व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्याने काय होते व उपाय काय?

0
648
व्हिटॅमिन बी 12 कमतरता झाल्याने काय होते व उपाय काय
व्हिटॅमिन बी 12 कमतरता झाल्याने काय होते व उपाय काय

नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी नियमित आवश्यक तो आहार घेणे आवश्यक ठरते. तसेच, आपले अनेक आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी, सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय ठेवली पाहिजे. नंतर फ्रेश झाल्यावर नाश्ता घेतला पाहिजे. दुपारचे जेवण व्यवस्थित घेतले पाहिजे. दुपारचे जेवण यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन चा समावेश असणे देखील आवश्यक ठरत असते. यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढणे बर्याच लोकांना कठीण जाते.

संध्याकाळचा नाष्टा, रात्रीचे जेवण हे सर्व व्यवस्थित योग्यरितीने असायला हवे. त्याचप्रमाणे, आपण आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा, फळ भाज्यांचा देखील समावेश करायला हवा. तसे, नियमित एक फळ तरी खाल्लं पाहिजे. फळे यामधून देखील आपल्याला अनेक प्रकारचे विटामिन्स मिळण्यास मदत होत असते. म्हणजेच जेवढ्या पण आपल्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा, पौष्टिक तत्त्वांचा, विटॅमिनचा समावेश करू तितके आपल्या आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होत असते.

बऱ्याच वेळा आपल्या शरीराला जर व्हिटॅमिन हे व्यवस्थित मिळाले नाही, तर आजारांना निमंत्रण येत असते. व्हिटॅमिन अनेक प्रकारे आहेत. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, बी 5, बी12 वगैरे सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बी12  हे व्हिटॅमिन जर आपल्या शरीराला कमी प्रमाणात मिळत असेल किंवा आपल्या शरीराला बी12 ची कमतरता भासत असेल, तर यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आपल्या शरीरात प्रत्येक व्हिटॅमिन चे प्रमाण हे योग्य प्रमाणात असले पाहिजे. आपल्या शरीराला व्यवस्थित प्रकारे ऊर्जा मिळण्यासाठी आहारातून सर्व प्रकारचे व्हिटॅमिन मिळणे आवश्यक ठरते. जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन ची कमतरता भासणार नाही. बी12 हे व्हिटॅमिन आपल्या शाळेला खूपच फायदेशीर ठरत असते. जर आपल्याला बी12 या विटामिन ची कमतरता भासत असेल तर आपल्या शरीराला लवकर थकवा जाणवत असतो. त्याचप्रमाणे बी ट्वेल याची आपल्या शरीराला कमतरता भासल्यास अजून कोणकोणते नुकसान होऊ शकतात याविषयी माहिती आपल्याला माहिती असायला हवी.

तर मित्रांनो, आज आपण, व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्याने काय होते? व त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्याने काय होते तसेच त्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  जेवण न जाण्याची कारणे व उपाय

विटामिन बी12 ची कमतरता झाल्यामुळे काय होते ?

आपण आपला नेहमीचा हा जर योग्य प्रमाणात घेत असेल तर, आपणास सर्व प्रकारचे आहारातील पोषक घटक, पोषकतत्व, मिनरल्स, आयर्न, प्रोटिन्स यांचा पुरवठा होत असतो. जर आपल्या शरीराला विटामिन ची कमतरता भासत असेल तर अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीराला मिटवेल या व्हिटॅमिनची कमतरता भासत असेल तर त्यामुळे काय होऊ शकते ? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

 • व्हिटॅमिन बी12 हे जर आपल्या शरीरात पुरेपूर असेल तर आपल्याला रक्ताची कमतरता भासत नाही परंतु व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासल्यास आपल्या शरीराचे रक्ताचे प्रमाण हे कमी होऊ लागते.
 • आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असली तर आपल्याला लवकर थकवा येत असतो कुठलेही काम करताना एकदम थकवा येण्याचा त्रास होऊ लागतो.
 • शरीरात जर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर गर्भधारणे साठी देखील त्रास होऊ शकतो. एक प्रकारे गर्भधारणा लवकर होत नाही.
 • आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासत असेल तर त्यामुळे हृदय रोग या आजाराला देखील आमंत्रण दिले जात असते. म्हणजेच हृदय या संदर्भात आजार उद्भवू शकतात.
 • जरा व्हिटॅमिन बी ची कमतरता ही शरीरात असेल तर त्यामुळे सारखे सारखे तोंड येण्याचे प्रमाण वाढते. शिवाय जीव देखील लालसर होऊ लागते.
 • व्हिटॅमिन बी12 ची कमतरता शरीरामध्ये झाल्यामुळे शरीराची त्वचा ही पिवळसर रंगाची दिसू लागत असते. कारण आपल्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण हे खूपच कमी झालेले असते म्हणजेच रक्ताची कमतरता झालेली असते त्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही पिवळ्या रंगाची दिसू लागत असते.
 • आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासत असेल तर आपल्याला डोळ्यांत संदर्भात देखील समस्या निर्माण होऊ शकतात एक प्रकारे डोळ्यांना धुरा सारखे दिसणे म्हणजे स्पष्ट न दिसणे इत्यादी प्रकारच्या समस्या येऊ शकतात.
 • शरीरात जर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासत असेल तर कुठलेही काम करत करत असो तसेच चालताना लवकर थकवा येत असतो किंवा चालताना त्रास होण्याची शक्यता देखील असते.
 • आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर डोकेदुखीचा देखील तीव्र त्रास होऊ शकतो.
 • त्याचप्रमाणे बी12  या व्हिटॅमिनची कमतरता शरीरात असल्यामुळे भूक न लागणे या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
 • शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्यामुळे हातापायांना मुंग्या येण्याच्या समस्यादेखील येत असतात.
 • शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्यामुळे दम लागण्याचा त्रास तसेच, सांधेदुखीचा त्रास देखील उद्धव लागतो.
 • जर शहरांमध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल, तर त्यामुळे स्मरणशक्तीवर देखील परिणाम होत असतो. म्हणजे एखादी गोष्ट ही लक्षात न राहता सारखे सारखे विसरण्याची सवय होते.
 • तसेच जर यामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर अनेक आजार होण्याची संभावना असते.
वाचा  श्वास घेताना अंग दुखणे  - छाती, पाठ, पोट

तर, मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासत असेल, तर वरील सर्व प्रकारच्या समस्या या उद्भवू शकतात. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासू नये यासाठी आपण काही घटकांचा आहारात समावेश करायला हवा. व्हिटॅमिन बी ट्वेल ज्या घटकांमध्ये असतील त्या घटकांचा आहारात समावेश केल्यामुळे वरील सर्व प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत. तर आपण आहारामध्ये कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत ? कुठले घटक समाविष्ट केले पाहिजे ? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन बी12 वाढवण्यासाठी उपाय :-

आपल्या शरीरामध्ये बी12 ची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा समावेश करायला हवा. व्हिटॅमिन बी12 हे आपण कशाप्रकारे आपल्या शरीरात वाढू शकतो यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो याबद्दल आपण जाणून घेऊयात.

 • आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 हे जास्तीत जास्त टिकून रहावे, यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी देण्यावर भर दिला पाहिजे.
 • जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता नसेल म्हणजेच कॅल्शियम चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असेल तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 हे चांगल्या प्रकारे टिकून राहण्यास मदत होते.
 • आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासू नये यासाठी आपण दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे.
 • आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासू नये यासाठी आपण काय मिठाचे सेवन देखील करायला हवे.
 • त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये आंबट वर्गी या पदार्थांचा देखील समावेश करायला हवा जेणेकरून व्हिटॅमिन बी12 हे टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
 • जर तुम्ही सुकामेवाचे नियमित सेवन करत असेल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासणार नाही. म्हणून,तुम्ही नियमित सुकामेवाचे सेवन करायला हवे.
 • मूग मटकी हरभरे अशी कडधान्य ही खाल्ल्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासणार नाही. एक प्रकारे जर नियमित कडधान्यांचा समावेश तुमच्या आहारात करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये बी12 ची कमतरता भासू शकत नाही.
 • अंड्याची सेवन केल्यामुळे देखील शहरांमध्ये बी12 ची कमतरता भरून निघत असते.
 • त्याचप्रमाणे, जर तुम्ही मटण, मासे यांचे सेवन करत असाल तर, त्यामुळे देखील तुम्हाला विटामिन बी12 मिळत असते. कारण मटण, मासे या मध्ये व्हिटॅमिन बी12 चा चांगला समावेश असतो.
 • तुम्ही तुमच्या आहारामध्ये बीन्स व शेंगा यांचा समावेश करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भासणार नाही.
 • जर तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करत असाल तर त्या मधून देखील तुम्हाला, व्हिटॅमिन बी12 मिळत असते.
 • आहारामध्ये दही चा समावेश केल्यामुळे देखील बी12 ची कमतरता भरून निघते.
 • सोयाबीन, मशरूम यांसारखे घटकांचा समावेश आहारामध्ये केल्यामुळे देखील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून निघत असते.
वाचा  छाती वाढवण्यासाठी विविध घरगुती उपाय

तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता पूर्ण भरून निघावी, यासाठी आपण वरील घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12  योग्य प्रमाणात उपलब्ध असेल, तर आपल्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण देखील कमी होत नाही. शिवाय, रक्ताचे देखील कमतरता भासणार नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीराला थकवा लवकर येणार नाही. त्याचप्रमाणे, व्हिटॅमिन बी12  या विषयाबद्दल जास्तीची माहिती हवी असल्यास त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here