बेकिंग सोडा चे सेवन केल्याने होणारे शरीराला विविध फायदे :-

0
988
बेकिंग सोडा चे सेवन केल्याने होणारे शरीराला विविध फायदे
बेकिंग सोडा चे सेवन केल्याने होणारे शरीराला विविध फायदे

आपल्या स्वयंपाक घरातील विविध पदार्थांचा वापर करून देखील आपण आपल्या शरीराचे निगडित विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्याच बरोबर अशा विविध गोष्टींचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला तसे विविध फायदे देखील होऊ शकतात .अशाच वेगळ्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांच्याच प्रत्येकाच्या घरी बेकिंग सोडा हा असतो. बेकिंग सोडा चे सेवन बरेच लोक करता. बेकिंग सोडा यालाच बरेच लोकं खाण्याचा सोडा सुद्धा म्हणतात. तर इंग्रजी मध्ये बेकिंग सोडा या शब्दाला ‘सोडियम बायकार्बोनेट’ असे म्हणतात. स्वयंपाक घरात भजी, इडली, ढोकळा वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा चा वापर केला जातो. असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी या सोडायचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

बेकिंग सोडा चा वापर हा पदार्थांना कुरकुरीत करण्यासाठी वापर याचा केला जातो. पण जसा बेकिंग सोडा आपल्याला स्वयंपाक घरात उपयोगी पडतो. तसेच बेकिंग सोडायचे काही फायदे आपल्या शरीराला देखील खूप उपयोगी ठरतात. जरा आपण या थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा चा वापर जर केला तर आपल्या शरीरात असे विविध फायदे देखील होऊ शकते व त्याचबरोबर विविध अडचणी किंवा समस्या पासून आपल्या आराम देखील मिळू शकतो.

बेकिंग सोड्याचे आपण जर वेगवेगळे फायदे बघितले तर काही लोकांना आश्चर्य होईल. कारण की बेकिंग सोडा मुळे होणारे फायदे आपल्या शरीराला खूप अत्यावश्यक व उपयोगी फायदे आहेत. त्याच बरोबर बेकिंग सोडा हा पदार्थांना चव आणण्यासाठी जशी मदत करतो तसे आपले शरीर निरोगी व सुदृढ होण्यासाठी सुद्धा बेकिंग सोडा मदत करतो.

पण बेकिंग सोड्याचा अतिवापर करणे तितकेच आपल्या शरीरासाठी हे घातक ठरू शकते. त्यामुळे बेकिंग सोडा यांचा योग्य प्रमाणातच वापर करावा. अतिप्रमाणात बेकिंग सोडा चा वापर करु नये. जर बेकिंग सोडा आपण अति वापर केला तर त्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. बेकिंग सोडा आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. जसे कुठल्याही पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे वेगवेगळे नुकसान होऊ शकते. तसेच आपण जर या बेकिंग सोडा याचे अति प्रमाणात वापर केला तर आपल्या शरीराला देखील त्याचे वेगवेगळे नुकसान होऊ शकते.

वाचा  स्वप्नात शिंगाडे दिसणे शुभ की अशुभ!

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बेकिंग सोडा चे सेवन केल्यामुळे की व याचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे कोण कोणते विविध फायदे होऊ शकतात. ज्यामुळे आपले शरीर हे निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकते ? चला तर मग बघूया !

बेकिंग सोडा खाल्ल्यामुळे होणारे शरीराला फायदे :-

  • ॲसिडिटी कमी करण्यास आपल्याला मदत करते :-

अनेक लोकांना बराच वेळा सतत अपचन झाल्यामुळे किंवा अवेळी जेवण झाल्यावर त्यांना सतत ऍसिडिटी होणे या समस्या उद्भवतात. ऍसिडिटी मुळे पोटात जळजळ होते किंवा पोटात आग पडल्यासारखे त्यांना वाटते. पण जर तुम्हाला या ऍसिडिटी पासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही बेकिंग सोडा चा वापर करू शकतात. थोडेसे कोमट गरम पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाका आणि चांगले मिश्रण मिक्स करून घ्या. नंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा पाण्याचे सेवन करावे. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे तुमचा ऍसिडिटीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल पण आपण या बेकिंग सोडा चे अतिप्रमाणात वापर करू नये जरा आपण या बेकिंग सोडा चा अति वापर केला तर आपल्या पोटाच्या आतड्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा एक उत्तम फायदा बेकिंग सोडयामुळे आपल्याला व आपल्या शरीराला होतो.

  • सांधेदुखी व गुडघेदुखी  थांबवण्यास मदत करते :-

अनेक लोकांना एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम केल्यामुळे किंवा अनेक वेळी दैनंदिन जीवनात खूपच धावपळ केल्यामुळे किंवा मग वयोमानानुसार बऱ्याच लोकांना सांधे दुखी व गुडघे दुखी या समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच लोकांना सतत सांधेदुखी गुडघेदुखी होणे अशा वेगवेगळ्या समस्या सतत निर्माण होत असतात त्यामुळे त्यांना त्याच्या वेदना अधिकच जाणवत जात आणि नंतर या वेदनांचा त्रास सहन होत नाही. पण जर तुम्हाला या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल किंवा तुम्हाला होणारी सांधेदुखीवर व गुडघेदुखी थांबवायचे असेल तर तुम्ही बेकिंग सोडा चा वापर करू शकतात. थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा आणि थोडेसे मध्ये टाका आणि हे पाणी दिवसातून अनेक वेळा प्या. असे 15 ते 20 दिवस केल्यामुळे तुमच्या सांधेदुखी व गुडघेदुखीचा होणारा त्रास कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते अथवा तो त्रास कमी झालेला तुम्हाला जाणवू शकतो.

  • चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यास मदत करते :-

अनेक तरुण मुला-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचा चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते अथवा त्यांच्या सौंदर्या यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हे पिंपल घालवण्यासाठी ते वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीमचा वापर करतात. पण त्यामुळे त्यांना याचा त्यांच्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. पण जर तुम्हाला हे चेहऱ्यावरील पिंपल घालवायचे असेल बेकिंग सोडा चा वापर करावा. बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी टाकावे आणि हे मिश्रण एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट पिंपल्स आलेल्या ठिकाणी एक ते दोन मिनिटं राहू द्यावी. जास्त वेळ ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवू नका. एक-दोन मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. असे दिवसातून जर तीन चार वेळा करावे. असे जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्याचे तुम्हाला मदत होऊ शकते.

  • दात स्वच्छ करण्यासाठी आपल्याला मदत करते :-

अनेक लोकांना दात अस्वच्छ असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते जसे की दात दुखणे,दाताला कीड लागणे असे वेगवेगळे समस्या उद्भवतात. पण जर तुम्हाला तुमचे दात स्वच्छ करायचे असतील तर ब्रशवर थोडीशी बेकिंग सोडा घेऊन त्याच्याने ब्रश करावा. पण हा बेकिंग सोडा चे सेवन अतिप्रमाणात घेऊ नये व याचा वापर अति प्रमाणात करू नका  पण अति प्रमाणात बेकिंग सोडा घेऊ नका व जास्त वेळ बेकिंग सोडा ने दातांना ब्रश करू नका. जर तुम्ही जास्त बेकिंग सोडा ने ब्रश केला तर तुमच्या दाताला इजा होऊ शकते. तुमचे दात स्वच्छ राहण्यास बेकिंग सोडा तुम्हाला मदत करू शकतो.

वाचा  उंची कमी करण्यासाठी काय करावे व कमी होते का?

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की बेकिंग सोड्याचा वापर केल्यामुळे किंवा त्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत मिळू शकते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here