नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत शुगर फ्री का वापरतात त्याचे फायदे व नुकसान ,हल्ली आपण आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो. तर काही लोक असे असतात, की ते त्यांच्या आरोग्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष देतात. त्यामध्ये ते डाइट करतात. तसेच शुगर फ्री चा ही वापर करतात. शुगर फ्री चा वापर खूप काळापासून आंतरराष्ट्रीय लोक करतात. तसे शुगर-फ्री चे प्रॉडक्ट आता, आपल्याकडेही वापरायला लागलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार शुगर-फ्री हे आपल्या डाइट तसेच शरीरासाठी फार सर्वोत्तम पर्याय आहे. तर काही लोक त्यांच्या रेगुलर आहारात शुगर फ्री शिवाय कोणतेही पदार्थ गोड पदार्थ खात नाही.
शरीरात एकदाचा फॅट जमा झाला, की तुम्हाला खूप सार्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये डायबेटीस, हायपर टेन्शन, रक्तदाब, तसेच वजन वाढल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये पर्याय भरपूर असतात, त्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्य जपावे, व नियमित व्यायाम करायला हवेत. चालायला हवेत. तसेच आहारामध्ये तेलकट-तुपकट पदार्थ कमी करायला हवेत. यासारख्या गोष्टींमुळे तुमचे वजन तर कमी होतेच. शिवाय तुम्ही तंदुरुस्त राहतात. तसेच काही लोक त्याला पर्यायी उपाय म्हणून शुगर फ्री चे प्रॉडक्ट वापरतात. त्यामध्ये ते साखर बंद करून, शुगर फ्री ला मान्यता देतात. तर आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत, की शुगर फ्री प्रोडक्स म्हणजे काय? आणि त्याचा वापर कसा करावा? त्यामुळे आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होतात? तसेच त्याने काही दुष्परिणाम होतात की नाही? यासारख्या शंका असतील, तर चला जाणून घेऊया, त्या बद्दल थोडीशी माहिती, त्याचा वापर कसा करावा व कोणत्या वेळी करावा? चला जाणून घेऊयात!
Table of Contents
शुगर फ्री म्हणजे काय?
हल्ली आपल्या भारतीय पद्धतीमध्ये जेवणात गोड पदार्थ नसला तर जेवण अपूर्ण वाटते तसेच नियमित गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्या तर शरीरात वजन वाढीच्या समस्या होतात अशावेळी काही लोक पर्यायी उपाय म्हणून शुगर फ्री वापरतात तर शुगर फ्री म्हणजे नेमके काय तर शुगर-फ्री म्हणजे त्यामध्ये कृत्रिम प्रकारची साखर असते म्हणजे आपण जो पदार्थ खातो त्यात साखरेऐवजी त्या पदार्थांचे मिश्रण करून आपण खाऊ शकतो त्यामध्ये फ्रॅक्टोज नावाची साखर तयार करून आपण त्या पदार्थांमध्ये वापरतो तसेच शुगर फ्री मध्ये एस्पार्टम आणि सुक्रालोजमध्ये दोन प्रकार असतात.
शुगर फ्री का वापरावी?
बरेच वेळेला तुम्हाला वजनवाढी च्या समस्यांना तोंड द्यावे लागते. एकदाचे वजन वाढले, की तुम्हाला शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला सारखा-सारखा थकवा येणे, घाम येणे, तसेच डायबिटीज, उच्च रक्तदाब, हे विकार तसेच गुडघे दुखी, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच वजन वाढल्यामुळे तुम्ही डाइटचा तक्ता आखतात. त्यामध्ये साखर पूर्णपणे बंद करतात. पण साखर पूर्णपणे बंद करणे, हे शरीरासाठी घातक असते. अशावेळी तुम्ही पर्यायी म्हणून, शुगर फ्री चा वापर करू शकतात. त्या मध्ये कृत्रिम साखरेचे प्रमाण असते. तसेच मधुमेही लोक हे त्यांच्या आहारात शुगर-फ्री वापरू शकतात. शुगर फ्री ही कमी कॅलरी ची असते. तसेच हल्ली काही जण त्यांच्या तब्येतीविषयी फार काळजीपूर्वक असतात. तसेच काही स्त्रिया-पुरुष यांना स्लिम बॉडी म्हणजे बॉडीचा शेप व्यवस्थित असायला हवा, अशा साठी ते शुगर फ्री चे टॅबलेट त्यांच्या आहारात वापरतात. ते चहा मध्ये तसेच गोड पदार्थामध्ये टाकून खातात.
शुगर फ्री वापरण्याचे फायदे?
शुगर फ्री वापरल्याने आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात. तर ते नेमके कोणते? तर चला जाणून घेऊया.
मधुमेही लोकांसाठी फायदेशीर असते
ज्या लोकांना मधुमेह होतो, त्यांच्या शरीरात इन्सुलिनची पातळी कमी होते. त्यावेळी रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे, तुम्हाला मधुमेहासारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. अशा यावेळी तुम्ही पूर्णतः हा साखर बंद केल्यावर, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही अशा वेळी शुगर-फ्री टॅबलेट तुमच्या आहारात घेतले, तर तुम्हाला शरीरात इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तसेच त्याचा वापर करण्यापूर्वी, तुम्ही डॉक्टरांना ही विचारून घेऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, तेलकट-तुपकट पदार्थ खाल्ल्यामुळे, अति गोड पदार्थ खाल्ल्यामुळे, अपूर्ण झोपेमुळे, ताण-तणाव मुळे, तुमच्या वजन वाढी च्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळत आहे. अश्यावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात गोड पदार्थ जास्त खात असाल तर ते तुम्ही थांबवतात. त्यामुळे तुमच्या शरीरात त्याचा त्रास होतो. अचानक पणे गोड पदार्थ पूर्ण बंद केल्यावर, तुम्हाला थरथर होणे, तसेच अशक्तपणा जाणवणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात शुगर-फ्री टॅबलेटचा वापर केला, तर तुम्हाला वजन वाढी च्या समस्येवर नियंत्रण आणता येते. तसेच थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, यासारख्या समस्येवरही आराम मिळतो.
शुगर फ्री वापरल्याने होऊ शकतात हे फायदे?
- शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त झाले, की तुम्हाला भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी तुम्ही शुगर टॅबलेट वापरू शकतात.
- तसेच तुम्ही जर डायट प्लान मध्ये असाल, तर शुगरफ्री वापरू शकतात.
- शुगर फ्री टॅबलेट वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावर त्याचा प्रभाव पडतो. चेहरा चमकदार दिसण्यासाठी मदत मिळते.
- शुगर फ्री खाल्ल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते.
शुगर फ्री वापरल्याने होणारे दुष्परिणाम?
मित्रांनो, वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला शुगर-फ्री वापरल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात. ते सांगितलेले आहेतच. पण शुगर-फ्री चे प्रमाण जास्त झाले, तर तुम्हाला त्यापासून दुष्परिणाम होऊ शकतात. कारण कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच खाल्ल्याने, तिचे फायदे होतात. तिचे प्रमाण चुकले किंवा तिचे प्रमाण जास्त झाले, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसे शुगर फ्री चे आहे,
हल्ली मार्केटमध्ये तसेच स्वीट्स पदार्थांमध्ये, शुगर-फ्री केक, हलवा, मिठाई यासारख्या गोष्टी बनवल्या जातात, आणि ते आपण घेतो. पण ते आपल्या शरीरासाठी जास्त प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, आपल्याला घातक होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मळमळणे, तीव्र डोकेदुखी होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, तसेच ताण-तणाव असल्यासारखे वाटणे, यासारख्या समस्या होऊ शकतात. अशावेळी तुम्ही त्याचे प्रमाण हे प्रमाणातच घ्यावे. त्याचे प्रमाण जास्त होऊ देऊ नयेत. तसेच हे घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की शुगर-फ्री मुळे तुम्हाला होणारे फायदे व त्यापासून होणारे दुष्परिणाम नेमके कोणकोणते आहेत, तसेच त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद.