सिझेरियन का करावे लागते? 

0
701
सिझेरियन का करावे लागते
सिझेरियन का करावे लागते

नमस्कार, एखादी स्त्री प्रेग्नेंट होते, त्यावेळी तिच्या  पहिल्या महिन्यापासून, शेवटच्या नवव्या महिन्यापर्यंत, ती काळजी घ्यायला सतर्क असते. त्यावेळी ती त्या बाळाची आतुरतेने वाट पाहते. तसेच तो काळ जसा तिच्या जवळ-जवळ येतो, तसतसे तिच्या मनात डिलीव्हरीची भीती राहते. आणि तो एक दिवस येतो, त्यामध्ये तिला माहिती असते की, तो एक त्रास फार कठीण असतो. तसेच अनेक महिलांच्या जीवनात या घटना येतात. त्यामध्ये त्यांचा जीव घाबरतो, आणि त्यांच्या मनात सारखे प्रश्न येत असतात, की डिलीवरी कशी असते? सिझेरियन डिलीवरी कशी ? नॉर्मल डिलिव्हरी कशी असते ? आज आपण बघणार आहोत, की सिझेरियन का करावे , व सिझेरियन कोणत्या कारणामुळे करावी लागते? चला तर मग जाणून घेऊयात, सिझेरियन का करावे लागते?

सिझेरियन डिलीवरी का, व कोणत्या कारणांमुळे करतात ? 

बऱ्याच वेळा महिलांना नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा सिझेरियन डिलिव्हरी ला फार भीती वाटते, पण त्यात घाबरण्यासारखे कारण नाही, सिझेरियन डिलिव्हरी ऑपरेशन द्वारे केली जाते. ओटीपोटावर टाके पाडून केली जाते, सिझेरियन डिलिव्हरी करतात, त्यावेळी तुम्हाला भूल दिली जाते. त्या वेळच्या वेदना या तुम्हाला जाणवत नाही. पण जसजशी तुमच्या पोटावरील भूल उतरते, त्यावेळी तुम्हाला त्या वेदना जाणवतात. त्यावेळी तुम्हाला डॉक्टर वेदना नाशक औषधे देतात. तसेच इन्फेक्शन औषधे देतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होत नाही, तसेच तुम्हाला डिलेवरी झाल्यावर, त्यांचीही काळजी घ्यावी लागते. सिजेरियन डिलीवरी का होते, व कोणत्या कारणांनी होते, ते आपण जाणून घेऊयात ! 

  • सहसा करून सिझेरियन डिलीवरी ही नॉर्मल डिलिव्हरी चे प्रयत्न करून ही नाही झाली, तरच सिझेरियन डिलिव्हरी करावी लागते. 
  • जर तुम्हाला प्रसूतीच्या वेदना आलेच नाही, तर तुमची सिजेरियन डिलीवरी करावी लागते. 
  • तसेच तुमच्या पोटात पाणी कमी झाले, तर सिझेरियन डिलीवरी करावी लागते. 
  • जर पोटात बाळाचे वजन जास्त असेल, अशा वेळी सिझेरियन डिलेवरी करावे लागते लागेल. 
  • एखाद्या स्त्रीचे वजन जास्त असेल, व त्यांना नॉर्मल डिलिव्हरी च्या कळा सहन होत नसतील, तर अशावेळी डॉक्टर ताबडतोब सिझेरियन डिलीवरी करायला घेतात. 
  • जर स्त्रीच्या पोटात बाळ आडवे झाले असेल, तर सिझेरियन डिलीवरी करावी लागते. 
  • तसेच बाळाच्या माने भोवती पोटातील नाळ च वेढे हे येत असतील, तर सिझेरियन डिलिव्हरी चा निर्णय घेतला जातो. 
  • जर एखाद्या महिलेला हाय बीपी चा प्रॉब्लेम असेल, तर तिची बीपी, ही मिडीयम लेव्हल ला करून, तिची सिझेरियन डिलिव्हरी करावे लागते. 
  • तसेच जर एखाद्या स्त्रीच्या पोटात कळा येतच नसतील, तर सिझेरियन डिलेवरी करावे लागते. 
वाचा   मैदानी खेळ खेळण्याचे फायदे

सिझेरियन डिलीवरी होऊ नये ? यासाठी कोणते प्रयत्न करू शकतात. 

सहसा, करून आत्ताच्या स्त्रिया या हुशार झालेले आहेत. त्यांना नॉर्मल आणि सिझेरियन डिलीवरी यामधले अंतर कळते. तसेच पूर्वीच्या काळापासून सिझेरियन डिलिव्हरी होऊ नये, यासाठी जे योग्य काम केले जाते, पूर्वी तर माझी आजी सांगायची की, नॉर्मल डिलिव्हरी सुलभरीत्या होण्यासाठी, तुम्ही योग्य ते कामे करा. पूर्वीच्या वेळी तर बाया जात्यावर दळण दळायचे, ओढ्यावर पाणी आणायचे, नदीवर कपडे धुवायला जायचे, घरात वाकून लादी पुसायचे, तसेच शेतात पायी जायचे, यामध्ये त्यांचा पूर्ण व्यायाम व्हायचा. पण आत्ताच्या हल्लीच्या हायब्रीड जीवनामध्ये जो तो काम करायलाही कंटाळा करतो. प्रेग्नेंसी च्या काळामध्ये तुम्ही योग्य ते काम करायला हवेत. जास्त प्रमाणात करू नका ना !

तुम्ही थोड्या प्रमाणात करा, जसे की रोजच्या रोज थोडे वाकून लादी पूशा, जर तुम्हाला वाकून जमत नसेल तर माॅप च्या साह्याने पुसा. तसेच खाली बसून थोडे कपडे धुवावे, त्यामध्ये तुमच्या पोटाचे स्नायू ताणले जातात. तो व्यायाम होतो, एक प्रकारे तुम्हाला हे काम जमले, चांगलीच गोष्ट आहे. तसेच तुम्ही रोजच्यारोज चालायला जावे, जड वस्तू उचलू नका. तसेच अतिशय कठीण कामे करू नका. तसेच गर्भवती महिलांसाठी योगासने असतात, ती तुम्ही युट्यूब, टीव्हीवर, मोबाईल वर बघू शकतात. तसेच तुम्ही योग्य आहार घ्या, बाहेरची जंकफूड खाऊ नका, हिरव्या पालेभाज्या खावे. हे साधे सोपे नियम असतात,नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. तसेच जर एवढे प्रयत्न करूनही, जर तुम्हाला पोटात कळा येत नसेल, त्या वेळी सिझेरियन डिलिव्हरी ही मात्र करावीच लागते. 

सिझेरियन डिलीवरी चा खर्च किती असतो? 

अनेक जणांना माहिती नसते, की सिझेरियन डिलीवरी चा खर्च हा किती असतो, तर सिझेरियन डिलीवरी च्या खर्च हा तुम्हाला 20 ते 60 हजारापर्यंत येऊ शकतो. तसेच जर तुम्ही जास्तीत जास्त फॅसिलिटी असलेल्या दवाखान्यात जर डिलिव्हरी करत असणार, तर त्या दवाखान्याच्या बजेटनुसार, तुमच्या दवाखान्यात सिझेरियन डिलिव्हरी  खर्च हा निघतो. तसेच जर एखाद्या गर्भवती स्त्रीची तब्येत अतिशय नाजूक असेल, तर त्यानुसार तिचा खर्च हा वाढतो. पण त्यामध्ये डॉक्टर त्यांच्या योग्यरीत्या शस्त्रक्रिया करून, बाळाची व आईची काळजी घेतात. 

वाचा  तोंड येणे या समस्या वर घरगुती उपाय :

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की सिझेरियन का करावे लागते, तसेच सिझेरियन डिलिव्हरी कोणत्या कारणांनी होते, तसेच सिझेरियन डिलिव्हरी होऊ नये, यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करू शकतात, व सिझेरियन डिलिव्हरी करत असाल तर त्यासाठी, तुम्हाला किती खर्च येऊ शकतो. या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहेत. जर तुम्हाला या माहितीमध्ये शंका असेल, तर तुम्ही एखाद्या डॉक्टरांनाही विचारून घेऊ शकतात. तर त्यांनी सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेलच, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here