्त पूजेसाठीच नव्हे, तर जास्वंदीचे फूल केसांसाठी ही फार आरोग्यदायी आहे.

केसांची निगाराखण्यासाठी तुम्ही जर जास्वंदीची फूलाचा वापर केला, तर तुमचे केस काळीभोर, लांबसडक राहतील. कारण जास्वंदीच्या फुलांमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमच्या केसांशी निगडित कोणतीही समस्या असतील, तर त्यावर तुम्हाला आराम मिळेल. तसेच जास्वंदीच्या फुलापासून तुम्ही केसांसाठी तेल व त्याचा हेअर मास्क ही बनवू शकतात. तो कशाप्रकारे बनवावा ? चला, तर मग जाणून घेऊया !

जास्वंदीच्या तेलाचे फायदे :

जास्वंदीचे तेल हे केसांसाठी खूप गुणकारी आहे. कारण जास्वंदीच्या तेलामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तसेच जास्वंदीच्या तेलात आर्यन , विटामिन सी, प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्ही केसांना जास्वंदीच्या फुलाचे तेल जर वापरले तर, तुमचे केस काळेभोर व त्यांची मुळे मजबूत होतील. तसेच केस गळतीची समस्या ही दूर होईल.

वाचा  माशाचा काटा घशात अडकल्यास काय करावे या समस्येवर विविध घरगुती उपाय ?

जास्वंदीचे तेल वापरल्याने तुमच्या डोक्यातील टाळूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यासाठी तुम्हाला जास्वंदीची तेल तयार करावे लागेल, जास्वंदीच्या फुलांच्या तेलाचा वापर तुम्ही दीर्घकाळ करू शकतात, अगदी लहानांपासून तर मोठ्यांना जास्वंदीच्या तेलाचे फायदे होतात ! तर मग आता जास्वंदीचे तेल कसे तयार करावे ? ते बघूया …

केस गळती वर जास्वंदीचे फूल चे तेल कसे तयार करावे ?

आपण जास्वंदीच्या तेलाचे फायदे आता जाणून घेतले आहेत, पण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की हे तेल नेमके बनवायचे कसे ? इंटरनेटवर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जरी याबद्दल माहिती घेतली असली, तरी पण आपल्याला हे तेल बनवताना खूप सारे अडथळे येतात. यासाठी आम्ही आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये हे कसे बनवावे ? याबद्दल माहिती देत आहोत.

चला मग तर जाणून घेऊया –

मित्रांनो जास्वंदीच्या फुलाचे तेल तयार करणे, अगदी सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला –

  1. पंधरा ते वीस जास्वंदीचे फूल तोडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
  2. त्यानंतर जास्वंदीची फुले शंभर ग्रॅम खोबरेल तेलामध्ये मंद आचेवर उकळून घ्यावे.
  3. त्यानंतर खाली उतरून त्यात वाळा +जटामासी+ आवळा पूड एकत्र करून थंड झाल्यावर एका बाटलीत भरून घ्यावे.

आता आपले जास्वंदीच्या फुलाचे तेल तयार झालेले आहे, आता तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने आपल्या केसांना लावू शकतात.  चला मग तर जाणून घेऊया, याचा वापर आपल्या केसांसाठी कसा करावा याचा आहे ते.

केस गळती वर जास्वंदीचे फूल चे तेल केसांना कसे लावावे ?

जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की जास्वंदीच्या तेलाचे आपल्या केसांसाठी भरपूर फायदे मिळायला हवे, यासाठी त्याचा वापर कसा करावा ? तर तुम्हाला जास्त काळजी करायची आवश्यकता नाही आहे. हे तेल वापरतांना फक्त काही काळजी घ्यावयाची आहे, जसे की –

आपण

  • वरील दिलेल्या पद्धतीने बनवलेले जास्वंदाच्या फुलाचे तेल केस धुवायच्या आधी 1 ते 2 तासांपूर्वी केसांना लावायचे आहे.
  • त्या तेलाने आपल्याला 15 ते 20 मिनिटे केसांची मालिश करावयाची आहे.
    खास करून जर तुम्ही जास्वंदीचे तेल रात्रीच्या वेळी झोपताना केसांना मालिश केली, तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल, यामुळे तुमच्या केसांना पोषक आहार व केस मजबूत होण्यास मदत मिळेल.
वाचा  दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

टीप  जास्वंदीचे तेल केसांना लावण्यापूर्वी एका वाटीत कोमट करून केसांना लावावे, त्याने तुम्हाला फायदा जास्त होईल.

जास्वंदीच्या फुलापासून हेअर मास्क कसा तयार करावा ?

जास्वंदीची फुले केसांसाठी फार गुणकारी तर आहेतच, तसेच त्याचे तेलही गुणकारी आहे. तसेच जास्वंदीच्या फुलांच्या हेअर मास्क ही केसांसाठी फार गुणकारी आहे. जर तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावला, तर त्याने तुमचे केस अगदी मुलायम, सॉफ्ट आणि शाईन करतील. तुमच्या डोक्यातील टाळूची आग होणे, फोड येणे, तसेच केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्या असतील, तर त्यावर तुम्हाला खूप फायदा होईल. तर मग तुम्ही जास्वंदीच्या फुलापासून हेअर मास्क कसा तयार करावा? ते बघूया !

जास्वंदीच्या फुलापासून हेअर मास्क बनवण्याची पद्धत :

हल्ली वातावरणातील बदलांमुळे, कमी वयातच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चे केस गळती च्या समस्या फार व्हायला लागल्या आहेत. वरील प्रमाणे आपण जास्वंदीचे तेल कसे करावे, ते बघितलेले आहे. तसेच जास्वंदीच्या फुलापासून व पानांपासून तुम्ही हेअर मास्क करू शकतात. तोही अगदी सोप्या साध्या पद्धतीने आहेत त्यासाठी तुम्ही –

  1. जास्वंदीची पाने आणून +जास्वंदीची फुले+ मेथीचे दाणे+ त्यात दोन चमचे दही +अर्धा नींबू यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.
  2. ती बनवलेली पेस्ट केसांना वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवा.
  3. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुऊन घ्यावेत.असे तुम्ही महिन्यातून तीन ते चार वेळेस केल्यास, तुमच्या केसांना अगदी मजबूत, मुलायमपणा, चमकदारपणा येईल. खरच नक्की करून बघा.

चला तर आज आम्ही तुम्हाला जास्वंदीच्या फुलांचे गुणधर्म, केसांसाठी त्यांचा कशा प्रकारे तुम्ही वापर करू शकतात, तसेच त्याचे तेल कसे बनवावे? ते आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे. पण जर कोणाला कशाची ऍलर्जी असेल तर जास्वंदीचे तेल वापरण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांना विचारून लावू शकतात.

तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट मध्ये जरूर कळवा. कुठलेही घरगुती उपाय वापरण्याआधी आपण आपल्या जवळच्या चिकित्सक सोबत चर्चा करूनच यांचा वापर करायला हवा.
धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here