उंची कमी करण्यासाठी काय करावे व कमी होते का?

0
1530
उंची कमी करण्यासाठी काय करावे व कमी होते का
उंची कमी करण्यासाठी काय करावे व कमी होते का

 नमस्कार मित्रांनो. बरेच जण आपल्या सौंदर्याबाबत खूप काळजी करत असतात. कुणाची उंची कमी असेल त्या व्यक्तीला जास्त उंची असणाऱ्या व्यक्तीचा हेवा वाटत असतो. अरे माझी पण उंची सेम यांच्यासारखे राहिली असती तर मीदेखील स्मार्ट दिसलो असतो! मित्रांनो, अर्थातच उंची ही आपल्या सौंदर्या मध्ये अजून जास्तीत जास्त वाढ करत असते. त्यामुळे प्रत्येकालाच वाटत असते की आपली देखिल उंची छान असावी. आणि यामुळे आपल्या सौंदर्यात अजूनच जास्त भर पडेल नाही का ! म्हणजेच ज्यांची उंची कमी असेल तर त्यांना उंच व्यक्तींचा हेवा वाटणे हे सहाजिकच आहे. आणि मित्रांनो या व्यतिरिक्त काही व्यक्तींची उंची तर एवढी लांब असते एवढी उंच असते की त्यांना कमी उंचीच्या लोकांचा हेवा वाटत असतो अजबच आहे ना !आणि उंची कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात.

एका ठिकाणी कमी उंची वाले उंच व्यक्तिंचा हेवा करतात तर दुसर्‍या बाजूला उंच व्यक्ती कमी उंची वाल्यांचा हेवा करतात. मित्रांनो बरेच ठिकाणी मित्रांच्या ग्रुप असतो त्यामध्ये जर कोणाची कमी उंची असेल तर त्याला कमी उंचीचा म्हणून चिडवले जात असते आणि एका बाजूला ज्या व्यक्तीची जास्त उंची असेल तर त्याला लंबू लंबू असे म्हणून देखील चिडवले जात असते. मग त्या उंची उंच व्यक्तीला असे वाटत असते की अरे माझी मित्रांची उंचीबरोबर माझी उंची असली असती तर ? साहजिकच असे प्रश्न तर प्रत्येक ठिकाणी उद्भवतच असतात.

        मित्रांनो, बरेच जण हे ज्यांची उंची अधिक आहे म्हणजेच जास्त उंच आहे असे बरेच व्यक्ती उंची कमी करण्यासाठी काहीना काही प्रयत्न करत असतात. म्हणजेच नेमके काय करावे ? उंची कमी करता येते का ? त्यासाठी कोणत्या मेडिसिन्स घेणे योग्य ठरते ? उंची कमी करण्यासाठी औषधे घ्याव्यात का ? कोणते उपाय करता येतील? असे बरेच प्रश्न अधिक उंची असणाऱ्या व्यक्तींना पडत असतात. तर मित्रांनो, आज आपण उंची कमी करण्यासाठी काय करावे व उंची कमी होते का ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग मित्रांनो उंची कमी करण्यासाठी काय करावे व उंची कमी होते का ? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उंची कमी करण्यासाठी काय करावे ?

    मित्रांनो, उंची ही आपल्या सौंदर्या मध्ये अजून भर पाडत असते. त्यामुळे ज्या व्यक्तींची उंची कमी असते ते उंच व्यक्तींचा हेवा करत असतात. आपली देखील उंची छान राहिली असती तर! आणि जे व्यक्ती अधिक उंच असतात. म्हणजेच, खूपच उंच असतात त्यांना देखील असे वाटत असते की, आपली उंची थोडी कमी राहिली असती तर ! म्हणजेच उंची च्या बाबतीत प्रत्येकाला काही ना काही प्रश्न पडत असतात. बऱ्याच व्यक्ती या उंची कमी करण्यासाठी काही ना काही उपाय शोधत असतात.  तसेच बरेच व्यक्ती हे उंची कमी करण्यासाठी औषधे देखील घेत असतात. आणि काही जण तर उंची कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे योगासन करणे आवश्यक ठरते, हे देखील नेटच्या माध्यमातून शोधत असतात. मित्रांनो, उंचीही अनुवंशिक देखील असू शकते. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वजण उंच असतील तर सहाजिकच व्यक्तीची उंची देखील उंच असते. आणि एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील आई-वडील आजी-आजोबा हे कमी उंचीच्या असतील तर त्या व्यक्तीची उंची देखील कमीच असणार ! म्हणजेच उंचीवर अनुवंशिकतेचा परिणाम झालेला दिसून येत असतो.

वाचा  आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

       त्याचप्रमाणे, नियमित च्या आहारामध्ये योग्य त्या पोषक तत्वांचा, पोषक घटकांचा समावेश जर असेल तर त्याचा परिणाम देखील उंची वाढीवर दिसून येत असतो. ज्या व्यक्तींची उंची कमी असते तर ते उंची वाढण्यासाठी उपाय शोधत असतात व्यायाम कोणता करावा हे देखील ते शोधत असतात. या उलट ज्या व्यक्तींची उंची अधिक आहे ते व्यक्तीदेखील ती  कमी करण्यासाठी उपाय शोधत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील घेत असतात. परंतु मित्रांनो, खरंच सांगायचे झाले तर उंची कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे औषध उपयोगी ठरत नाही.

बऱ्याच व्यक्ती उंची कमी करण्यासाठी औषधे घेत असतात परंतु हे त्यांच्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकते. अशी औषधे ही जास्तीत जास्त केमिकलयुक्त असल्यामुळे त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. उंची कमी करण्यासाठी औषधे घेतली म्हणजे उंची तर जास्त वाढत नाही परंतु त्याचा केमिकल हे शरीरामध्ये जमा होत असते. परिणामी शरीरात वेगवेगळ्या आजार उद्भवू शकतात तसेच शरीरातील हाडे देखील कमजोर होण्याची भीती असते. त्यामुळे उंची कमी होण्यावर कुठल्याही प्रकारच्या औषध उपयोगी पडत नाही याने शरीराचे नुकसानच जास्त होऊ शकते. तसेच बाजारामध्ये उंची कमी करण्यासाठी महागडे औषधे उपलब्ध असतात परंतु हे औषधे घेतल्यामुळे शरीराची नुकसान होऊ शकते त्यामुळे ते घेणे जितके टाळता आले तितके टाळलेले बरे!

उंची अधिक वाढल्यास कशी कमी करावी ?

      मित्रांनो, बरेच जण हे उंची जास्त असल्यामुळे उंची कशी कमी करावी यासाठी उपाय शोधत असतात. आणि काही जण तर बाजारातून  मिळणारे औषधे देखील जाणून घेत असतात. परंतु मित्रांनो असे अजिबात करू नका कारण याने शरीराला फायदा होणार याची जास्त नुकसान होऊ शकते. औषधे म्हटले तर त्यामध्ये केमिकल जास्त प्रमाणात असते आणि हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच यामुळे शरीराचे हाडे देखील ठिसूळ होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्ती ही एक्सरसाईज देखील शोधत असतात.

वाचा  टाचेचे हाड वाढणे या समस्या विविध घरगुती उपाय :-

मित्रांनो, खरंच उंची कमी करण्यासाठी कुठलीही एक्सरसाइज नाही. म्हणजेच कुठल्याही प्रकारचे योगासन नाहीये. उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासन करू शकतात, परंतु उंची कमी करण्यासाठी कुठलेही योगासन नसते. खरं तर मित्रांनो, उंची वाढणे ही शरीरातील हार्मोन्स बदल मुळे होत असते. याउलट तुम्ही जर उंच आहात तर या तुम्ही यात समाधान माना. नाही तर, कमी उंची वाले उंची वाढवण्यासाठी सतत काही ना काही प्रयत्न करत असतात.

उंची वाढणे आपण थांबवू शकतो का ?

   बऱ्याच अशा व्यक्ती असतात की ज्यांची उंची कमी असते आणि ते उंची वाढवण्यासाठी सतत काहीना काही प्रयत्न करत असतात. मेडिसिन्स घेत असतात. तसेच योग्य त्या प्रकारचे योगासने करण्यावर भर देत असतात, जेणेकरून त्यांची उंची त्यांना वाढवता येईल. आणि ज्या व्यक्तींची उंची अधिक असते त्या व्यक्तींना उंची वाढणे आपण थांबवू शकतो का ? हा प्रश्न सतत होत असतो. आणि बरंच व्यक्ती ही उंची वाढू नये यासाठी काहीना काही प्रयत्न करत असतात आणि बरेच जण त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देखील देत असतात परंतु मित्रांनो असे अजिबात करू नका. कारण ऊंची वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे, शरीरामधील हार्मोन्स बदल झाल्यामुळे देखील उंची वाढत असते. तसेच, उंची वाढण्यामागील एक कारण ते म्हणजेच, आनुवंशिकता हे देखील आहे.

         अनेक उंच व्यक्ती हे उंची वाढणे थांबवण्यासाठी औषधे घेत असतात परंतु अशा औषधांनी उंची वाढणे थांबते का खरे परंतु या औषधांमुळे शरीराला अधिक विकार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी औषधे न घेणे बरे! जास्त औषधे घेतल्यामुळे केमिकल शरीरामध्ये जमात असते त्याचप्रमाणे शरीरातील हाडे देखील ती सुरू होण्याची अधिक संभावना असते. म्हणूनच मित्रांनो उंची वाढने कमी होण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची औषधे घेऊ नका. कारण तुम्ही करायला जाल काही आणि होईल भलतच काही. उंची कमी करण्यासाठी तुम्ही औषध घेत असाल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की सांगावे कारण यासाठी वापरलेले औषधे हे केमिकल रहित असतात. त्यामुळे ते शरीराला फार नुकसानदायक ठरू शकतात. मित्रांनो खरे सांगायचे म्हटले तर उंची कमी करण्यासाठी कुठल्याही उपाय उपलब्ध नाहीये. तसेच, कुठलेही योगासन नाही. हे तुम्ही जितके लवकरात लवकर समजून घ्याल, तितके तुम्हाला फायदेशीर ठरेल.

वाचा  कानाच्या मागे गाठ येणे

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

       धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here