मासिक पाळी महिन्यातून दोनदा येणे

0
976
मासिक पाळी महिन्यातून दोनदा येणे
मासिक पाळी महिन्यातून दोनदा येणे

नमस्कार, मैत्रिणींनो मासिक पाळी हे स्त्रीच्या शरीरातील मुख्य घटक आहे. स्त्रियांना मासिक पाळी वयाच्या बाराव्या- तेराव्या वर्षापासून चालू होते. तर 40 ते 45 या वयापर्यंत राहते. मासिक पाळी चक्र हे आपल्या शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असते. मासिक पाळी आल्यामुळे स्त्रियांच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे स्त्रीबीज तयार होते व ते फलोत्पादन नाही झाले, तर ते फुटते व त्यामुळे मासिक रक्तस्राव चालू होतो. परंतु काही लोकांना मासिक पाळी महिन्यातून दोनदा येण्याचा त्रास होतो.

मासिक पाळी दर महिन्याला 21 ते 28 दिवसांनी येते. तसेच तिचे शारीरिक चक्र बिघडले, मानसिक थकवा, शारीरिक थकवा आल्यामुळे, हे चक्र 28 ते चाळीस दिवसांपर्यंत ही लांबू शकते. पण जर ते चक्र जर तुम्हाला पंधरा-पंधरा दिवसात येत असेल, तर त्यावेळी घाबरण्यासारखे आहे. कारण मासिक पाळी महिन्यातून दोनदा आल्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा, मानसिक थकवा येतो. तुम्ही अशक्त होतात. तसेच शरीरात रक्ताची कमतरता ही होते. अशा वेळी मासिक पाळी महिन्यातून दोनदा येण्या मागील कारणे नेमकी कोणती असू शकतात? त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, की मासिक पाळी महिन्यातून दोनदा येत असेल, तर  काय उपाययोजना कराव्यात. 

मासिक पाळी दोनदा येत असेल, तर त्याची काही कारणे ? 

मैत्रिणींनो मासिक पाळी महिन्यातून दोनदा येत असेल, तर त्याची काही कारणे जाणून घेऊयात. 

ताण-तणाव आल्यामुळे :

बऱ्याच वेळेला स्त्रियांची धावपळ होते. शारीरिक थकवा येतो, तसेच ते ताण तणावात असतात, चिंता असते, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे त्यांचा संबंध हे त्यांच्या हार्मोन्सवर होतो. मग हार्मोन्स बदल यामुळे त्यांची पाळी ही लांबू शकते, किंवा महिन्यातून दोनदा येऊ शकते. यासारख्या समस्या त्यांना होऊ शकतात. अशा वेळी त्यांनी ताणतणावापासून दूर राहावे, चिंता करणे कमी करावे. तसेच मेडिटेशन करावे. व्यायाम करावेत. या साऱ्या गोष्टींमुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. मासिक पाळी नियमित रूपात येते. 

वाचा  लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे

थायरॉइड मुळेही होते :

जर तुमच्या शरीरात हार्मोन्स इनबॅलन्स झाले, तर तुम्हाला थायरॉईड होतो, तसेच आपल्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे घटक आपल्या शरीरातील पाळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच थायरॉईडचे दोन प्रकार असतात. एक हायपर थायराइड दुसरा हायपोथायरॉईड हे प्रकार असतात. या प्रकारामध्ये तुमच्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स वर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीरावर अतिरक्तस्राव जाण्याची संभावना असते. शिवाय पाळी महिन्यातून दोनदा येते. तसेच काही जणांचे पाळीही लांबली जाते. अशावेळी त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यावेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे. वेळीच उपचार करून घ्यावे. 

वजन वाढल्याने :

बाहेरील जंकफूड खाणे, बदलती जीवनशैली, तसेच बैठे काम या साऱ्या गोष्टींमुळे तुमचे वजन वाढू शकते, असे वेळी त्याचा परिणाम तुमच्या पाळीवरही होतो. त्या काळामध्ये तुम्ही वजन कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, अशावेळी तुम्ही व्यायाम करतात. डाएट करतात. तसेच आयुर्वेदिक ज्यूस काढा घेत असाल, तर अशावेळी त्याचा प्रभाव तुमच्या पाळीवर झाल्यामुळे, तुमची पाळी महिन्यातून दोनदा येण्याचे समस्या होऊ शकतात. 

गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यामुळे ही होते :

काही लोकांना त्यांचे बाळ लवकर नको असते, त्या कारण त्यांना त्यांच्या काम, जॉब असतो. तसेच काही कारणास्तव त्यांना मूलबाळ लवकर होऊ द्यायचे नसते. तर ते त्यांचे प्लॅनिंग करतात. तर काहींचे बाळ होण्याआधी घराचे नियोजन असते, अशा वेळी ते त्यांचं बाळाचा नियोजन, प्लॅनिंग  करतात. त्यामुळे काही स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात. त्या गोळ्यांमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होतो, त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमची पाळी महिन्यातून दोनदा येण्याच्या संभावना होऊ शकते. 

मॅनोपॉज वेळेस या गोष्टी होतात :

हो, वयाच्या चाळिशीनंतर तुमची मॅनोपॉज ची क्रिया सुरू होते. त्या वेळी तुमच्या शरीरात बदल होतात. अशा वेळी महिलांची चिडचिड होते,  तसेच पाळी महिन्यातून दोनदा यायला सुरुवात होते. तर काहींची दोन चार महिन्यांनी येते. तसेच काहींचे अंगावरून खूप रक्तस्राव होतो, त्यामुळे त्यांना अशक्तपणा, थकवा, कमजोरी यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागते.

वाचा  स्वप्नात राजहंस दिसणे शुभ की अशुभ

म्हणून प्रत्येक स्त्रियांचे शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात, अश्या वेळी त्यांनी मेडिटेशन करायला हवे. बाहेर मोकळ्या हवेत फिरायला हवे. पाळी दरम्यान खूप आराम करायला हवा. पुरेशी झोप घ्यायला हवी. तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, कारण ते वय त्यांचे रजोनिवृत्तीच्या असते. यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे त्यांना या सार्‍या त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी पुरुषांनी स्त्रियांना समजून घ्यायला हवे, व त्यांची आरोग्याची काळजी घ्यायला हवी. 

कर्करोगाची लक्षणे असू शकतात :

मासिक पाळीचे चक्र हे नियमित राहिले, तर स्त्रीचे आरोग्य आणि तिचे शरीरातील हार्मोन्स असंतुलन सुरळीत आहे, असे समजावे. पण अंगावरील रक्तस्राव अति प्रमाणात होत असेल, तसेच मासिक पाळी ही महिन्यातून दोनदा येत असेल, आणि आल्यावर तिचा रक्तस्त्राव हा सहा दिवसाच्या वर असेल, तर अशा वेळी तुम्हाला कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

कारण त्या काळात तिला अति रक्तस्राव होणे, शारीरिक ताण-तणाव, ओटीपोट दुखणे, कंबर दुखणे, थकवा चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात जर पाळी सारखी महिन्यातून दोनदा येत असेल, त्यावेळी पण तुम्ही दुर्लक्ष करू नका. अशावेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. कारण त्यांच्या योनीमार्गातील व गर्भाशय यात कर्करोगाच्या पेशी जागृत झाल्यामुळे, ही या गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार करून घ्यावेत. 

मासिक पाळी महिन्यातून दोनदा येऊ नयेत, यासाठी काही टिप्स ! 

  • जर तुमची मासिक पाळी महिन्यातून दोनदा येत असेल, अशावेळी त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखवावे व वेळीच उपचार करून घ्यावेत. 
  • तसेच अशा वेळी तुम्ही शारीरिक काम जास्त करू नये. 
  • पाळी दरम्यान तुम्ही ओटी पोटाला गरम , पाण्याच्या पिशवी ने शेकू शकतात. त्यांनी ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे यावर आराम मिळू शकतो. 
  • मासिक पाळी दरम्यान तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नका. त्यामुळे पोटात आग होण्याची संभावना असते. 
  • अशावेळी तुम्ही थंड पदार्थ खावे. 
  • मासिक पाळी दरम्यान भरपूर विश्रांती घ्यायला हवे, पुरेसे झोपायला हवे. 
  • तसेच तुम्ही योग्य आहार घ्यायला हवा. 
  • पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड हे बदलत राहावेत. कारण सहा- सात तासांच्या वर सॅनिटरी पॅड बदलले नाही, तर तुम्हाला योनिमार्गात इन्फेक्शन होण्याची संभावना असते. 
  • मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता राखावी व निरोगी राहावे. 
वाचा  दात दुखीवर आयुर्वेदिक औषधे

चला तर मग मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी दोन महिन्यातून दोनदा येत असेल, तर ती कोणत्या कारणामुळे येते. तसे आल्यास काय काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही  शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here