सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय त्याबद्दल काही शंका-कुशंका जाणून घेऊयात

0
1177
सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय
सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय

सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय

नमस्कार, मैत्रिणींनो डोहाळे लागणे, म्हणजे स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक होय. ज्यावेळी एखाद्या स्त्रीला डोहाळे लागतात, त्यावेळी त्यांच्या घरात नवीन पाहुण्यांचं इंट्री होत आहे, असे असते. मग पहिल्या महिन्यापासून, तर नऊ महिन्या पर्यंत आपण आपली काळजी घेत असतो. त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर, तिच्या जीवनात परिपूर्णता येते. ती एका बाळाची आई होते. तिने एका बाळाचे मातृत्व घेतलेले असते, आणि तिचा परिवार पूर्ण होते यालाच म्हणतात, स्त्रीच्या जीवनात अनमोल क्षण त्यावेळी येतात. त्यावेळी तिला त्या वेदना ही कठीण वाटत नाही, जेवढे सुख तिला डिलिव्हरी झाल्यावर त्या बाळाला बघून मिळते. हो खरच हे नाते वेगळेच असते, आणि आपण हे नाते अजून कसे जपावे, याची काळजी घेतली पाहिजेत. बाळंतिणीची काळजी घेतली पाहिजे, डिलिव्हरी मध्ये दोन प्रकार असतात. एक नॉर्मल डिलिव्हरी दुसरी सिझेरियन डिलिव्हरी होय. शक्यतो डॉक्टर लोक हे नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रयत्न करतात, पण डिलिव्हरीच्या वेळी म्हणजेच प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना जर त्या वेदना सहन होत नसतील किंवा काही त्रास होत असेल, अशा वेळी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला जातो, आज आपण जाणून घेणार आहोत, की सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय व कशी होते, ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

सिझेरियन डिलिव्हरी कशी होते?

सहसा करून सिझेरियन डिलिव्हरीला सी सेक्शन डिलीवरी असे म्हणतात. सिझेरियन डिलिव्हरी कोणत्या कारणांमुळे होते, ते आपण आता जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

 • सहसा करून सिझेरियन डिलिव्हरी ही नॉर्मल प्रसुती च्या वेदना स्त्री म्हणजे  कितपत सहन करते, यावर डिपेंड असते.
 • तसेच प्रसुतीच्या वेळी जर महिला बेशुद्ध झाली, किंवा तिच्या तिला चक्कर येत असतील, अशा वेळी हा निर्णय घेतला जातो.
 • तसेच प्रेग्नेंसी मध्ये जर नऊ महिने बाळाची हालचाल ही कमी रित्या होत असेल, आणि डिलिव्हरी च्या वेळेस बाळाचे खाली उतरण्याचे चांसेस कमी असतील, अशा वेळेस हा निर्णय घेतला जातो.
 • तसेच प्रसूतीच्या वेदना न येणे, किंवा पोटात न दुखणे, अशा वेळी हा निर्णय घेतला जातो. 
 • बाळाने जर पोटात शी केली, ते सोनोग्राफीमध्ये दिसते अशावेळी हि डिलिव्हरी केली जाते. 
 • प्रसुतीच्या वेळेस जर स्त्रियांची बीपी हाय असेल, यावेळी ती कमी करून सिझेरियन डिलिव्हरी  करावी लागते. 
 • तसेच ज्यांचे वजनात जास्त असते, आणि त्यांच्याकडून नॉर्मल डिलिव्हरी च्या यातना सहन होत नाही, त्यांच्या निर्णयानुसार हि डिलिव्हरी डॉक्टर करू शकतात. 
 • नॉर्मल डिलिव्हरी होत असताना, जर जास्त अवधी लागत असेल, तसेच बाळाचे ठोके कमी व्हायला लागले असतील, अशा वेळी सिझेरियन  करावे लागते. 
 • तसेच बाळाचे वजन जास्त असेल, अशा वेळी सिझेरियन डिलिव्हरी करावी लागते. 
 • जर पोटातील पाणी कमी होत असेल, अशावेळी ही  डिलिव्हरी केली जाते. 
 • जर बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळले जात असेल, अशावेळी सिझेरियन डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला जातो. 
वाचा  टाळूला खाज येणे

जेव्हा सिझेरियन डिलिव्हरी होते, तेव्हा घाबरून सारखे काही असते का? 

हल्ली लोक सिझेरियन डिलिव्हरी ला फार घाबरतात. पण ज्यावेळी कठीण प्रसंग असेल, अशा वेळी त्या डिलिव्हरीचा पर्याय असतो. अशावेळी घाबरून जाऊ नका, डॉक्टर त्यांचे काम योग्यरीत्या करतात. तसेच महिलांची म्हणजे आईची व बाळाची काळजी ते स्वतः घेतात, व प्रसूती योग्यरीत्या करतात. आता पूर्वीच्या सारखे डिलिव्हरी राहिलेले नाहीत. आता फक्त दोन टाक्याचे सिझेरियन डिलिव्हरी आलेले आहेत. पूर्वीच्या काळी तर बाळंतिणीच्या पोटावर सोळा-सतरा टाके राहायचे. पण आता वैज्ञानिक पद्धतीनुसार आता फक्त सिजरिंग डिलिव्हरी च्या फक्त दोनच टाके राहतात. त्यामुळे एवढे घाबरायचे कारण नाही, फक्त डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही पाच दिवस दवाखान्यात राहून, तुमच्या घरी तुम्हाला सोडले जाते. त्यानंतर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. 

सिझेरियन डिलिव्हरी नंतर चा आहार

सिझेरियन डिलिव्हरी झाल्यावर बाळांतीनला, तुम्ही योग्य तो आहार द्यायला हवा. डिलिव्हरी झाल्यावर पहिले दोन ते तीन दिवस त्यांना एकदम नॉर्मल liqvid आहार द्यायला हवा. कारण ओटीपोटावर टाके असल्यामुळे, त्यांना उठा बसायला त्रास होतो, सुरुवातीला त्यांना शौचास व बाथरूमला जाण्याचा त्रास होतो.  नंतर दोन ते तीन दिवसानंतर त्यांना तुम्ही पातळशी पेज, मुगाची डाळीची खिचडी, तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सूप, डाळ भात, गव्हाच्या घाटा असा आहार घ्यायला हवा. तसेच सिझेरियन डिलिव्हरी होते  अशा वेळी पहिले सात दिवस त्यांच्या पोटावर हे टाके असतात. त्या टाक्यांना डॉक्टरांनी दिलेला मलम लावावा. टाक्यांची नेहमी स्वच्छता ठेवावी. तसेच डिलिव्हरी नंतर तुम्ही तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नका. त्याने तुमच्या पोटात आग होईल, कारण डिलिव्हरी होणे, म्हणजे नवीन जन्म असतो. त्यावेळी तुमची पचन संस्था ही कमजोर असते, अशा वेळी जर तुम्ही तिखट आहार खाल्ला, तर तुम्हाला जुलाब होण्याची शक्यता असते, आणि ओटीपोटावर टाके असल्यामुळे त्याला खूप त्रास होईल. ही काळजी आपण घ्यावी. 

वाचा  छाती वाढवण्यासाठी विविध घरगुती उपाय

ड्रायफ्रूट खाऊ शकतात का? 

हो, सिझेरियन डिलिव्हरी नंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात. डिलिव्हरी नंतर बाळंतिणीचे शरीर एकदम कमजोर होऊन जाते, तिला एनर्जी युक्त फळे ड्रायफ्रूट्स  द्यायला हवेत. म्हणजेच काजू, बदाम, खारीक, खोबरे यांचे मिश्रण करून तुम्ही त्यांना लाडू बनवून खायला देऊ शकतात. त्याने त्यांच्या शरीराची झीज भरून निघते. 

जड वजन उचलू नका

डिलिव्हरीनंतर एक ते दीड महिना तुम्ही शक्यतो, जड वजन उचलणे टाळावे. कारण तुमच्या ओटीपोटावर टाके असतात, आणि तुम्ही जर जड वजन उचलले, तर पोटावरील टाके तुटण्याची शक्यता असते, शिवाय रक्तही त्यातून येऊ शकते, ही काळजी तुम्ही घ्यावी. 

सिझेरियन डिलिव्हरी नंतर, व्यायाम करू शकतो का? 

आता हल्लीच्या युगामध्ये जो तो फिगर मेंटेन ठेवण्यामागे असतात. पण एवढी घाई नको, एवढा उतावीळपणा नको, कारण डिलिव्हरी नंतर स्वतःला बाळांतीनला सावरायला फार वेळ लागतो. कारण त्यांचे ओटीपोटावर टाके असतात, त्यात त्यांना अवजड कामे करावे लागत नाहीत. आणि अशा वेळी जर त्यांनी व्यायाम केला, तर त्यांना त्याचा त्रास अधिक होईल. त्यांचे ओटीपोटावर टाके असल्यामुळे, व्यायामाने तिच्या पोटाला ताण पडून, त्यातून रक्त येण्याची शक्यता असते. डिलिव्हरी नंतर व्यायाम तुम्हीच दोन ते अडीच महिन्यांनी चालू करू शकतात. तोही एकदम हलका व्यायाम  करू शकतात. 

सिझेरियन डिलिव्हरी नंतर पोटाला, बेल्ट बांधु शकतो का? 

हल्लीच्या युगात जो तो ज्याचे त्याचे वजन मेंटेन करण्यामागे राहतात. प्रसुतीनंतर वजन वाढते, पण त्यामध्ये शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला तो आहार घ्यावाच लागतो. प्रसुतीनंतर  नंतर किमान एक महिना तरी तुम्ही ओटी पोटाला बेल्ट लावू नका. कारण पोटाला बेस्ट लावल्यामुळे, तुमच्या ओटी पोटावरील टाके असतात. त्यावर दबाव पडून, ते दुखण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही एक ते सव्वा महिन्यानंतर, कमरेला ,ओटीपोटाला बेल्ट हा लावू शकतात. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत  की सिझेरियन डिलिव्हरी, म्हणजे काय तसेच त्या बद्दल काही शंका- कुशंका व त्यानंतर तुम्ही तुमचा आहार कसा घ्यावा, व कोणत्या प्रकारे घ्यावा व त्यानंतर कोणती काळजी घ्यावी, हेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही एखाद्या स्त्री रोग तज्ञलाही विचारू शकतात. तर आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  पोटातील आतड्याला आलेली सूज घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपचार :-

 

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here